शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

Submitted by हस्तर on 9 October, 2020 - 11:59

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे

२०१५ मध्ये ४० जागा लढवल्या होत्या पण दुसऱ्या नंबर वर पण कोणी आले नव्हते ह्या वेळी ५० जागा ते पण भाजप आणि भाजप आयटी सेल विरोधात असताना

शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल ती पण बिहार मध्ये ,आणि आत्ताच्या काळात जास्त होईल ,एक तरी उमेदवार जिंकायला पाहिजे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Laughter challenge सुरु केलंय का ?
Happy
हिंदुत्वाचा डगला अंगावर असता तर चौथ्या पाचव्या न ची मते नक्कीच मिळाली असती !

उद्या बिहार मधील लोजपा इथे निवडणूक लढली तर त्यांना मते मिळतील का ?

शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल>> कसे? मामु, प्रचार प्रभार असे सगळेच सांभाळीत आहेत म्हणून? Wink

बिहार मध्ल्य एखद्या फेबु राजकर् णि ग्रुप मधे जाउन बघा

महाराष्ट्रात - राष्ट्रवादी + काँग्रेस + शिवसेना असे एकत्र सत्तेत आहेत. बिहारमध्ये काय स्टेटस आहे? शिवसेना कॉग्रेससोबत युती करुन लढत आहे की काँग्रेस विरोधात लढत आहे?

Submitted by BLACKCAT on 9 October, 2020 - 21:41

दिल्लीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी देखील जागा लढविल्या होत्या. शून्यावर बाद झालेत ना? राष्ट्रवादी निकालानंतर गप्प बसले. शिवसेना भाजपच्या ६ च जागा आल्या म्हणून (स्वतःचा भोपळा विसरुन) नाच नाच नाचले. काँग्रेसच्या काहींनी भाजप हरले म्हणून आनंद व्यक्त केला होता पण ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना झापले की आआप जिंकले म्हणून आपण खूश व्हायचे कारण नाही, आपल्याला एकही जागा का मिळाली नाही याचे परीक्षण करायला हवे.

हिंदू च्या मुस्लिम द्वेशावर bjp ची जित अवलंबून असते .
बाकी जिंकून देण्यासारखं एक पण गुण bjp मध्ये नाही.
संपले ते जिंकण्याचे दिवस आता पराजय ची साखळी चालू होईल.

इथे राज्यात सेने बरोबर सत्तेत भागीदारी असताना , बिहार मध्ये पवार काका स्वतःच्या बळावर १५० जागा लढणार आहेत !
सेने बरोबर युती न करण्याचे कारण काय असावे ?

370 झाले
मंदिर आले
3 तलाक झाले
राफेल आले

आता लोक शाळा, हॉस्पिटल , रस्ते , व्यवसाय , जीडीपी विचारतील , ते नै जमणार भाजपाला.

शिवसेना म्हणूनच शहाणी झाली आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व घेऊन बसली

हिंदुत्व म्हणजे मरायला सेना आणि चरायला भाजप असे झाले होते,
म्हणून ते हिंदुत्वाचे ययातीचे मढे सेनेने टाकून दिले

black cat, आर्ग्युमेंट साधारण ठीक वाटतंय पण महाराष्ट्रात भाजपला सोडचिठ्ठी देताना मुम पदाचा प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि आणि तो सोडविण्यासाठी काँग्रेस आणि रावा काँग्रेस यांच्या मदतीची गरज होती ती हिंदुत्व टाकून दिल्याशिवाय भागली नसती. सत्ताही मिळाली नसती. ही धोरणे कायम raahaateel असे नाही. सगळ्यांच्या संधीसाधूपणात शिवसेनेनेही तेच करून आपले काम साधले जे सध्याच्या परिस्थितीतल्या उपलब्ध पर्यायांत ठीक वाटले. बिहारमध्ये कोणाची तरी मते फोडण्यासाठी अलीकडे सर्वत्र लोकप्रिय झालेली म्हणजे स्वत:चे उमेदवार उभे करण्याची पद्धत पवार वापरत आहेत. हेही निवडणूक हाणामारीत क्षम्य होत चाललेले आहे. हे गहन अर्थकारण आहे. नितीशची मते कमी करण्याचे. मग भाजप आपल्या मुख्य मंत्री पदाच्या वचनाचा फेरविचार करून ते केरात फेकू शकेल. चिराग आणि शरदराव भाजपला मदत होईल असे वागत आहेत असे सध्या दिसतेय. बदल्यात काय मिळवायचे आहे ते उघड होईलच हळू हळू. शिवाय नितीश ची मते आणि आमदार युतीला सत्ता मिळवून देण्यात कमी पडू लागले तर उर्वरित लोकांच्या गटाला ती संधी असेल भाव वाढवून घेण्याची.

मुळात हिंदुत्व वादी पक्षांनी हिंदूचे काही भले केले नाही उलट नुकसान च केले आहे.
तसेच मुस्लिम वादी पक्षांचे पण तेच आहे.
दोन्ही हिंदुत्व वादी आणि मुस्लिम वादी पक्षाचे नेते एकाच दर्जाचे आहेत.
त्यांच्या असण्याची आणि नसण्याची पण काही गरज नाही.
फक्त विकास ,सामाजिक न्याय,आणि उत्तम प्रशासन देणारा च उमेदवार बिहारी लोकांनी निवडावा.
नाही तर आहे च कधी दिल्ली,कधी मुंबई,कधी बंगलोर ::::::;
अशा वाऱ्या आयुष्भर करायला लागतील आणि पुढच्या पिढीला पण.

मुळात हिंदुत्व वादी पक्षांनी हिंदूचे काही भले केले नाही उलट नुकसान च केले आहे.
तसेच मुस्लिम वादी पक्षांचे पण तेच आहे.
दोन्ही हिंदुत्व वादी आणि मुस्लिम वादी पक्षाचे नेते एकाच दर्जाचे आहेत.
त्यांच्या असण्याची आणि नसण्याची पण काही गरज नाही.>>>>>>>>>> या मताशी १००० टक्के सहमत.

फक्त विकास ,सामाजिक न्याय,आणि उत्तम प्रशासन देणारा च उमेदवार बिहारी लोकांनी निवडावा.>>>>>. बिहारीच कशाला इतर राज्यातील् लोकांना पण तेच लागु होते. उंटावर बसुन शेळ्या हाकणारे, जामिन मिळाला तरी गरीब लोकांचे अन्न लुबाडुन खा खा करणारे, लोकांच्या जमिनी लुबाडणारे कोणालाच नकोत.

Rofl लालु बिटवा की गद्दी का का होगा फिर ?

रौतवा ये कहता फिरेगा के ठाकरे परीवार का मूल बिहार में हय न भई, तो हमार बिटवा को ही व्होट दो .

BJP आघाडी मध्ये नितीश कुमार लाच मुख्य मंत्री व्हायचे आहे.
त्यांनी जागा पण bjp पेक्षा जास्त पदरात पाडून घेतल्या आहेत.
पण तिथे सुद्धा महाराष्ट्र सारखे bjp च्या jast सीट निवडून आल्या नितीश कुमार पेक्षा तर मुख्य मंत्री कोण हा जंगी सामना तिथे पण रंगणार आहे.
तेव्हा अपक्ष ,पासवान चा पक्ष,ह्यांचा भाव वधरणार.

Submitted by रश्मी.. on 10 October, 2020 - 13:09

राजद २०२४ (किंवा त्या आधी जेव्हा कधी विधानसभेच्या निवडणूका होतील तेव्हा) मध्ये महाराष्ट्रात सर्वच्या सर्व २८८ जागा लढवतील आणि त्या दरम्यानच्या काळात सगळ्या जागा पुरेशा बहुमताने जिंकता याव्यात इतपत बिहारींचे लोंढे संपूर्ण महाराष्ट्रभर पाठवतील.

आख्या भारतात फक्त रामदास आठवले हा व्यक्ती नशीबवान आहे.
ना निवडून यायची चिंता,ना पक्षा तर्फे कोणी आमदार ,खासदार असण्याची गरज.
कोणत्याही विचारधारेचा विजय होवू ध्या आठवले मंत्री असणारच केंद्रात.

ज्या भागात,ज्या राज्यात,ज्या महानगर पालिकेत. .बिहारी लोक प्रतिनिधी निवडून देतील अशी अवस्था असेल तर भागाचा बिहार झालाच म्हणून समजा.
फक्त कचरा पट्टी .
जिथे बिहारी किंवा यूपी वाले जास्त आहेत अशा मुंबई किंवा दिल्ली मधील भाग बघा .
जशी जनता त्याच दर्जाचे त्यांचे प्रतिनिधी.

हेमंत तुम्ही बोलताय ते मला पटतंय. मागे एकदा मी ट्रेनमध्ये जाताना एक बिहारी बाजूला होता. त्या बिहाऱ्याचा मित्र जो नॉन बिहारी होता तो आला आणि चेष्टेत बोलला एक बिहारी सौ बिमारी, तर त्यावर तो बिहारी बोलला एक बिहारी सौ पे भारी. हे असल्या मेंटलीटीचे लोक्स आहेत. घाण तर करतातच वर फुशारक्या पण मारतात.

खरे ते ( शिवसेना ) आधी युपी मध्ये होते, बिहार मध्ये कोण जाणे केव्हा गेले ? आणी एकतर त्या बिहार्‍यांची डोकी सुशांत प्रकरणावरुन सटकलीयत. बाकी कोनु नाही पर ये शिवसेनाने हमरे सुशांत को खामखां बदनाम किया म्हणून ते मत पण द्यायचे नाही. आता किंगमेकरला हे माहीत नसेल तर कठिण आहे.

एकदा शेखर सुमनने लालु यादव आणी रबडीची त्याच्या कार्यक्रमात नक्कल केली तेव्हा मी खाली लोळायची बाकी होते. भयाण विनोदी होता तो शो. बहुतेक जबान संभालके होता.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक कोण असणार ही यादी आता समोर आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी असणार आहेतच. शिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत.

बऱ्याच बिहारी मित्रा शी बोलल्यावर जाणीव झाली .
की नेते फक्त जाती, पाती,धर्मावर भडकावून जिंकून येत आहेत.
पण विकास कोणीच करत नाही.
किती तरी वर्ष झाली 1 फॅक्टरी पण बिहार
मध्ये निर्माण झाली नाही.
बेसिक सुविधा पण नाहीत
शिक्षण ची अवस्था एकदम खराब आहे,कायदा आणि सुव्यवस्था विषयी बोलायचं नको.
बिहारी आता फसणार नाहीत हे काम करा तरच मत मागायला या अशी भूमिका ते घेत आहेत.
Lockdown madhye दुसऱ्या राज्यात त्यांची अवस्था खराब झाली.
त्या मुके बिहारी नेत्यांच्या भुलधापा ते आता ऐकुन घेणार नाहीत.
मोदी हे बोलतात तसे कधीच वागत नाहीत.फक्त मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि काम काहीच करायची नाहीत हे मोदी चे तत्व आहे ते पण अनुभवाने लोकांना माहीत झाले आहे.

आधीच एका पक्षाचे चिन्ह बाण आहे , म्हणून सेनेला बिस्कीट हे चिन्ह मिळाले>>>>> असे आहे होय. म्हणून सगळीकडे बिस्कीटावर जोक येतायत.

शिवसेना तिथे जाऊन मधली मते खाणार आहे, बाकी काही नाही. मावशीने तसे करण्याचा आदेश दिला असेल.

राज ठाकरेंचे तत्व आहे ते

निवडून येत नसले तरी मते खाऊन कुणाला तरी पाडायचे

मग पुढच्या निवडणुकीत मांडवलीला पक्ष येतात

पण ते राम मंदिर काय ह्यांना पावले नाही , त्याचा निकाल आला आणि दुसऱ्या दिवशी सेना भाजप फुटले , आधी वाटले होते फक्त महाराष्ट्रात असेल , आता सगळीकडेच फुटत चाललेत

Pages