बाल- रोप संवर्धन उपक्रम - रित्विक ( रुपाली विशे- पाटील)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 September, 2020 - 05:50

रित्विक - ११ वर्षे

मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचे हेडमास्तर आम्हां सर्व मुलांना शाळेच्या आवारात एक रोपटे लावायला सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावायचे आणि त्या रोपाची जोपासना करायची. हेडमास्तर स्वतः यायचे आणि रोपट्यांचे निरिक्षण करायचे आणि ज्या विद्यार्थाने व्यवस्थित रोपट्याची काळजी घेतलेली असे त्याचे कौतुक प्रार्थनेच्या तासाला सर्वांसमोर केले जायचे. मायबोलीच्या बाल - रोप संवर्धन ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या रोप - संवर्धन उपक्रमाची प्रकर्षाने आठवण झाली.

घराच्या मागील आवारात आम्ही अनेक फळझाडे तसेच फुलझाडे यांची लागवड केली आहे. त्या झाडांच्या देखभाली मध्ये मुलगा आम्हांला नेहमीच मदत करतो. काळ्या आईची मशागत केली तसेच निसर्गावर मनापासून प्रेम केलं तर आपल्या ओटीतलं दान ते माणसांच्या पुढ्यात
भरभरून टाकल्याशिवाय राहत नाही हे सत्य आहे. ह्या बाल- रोप संवर्धन उपक्रमातून मुलाला ह्या साऱ्या गोष्टींची थोडी फार का होईना पण जाणीव व्हावी म्हणून उपक्रमात भाग घेण्यास उद्युक्त केले आणि निश्चितच त्याला ह्या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळेल तसेच निसर्गाप्रती त्याच्या मनात प्रेम निर्माण होईल अशी आशा मनी बाळगते. सदर उपक्रम राबिवल्याबद्दल संयोजक मंडळाला मनपूर्वक धन्यवाद.

ritvik 1.jpeg

मुग, मटकी, चवळी च्या बिया मातीत पेरल्या

ritvik2.jpeg

मातीच्या गर्भातून बाहेरील जगात डोकावू पाहणारे इवलेसे रोपे..

ritvik 3.jpeg

पावसामुळे सूर्य किरणे न मिळाल्याने काही बियांनी कच खाल्ला.

ritvik 4.jpeg

हिरवी रोपे...

ritvik5.jpegritvik 6.1.jpeg

वाढणारी रोपे
ritvik project 1.jpegritvik project 2.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा, छान रोपं आलीयत. शाब्बास रित्विक.
तुमच्या शाळेतील रोपांचा उपक्रमही स्तुत्य आहे.

@धन्यवाद मानवजी..
खरचं खूप छान उपक्रम होता शाळेचा पण पुढे शाळेचे वर्ग वाढले आणि शाळा वाढवली त्यामुळे आम्ही मुलांनी लावलेली झाडं ही तोडली.

@ धन्यवाद अनुजी..
नंतर मागच्या आवारात नेऊन ठेवायला पाहिजेत म्हणजे रोपे चांगली वाढतील.

छान रित्वीक..
आता तुम्हा सर्वांचे बघून मला पण मुलाला रोप लावायला प्रोत्साहन दिले पाहिजे वाटायला लागले आहे. दोन बाल्कनी आहेत कुंडया ठेवायला.
Happy

धन्यवाद Sparkle - हो, आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे.
धन्यवाद वीरुजी,
धन्यवाद कविन.

बाल शेतकरी रित्त्विकचे कौतुक. अवजारांची सुद्धा तोंडओळख होईल.

सही, मस्तच. रित्विक शाबासकी.

किती छान परीसर आहे, कुठे राहता तुम्ही, लकी आहात.

वाचलं बोईसर, मस्तच परीसर.

धन्यवाद अन्जू..
हो ,बोईसर ला राहते.. अणूविकास वसाहत.

मस्तच रुपाली.

मेन प्लँट आहे तिथे नवरा जाऊन आला दोन वर्षापुर्वी. हिंदी दिवस होता तेव्हा आमंत्रण होतं त्याला. खूप strict आहे सर्व आणि ते स्वाभाविक आहे म्हणा, मोबाईल वगैरे मेन गेट वर watchman कडे ठेवायला लागतात. पण ह्या निमित्याने त्याला बघायला मिळालं, तिथलं काम समजलं.

हो.. माझे पती नोकरीला आहेत मेन प्लांट ला scientific asst. म्हणून . केंद्र सरकारी प्रकल्प असल्याने खूप security आहे. तुमचे पती कॉलनी त आले होते का? की प्लांटमध्ये गेले होते?
खूप छान कार्यक्रम असतात इथे.. तुमच्या पतींना पण अभिनंदन सांगा .. परत येणार असाल तर दोघे पण या.. फक्त मला कळवा..

नाही कॉलनीत नाही, ती दूर आहेना तिथून.

त्या प्रकल्पातर्फे हिंदी दिवसानिमित्य, विविध istitute मधल्या लोकांना आमंत्रण होतं. त्यात SBI तर्फे माझा नवरा आणि अजून काही जणांची निवड झालेली.

माझे पती नोकरीला आहेत मेन प्लांट ला scientific asst. म्हणून >>> वाह मस्त.

परत येणार असाल तर दोघे पण या.. फक्त मला कळवा.. >>> धन्यवाद.

Pages