आज लाईट गेली ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2020 - 16:39

आज लाईट गेली. मुंबई अंधारात गेली. सकाळी उठल्या उठल्याच ही अशुभवार्ता समजली. सकाळ असल्याने अंधार जाणवला नाही. पुरेसा वारा वाहत असल्याने उकाड्यानेही हैराण केले नाही.

गीझर नसल्याने आंघोळीची गोळी घेतली आणि दिवसाची सुरुवात चांगली झाली. वर्क फ्रॉम होमच करायचे होते. लॅपटॉप शंभर टक्के चार्ज होता. पण मोजून साडेतीन तास काम केले आणि लॅपटॉप मेला डिक्लेअर केले. हाफ डे सुट्टी टाकून मोकळा झालो.

स्वयंपाकघरातील वाफा टाळायला जेवण बाहेरूनच मागवले. जेवण झाल्यावर हलकीशी डुलकी घेतली. आणि जरा उन्हं खाली सरकताच मुलांना घेऊन खाली गार्डनमध्ये खेळायला गेलो.

पावणेसात वाजले. अंधार पडला. पण लाईटीचा काही पत्ता नव्हता. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मिट्ट काळोख पडेपर्यंत खाली गार्डनमध्येच सो कॉलड निसर्गाच्या सानिध्यातच राहणे पसंत केले.
घरी आल्यावर मात्र पंधरा मिनिटातच कूकरची शिट्टी वाजली. अंगातून धारा वाहू लागल्या. सवयीने खिडक्या बंद केल्या आणि आत उकडू लागलो. अश्यात चहाची तल्लफ येऊनही पिण्यात अर्थ नव्हता.

मग वडिलांनी बाल्कनीत खुर्च्या टाकल्या. आधी पोरं गेली. पाठोपाठ मी गेलो. मागाहून आई आणि बायकोही हजेरी लावायला आल्या. नेहमीची लाईटीवर येणारी पाखरं दूरदूरपर्यंत नव्हती, ना मच्छरांचा त्रास होता. पण दूरदूरपर्यंत काळोखात बुडालेली नवी मुंबई, शीतल चांदणे आणि नीरव शांतता म्हणजे काय याचा प्रत्यय देत होती. चहा-खारी, फरसाण, पेढे आणि काजू कतली. खाताखाता गप्पांमध्ये नऊ कसे वाजले समजलेच नाही.

आणि मग अचानक एकच गलका झाला. लाईट आली. बायकोने एसी लावला. वडिलांनी आयपीएलची मॅच लावली. मी लॅपटॉप चार्जिंगला लावला. पोरं मेणबत्ती फुंकायला पळाली. आणि आई चटकन स्वयंपाकघरात जेवणाच्या तयारीला लागली....

मोबाईल हातात घेतला. सोशलसाईटवर मुंबई ब्लॅक आऊट बद्दल कॉमेंट वाचल्या. मुंबईकरांमध्ये याचे कौतुकच दिसत होते. तर मुंबईबाहेरचे या कौतुकाला चिडवत होते. खेड्यापाड्यात जिथे दर दिवसाआड वीज नसते त्यांचे दाखले देत मुंबईकरांची एक दिवस लाईट जाताच किती ती तडफड म्हणून टोमणे मारले जात होते.

पण चालायचंच!
जी गर्दी, प्रदूषण, अस्वच्छता, तुंबलेले पाणी, दाटीवाटीतली तरीही महागडी घरे, लोकलचा प्रवास,ट्राफिक जाम, दंगली, बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया... सर्वसामान्य मुंबईकरांचे जे प्रॉब्लेम आहेत ते तरी कुठे बाहेरच्यांना असतात.

आणि अचानक तासाभराने पुन्हा लाईट गेली. पण आता अरे देवा, ओह शिट, वगैरे काही झाले नाही. मुलांचे जेवण उरकले होते. आमचे जेवण तयार होते. पुन्हा मेणबत्त्या पेटवल्या. दोन्ही दांपत्यांनी आपापल्या सोयीने मेहफिल जमवत कॅंडल लाईट डिनरचा आस्वाद घेतला. माश्याचे काटे काढायला त्रास नको म्हणून मी मात्र मोबाईलचा टॉर्च ऑन करत जेवणे पसंत केले. जेवण झाल्यावर बसल्या बसल्या भेंड्याचे बैठे खेळ सुरू झाले.

झोपायला जाण्याआधी पुन्हा लाईट आली. पण ती येताच झोपच उडाली. त्यामुळे हे लिहायला घेतले.

उद्या पुन्हा असाच अंधारातील दिवस आणि रात्र जगायला तितकीशी मजा येणार नाही. पण रोजच्या रुटीनमध्ये एक वेगळा दिवस बरा वाटला. तुमचेही आजचे वा आधीचे काही लाईट गेल्याचे अनुभव असतील तर जरूर लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसभर लाईट नव्हती?
नरीमन पॉईंटला सकाळी १० ते १२ असे दोनच तास लाईट नव्हती.
दादरला १० ते ४.

आमच्याकडे 9.30 ते 12.30 एवढा वेळ लाईट नव्हती.त्याआधी सव्वनऊला मी टोस्टर लावला होता आणि 10 मिनिटांनी लाईट गेली. ट्रिपर खाली आला होता.मला वाटले टोस्तर मुळे लाईट गेली असावी.पण नंतर electrician ne durust kele तर वायर लू ज झाली होती.
नंतर बिल्डिंग मध्ये लाईट आली तरी आमच्या कडे नव्हती.परत 2 वेळा ट्रीपर ऑन ऑफ केल्यावर supply suru zala.chenburla ratri 8 वाजता वीज आली.

कदाचित कधीही लोड शेडींग पाहिले नसल्यामुळे तुम्हाला हा अनुभव नविन वाटला असेल. एक संध्याकाळ निवांतपणे आपल्या परिवारासोबत गेली याचे समाधान असू द्या. बाकी रोज पळायचे आहेच.

>>हे बिगर काँग्रेसी आल्या पासून राज्याची अवस्था खराब होत चालली आहे तरी पण देशात अग्रेसर च आहे<<

ओ सातवी ड.... राज्यात कॉंग्रेसचेच सरकार आहे की Wink
विसरलात काय?

मुम्बईत वीज कोण पुरवतो, राज्यात वीज कोण पुरवतो कशाचा काहीही पत्ता नसणारे आयडी कुठल्याही धाग्यावर जाउन राजकारणाचा चिखल करतात Wink

हे बिगर काँग्रेसी केंद्रात आल्या पासून राज्याची अवस्था खराब होत चालली आहे तरी पण महाराष्ट्रात काँग्रेस रावा सेना असल्याने आपले राज्य देशात अग्रेसर च आहे<

त्यांना असे म्हणायचे आहे

तो एक काही झाले की अनाजीपंत अनाजीपंत बोंबलणारा जातीयवादी आयडी कुठल्याही गोष्टीत माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला मध्ये आणून स्वताचे संस्कार दाखवत फिरतो तेंव्हा त्याची फडफड बघून मात्र मजा येते Wink
किती वेळा हाकलून दिले तरी नावापुढे एकेक टिंब वाढवून परत येतो.... काही दिवसांनी ह्याच्या नावापेक्षा टिंबे जास्त होतील Wink

>>त्यांना असे म्हणायचे आहे<<

त्यांच्या अंतर्मनातले कळते की काय तुम्हाला? का तुमचीच सावली आहे ती Wink
सातवी ड चे वकील Happy

कदाचित कधीही लोड शेडींग पाहिले नसल्यामुळे तुम्हाला हा अनुभव नविन वाटला असेल
>>>
@ सियोना
हो
दुर्दैवाने हे खरे आहे
त्यामुळे सोशिकता फार कमी झालीय.
नाही म्हणायला गडचिरोलीच्या वास्तव्यात अनुभवलेली लोडशेडींग वा वारंवार लाईट जाणे. पण तिथले माझे लाईफ फार संथ असल्याने लाईट असतानाही फार काही वेगळे करायचो नाही.

आज गुरुवार
इथे दिवसभर light नाही
हे नेहमीचे आहे

तेच तर मलाही वाटलं.. आज लाईट गेली , असाही विषय असु शकतो काय??? >>>

अरे देवा आता 'आज दिवसभर लाईट गेली नाही' असा धागा येतो की काय.

एक 'ग्रिड फेल' मंत्री, राज्याचा उर्जा मंत्री असताना मुंबईची लाईट जाते ?? कमाल आहे !

तेच तर मलाही वाटलं.. आज लाईट गेली , असाही विषय असु शकतो काय?
>>
हो शीर्षक चुकलेच. आज मुंबईत लाईट गेली असे शीर्षक हवे होते.

अरे देवा आता 'आज दिवसभर लाईट गेली नाही' असा धागा येतो की काय.
>>
ज्यांच्याकडे वरचे वर जात राहते त्यांनी हा धागा काढायची संधी उचलावी.

दिल्ली भारताची राजधानी आहे.
तिथे वीज कधी ही जाते .
पाणी प्रतेक घरात नळाने येत नाही.
बजबजपुरी आहे.
त्या मानाने मुंबई आणि महाराष्ट्र स्वर्ग आहे.
पण भारतीय मीडिया त्याचा इश्यू करत नाहीत.
पण पूर्ण जगाला माहित आहे भारताची राजधानी अशी असेल तर देश कसा असेल.

Tanishk
टाटा ची कंपनी आहे.
आणि देशातील एकमेव उद्योगपती टाटा आहेत त्यांनी त्यांच्या कंपनी मधील एका पण कामगार ना कामावरून covid19 चा बहाणा करून काढले नाही .
बाकी अंबानी ,अडाणी ह्यांनी covid चा फायदा घेवून एक तर कर्ज बुडविली नाहीतर कामगार ची देणी बुडविली.
Tanishk वर धार्मिक उन्मादाने टीका करणारा सर्वात मूर्ख व्यक्ती असेल.

छे छे... काहीही वाटते.. ते टिपिकल परकीय शक्तींचा हात आहे टाईप्स झाले.. असे असते तर एवढ्यात आपणही बदला घेतला असताच

Pages