आज लाईट गेली ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2020 - 16:39

आज लाईट गेली. मुंबई अंधारात गेली. सकाळी उठल्या उठल्याच ही अशुभवार्ता समजली. सकाळ असल्याने अंधार जाणवला नाही. पुरेसा वारा वाहत असल्याने उकाड्यानेही हैराण केले नाही.

गीझर नसल्याने आंघोळीची गोळी घेतली आणि दिवसाची सुरुवात चांगली झाली. वर्क फ्रॉम होमच करायचे होते. लॅपटॉप शंभर टक्के चार्ज होता. पण मोजून साडेतीन तास काम केले आणि लॅपटॉप मेला डिक्लेअर केले. हाफ डे सुट्टी टाकून मोकळा झालो.

स्वयंपाकघरातील वाफा टाळायला जेवण बाहेरूनच मागवले. जेवण झाल्यावर हलकीशी डुलकी घेतली. आणि जरा उन्हं खाली सरकताच मुलांना घेऊन खाली गार्डनमध्ये खेळायला गेलो.

पावणेसात वाजले. अंधार पडला. पण लाईटीचा काही पत्ता नव्हता. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मिट्ट काळोख पडेपर्यंत खाली गार्डनमध्येच सो कॉलड निसर्गाच्या सानिध्यातच राहणे पसंत केले.
घरी आल्यावर मात्र पंधरा मिनिटातच कूकरची शिट्टी वाजली. अंगातून धारा वाहू लागल्या. सवयीने खिडक्या बंद केल्या आणि आत उकडू लागलो. अश्यात चहाची तल्लफ येऊनही पिण्यात अर्थ नव्हता.

मग वडिलांनी बाल्कनीत खुर्च्या टाकल्या. आधी पोरं गेली. पाठोपाठ मी गेलो. मागाहून आई आणि बायकोही हजेरी लावायला आल्या. नेहमीची लाईटीवर येणारी पाखरं दूरदूरपर्यंत नव्हती, ना मच्छरांचा त्रास होता. पण दूरदूरपर्यंत काळोखात बुडालेली नवी मुंबई, शीतल चांदणे आणि नीरव शांतता म्हणजे काय याचा प्रत्यय देत होती. चहा-खारी, फरसाण, पेढे आणि काजू कतली. खाताखाता गप्पांमध्ये नऊ कसे वाजले समजलेच नाही.

आणि मग अचानक एकच गलका झाला. लाईट आली. बायकोने एसी लावला. वडिलांनी आयपीएलची मॅच लावली. मी लॅपटॉप चार्जिंगला लावला. पोरं मेणबत्ती फुंकायला पळाली. आणि आई चटकन स्वयंपाकघरात जेवणाच्या तयारीला लागली....

मोबाईल हातात घेतला. सोशलसाईटवर मुंबई ब्लॅक आऊट बद्दल कॉमेंट वाचल्या. मुंबईकरांमध्ये याचे कौतुकच दिसत होते. तर मुंबईबाहेरचे या कौतुकाला चिडवत होते. खेड्यापाड्यात जिथे दर दिवसाआड वीज नसते त्यांचे दाखले देत मुंबईकरांची एक दिवस लाईट जाताच किती ती तडफड म्हणून टोमणे मारले जात होते.

पण चालायचंच!
जी गर्दी, प्रदूषण, अस्वच्छता, तुंबलेले पाणी, दाटीवाटीतली तरीही महागडी घरे, लोकलचा प्रवास,ट्राफिक जाम, दंगली, बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया... सर्वसामान्य मुंबईकरांचे जे प्रॉब्लेम आहेत ते तरी कुठे बाहेरच्यांना असतात.

आणि अचानक तासाभराने पुन्हा लाईट गेली. पण आता अरे देवा, ओह शिट, वगैरे काही झाले नाही. मुलांचे जेवण उरकले होते. आमचे जेवण तयार होते. पुन्हा मेणबत्त्या पेटवल्या. दोन्ही दांपत्यांनी आपापल्या सोयीने मेहफिल जमवत कॅंडल लाईट डिनरचा आस्वाद घेतला. माश्याचे काटे काढायला त्रास नको म्हणून मी मात्र मोबाईलचा टॉर्च ऑन करत जेवणे पसंत केले. जेवण झाल्यावर बसल्या बसल्या भेंड्याचे बैठे खेळ सुरू झाले.

झोपायला जाण्याआधी पुन्हा लाईट आली. पण ती येताच झोपच उडाली. त्यामुळे हे लिहायला घेतले.

उद्या पुन्हा असाच अंधारातील दिवस आणि रात्र जगायला तितकीशी मजा येणार नाही. पण रोजच्या रुटीनमध्ये एक वेगळा दिवस बरा वाटला. तुमचेही आजचे वा आधीचे काही लाईट गेल्याचे अनुभव असतील तर जरूर लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वर्षांपूर्वी अमेरिकेतही पॉवर कट झालेला. त्या घटनेलाही अभुतपूर्व प्रसिद्धी मिळाली होती. चला आता मुंबई देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणायला हरकत नाही.

जवळ जवळ दोन ते अडीच तास ठाणे आणि मुलुंड दरम्यान पंचवटी एक्सप्रेस मध्ये बसुन होतो. मुंबई च्या उकाड्याचा चांगलाच अनुभव मिळाला.....

मुंबई आणि महाराष्ट्र मधील काही शहर सोडली तर देशात 1 पण असे शहर नाही जिथे 24 तास वीज उपलब्ध असते.
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
जी दिल्ली पण वीज जाण्याने रोज हैराण असते त्या केंद्र सरकार चे अधिकारी महाराष्ट्र ला शहाणपण शिकवायला मुंबई मध्ये येणार आहेत.
प्रतेक कठीण प्रसंगी परप्रांतीय लोकांनी मुंबई ची साथ सोडलेली असते.

आमच्या कडे असा दिवस दर महिन्याला असतो.
तामिळनाडू मधे प्रत्येक महिन्यात एक दिवस पूर्णपणे लाइट नसते.सकाळी 9 ते संध्याकाळी 7,7-30 पर्यंत.
दोन दिवस आधीच सांगतात या दिवशी लाइट नसणार म्हणून..
आणि ते असूनही अधूनमधून पण सुरूच असते.. एकदा गेली कि दोन तीन तास नाही येत लाईट.

सहा तास लाईट नव्हते म्हणे.

काँग्रेसने 60 साल मे क्या किया , ह्याचे उत्तर त्या सहा तासात भक्तांना मिळाले असेल

चला आता मुंबई देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणायला हरकत नाही.
>>>>

आता??

प्रॉब्लेम टाटाचा असु शकतो नाही असे नाही पण खोलात शिरल्यावर आपल्या(बायकोच्या) राक्षसी राजकीय महत्त्वकांक्षेपायी कोणी महाराष्ट्रीयन असे करु शकतो का अशी शक्यताही काल एका टीव्ही चॅनेलवर बोलुन दाखवली.

महाराष्ट्राचे विघ्नसंतुष्ट अनाजी प्रत्येक चौकात बसलेले आहेत (काम धंदे नसल्यामुळे) हे आजचे वर्तमान आहे.

माझ्या संघ सहकाऱ्याने light नाही म्हणून दिवसभर सुटी घेतली
Client च्या तोफेच्या तोंडी मी सापडले.. एकटी.. Sad
त्याचं module explain करायला

गीझर नसल्याने आंघोळीची गोळी घेतली>>>
मुंबइत गिझर लागतो, ऑक्टोबर मध्ये! Uhoh

अरे वा बाबा नवीन घरात रहायल आले का? छान झालं. कुठ करोना काळात एकटे रहात होते उगाच.

तांत्रिक अडचणी मुळे ग्रीड फेल होवू शकते.
देशात असे अनेक वेळा झाले आहे.
उत्तरेच्या राज्यात हे नेहमीच होते.
पण किरीट सोमय्या आणि अर्धवट हिंदी न्यूज
चॅनल ह्यांनी लगेच सरकार वर आरोप करायला survat केली जसे देशात पहिल्यांदाच असा प्रसंग घडला आहे.
1 ते 2 तासातच च वीज पुरवठा परत सुरू झाला तेव्हा मात्र सरकार चे कौतुक करायला हे विसरले.

पोस्ट कर्त्याची पोस्ट ही काल्पनिक आहे.
त्यांनी वर्णन केलेली घटना ही फक्त कल्पना आहे त्याचा सत्य प्रसंग शी काहीच संबंध नाही.

@ मानवमामा
हो सवयीने करतो गरम पाण्याने आंघोळ. किंबहुना सर्दीचा त्रास असल्याने मुद्दाम थंड पाणी टाळतो. अन्यथा गर्मीच्या सीजनमध्ये घरी असताना दुपार संध्याकाळ थंड पाण्यात आंघोळ करण्यातच मजा. पोरांसोबत आठवड्यातून एक दोनदा करतो.
पण बहाणा मिळाला तर आंघोळ टाळायलाही आवडते. आंघोळीचे म्हणजे लग्नाच्या अगदी उलट असते. आधी आंघोळीला जायला आळस येतो. एकदा करायला सुरुवात केली की बाहेर पडावेसे वाटत नाही.

आणि हो, बाबा येतील लवकरच कायमचे ईथे. सध्या विकेंडला येतात. सोमवारी जातात. काल लाईट नसल्याने थांबले.

@ Hemant
काल्पनिक काही नाही. सरळसोट तर घटना आहेत. त्यात काय अविश्वसनीय वाटावे? गेलेल्या लाईटीचे बिल बावीस हजार आले तर दाखवा ना अविश्वास Happy
जोक्स द अपार्ट, वरील घटनांपैकी फक्त अंधारात केलेल्या मत्स्याहाराचा फोटो पुरावा आहे माझ्याकडे, दाखवू का Happy

किशोर,
नेमके कारण माहीत नाही. हल्ली न्यूजला खरे खोटे करायचा त्रास मी घेत नाही. सगळ्यात राजकारण असते.

@ मृणाली
आमच्याकडे सकाळी उठल्यापासूअ रात्री झोपेपर्यंत गेलेली. एकदा फक्त तासाभरासाठी आली.
जवळच असलेल्या माझ्या सासुरवाडीतही सेम अशीच्घ स्थिती. फक्त त्यांच्याकडे आलेली तासभर वीज वेगळ्या तासाला आलेली.

मुंबइत गिझर लागतो, ऑक्टोबर मध्ये! Uhoh
>>>>

बाई दवे,
गेले चार पाच दिवस ईथे पावसाळी वातावरण आहे. आणि आज आत्ता तर ईतका कोसाळतोय आम्ही लाईट असूनही दारे खिडक्या आणि फंखे बंद करून बसलो आहोत Happy

आमच्या ठाण्यात पण सकाळी ८:३०-९ ला लाईट गेली होती. तीन हात नाका परिसरात रात्री ८ वाजता आली आणि आमच्या पाचपाखाडी ९ वाजता आली.

आम्हाला तर सवयच झाली आहे..
जरा वारा पाऊस आला कि संध्याकाळी गेलेली लाईट दुसर्या दिवशी सकाळी येते काही वेळा.

आंघोळीचे म्हणजे लग्नाच्या अगदी उलट असते. >> जरा समजावुन सांगता का. कोणी लग्नाळु असेल तर त्याला फायदा होईल.

जरा समजावुन सांगता का
>>>>

आंघोळीबाबत आधी नको ती आंघोळ वाटते पण एकदा पाण्याचे चार तांबे अंगावर घेतले की पाण्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही.

लग्नाबाबात नेमके उलटे होते. आपण छान वयात आलो असतो. नैसर्गिक भावना मनात उत्पन्न झाल्या असतात. त्यामुळे कधी एकदा लग्न होते असे वाटते.
पण एकदा झाले की मग ... पुढचं सांगायची गरज आहे का? मायबोलीवरील चार पैकी तीन धागे तर विवाहीतांच्या समस्यांवर असतील.

सहा तास लाईट नव्हते म्हणे.
काँग्रेसने 60 साल मे क्या किया , ह्याचे उत्तर त्या सहा तासात भक्तांना मिळाले असेल
Submitted by BLACKCAT on 13 October, 2020 - 09:10

लोड शेडींगचे दिवस आठवले. रोज ३ तास वीज नसायची.
Submitted by sonalisl on 13 October, 2020 - 18:03

45 वर्षापूर्वी सुधा माझ्या गावात 24 तास वीज होती.
घरात सुद्धा आणि शेतात सुद्धा.
महाराष्ट्र नेहमीच सर्व बाबतीत देशात आघाडीवर होता .
आता हे बिगर काँग्रेसी आल्या पासून राज्याची अवस्था खराब होत चालली आहे तरी पण देशात अग्रेसर च आहे.

Pages