वडापाव फॅन क्लब

Submitted by VB on 9 October, 2020 - 01:01

लॉकडॉऊनमध्ये ज्यागोष्टींची खुप खुप आठवण आली असेल त्यातला एक म्हणजे वडापाव. तसे घरी करुन खाल्ला सुद्धा दोनदा पण नुसताच वडा. झालापण छान होता. तरिही मन भरले नाही. वडापाव अत्यंत प्रिय ईतका की जेव्हा डायट करत होते तेव्हा फक्त एक वडापाव खाण्यासाठी सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण स्किप केले होते.
गेल्या काही दिवसापासुन माबोवर वडापावच्या गप्पा चालु झाल्या अन परत जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला.
ठाण्याचा कुंजविहारचा वडापाव खुप आवडतो. अगदी लहान होते तेव्हापासुन खात आलीये हा वडापाव. आठवडा - पंधरावड्यातुन एकदा पप्पा आणायचे कारण मला खुप आवडतो. तेव्हा एक पुर्ण सोडा अर्धाही संपायचा नाही माझ्याने तरिही हट्टाने संपवायचे तास दोन तास लावुन.
मग शाळा सुरु झाली तेव्हा मैत्रिणी बरोबर एकदा गजानन वडापाव चाखला, हा तुलनेने स्वस्त, छोटा अन जरी कुंजसारखी चव नसलेला तरी छान चटकदार असायचा. तो ही आवडु लागला. आठवड्यातुन किमान एक दोनदा तरी ग्रुपने एकत्र जावुन मजामस्ती करत खायचो आम्ही Happy
मलातरी हे दोन वडापाव सोडले तर ईतर कुठलेच आवडले नाहीत. मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाजुला असणार्या एका पडक्या घरात वडापाव विकला जातो अन तो अप्रतिम असतो असे कळले. म्हटले बघु या एकदा कसा लागतो तर खरच चव अप्रतिम होती तोही खुप आवडत्या वडापावच्या यादीत सामील झाला.
पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वडापाव म्हणजे कुळकर्णींचा वडापाव. आताश्या तो बंद झालाय. तो वडा म्हणजे बटाटाभजीसारखा छोटुसा. पण चव... अहाहा वर्णन करणे कठिण आहे, नुसते आठवणीने पण तोंडाला पाणी सुटले. तेही घराच्या दारात विकायचे, पण लगेच काही कारणाने बंद झाले.

सो वडापाव खुप लाडका असल्याने कुठेही जावो, खातेच पण ठाण्याचे हे काही खुपच आवडते Happy

असेच तुमचे काही आवडते वडापाव असतील तर लिहा ईथे.

*** वेमां, फोटो इंटरनेटवरून घेतलाय, धोरणात नसेल तर काढून टाका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साताऱ्याचा सुपनेकर चा वडा , वडा चटणी नो पाव

बोकलत - गोल्डन वडापाव फेमस आहे लोणावळ्याच्या , पण तो त्या मुख्य रस्त्यावर आहे. राजमाची ट्रेक मधल हक्काचं जेवण असायचा

अरे हां कोल्हापूर ला गेलो तर झाडाखालचा वडा खातो.
पण कोल्हापूर रितिप्रामाणे वड्याला सँडविच ब्रेड दिलेले पाहिले की मला जोरात किंचाळावं वाटतं.वडा पाव ला लादी पावच हवा.

लहान होतो तेव्हा घरातला कोणी माणूस बाहेर गेला की येताना त्याला वडापाव घेऊन ये म्हणून सांगायचो. तो गेल्यावर कधी एकदाचा येतोत आणि वडापाव खायला मिळतोय असं व्हायचं. तो पार्सल वडापाव उघडला की त्यातून येणाऱ्या बेसन आणि तिखट, चिंचेच्या चटणीच्या वासाला कसलीच सर नसायची. का काय माहीत पण ती जी वडापावची चव लागायची ती आता लागत नाही.

तोंपासु धागा!
लहानपणी बटाटेवडा म्हणजे रमाकांतचा एवढं पक्कं होतं. जेव्हा एक्स्प्रेस हायवे झाला नव्हता तेव्हा खोपोली फाटा प्रचंड गजबजलेला असायचा. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या गाड्या हमखास रमाकांत चा वडा खायला थांबायच्या. सुंदर वडा! बऱ्याच वर्षांत खाल्ला नाही.
पुण्यात सहकारनगरमधला श्रीकृष्णचा आणि शनवारातला प्रभा विश्रांती गृहचा हे दोन्ही बव अप्रतिम. प्रभा चा वडा जितक्या वेळा खाल्ला आहे त्याच्या दुप्पट वेळा तो संपला असे ऐकले आहे! हे पेठी परंपरेला साजेसेच!
माझा आवडता वडा हा लोणावळ्याला एस्टी स्टँडच्या गल्लीत वळताना कोपऱ्यावर ए वन चिक्कीचं दुकान आहे त्याच्याच रांगेत एक गोल्डन वडापाव चं दुकान आहे. एक नंबर वडा! त्या वड्याच्या सारणात थोडासाच पुदिना घातलेला असतो. त्याचा स्वाद फार छान लागतो.

डोंबिवलीत कोणत्यातरी वडेवाल्यापाशी मायबोलीकर ओळख कट्टा करा.
-------
गोरे ने सध्या बंद ठेवून पाटीवर फोन नंबर लिहिला आहे.
---------
कर्जतच्या स्टेशनवर वड्याचे कंत्राट दिवाडकरकडे आहे/असते. पण चांगला वडा बाजारात आंबेडकर पुतळ्याजवळ दगडे याचा आहे.
-------
भजी आणि मिसळ भटकंतीत बाधू शकते. वडापाव कधीच बाधत नाही.

गोरे ने सध्या बंद ठेवून पाटीवर फोन नंबर लिहिला आहे. >> हो ना.. साफ निराशा.. आधीच ॲार्डर द्यावी लागते Sad

भाऊ वड्याबद्दल कोणीच काही कसे काय बोलले नाही? तो पण खुप फेमस आहे.

कोल्हापुरचा वडा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या पुर्वेचा का? एकदा खाल्ला होता, अन खुप आवडला.

कोल्हापुर, बेळगावात ब्रेडच देतात सोबत. लादीपाव पण मिळतो काही ठिकाणी पण गोडसर असतो त्यामुळे नुसते वडेच खायचे. मिरचीवडे अन बटाटावडे

<<<वडा पाव ला लादी पावच हवा.>>> +१११

कर्जतचा स्टेशनचा वडापाव एकदा खाल्ला होता खुप नाव ऐकुन पण नाही आवडला.

कर्जत स्टेशन वर पूर्वी खरंच छान वडापाव मिळायचा. हल्ली हल्ली मात्र अत्यंत तेलकट आणि शिळे वडे असतात.

पुण्याला श्रीकृष्ण वडा बरोबरच्या मोठ्या पावामुळे लक्षात आहे. पूर्वी (२० वर्षांपूर्वी) एका पावात दोन मोठे वडे मावायचे. सध्याचे माहीत नाही.

पुण्यात सिंहगड रोडवर संतोष हॉलच्या जवळपासच एके ठिकाणी वडापाव खाल्ला होता. अप्रतिम होता. दुकानाचे आणि दुकानदाराचे नाव आठवत नाही.

तुळशीबागेच्या सुरुवातीला बाजीराव रस्ता, विश्रामबाग वाड्यासमोर. बँक ऑफ महाराष्ट्र 4वाजता बंद झाली की 5वाजता सुरू होते वडापाव गाडी. तुफान गर्दी असते. तुळशीबागेत खरेदी झाली की तिथे वडापाव खायचा.मग अजून काही पार्सल घेऊन खात रमत गमत शिवाजी रस्त्याकडे रिक्षात बसायचे. वड्या बरोबर मिळणारी पातळ शेंगदाणा चटणी पण मस्तच.

अतुल पाटील, तुम्ही डकवलेला फोटो पाहुन मल कोल्हपुर मधे मिळणार्‍या वडापाव ची आठवण झाली. शिवाजी विद्यापीठ कँटीन मधे आणि इतरही अनेक गाड्यांवर फार वर्षांपुर्वी वडापाव हा असा ब्रेड स्लाईस मधे दिला जायचा. आत्ता एवढ्यात जाणं झालं नाही त्यामुळे हा फोटो पाहुन नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटलं

त्या कर्जत च्या फेमस वडापाव च नाव आठवत नाहीये. मुंबई पुणे ट्रेन प्रवासात खाल्लाय .
दिवाडकर स्टेशनात विकतो तो नुसता नावाला वडा आहे. स्टेशनला लागुनच एक मोठी गल्ली आहे तिथे दगड्याचा वडा मिळतो. तसा वडापाव अजुनतरी कुठे खाल्लेला नाही.
एकदा ट्राय करा दुसरे सगळे विसराल.

मस्त धागा.

वडापाव माझा फेव्हरेट आहे. लहानपणी आई बाजारात जाताना विचारून जायची, काही खाऊ आणायचा का. पण शहाण्या बाळासारखं आम्ही काही नको असं म्हणायचो.

तरी पण आई घेऊन यायची,आणि आम्ही ताव मारायचो ( ती घेऊन येणार हे माहिती असायचं, आणि वडापाव खायचा पण असायचा Lol )

तसें खूप ठिकाणी खाल्ले वडापाव, आठवतील तसें लिहिते इकडे.

पण सासवड चा अस्मिता वडेवालेंचा खूप आवडतो. गेली अनेक वर्ष पुणे टू बारामती प्रवासात, आमची ही परंपरा आहे की सासवड ला थांबायचं, आणि दोन दोन वडापाव खाऊन निघायचं.

त्यांच्या चटण्या आवडतात फार, आणि वडापाव बरोबर चिरलेला कांदा देतात, ते जामच आवडतं.

आज वडापाव खावा लागणार Lol

मलाहि खुप आवडतो वडापाव... कर्जतचा वडापाव मला नाहि आवडला.. दादर चा श्रीकृष्ण वडा...मस्तच तशी चव नाहि मिळाली कुठेच.
आमच्याइथे टिळकनगर चेंबुर ला ४० नंच्या इथे वडापाव मिळायचा आता तो बंद झाला. घाटकोपरपासुन लोक यायची अगदि दुपारी ४ ते ६ मध्येच ठेवायचा थोडं लेट गेलं कि नाहि मिळायचा.. पट्टी समोसाहि मस्त त्याच्याकडचा..पोहे घालुन बनवलेला.

वडापाव कुठलाही आवडेल पण आतली भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीचीच ( हिरव्या मिरच्या आले लसून वै.) हवी.
सोबत चुरा, चटणी लसून खोबर्‍याची चटणी आणि तळलेली हिरवी मिरची.. ब्रेड स्लाईस अजिबात नको.

'कोथ्रुड वडापाव, नविन सुरु केले गाडी होती तेंव्हा छान होता. जोशी वडेवाल्यांचे वडे सकाळी बरे मिळतात नंतर नंतर पीठ असे वड्याला विरघळून लागलेले असते.

जोशी वडेवाले जे नव्या पेठेत होते/ आहेत, त्यांच्याकडे काहीच चांगलं मिळायचं नाही. वडे खास नसायचे>>>>> हो, खरंच. बऱ्याचदा थंडच असायचे तिकडचे वडे. आणि ती पुदिन्याची चटणीही खास नसते.

वडापाव मलाही खूप आवडतो. पण २ वर्षांपासून बटाट्याची अलर्जी झाल्यामुळे वडापाव खाता येत नाही आता.

लतांकुर सासवड वडापाव भारी..

जोशी वडेवाले 10 वर्षांपूर्वी पुण्यात आले तेव्हा मस्त असायचे, आल्याचा वेगळाच स्वाद लागायचा.

आणि 5-6 वर्षपूर्वी बाणेरचा रोहित वडेवाले कडचा वडापाव आणि सौथ इंडियन स्टईल चहा, तशाच दोन भांड्यात मिळायचा. दोन वर्ष होते बाणेरला. नंतर ऑफिस मध्ये कॉफी tea vending machine आला तरी आम्ही तिकडे जाऊन चहा प्यायचो 5 वाजता.. मस्त चहा कधी तरी वडापाव सोबत.

अरे हां बरोबर दादर चा तो पुलाजवळ चा वडा. छबिलदास.
आम्ही सर्व मराठी नाटके शिवाजी मंदिर ला बघायचो.त्याच्या आधी विसावा ला नाश्ता किंवा छबिलदास ला वडापाव किंवा उसळ शेव.

वडापाव जीव की प्राण. मस्त धागा. पेण ला कोलेजजवळ कँटीनमध्ये मिळणारा वडापाव फार आवडायचा.
आता सांगलीत हरभट रोडवर बोळातला बँक ऑफ महाराष्ट जवळचा जम्बो वडा . मेन रोडवरचा चर्च च्या शेजारचा वडा. इथे भरपूर गर्दी असते मात्र संध्याकाळी. अंकली ला जैन वडा मिळतो. बऱ्यापैकी फेमस ही आहे पण त्याबरोबर ब्रेड असतो. मिरजेत पंढरपूर रोडवर वहिनीचा वडा.
सातारला जाताना वाटेत खिंडीतला वडापाव ,मिसळ नेहमी थांबून खाल्ली जाते.
इथे फारसे सांगलीकर दिसत नाहीत. कोणी असतील तर त्यांना आठवतील ही ठिकाणं.

>> अतुल पाटील, तुम्ही डकवलेला फोटो पाहुन मल कोल्हपुर मधे मिळणार्‍या वडापाव ची आठवण झाली.

DJ.. हो कोल्हापूरचाच आहे तो. शिवाजी विद्यापीठातल्या कँटीनमध्ये, राजाराम कॉलेजच्या मागे श्यामचा वडा, विद्यापीठाच्या समोर अमरचा गाडा (हि सगळी माझ्या आठवणीतील प्राचीन काळातली ठिकाणे) किंवा शहरात वा भागात कुठेही असाच मिळतो. खरे आहे नॉस्टॅल्जिक करतो हा Happy माझ्या माहितीनुसार कोल्हापूर, सांगली आणि त्या भागातच असा वडापाव मिळतो. त्यात पिठाचा थर आणि एकूणच त्याचे प्रमाण जास्त असते.आतल्या बटाटा भाजीमध्ये पीठ सामावून गेलेले असते. बाकी बहुतांश ठिकाणी (पुणे मुंबई व अन्यत्र) पिठाचा पातळ थर आतल्या बटाटा भाजीला नाजूकपणे लपेटून असतो. शिवाय ब्रेड आणि लादीपाव हा फरक सुद्धा आहेच. ज्या त्या ठिकाणच्या आपापल्या पद्धती आहेत बस्स.

अरे वा धागा पळतो आहे नुसता. मला घरी मी करते तोच आव डतो. पण वेळ होत नाही. इथे मुलुंड वेस्ट ला विश्व सम्राट हॉटेल च्या समोर एक गाडीवाला लावतो. तिथे छान असतात वडे व चटण्या. मला बरोबरची वड्याची पिल्ले व गोल भजी बटाट्याची फार आवडतात. पण हे सर्व सहा महिन्यातुन एकदा.

इथे लोला ह्यांची एक रेसीपी आहे त्याने पण सुरेख होतात बटाटेवडे. लॉक् डाउन मध्ये एकदा केला होता. वडापावचा बेत. लेकी ने बरोबर कांदा मागून घेतला.

हैद्राबाद मध्ये एक आलू टोस्ट मिळतो. अर्ध्या ब्रेडला बटाट्याचे सारण लावुन बेसनात बुडवून तळून घेतात. मग तुकडे करून वरून बारीक शेव. हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून देतात. जबरदस्त लागते. ह्याची रेसीपीआहे युट्युब वर. मेरे चटोरों म्हणनारा शेफ आहे क्युट सा.

मिरजेपासून किती किलोमीटर आहे? >> मिरजेतच आहे. रमा उद्यान कोलनीजवळ. पंढरपूर रोडवर.
अंकलीत चपटी भजी म्हणून प्रकार मिळतो. अफलातून लागतो.
कढी वडा ही फेमस आहे. पण मला कढी बरोबर वडा काही झेपला नाही. वडापाव म्हणल्यावर पावाच्या पोटातच वडा हवा. बरोबर झणझणीत मिरची आणि सुखी चटणी.

Pages