ड्रग्स आणि बॉलीवूड सेलिब्रेटी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 September, 2020 - 05:14

लक्स नाही ड्रग्स ! सिनेतारकांच्या सौंदर्याचे रहस्य !!

सध्या हा मेसेज सोशल मिडियावर फार वायरल होत आहे.
कारणही तसेच आहे. एका पाठोपाठ एक बॉलीवूड तारका ड्रग्स घेत असल्याचे समोर येत आहे. अर्थात पुरुष मंडळीही घेत असतीलच. पण बायकांनी व्यसन केलेय हे समजताच आपले कान जरा जास्त टवकारतात. आणि त्यात त्या स्वप्नसुंदरी असतील तर मग कानांसोबत तोंडाचा आ देखील वासला जातो.

आपल्याकडे दर दुसरया वा तिसरया घरात एक मद्यपान करणारी व्यक्ती सापडेल. पण तेच मायबोलीवूड स्टार सई ताम्हाणकरने घेतले तर ती ब्रेकिंग न्यूज बनते. सिगारेटचा धूर उडवणारे बरेच असतात, पण बॉलीवूड बादशाह शाहरूख चेन स्मोकर आहे या गॉसिपची मजाच काही और.. त्यामुळे ईतर ड्रग्स रॅकेट पेक्षा जास्त ग्लॅमर या घटनेला आलेय. पण खरेच या तारका नावाजलेल्या नसत्या तर कोणाला काही पडले असते का याचे? ड्रग्स घेणे वा नशा करणे यातला बेकायदेशीर भाग वगळला तर हा एवढा मोठा गुन्हा आहे का? मुळात ड्रग्सच्या आहारी गेलेल्यांना सहानुभुती द्यावी की त्यांचा तिरस्कार करावा?

असो.
सोशलसाईटवर बरीच उलटसुलट चर्चा होते. मायबोलीवर नेहमी खरयाखोट्याचा समाचार घेतला जातो. म्हणून हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रग स्वतः स्वतःच्या पैश्याने घेऊन वापरणे हा तत्वतः गुन्हा नाही. पण त्यातून व्यसन लागून ड्रग चा रतीब चालू ठेवताना इतर गुन्ह्यांची शक्यता वाढते. (गोव्यात राहून ड्रग्स साठी पैसे संपले म्हणून शरीर विक्री करणार्‍या देशी परदेशी महिला आहेत. शिवाय पैसे मिळवायला/बिना पैसे ड्रग मिळत राहायला एजंट कडून ड्रग ट्रॅफिकिंग चा आग्रह होणे, किडनॅपिंग, पॉर्न मध्ये काम करायला लावणे असे अनेक आपल्याला माहितीही नसलेले गुंतागुंतीचे कोन यात आहेत. (संदर्भ- लॉक्ड अप अब्रॉड चे काही एपिसोड))
फिल्म ईंडस्ट्रीत पीअर प्रेशर, आणि एकंदर सतत चांगलं दिसत राहणं, विचीत्र परिस्थितीत आणि लोकेशन ला शूट, तासनतास डान्स्/गाण्याचे लाईव्ह शो यामुळे ड्रग च्या आहारी जाणे सोपी गोष्ट असावी. यापासूनही दूर राहणारे असतील, पण कमी. काही जण अगदी कधीतरी पार्टीत घेऊन नंतर सवय न लागलेले पण असतील.
'माझे मी ड्रग घेतले आणि खोलीत झोपून गेलो' इतकं सोपं नाहीये ते. त्यामुळे ड्रग घेणे हा सरसकट गुन्हा मानला जाऊन त्यावर कारवाई होते.
आणि छान आवडता सुंदर हिरो/हिरॉईन्/मसल मॅन/दानी पुरुष असण्याचा आणि त्याने दारु पिण्याचा, ड्रग घेण्या न घेण्याचा संबंध नाही. किंवा एखादा नायक नायिका आवडते आणि ड्रग घेते हे कळल्यावर आवडीत फार फरक पडू नये. ते त्यांचे वैयक्तीक आयुष्य. पण हाच नायक नायिका गाड्या चालवून लोकांना चिरडतोय्/तेय, अंडर वर्ल्ड शी संबंध ठेवून पिक्चर मध्ये नायक नायिका निवडीत फिक्सिंग करतेय, एखाद्या प्रतिस्पर्ध्याला उडवून देतेय्/तोय (गुलशन कुमार) असे नक्की कळले तर मात्र आपल्या आवडीत्/या माणसाचे पिक्चर बघण्या संबंधीच्या निर्णयात फरक पडावा. त्याच्या वैयक्तीक आयुष्याने दुसरी आयुष्यं धोक्यात येतायत.

फिल्म ईंडस्ट्रीत पीअर प्रेशर, आणि एकंदर सतत चांगलं दिसत राहणं, विचीत्र परिस्थितीत आणि लोकेशन ला शूट, तासनतास डान्स्/गाण्याचे लाईव्ह शो यामुळे ड्रग च्या आहारी जाणे सोपी गोष्ट असावी >> अनेक प्रोफेशन्स आहेत ज्यात एवढेच अथवा यापेक्षा जास्त प्रेशर असते. माझ्या आधीच्या एका जॉब मध्ये देशभरात कुठेही सर्व्हिसिंग साठी जाणे, बर्थ न मिळत ट्रेन मधुन, गर्दीच्या बस मधून केलेला तासन तास प्रवास, मोठमोठे मशिन्स उघडून ठीक करताना पहाटे पर्यन्त फिजिकल आणि मेंटल एक्झर्शन सकट केलेले काम , ते लौकरात लौकर ठीक करण्याचे दडपण, त्याच्या सकाळीच उठून परत येऊन मिटिंगस अटेंड करणे वगैरे असे. एक कॉल संपण्याआधीच दुसरीकडे झालेले बुकिंग, दोन तीन महिने रविवार सुद्धा फ्री न मिळणे असे अविरत चालत असे. देशभरात असे काम करणारे कित्येक इंजिनिअर्स असतील. डॉक्टरांचे कामही काय कमी दडपण , एक्झर्शनचे असते? यांच्यात नाही दिसत अशी ड्रग्जची आवश्यकता / प्रमाण.
लागले व्यसन सुटत नाही म्हणुन त्याला दिलेली एक्स्क्युजेस असतात ही सगळी.
मग या इंडस्ट्रीत का एवढे ड्रग्ज ऍडीक्ट्स सापडतात, तर पैसा. एवढा पैसा आहे हे हेरून, टार्गेट करून गळाला लावले जात असावे. निकोटिन नंतर गांजा हा दोन नंबरचा ऍडीक्टिव्ह ड्रग असावा बहुतेक, लौकर व्यसन लागते आणि लागले की सुटत नाही. स्मोकिंग ही पूर्वी सोशल ऍक्टिव्हिटी समजली जायची. आय ऍम अ सोशल स्मोकर. तसेच गांजा हे सोशल ड्रग म्हणुन प्रमोट केल्या जात असेल चित्रपटसृष्टीत. एकदा शरीरात गेले की रस्त्यावरचा भिकारी असो वा कुण्या देशाचा राष्ट्रपती, व्यसन त्यात भेदभाव करत नाही. तेव्हा अमुक लोक तर शिकले सवरले/बुद्धिवंत त्यांना व्यसन लागायला काही वेगळे कारण असेल असे नसते, एकच कारण असते - त्या व्यसनी पदार्थाची बिना भेदभाव होणारी किमया.

हो खरं आहे मानव. ड्रग पैसे आहेत हे पाहून विकलं जात असेल. शिवाय ज्यांना इतरांपेक्शा आपण कूल हे दाखवायचं ते या चक्रात खोट्या प्रतिष्ठेच्या समजूतीपायी अडकत असावेत.
दिल्ली साईड ला किंवा पुणे मुंबई मध्ये पण थोड्या श्रीमंत वर्तुळात कॉलेज मध्ये ड्रग चालत असावीत. कदाचित सुरुवातीला 'याचं व्यसन बिसन लागत नाही, फक्त उत्साह आणि एनर्जी वाढते, मस्त वाटतं' असं दाखवून प्रमोट केली जात असतील.पांढरपेशे मध्यमवर्गीय एकंदरच काम इ एम आय, बिले, डेड लाईन या चक्रात इतके गुंतलेत की त्यांना हे मोह भूल घालत नसावेत. किंवा घातले तरी पैसे/वेळ कमी पडत असावा.
(माझं कॉलेज लाईफ पण इतकं शाळे सारखं गेलंय की '७ नंतर कुंपणावरुन उडी मारुन हॉस्टेल मध्ये पोहचणे' किंवा 'मैत्रिणीला स्टँडवर सोडायला जाते' लिहून नंतर बाहेर डिनर करुन परत येणं' वगैरे साहसी गोष्टी असायच्या. त्याकाळी असे गेट बाहेर ड्रग विकणारे लोक असते तर लांब राहिलेच असते याची खात्री नाही. आता कॉलेज गोअर्स पुढे केवढे मोह, केवढं पीअर प्रेशर असेल. पण त्याच बरोबर जास्त माहितीला अ‍ॅक्सेस असेल. इन्फॉर्म्ड डिसीजन.)

'याचं व्यसन बिसन लागत नाही, फक्त उत्साह आणि एनर्जी वाढते, मस्त वाटतं' असं दाखवून प्रमोट केली जात असतील >> हो. आणि यात एक मोठा फॅक्टर काम करतो, निदान निकोटिनच्या बाबतीत तरी, गांजाच्या बाबतीत माहीत नाही पण असावा, तो म्हणजे बेक्कार चव. (गांजाची चव माहीत नाही पण ती पण सिगरेट/तंबाखु सारखी बेक्कार असावी)
आता बेक्कार चवीचा तर उलट परिणाम व्हायला हवा ना? व्यसन न लागण्यास मदत व्हायला हवी ना!
पण मानसीक पातळीवर उलट होतं.
जर यांची चव एकदम छान असती तर "का बरं इतर लोक घेतात, याचे दुष्परिणाम असूनही?" याच लगेच उत्तर मिळालं असतं आणि सुरवात करणाऱ्यांचे अँटेना लगेच टवकारले असते, ते लगेच सावध झाले असते. पण चव असते बेक्कार म्हणुन लोक आश्वस्त होतात की अजून ट्राय करून पहायला आवडत नाही, नाही तरी एवढी बेक्कार चव आहे आपण केव्हाही सोडून देऊ, आणि अशा प्रकारे ही बेक्कार चव मनुष्याला आपले मिसऍडव्हेंचर पुढे चालू ठेवायला मोठी मदत करते, आणि तो सापळ्यात अडकतो.

ड्रग वर बंदी आहे
सर्व जगात हा गंभीर गुन्हा समजला जातो
काही देशात तर मृत्यू दंड आहे .
ड्रग चे विविध प्रकार असून ते वेगवेगळ्या प्रकारे नशा उत्पन्न करतात.
काही ड्रग उत्साह वाढवतात तर काही ड्रग वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत घेवून जातात.
आणि ड्रग हा प्रकार खूप जुना आहे खूप वर्षा पासून चोरून ड्रग वापरले जाते.
फक्त नट नट्या आणि मुंबई मध्येच हे वापरले जात नाही तर पूर्ण देशात ह्याचा व्यापार चालतो.

जनावर अशा नशा उत्पन्न करणाऱ्या वनस्पती खात नाहीत त्यांना तेवढी अक्कल आहे.
पण माणूस अती शाहना असल्या मुळे त्याचा वापर करतो नशे साठी.

एकदम बरोबर.
पूर्ण देशात प्रतेक शहरात ड्रग घेणारे आहेत.
फक्त मुंबई मध्ये नाही चालत ड्रग चा धंधा.

माझं कॉलेज लाईफ पण इतकं शाळे सारखं गेलंय >> Happy मूळात आपल्याला कॉलेज लाईफ मिळालं जिथे आर्थिक्/सामाजिक इ इ चूका करायला वाव होता आणि त्याचे परिणाम जीवनव्यापी नव्हते. सारा सारखी एखादी तारका सोडली तर बहुतेक मुली ड्रॉप-आउट होतात. They are going to learn things with trial and error, or in a hard way... तिशीत आल्यातरी ज्या learning gaps राहून गेल्या त्या बुजत नाहीत.

मी ज्युनियर कॉलेजात असताना एक drugs वर सिरीयल आलेली. राकेश अस्थाना, तो एक गौस आडनावाचा actor, चन्ना रुपारेल पण होती बहुतेक. सॉलिड होती, shocked होतो आम्ही. नंतर हे प्रकरण कमी झालं असावं असं वाटलं. आता मात्र प्रचंड वाढलंय असं वाटतं. वर्षभरापूर्वी मटामधे डोंबिवली ठाकुर्लीत पण अमुक एरियात चरस गांजा ओढतात etc वाचलं तेव्हा परत एकदा shocked. मधे रियाने पण एका डोंबिवलीच्या पेडलरचं नाव घेतलं असं news मध्ये आलेलं.

गांजा तर पान शॉप वाले पण ठेवतात.
उत्तर भारतीय जास्त प्रमाणात गांजा चा वापर करतात.
भांग तर सर्रास मिळते.
होळी च्या दिवशी सर्रास सर्व बिल्डिंग मध्ये वापरली जाते.

तेच काय कळेना

एकाच झाडापासून दोन्ही बनते , गांजा व भांग , मग एकावर बंदी आहे , एकावर नाही

मग पीक घेणे कायदेशीर की बेकायदेशीर ?

भांग हा खतरनाक प्रकार आहे.
जास्त प्रमाणात घेतली तर माणसाला सत्य आणि भास ह्या मधील फरक समजत नाही.
गटार सुद्धा निर्मळ पाण्याची नदी वाटते आणि तेच सत्य आहे असे तो व्यक्ती समजतो.

भांग वर पण बंदी हवी. किंवा काहीतरी कॉन्सण्ट्रेशन चे निकष हवे बंदीचे. (नीरा लोक पितात, पण ताडी झाली की ती दारु बनते तसे.)
आमच्या सोसायटीत होळीला बनायची. गेली ४-५ वर्षे पासून बंद झाली आपोआप.

ह्या नावं येणाऱ्या तारका सुशांत घ्यायचा सर्रास, आम्ही नव्हतो ब्वा घेत सांगत सुटल्यात (फक्त पार्टीत सामील असायचो) . आता खरं खोटं म्हणजे त्या घेत होत्या का नव्हत्या ते सांगायला सुशांत नाहीये जगात.

इतके ड्रग वगैरे घेऊन पण स्किन सुंदर. केस सुंदर. डान्सेस सुंदर. डोळे बोलके.
बहुतेक २-३ तास जिम केल्याने ड्रग चे वाईट परीणाम शून्य होत असतील. (दारु पचवण्या बद्दल हे लॉजिक नेहमी दिले जाते तसे.)

सध्या नशील्या पदार्थांचा विस्तार खूप दूरवर आणि खोलवर पोचला आहे. शुक्रवारच्या कार्य सप्ताहाच्या अंती रात्री उशिरापर्यंत तरुणवर्ग हॉटेल्स किंवा बाहेर नशेत असलेला वा नशा करताना दिसतो. विशेषत: आय टी कार्यालये असलेल्या भागात दिसतो. सररास. फॅशन डिझायनर, हौशी फोटोग्राफर, हौशी इतिहास संशोधक , चित्रकार, आर्ट connosseur अशी सगळी एलीट मंडळी असतात. ज्या बायका समाजात वजन वाढावे आणि आपली छाप पडावी यासाठी ' इंडियन कल्चर' चे कोर्सेस करीत असतात त्याही असतात मोठ्या प्रमाणात. आजकाल 'इंडियन कल्चर' विषयी कॉफी टेबल चर्चेत फेकण्यापुरती माहिती असणे हे elite मानले जाते.

ड्रग स्वतः स्वतःच्या पैश्याने घेऊन वापरणे हा तत्वतः गुन्हा नाही. पण त्या ....

या प्रतिसादात दिलेले ड्रग चे दुष्परिणाम दारूलाही तंतोतंत ( काकणभर जास्तच) लागू होतात. दारू च्या व्यसनापायी आयुष्याची माती करून घेतलेल्या अभिनेता/ अभिनेत्री ची चिक्कार उदाहरणे सापडतील. पण दारूवर बंदी तर नाहीच, उलट इथे माबोवरही दारू कशी प्यावी, चकणा काय घ्यावा, कॉकटेल चे प्रकार आदी चर्चा होते. आम्ही भारतात जाताना चॉकलेट नको, सिंगल माल्ट आण असा आग्रह होतो. मग गांजानेच काय घोडे मारले आहे ?

होळीत भांगेवर बंदी आणणे म्हणजे तिळगुळ न देता संक्रंत साजरी करा असा आदेश देण्यासारखे आहे.

गांजावर बंदी घालायच्या प्रयत्नात अमेरिकेने आज हार मानली आहे. लाखो जीवने उध्वस्त केल्यावर! जे अमेरिकेला जमले नाही ते आपल्याला जमणार आहे का ?

वि.कु.,
मला दारु आणि ड्रग चे दुष्परीणाम यातला फरक फार टेक्निकल डिटेलात माहिती नाही. पण ड्रग चे व्यसन सोडवणे दारु चे व्यसन सोडवण्यापेक्षा मेडिकली कठीण आहे.हे एक कारण कायदेशीर कारवाईसाठी पुरेसे वाटते.दारु पिऊनही त्याने त्या माणसापासून समाजाला धोका पोहचत असेल (मारामारी/डी यु आय) तर कायद्यात शिक्षा आहेच.

सर्रास सर्व क्षेत्रातील लोक जी आर्थिक बाबतीत सू स्थिती मध्ये आहेत ते नशा करतात.
नशा करणे हे आता समाजात कॉमन झाले आहे.
फक्त नट्या च चर्चेत ठेवल्या आहेत NCB नी पण नट सुद्धा नशा करण्यात मागे नाहीत.
नशा करणारे आणि आरोप करणारे सर्व एकाच माळेचे मणी आहेत.
ती कंगना आरोप करतेय म्हणजे ती मोठी सभ्य नाही सर्व करून तिचे पण झाले आहे आणि आता पण चालू असेल.

व्यसनामुळे माणूस त्यावर डिपेंड होतो

ह्या डिपेंडन्स चे 2 प्रकार असतात

1 फिजिकल - ह्यात शारीरिक लक्षणे जास्त असतात , कम्प सुटणे , पाय लटपटने , घाम येणे , डोकेदुखी इ इ उदा दारू

2 सायकॉलॉजीकल - यात मानसिक लक्षणे जास्त असतात , उदा ड्रग्ज

दुसरा प्रकार असल्यास व्यसन सोडणे कठीण असते

माझं व्हिजन असं आहे-
1. सर्वाना रेशनकार्डवर गांजा अल्पदरात उपलब्ध करून द्यावा. सबका साथ, सबका गांजा.
2. पुण्यात खास चुलीवरील कोकेन मिळू लागेल. तसेच खास ऑर्गनिक चरस मिळेल. पुण्यात काय हापुसपासून तांदूळ पर्यंत सगळे महोत्सव होतात तर 'माल महोत्सव' तर होईलच. मिसळीच्या रस्स्यामध्येही एक फ्लेवर माल चा असेल.
3. लॉककडाऊनमध्ये जसा इनो घालून बिस्किटाचा केक बनवला तसा कोकेन घालून घरीच केक बनवण्याचा ट्रेंड यावा.
4. पुडाच्या वड्या, पूड चटणी हे पदार्थ घरोघरी बनवावेत.
5. लग्नासाठी जाहिरात देताना वधू-वर देशस्थ ,कोकणस्थ की कोकेनस्थ याचा स्पष्ट उल्लेख करावा.
6. टाका पिठामध्ये तेल ,मग कोन बनवा रे जुनं होऊन 'मागवा पेडलरकडून माल, मग कोकेन बनवा रे' अशी जाहिरात लागेल.
7. ''या' अभिनेत्रीला फार आवडते 'हे' ड्रग, बघा तुमची आवड जुळते का' असे लोकसत्ता ऑनलाईनचे क्लिक बेट येतील.
8. कोमट कोकेन घेणारी जमात निर्माण होईल.

(इंटरनेट साभार)

Pages