वडापाव फॅन क्लब

Submitted by VB on 9 October, 2020 - 01:01

लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही Happy
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.

सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते Happy

असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.

*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हायझेनबर्ग ते बरेचदा ओरडायचे कारण तिथे लोक वाट्टेल तितका वेळ आणि वाट्टेल तेवढया मोठया आवाजात बोलत बसत अगदि त्यांच्या घराजवळ प्लस तिथेच पुढे गाड्या पण लावत. आम्ही खूपवेळा शिव्या खाल्ल्यात त्यांच्या Happy

ग्रॅज्युएट वडापाव नावामागे काही स्टोरी आहे का?
>>>>

वडापाववाला ग्रॅज्युएट होता ईतकीच सिंपल स्टोरी आहे. बहुधा शिवनेसेच्या सहकार्याने गाडी टाकली होती. गाडीवर आपले ग्रॅज्युएशनचे सर्टीफिकेटही लावले होते Happy
पण अर्थात तो काळ वेगळा होता. तेव्हा दर दुसरया घरात चार ईंजिनीअर जन्माला नाही यायचे. एखादा ग्रॅज्युएट मराठी मुलगा न लाजता वडापावची गाडी लावतोय. आणि तो छान असल्याने धंदाही चांगला होतोय हे एक उदाहरण म्हणून त्या काळात ऊत्तम होते.

तिलक समोर गाड्या लावायला जास्त जागाच नव्हती.. बसायला/ उभे राहायला ही थोडीशीच जागा.
त्यामुळे निम्म्याहून जास्त पब्लिक आणि गाड्या रस्त्यावरच Happy

जवळच्या शंकर विलास हॉटेलचे पण वडे आवडायचे, २० पैशाला एक असायचा तेव्हापासून खाल्लेत. त्यांचे सामोसे पण सुपर्ब.

ठाकुर वडापाव पण आवडतो, आदित्य मंगल कार्यालयासमोर. त्यांचा मधला मालमसाला सॉलिड असतो. कैरीच्या दिवसात कैरीही असते त्यात (वड्यात नाही, पावात वड्याबरोबरचा मालमसाला).

बोकलत यांनी उल्लेख केलेला गोरे वडा पाव पण आवडतो. हे गोरे कल्याण खिडकी वडा वाल्यांचे नातेवाईक आहेत.

आता lockdown मध्ये नाही आणि नंतरही नाही पण बरेचदा midc तला एक मोठा रोड जिमखाना रोडच्या नंतरचा, जिथे संपतो तिथे माणिकरत्न समोर एक गाडी लागते, आता नाव साईतीर्थ आहे पण आम्ही माणिकरत्नचा वडा पाव म्हणतो कारण मालक त्या बिल्डींगमधे राहतात बहुतेक आणि आधी गाडी त्या सोसायटीबाहेर लावायचे, तो सुपर्ब असतो त्यात मध्ये कांदा आणि पिठाचा चुरचुरीत चुरा असतो. वडा चव अप्रतिम, बाहेरचा भाग फार जाडसर नाही. ह्यांची चटणी फार नाही आवडत पण वडा मस्तच.

नालासोपारा इथे होतो तेव्हा आचोळे रोड च्या मजिठीया पार्क लेन मध्ये सुरु झाल्यावर एक माय लेक गाडी लावायचे, त्यांचा छान होता. नंतर कपोळ स्कुलजवळ आमच्या सोसायटीतल्या एकांनी पण गाडी सुरु केली, असं समजलं पण ते आता आम्ही इथे आल्यावर. त्या प्रभाचा जाऊन खायचा आहे, फार गोड कष्टाळू आहे ती.

डोंबिवली वेस्टला जयहिंद कॉलनीत चुलत बहिणीकडे एकदा गेलेले तेव्हा भाच्याने सामोसे कुठून आणलेले माहिती नाही छान होते तसेच ती बहिणी स्टेशनजवळ अंबिका नगरमधे राहायला आली तेव्हा तिथून कुठून वडे आणलेले तेही मस्त होते. हा उल्लेख कदाचित त्या एरियात राहणाऱ्या कोणाला माहिती असतील ह्या गोष्टी अमुक दुकानात छान मिळतात म्हणून केलाय. चांगल्या खाण्याला विसरू नये ब्वा Lol

डोंबिवली इस्ट स्टेशनजवळ कुंजविहारीचा पण काही वर्ष मिळतो छान असतो. पण मागे एकदा जरा बरा वाटला. आता परत खूप महिने नाही गेले कुठे वडे खायला.

चविष्टचे चांगले असतात वडे आणि लसणीचे तिखट तसेच बल्लाळेश्वरचे वडे मस्त होते.

दादर श्रीकृष्णचे चांगले असतात पण जेव्हा पहिल्यांदा खाल्ला तेव्हा डोंबिवलीतला बाईचा वडा त्यापेक्षा भारी वाटलेला. दादरवाल्यांनो माफ करा. तुलना होते नकळतपणे, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणचे जास्त खात असतो तेव्हा.

बाय द वे हेडर फोटोत ब्रेड आहे, वडा पाव म्हटलं की लादीपाव असतो आमच्याकडे. मिसळपाव, पावभाजी सर्वच लादीपाव सोबत.

पुण्यातला अजून चविष्ट वडापाव: हत्ती गणती वरून येऊन टिळक रोड क्रॉस केला की थोड्याच अंतरावर एक हातगाडी असते. पूर्वी एक जाड चष्मा वाले अण्णा असायचे. आता त्यांचा मुलगा असतो बहुदा.. >>
विठ्ठलमंदिरा जवळाच्या ह्या वडापाव गाडीवर खुपदा वडापाव खाल्ला. वडापाव चांगला होता, पण गाड्याची अवस्था फारच कळकट्ट असायची.
तिलक चा पण वडापाव + चहा काँबो मस्त लागायचा.

काही आवडलेले वडापाव -
- कँपातला गार्डन वडापाव
- शिरवळचा श्रीराम वडापाव.
- वाईचा, बस स्टेशन समोरचा.
- बालगंधर्व जवळी जोशीचा वडापाव चांगला वाटला.
- लोणावळ्याचा ( भुशीडॅम जवळील). बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा.
- नांदेडचा भाग्यनगरचा
- लातुरचा गांधीचौकातला.

निरु, मुळगावचा वडापाव मी खाल्लाय बरेचदा. मला तो वडा पातळ थोडा लिबलिबित वाटतो चव जरी चांगली असली तरी, खरतर त्यांची स्पेशालिटी म्हणजे ठेचा चटणी जी वडापाव सोबत देतात , ती अप्रतिम आहे.
पण तिथले वडापाव पेक्षा मिसळ पाव भारी आहे. दोन तीनदा सह्याद्री ला गरमागरम चिकन भाकरी थाळीवर ताव मारलाय. जेवण रुचकर तर होतेच पण भाकरी डायरेक्ट तव्यातून ताटात, मस्तच.
लग्नानंतर नवऱ्यासोबत जायचा प्लॅन होता पण लगेच लॉक डाउन आला, आता बघू कधी जमतंय

पुणे सोलापूर हायवेवर यवतच्या थोडे पुढे भुलेश्वरला जाण्यासाठी जे वळण आहे तिथे एक दुकान आहे. अप्रतिम वडापाव खाल्ला तिथे.

<<<बाय द वे हेडर फोटोत ब्रेड आहे, वडा पाव म्हटलं की लादीपाव असतो आमच्याकडे.>>> अंजुताई, तो फोटो अतुल यांचा कोल्हापूर वडापाव चा आहे. बहुदा वेमांनी अपलोड केलाय.
माझ्याकडे तर फोटोच नाहीये सध्या.
वडापाव असला की फोटो काढेस्तोर उसंत कुणाला असते म्हणा, नकळत फडशा पडतो त्याचा

अंजुताई, तो फोटो अतुल यांचा कोल्हापूर वडापाव चा आहे. बहुदा वेमांनी अपलोड केलाय. >>> अच्छा अच्छा. हो कोपुत असे ब्रेड फेमस आहेत.

वडापाव असला की फोटो काढेस्तोर उसंत कुणाला असते म्हणा, नकळत फडशा पडतो त्याचा >>> अगदी अगदी. आता कधी वडापाव खातेय असं झालंय मला. मधे lockdown मधे वडे घरीच केलेले दोन तीनदा, पाव रेडीमेड मग unlock सुरु झाल्यावर वडापाव दोनदा रेडीमेड आणले.

पाटकर शाळेजवळचा वडाही छान असतो एकदम टेस्टी (आता त्या वडेवाल्या मावशी स्वर्गात देवांना वडे तळून तृप्त करत असतील) आता कोण चालवतं माहिती नाही.>>> कवे त्यांच्याबद्दलच सविस्तर लिहिलंय बघ मी. आता तिथे वडा पाव मिळतो, पण कोणी दुसरे चालवते. त्या बाईंनी आधीच विकलं, का ते कारण ऐकून मला फार वाईट वाटलं. तुला माहिती नसेल तर मेसेज करेन.

>>कोल्हापूर वडापाव चा आहे. बहुदा वेमांनी अपलोड केलाय.<<
माबोवरच्या नविन सुविधे नुसार पहिला (अप्लोडेड) फोटो वर शिर्षकात दिसतो, बाय डिफॉल्ट. दुर्दैवाने, नेमका स्लाइस्ड ब्रेड असलेला फोटो वर आला आहे, जो वडापावचा घोर अपमान आहे. वडा/मिसळ/भाजी पावासोबत स्लाइस्ड ब्रेड देणार्‍यांना अजिबात क्षमा नाहि. देवाच्या नैवेद्यावर चपाती, किंवा बासुंदि बरोबर चपाती/भाकरी देण्यासारखं आहे ते... Proud

मस्त धागा.
सर्वांच्या आठवणी मस्त. असे खास लक्षात राहण्यासारखे वडे खाल्ले नाहीत कुठे. पहिला वडा मुलुंड पूर्वेच्या योगेश्वरीचाच असावा.
त्यातल्या त्यात आवडतो तो किंग जॉर्ज (दादर) बाबू वडा, प्रकाश आणि मामा काणे (दादर) वडा. वझे (केळकर) कॉलेजच्या कॅन्टीनचाही आवडायचा.
मला पंजाबी सामोसे जास्त आवडतात. डी दामोदरचे. Happy

फार फार वर्षापूर्वी कोल्हापूर एस टी stand वर वडे खाल्ले. जाड जाड आवरण आणि हळद भरपूर आत, बाकी काही टेस्टच नाही. कोकण पुणे बस प्रवासात खाल्ले होते. अर्थात एकदा आलेल्या अनुभवावरून मी नावं नाही ठेवणार, दुसरीकडे चांगले मिळत असतील.

एकदा श्रीरामपूरहून कोकणात जाताना रंकाळ्यावर भेळ खाल्ली, सुपर्ब होती. परत कोपुत वडे खायचे डेरिंग नव्हतं. तसेच परत येताना हायवेवर मिसळ खाल्लेली एका छोट्या हॉटेलात, टेस्टी होती सोबत मोठा एक स्लाईस ब्रेड. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसलेला लादी पावाऐवजी ब्रेड बघून. मायबोलीमुळे बऱ्याच कोपुकरांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे आता माहिती झालं की तिथे मिसळ आणि वड्याबरोबर स्लाईस ब्रेड मिळतो.

कोकण कुणकेश्वर देवळाजवळ पण चांगला वडापाव मिळालेला.

कविन, थॅंक्यू सो मच. मी किती दिवसांपासून नाव आठवत होते.
अमा, नक्की जाऊन बघा आणि असेल तर खाऊनही बघा. वडापाव व त्याला लावलेल्या चटण्याही बेस्ट असायच्या त्याच्या. वडापाव सकाळी ११ नंतर मिळायचा. तोपर्यंत भजीपाव. तो ही फार भारी होता.

पार्ल्याच्या बाबू वडापावचे कोणी फॅन नाहीत का इथे? मागच्या वर्षी एकदा स्टेशनजवळ होतो तर दिनानाथसमोर दुकानं आहेत त्या गल्लीत एका टपरीवर खूप गर्दी दिसली. लोकं लाईन वगैरे लावून होते. म्हणून तिथल्या मोच्याला विचारलं तर म्हणाला वडापाव मिळतो इथे. सचिन खेडेकर व त्याची बायको पण होते त्या लायनीत. आता एकदा खाऊन बघायला हवा गेल्यावर.

मुंबईला एकदा गेलेले, तर खाल्ला होता, ठिक आहे.

श्रीकृष्णा वडा प्लाझा समोरचा पण ओके आहे. तिखट नसतो.
मला वडा एकदम तिखट नसला तरी खमंग आवडतो...

पाटोणेपाडा, येऊर इथे दर रविवारी खालपासून चालत जायचा नित्य परिपाठ..
तिथपर्यंत चालत गेलं की शेवटच्या बस स्टॉप पाशी ही टपरी आहे.
वडा चवीला चांगला असतो. अगदी अप्रतिम वगैरे नाही. पण चालून आल्यावर हा वडापाव आणि काचेच्या ग्लासमधून गरम गरम चहा म्हणजे स्वर्गसुख...
चालतच जायच्या परतीच्या प्रवासाला पोटाला आतून मस्त गिलावा झाल्यामुळे उर्जा मिळते ते वेगळंच..
हा फोटो दिलाय तो वड्यापेक्षा त्या झाऱ्यावर तळल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीसाठी...


ऋन्मेष धन्यवाद Happy

आडो वेलकम. मामाकडे जाताना रिक्षावाल्यांना मेहुल टॉकीज खूण सांगायची हे पक्क डोक्यात बसलेलं असल्यामुळे ते नाव लक्षात राहीलय Happy

वावे , टिस्मा चा वडा मस्त च् घरगुती...
ते चालवणारे दांपत्य ओळखीचे झाले होते..

कामतचा वडा कुणी खाल्ला कि नाही... दह्यातला !

स्वीटहोमचे वड्याइतकेच सांबार आणि शेव अत्यंत चविष्ट.. कित्येक वर्षे चव जशीच्या तशी जपली आहे..

मी लहान होतो त्यावेळी अडीच रुपयाला वडापाव मिळायचा. जत्रेत दोन रुपयांचा वडापाव खाल्ल्याचं पुसटसं आठवतंय.

लतांकुर, अगदी अगदी. काही खाऊ नको म्हटलं तरी वडापाव हा आॅटोफे. त्यामुळे घरचे अगदी न बोलता समजून घेऊन माझे वडालाड पुरवतात.
वर्णिता, वडापाव माझाही जीव की प्राण. पण नुसतेच वडे खायला तितकी मजा येत नाही. पावाची व त्यातील मसाल्याची सोबत असली ना की वडा अगदी खुलतो व खाणाराही खुलतो. हेमावैम.
राज, स्लाईस पावाबरोबर वडा खायची वेळ लॉकडाऊन ने आणली एकदा. वडे घरी सहजपणे करता येतात पण लादीपाव वगैरे बेक करणं हे शक्य नाही झालं. तेव्हा तडजोड करावी लागली खरी.
बाकी वडापाव अगदी सुमार (खराब न झालेला) चवीचा असला तरी अनमान न करता खाते. उदाहरणार्थ एकदा फलटण स्टँड वर खाल्ला होता.
गुजरातेत बटाट्याला बटाका म्हणत होते हे कळायला वेळ लागला.. तोपर्यंत बटाकावडा ही पाटी वाचून आधी जरा बुचकळ्यात पडलेले.
अवांतर - श्राद्धाकरिता ते भरड्याचे वडे असतात त्याऐवजी बटाटे वडे असतील तर? असा छुपा विचार येतो कधी कधी.

मला वडापाव पेक्षा नुसताच वडा जास्त आवडतो..श्रीकृष्ण म्हणजेच छबिलदासचा वडा तर मस्तच.. उडदाची डाळ फोडणी दिलेला..फार तिखट नसतो.. पण खोबऱ्याच्या ओल्या चटनीबरोबर खायला मजायेते..कीर्ती कॉलेजचा भजीचा चुरा घातलेला झणझणीत..वडापाव..६ वर्षांपूर्वी एकदा महाबळेश्वरहुन येताना वाई रोडवर जिथे घरगुती मसाले गाडीवर विकतात.. तिथे वडापाव खाल्ला..एकदम मस्त होता..नाव आठवत नाही ..गाडीवरचा होता पण सगळ्यांना ड्रेस ऍप्रॉन होता.. वडापाव प्लेट मध्येच दिला होता चटणी, कांदा, आंब्याचे लोणचे, आणि प्लेटमध्येच थोडेसे घट्ट गोड दही दिले होते..दह्यामुळे हेवी वाटले नाही.. गोरेगावला सुरभीच्या गल्लीत समर्थ (धोंडिबा) वडापाव पण एकदम झणझणीत..
दिवाडकर नाव ऐकून कर्जत पेट फोर्ट ट्रेक हुन येताना वडापाव खाल्ला .. पण थंड एवढा छोटा.. आणि मिळमिळीत वाटला..
आता मोहरी, उडदाची डाळ, लसूण आले, मिरची कोथिंबीर, पुदिना कढीपत्ता बारीक चिरून फोडणीत देऊन घरीच बनवते आणि घरचीच खोबऱ्याची लसूण चटनी..फ्रेश तेलातला ( म्हणजेच तेल एकदाच गरम केलेले) आता आवडी निवडी डाएट सांभाळून..

आता हेडर मधला फोटो पाहून जीव भांड्यात पडला.व डापावसारखाच वडापाव दिसतोय. Wink

Chinchwadmadala appacha वडा पण मस्त होता.खूप वर्षां पूर्वी जोशी म्हणून एक बाई वडे, भजी करायच्या.तोही वडा सुरेख असायचा

चिंचवड़ मध्ये वासु वडापाव मध्ये पण चांगला वडापव मिळतो.

पंजाबी सामोसे खायचे असेल तर गुरुक्रुपा सायन. खुप वर्षापुर्वी. मुंबईत बर्याच थिएटर मध्ये गुरुक्रुपाचे समोसे. असायचे.

पूर्वी चापेकरांचा पुतळा होता चिंचवडला,त्या पुतळ्याच्या उजव्या हाताला कोरणारला एका वडेवाला होता.त्याच्याकडेच वडा म्हणे अतिशय मस्त असायचा असे नवरा म्हणे.दादरच्या श्रीकृष्ण वडेवल्याची चव, पण त्याहीपेक्षा हा वडा मस्त आहे.

मी लहान होतो त्यावेळी अडीच रुपयाला वडापाव मिळायचा. जत्रेत दोन रुपयांचा वडापाव खाल्ल्याचं पुसटसं आठवतंय.>> माझ्या लहानपणी १ रूपयाला वडापाव अन २० पैशाला चटणीपाव मिळायचा. पदवी परिक्षा होईपर्यंत किंमत रू. २.५० झाली होती.

@देवकी , त्याची गाडी अतिशयच कळकट होती आणि समोरच पवनानगर झोपडपट्टी. तिथे गर्दी असायची पण कधी इच्छा झाली नाही. गावात मोरया मंदिराला लागून खाडे म्हणून एक बाई फक्त वडा पाव विकत एकदम जगात भारी.

विदर्भात तेव्हा वडापाव अजून आला नव्हता. तिथे फक्त पाव भाजी किंवा अंडाभुर्जी सोबत अथवा चहा सोबतच पाव खाल्ला जाई. मिसळ, उसळ, वडा, भजी हे नुसते चापायचे पदार्थ होते.
मी मुंबईला पहिल्यांदा वडापाव खाल्ला. तेव्हा १ ₹ ला होता.
मिसळ मागितली असताना सोबत दिलेला पाव मी नम्रपणे परत करायचो सुरवातीला. नुसती चटकदार मिसळ खाणारा म्हणुन काही ठिकाणी ख्यातीही झाली होती माझी.

त्याची गाडी अतिशयच कळकट होती....गाडी नव्हती कोपऱ्यावर चिमुकले हॉटेल होते.मी नाही खाल्ला.नवऱ्याने खाल्ला.moryamandirachya पाठीमागे मिसळ छान मिळते.तर मंदिराच्या समोर वडा छान मिळतो.मी वडा तिथे खाल्ला आहे.

Pages