वडापाव फॅन क्लब

Submitted by VB on 9 October, 2020 - 01:01

लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही Happy
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.

सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते Happy

असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.

*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

VB बरे झाले मी सांगलीत आल्यावर धागा काढला, इकडे आल्यावर पहिले दोन दिवस आधी वडापावच खाऊन घेतला. पार्सल आणला होता भावाने.
नाहीतर होसुरमधे असते तर या धाग्यावर आलेच नसते Proud

माझे आवडते :

पुण्यात सिंहगड रोड वरचा अन्नपूर्णा चा वडापाव
श्रीराम वडापाव, शिरवळ
दत्त स्नॅक्स चा वडापाव , एक्स्प्रेस हायवे
सातारा सुपनेकर
आई घरी कच्चा कांदा सारणात घालुन वडे करायची ते पण अतिशय आवडते

आणि सगळ्यात आवडता आमच्या कराड च्या घाटावर चा लंकेश चा मोठा च्या मोठा गोलाकार वडा. पुण्यात येइपर्यंत वडा चपटा असतो ही कन्सेप्ट च माहित नव्हती. वडा म्हणजे मोठाच्या मोठा आणि गोल गरगरीत हेच डो़क्यात.
हा वडा चीनीमातीच्या पांढर्‍या बशीत मिळायचा. सोबत भिजवलेली हरभरा डाळीची मिरच्या घातलेली चटणी ( आपला डाळीचा चटका असतो तशी दिसायची ती ) आणि चिंचेची गोड चटणी वड्याच्या साईडलाच टाकुन द्यायचा तो. त्या दोन्ही चटण्या मस्त एकत्र व्हायच्या. गरम वड्याचा तुकडा तोडुन त्या चटण्यासोबत हा हु करत खायचे म्हणजे सुख....आ हा हा....अनेक वर्ष मला वडा सोबत पाव खातात हेच माहित नव्हते. Happy

वड्याची एक नावडती आठवण पण आहे -
पुर्वी वाकडेवाडी ला जोशी वडेवाले होते आरे मिल्क स्कीम च्या क्वार्टर च्या कंपाउंड ला लागुन. त्यांच्या दुकानाच्या बरोबर मागे असलेल्या क्वार्टर मधे आमचे मामा आजोबा राहायचे. एकदा त्यांच्याकडे रहायला गेलो होतो. त्यांच्या दारातुन जोशी वडे वाल्यांचे सगळे किचन दिसायचे. आणि सतत तळणीचा वास...२ दिवसात डोकं उठलं त्या वासाने. ते अजोबा आणि त्यांची फॅमिली म्हणाले की आता अम्हाला या वासाची सवय झाली आहे. तेव्हा पासुन मला जोशी वडा अजीबात म्हणजे अजीबात खावासा वाटत नाही.

स्मिता >> अगदी , लंकेशचा गोल गरगरीत वडा आणि व्यंकटेश ची भेळ हे घाटावर गेलं की खायलाच हवं. शास्त्र आहे ते. Proud

>> आधीच तयार करुन ठेवलेले आणि ऑर्डर येईल तसे गरम वगैरे करुन दिलेले वडे बघितले की आपला मूडच जातो.

काही ठिकाणी तर वडे आधी अर्धवट तळून ठेवतात व गिऱ्हाईक आल्यावर पुन्हा नीट तळून देतात Happy

>> वडा म्हणजे मोठाच्या मोठा आणि गोल गरगरीत हेच डो़क्यात

करेक्ट!

सिएसटीला बोराबझार गल्लीत सिएसटीजवळच्या एंडला एक इडली डोसा वडापावचा रस्त्यावर स्टॉल आहे. त्याच्याकडचा बटर वडापाव अफलातून असतो...... किती तरी वेळा खाल्ला आहे कारण ऑफिस जवळच आहे....
मुंबई/ पुणे/कोल्हापूर व्यतिरिक्त

सिन्नर बसस्टॉप समोर चा वडापाव....
नारायणगाव जवळ समर्थ वडापाव....
टेस्ट करा अप्रतिम मिळतात.

वडापाव म्हटले की फक्त नी फक्त कोल्हापूरचा. दुसरे पर्याय मनात येत नाहीत. +1

कोल्हापूरची फेरी झाली अन वडा पाव खाल्ला नाही तर काही तरी राहुन गेल्या सारखं वाटतं.

झाडाखालचा आणि शाहू मार्केट यार्ड समोरील शिव-अर्जुन चा वडा पाव आमचा फेवरेट.

बापरे मी चक्क १०१ वी.... म्हणजे कुणि न कुणी मला पुर्वी आवडणारे वडे पाव लिहिले असणार पण मला माझ्या बाबांचा वडा जास्त आवडायचा (आहेत ते उगाच रडू-बिडू नका माझ्यासाठी)
फक्त आता तसाच वडा घरीच लपवून खातो Wink त्यांना कसं देणार Lol

एंजॉय योर आवडीचे आयटम्स योर वे लोक्स. Happy

>> वहिनींचा वडा मिरज, छान आहे चव, बेसन कोटिंग जरा जास्त जाड वाटली, आतली भाजी भारी आहे.

बोकलत, हां... हाच तो कोल्हापूर पद्धतीचा ! अगदी तोंपासू Happy हो बेसन कोटिंग जाड असते आणि बटाटा भाजी बेसनशी एकजीव असते. हेच इकडे पुण्यात किंवा मुंबईत बेसनचा पातळ थर असतो भाजीवर

बायदवे खूपच जुने दिसतेय हे "वहिनींचा वडा" हॉटेल १९६८ .. गूगल नकाशा वर पण आहे

>>आणि सगळ्यात आवडता आमच्या कराड च्या घाटावर चा लंकेश चा मोठा च्या मोठा गोलाकार वडा
>>व्यंकटेश ची भेळ हे घाटावर गेलं की खायलाच हवं. शास्त्र आहे ते. Proud

अरे व्वा! बरेच कराडकर आहेत की इथे Happy
त्याबरोबर बाबूची पावभाजी आणि बॉंबे रेस्टॉरंटची आंबोळी ह्या दोन्ही गोष्टी पण मस्ट कराडच्या ट्रीपमध्ये Happy

बायदवे खूपच जुने दिसतेय हे "वहिनींचा वडा" हॉटेल १९६८>>> हो स्थापना 1968 साली झाले असं लिहिलंय पण एव्हडं जुनं नाही वाटलं. टवणे सरांना डिटेल्स माहीत असतील.

हैद्राबाद मध्ये एक आलू टोस्ट मिळतो. ..... ह्याची रेसीपीआहे युट्युब वर. मेरे चटोरों म्हणनारा शेफ आहे क्युट सा.
Submitted by अमा on 9 October, 2020 - 15:16

https://www.youtube.com/watch?v=7sDgZJ7YuoY याच्याबद्दलच म्हणत आहात का?

जम्बो वडापाव नामक एक महाभयानक प्रकार खाल्ला होता...
मला आवडतो JumboKing चा वडापाव! आतातर पुण्यात शिवाय पुणे - बंगलोर महामार्गावर 'ताथवडे' जवळ शाखा सुरु झाल्या आहेत. त्यांचा मऊ, लुसलुशीत पाव आणि आंबट-गोड चटणी विशेष आवडते! इतकी की जर त्यांची चटणी विकत मिळाली तर मी १ किलो चे packet विकत घेईन!!!

आई शप्पथ बेस्ट धागा आहे हा !!
वडापाव माझा पण जीव कि प्राण .. मी इतक्या ठिकाणचे वडे खाल्लेत !!
कोकण रेल्वे ने जाताना पेण /हमरापूर रोहा , चिपळूण आणि आणखी अधे मध्ये इंदापूर वगैरे स्टेशन वरचे ..
अनफॉर्च्युनेटली मला दुकानांची नावं लक्षात नसतात ..
पण खोपोली पाली फाट्यावरचा वडापाव , महाड चा गावातला वडापाव ,रत्नागिरीत आरोग्य मंदिर ला पिसे काकांचा वडापाव .. पुण्यात डहाणूकर कॉलनी मधे एक अन्नपूर्णा नावाची गाडी होती आता आहे का नाही माहित नाही .. त्यांचा हि अप्रतिम लागायचा ..
कोल्हापूर ला फक्त श्याम चा वडापाव ..मला खूप आवडत नाही कोल्हापुरी स्टाईल .. वड्यात पीठ पीठ लागतं .. शिवाय त्यात मिरच्यांचे तुकडे नसतात आणि ब्रेड सुद्धा स्लाइस वाला देतात .. तो मग असा पावत दाबून घालून खाता येत नाही .. पोळी भाजी सारखा खावा लागतो ..
एका मैत्रिणीने कोल्हापूर मधे बाईचा वडा या नावाखाली मला आणून दिलेला .. पण म्हणजे कुठून आणलेला वगैरे माहित नाही मला तो पण मस्त होता ..
आणखी पण खूप ठिकाणचे खाल्लेत ..
बॅचलर असताना रोज एक तरी वडापाव खायचे .. मज्जा !
आता इथे(जर्मनी त ) आल्यापासून घरी केल्याशिवाय काही नाही ..पण मी अगदी आनंदाने साग्रसंगीत करते वडापाव .. खायला आवडतो तितकाच करायला हि आवडतो Happy

मुलुंड वेस्टलाच अपना बाजार, महाराष्ट्र सेवा संघाच्यापुढे एक थिएटर आहे (नाव विसरलेय) तिथे एक सर्कल आहे. तिथे पूर्वी (१२ एक वर्षांपूर्वी) फार भारी वडापाव मिळणारी गाडी होती. इतका चविष्ट वडापाव मी खाल्ला नव्हता आधी. आम्ही आठवड्यातून २-३ वेळेस तरी खायचोच.

Kakde parkat (chinchwad) madhye kahi varshapurvi sunder vadapav milayacha. (Mahavir aani shankar mhanun)

>> कोल्हापूर ला फक्त श्याम चा वडापाव
>> Submitted by anjali_kool on 9 October, 2020 - 19:06

म्हणजे वर एका प्रतिक्रियेत मी राजाराम कॉलेजच्या मागे लिहिले आहे तोच म्हणताय का तुम्ही पण?

Outdoors I will check it out and update. I used to go to MSS library pre covid.

सोमवारी सकाळी इंद्रायणीत ठाण्याला बसलं की कर्जतला डोळे किलकिले करत दिवाडकरचे दोन वडापाव आणि ती लाल कुरकुरीत चटणी घ्यायची. डोळे बंद करुनच खायची आणि परत निद्राधीन. मग डायरेक्ट शिवाजीनगर! मग उरलेला आठवडाभर परिहार चौकातल्या दिवाडकरकडे वडा खायचा. पुण्याला कारपोरेशनच्या इथला जोशी वडेवालेचा खाल्लाय, पण अत्यंत गलिच्छ ठिकाणं आहे ते.
कर्जतला असली दिवाडकर म्हणजे हिरव्या पानात वडा देतो तो. वर्तमानपत्रात देणारे सगळे नकली! Proud
डोंबिवलीला गोरे. कानिटकरकडे पण मिळायचे चांगले, पण मानपाडा रोडवरच्या नाही ब्राह्मण सभेच्या इथल्या. मानपाडा रोडवरच्या कानिटकरच्या समोर महावीर स्टोर मधला समोसा जगात भारी असायचा.
ठाण्यात सिडको स्टॉपवरुन येताना कुंजविहारचा अनेकदा खाल्लेला आहे. तेव्हा तो जम्बो वडा आणि तळलेली मिरची खाणं फार भारी वाटायचं. हल्ली जातो तेव्हा नाही खावासा वाटत.
ठाण्यातला सगळ्या आवडता गडकरीचा! त्या पांढर्‍या बटर पेपरच्या पिशवीत दोन वडे.. पाव चटणी काहीही नाही. ती चव कुठेही येत नाही. घंटाळीच्या इथला श्रद्धाचा (संपला नसेल तर) चांगला असतो. विष्णू नगरातला गजानन आवडतो. नौपाड्याला दुर्गाला गर्दी असते पण वडपाव अगदी पानचट असतो. राजमाता ही फार आवडत नाही. त्यापेक्षा सत्य-राजदीप सोसयटी समोर गाडीवर चांगला मिळतो.
आयआयटी बाँम्बे, स्टाफ कँटिनचा वडा आणि सांबार नाही, आमटी पण नाही पण असल्याच कस्ल्या द्रावणात दोन वडे टाकून मिळायचा. तो ही फार आवडायचा.
सॅन होजेचा अन्नपूर्णाचा उत्तम असतो. पूर्वी मिलपिटसला होतं, आता सिस्कोच्या इथे मोठं उघडलंय.
एडिसन, न्यूजर्सीचा डिंपलला बरा मिळतो. पण तो माणूस फक्त कॅश घेतो, त्यामुळे पैसे घेऊन जायचं लक्षात ठेवावं लागतं.

>> बाब्बा रे. ब्रेड तळला म्हणजे किती तेल जात असेल त्याच्या मध्ये!

हो ना मानव. म्हणूनच ते पॅटीस खाणे माझ्या जीवावर येते.

पुण्यातील जोशी आणि रोहित वडापाव अजिबात आवडत नाहीत. कर्वे रोडला आनंद पावभाजी समोर एका गाडीवर उत्तम वडापाव मिळतो. गरवारे कॉलेजसमोर बिपिनकडचा पण मस्त असतो. कोकणांत उतरताना वडखळ नाक्यावर पण जबरदस्त वडापाव मिळतो. सारणात चिंचेचा कोळ घालतात त्याची मस्त चव येते.

पण सासवड चा अस्मिता वडेवालेंचा खूप आवडतो. गेली अनेक वर्ष पुणे टू बारामती प्रवासात, आमची ही परंपरा आहे की सासवड ला थांबायचं, आणि दोन दोन वडापाव खाऊन निघायचं.>>> +१
बॅचलर असताना रोज एक तरी वडापाव खायचे .. मज्जा !>>+१

Pages