रित्विक - ११ वर्षे
मी प्राथमिक शाळेत असताना माझ्या शाळेचे हेडमास्तर आम्हां सर्व मुलांना शाळेच्या आवारात एक रोपटे लावायला सांगायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावायचे आणि त्या रोपाची जोपासना करायची. हेडमास्तर स्वतः यायचे आणि रोपट्यांचे निरिक्षण करायचे आणि ज्या विद्यार्थाने व्यवस्थित रोपट्याची काळजी घेतलेली असे त्याचे कौतुक प्रार्थनेच्या तासाला सर्वांसमोर केले जायचे. मायबोलीच्या बाल - रोप संवर्धन ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेतल्या रोप - संवर्धन उपक्रमाची प्रकर्षाने आठवण झाली.
घराच्या मागील आवारात आम्ही अनेक फळझाडे तसेच फुलझाडे यांची लागवड केली आहे. त्या झाडांच्या देखभाली मध्ये मुलगा आम्हांला नेहमीच मदत करतो. काळ्या आईची मशागत केली तसेच निसर्गावर मनापासून प्रेम केलं तर आपल्या ओटीतलं दान ते माणसांच्या पुढ्यात
भरभरून टाकल्याशिवाय राहत नाही हे सत्य आहे. ह्या बाल- रोप संवर्धन उपक्रमातून मुलाला ह्या साऱ्या गोष्टींची थोडी फार का होईना पण जाणीव व्हावी म्हणून उपक्रमात भाग घेण्यास उद्युक्त केले आणि निश्चितच त्याला ह्या उपक्रमातून खूप काही शिकायला मिळेल तसेच निसर्गाप्रती त्याच्या मनात प्रेम निर्माण होईल अशी आशा मनी बाळगते. सदर उपक्रम राबिवल्याबद्दल संयोजक मंडळाला मनपूर्वक धन्यवाद.
मुग, मटकी, चवळी च्या बिया मातीत पेरल्या
मातीच्या गर्भातून बाहेरील जगात डोकावू पाहणारे इवलेसे रोपे..
पावसामुळे सूर्य किरणे न मिळाल्याने काही बियांनी कच खाल्ला.
हिरवी रोपे...
वाढणारी रोपे
प्रकल्पातर्फे हिंदी
प्रकल्पातर्फे हिंदी दिवसानिमित्य, विविध istitute मधल्या लोकांना आमंत्रण होतं. त्यात SBI तर्फे माझा नवरा आणि अजून काही जणांची निवड झालेली.>> खूप छान!
हो.. कॉलनी दूर आहे पण कॉलनीत सुद्धा होत असतात बरेच कार्यक्रम.
छान..आजूबाजूचा परिसर पण मस्त.
छान..आजूबाजूचा परिसर पण मस्त..!>> धन्यवाद अमृताक्षर..
खरच खुप छान परिसर आहे, आणि
खरच खुप छान परिसर आहे, आणि तुम्ही झाडांची जपणूक ही चांगली केली आहे......
धन्यवाद लावण्या..
धन्यवाद लावण्या..
खुप छान. रित्त्विकचं
खुप छान. रित्त्विकचं मनःपूर्वक अभिनंदन!!
Pages