ड्रग्स आणि बॉलीवूड सेलिब्रेटी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 September, 2020 - 05:14

लक्स नाही ड्रग्स ! सिनेतारकांच्या सौंदर्याचे रहस्य !!

सध्या हा मेसेज सोशल मिडियावर फार वायरल होत आहे.
कारणही तसेच आहे. एका पाठोपाठ एक बॉलीवूड तारका ड्रग्स घेत असल्याचे समोर येत आहे. अर्थात पुरुष मंडळीही घेत असतीलच. पण बायकांनी व्यसन केलेय हे समजताच आपले कान जरा जास्त टवकारतात. आणि त्यात त्या स्वप्नसुंदरी असतील तर मग कानांसोबत तोंडाचा आ देखील वासला जातो.

आपल्याकडे दर दुसरया वा तिसरया घरात एक मद्यपान करणारी व्यक्ती सापडेल. पण तेच मायबोलीवूड स्टार सई ताम्हाणकरने घेतले तर ती ब्रेकिंग न्यूज बनते. सिगारेटचा धूर उडवणारे बरेच असतात, पण बॉलीवूड बादशाह शाहरूख चेन स्मोकर आहे या गॉसिपची मजाच काही और.. त्यामुळे ईतर ड्रग्स रॅकेट पेक्षा जास्त ग्लॅमर या घटनेला आलेय. पण खरेच या तारका नावाजलेल्या नसत्या तर कोणाला काही पडले असते का याचे? ड्रग्स घेणे वा नशा करणे यातला बेकायदेशीर भाग वगळला तर हा एवढा मोठा गुन्हा आहे का? मुळात ड्रग्सच्या आहारी गेलेल्यांना सहानुभुती द्यावी की त्यांचा तिरस्कार करावा?

असो.
सोशलसाईटवर बरीच उलटसुलट चर्चा होते. मायबोलीवर नेहमी खरयाखोट्याचा समाचार घेतला जातो. म्हणून हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपडपट्टीतली मुले, रेल्वेत फुटकळ वस्तू विकणारी मुले, भीक मागणारी मुले, (ही सर्व पाच ते आठ दहा वर्षांदरम्यानची) सोल्यूशन नावाचे पांढरे रसायन पितात. नेल पेंट रिमूवर, इंक रिमुवर मध्ये स्पिरीट असते म्हणून पितात. इथाईल अल्कोहोल खूपच घातक असतो पण स्वस्त असतो. चार पाच रुपये भीक मिळाली की लगेच बरोबरच्या मोठ्या मुलाकडून छोटा डोस घेतात. विकणारा मुलगा स्वतः घेत नसतो. अनेकदा पाहिलेले दृश्य.
एकदा पुण्याला एका भाजीवालीने डोळ्यात पाणी आणून मुलाची कहाणी सांगितली होती. ह्याला कसं सोडवू तुम्ही तरी सांगा म्हणत होती. मी काय करणार? व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता दिला.
खूप पसरलेय हे नशापाणी. गरीब श्रीमंत सगळेच अडकलेत. आपापल्या कुवतीप्रमाणे नशा करतात.

दारूवर बंदी नाही गांजावर मात्र आहे.
म्हणजे दारू कमी अंमली अथवा तिचे दुष्परिणाम कमी म्हणुन असे काही नाही. कारण आहे पैसा. (करातून मिळणारा.) त्यासाठी दारूबंदी नाही.
जिथे केली होती तिथून उठवल्या गेली. (गुजरात आणि वर्धा जिल्हा सोडून. गुजरातेत बाहेरून येणाऱ्यांना परमिट काढून घेता येते.)
निकोटिनवरही बंदी नाही ती सुद्धा निकोटिन कमी अपायकारक आहे म्हणुन नव्हे तर पैसा.
आणि दुसरे राजकीय कारण असावे - मतपेढी.

दारूमुळे भारतात दरवर्षी २.६ लाख लोक मरतात

निकोटिनमुळे भारतात दरवर्षी जवळपास दहा लाख लोक मरतात

(या कारणांमुळे मी कायद्याने परवानगी असूनही दारू / सिगरेटला कळत / नकळत प्रोत्साहन देणाऱ्या धाग्यात लिहिणे टाळतो. बंदी नाही, घ्यायची त्यांनी घ्यावी पण जाहीर प्रदर्शन ज्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल ते टाळावे अशा मताचा मी आहे.)

दारू पिण्याचे,सिगारेट ओढण्याच वय आता कमी झाले आहे पाहिले 21 वर्ष वय असताना ही व्यसन लागत असतील तर आता तेच वय 16 ते 17 झाले आहे.
ही गोष्ट चिंताजनक आहे.

बंदी नाही, घ्यायची त्यांनी घ्यावी पण जाहीर प्रदर्शन ज्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल ते टाळावे >> +१०० सेलेब्रिटीने विशेषत: सजग असावे कारण अनेक लोक अनुकरण करतात.

टीनेज मध्ये अंमली पदार्था बद्दल मोह झाला नाही असे नाही. पण वीसेक वर्षापूर्वी समाजात काहीसा एकसूरीपणा असल्याने त्याला कधी प्रोत्साहन मिळाले नाही. 'स्वतःच्या पैशाने दारू प्यायली तर ठीक' किंवा 'दारू पिऊन गाडी तर नाही ना चालवली मग ठीक' असा संदेश कधी वर्तमानपत्रे/दूरदर्शन, भोवतालचा समाज इ घटकांकडून मिळाला नाही. नशेच्या अंमलात गेलेला वेळ हा ना स्वतःला उपयोगी ना दुसर्‍याला! सबब हे वागणं बरं नव्हं असाच सातत्याने संदेश मिळे. सलमान-संजय दत्त इ 'बॅड बॉईज' होते कारण इतर अजय देवगण, अक्षय कुमार, आमिर खान, काजोल-करिष्मा इ सापेक्षतेने जागरूक नायक-नायिका होते. आता बॅड गर्लस बॉईजचीच इतकी चलती आहे की नवीन पिढीची काळजी वाटते.

गांजावर बंदी घालायच्या प्रयत्नात अमेरिकेने आज हार मानली आहे. लाखो जीवने उध्वस्त केल्यावर! जे अमेरिकेला जमले नाही ते आपल्याला जमणार आहे का ?

Submitted by vijaykulkarni on 27 September, 2020 - 12:01 >>

विकु वीड आणि दारूच्या दुष्परिणामांची तुलना करणारी तुमची पोस्ट वाचून आँ झालं. एडिबल वीड खाऊन विमानात बसलेल्यांना पॅनिक अ‍ॅटॅक येण्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. वीड खालेल्या लोकांनी ऊडत्या विमानाचे दरवाजे ऊघडण्याचा प्रयत्न केल्याचे आणि बाकी पॅसेंजर्सनी त्या लोकांना पॅनिक लोकांना पट्ट्यांनी बांधून ठेवल्याचे किमान दोन प्रकार अलिकडेच झाले आहेत. लिक्विड दारू स्कॅन मध्ये पकडता येते पण बिस्किट, ब्राऊनी मध्ये मिसळलेली वीड कोणी ऑनबोर्ड नेली आणि सेवन केले तर कसे पकडणार? कोणी मुद्दाम कोणाला खाऊ घालणेही अगदीच सोपे आहे.
दारू तर अनेक दशकांपासून विमानातच सर्व केली जाते त्यातून असे प्रकार झाल्याची उदाहरणे नाहीत.

वीड सेवनाने ईन्स्टंट पॅनिक अ‍ॅटॅक, सुसायड्ल थॉट्स येण्याचे प्रमाण दारूपेक्शा कैक पटींनी जास्त आहे. केवळ सेवन करणार्‍याच्या तब्येतीचा प्रश्न नसून एकंदर पब्लिक सेफ्टी सुद्धा महत्वाची आहे.

मग रिक्रेशनल मेरवांना का सहजी उपलब्ध करतात? आमच्या देशात गेली काही वर्षे तरी लीगली कंट्रोलड सबस्टनस म्हणून उपलब्ध आहे, पण अद्याप अशा केसेस ऐकू येत नाहीत जितक्या अल्कोहोल इन्फ्ल्युअंस आणि ड्रग ओव्हर डोस आणि ऑक्सीटोसिन व्यसन/ मृत्यू इ येतात.
इथे ड्रग म्हणजे कुठला substance आहे? अपेक्षा आहे फक्त गांजा नसेल. त्याबद्दल इतका ओरडा नसेल होत.
सनव Proud

Submitted by सनव on 27 September, 2020 - 22:07
>>>>>
नहीऽऽऽऽऽऽऽ
लिगल नको व्हायला. इथे "तुम्ही ड्रग्ज कसे पिता?" सारखे धागे निघतील. जुन्या जुन्या आठवणी येतील, सप्ताहांताचे प्लॅन होतील. Rofl

ड्रग्स म्हणजे शरीराच्या चेतना संस्थे वर परिणाम करणारे औषध असे पण म्हणू शकतो.
ड्रग्स चा सामान गुणधर्म म्हणजे ड्रग्स वेदनेची जाणीव करून देत नाहीत.त्या मध्ये मग अनेक औषध पण येतात.pain killer येतात,भुल देणारी औषध येतात.
त्यांचा वापर सुद्धा नशा येण्यासाठी केला जातो.

कुलकर्णींच्या पोस्टला सहमत
मी वरचेवर एडिबल वीड आणि अफू घेत असतो. मला कधी व्यसन नाही लागले. तुम्ही रात्रंदिवस झिंगत पडल्यावर कोण काय करणार ? बादवे दारू-सिगरेट कधी आवडली नाही.
कुलांजन, ब्राह्मी,अश्वगन्धा, अंबर, केसर,काही भस्मे, जदवार वगैरे मिळून एक औषध बनवतो. प्रत्येक डोसला अंदाजे गांजाचे प्रमाण १५०मिलीग्राम आणि अफु ५०मिलिग्रॅम ठेवतो. दोनेक वर्षांपुर्वी गम्भीर आजारपणात ऍलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट्स आणि आलेले नैराश्य यात याच गोष्टींनी मदत केली होती. गांजाची पाने साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काढतो आणि अफूसाठी युनानीवाले चचा आहेत एक. आपला मेंदु जागेवर असेल तर एखादी गोष्ट चांगले-वाईट ठरवायला बाहेरून कोणी काही सांगायची आवश्यकता नसते.
(विशेष सूचना - कोणी चुकून असं औषध बनवलच तर तीन आठवडे एकेक -दोन दिवसांचे अंतर ठेऊन घ्या. नंतर एक महिनाभर ग्याप द्या. अधुनमधुन घेत असाल तर वेगळं आहे. cns वर परिणाम करणारे कोणतेही औषध जादा काळ घेतल्यास नन्तर शरीर त्याला दाद देणं बंद करते. नियमित घेतल्यास सवय लागेल आणि सवयीचे नन्तर व्यसनात रूपांतर होईल. शिवाय अफु ही नैसर्गिक स्तंभक असल्याने ५० मिलिग्रॅम एवढ्या लहान मात्रेने सुद्धा भयानक कॉन्स्टिपेशन होते सो तेबी बघा. बहुदा वेमा डिलीट करतील ही पोस्ट.)

औषध म्हणुन कधी कधी घेतले तर नाही लागत हो व्यसन. आणि त्यात मात्राही छोटी असेल.
नशे साठी, त्या इफेक्टसाठी घेतले तर लागते. आणि व्यसन लागणाऱ्याना अक्कल नसते असे काही नाही. चांगली बुद्धिवान, विद्वान, कर्तृत्ववान मंडळीही अडकतात. काही लोक नाही अडकत.
ठराविक काळा नंतर व्यसनातून सगळ्यांनाच बाहेर पडायचं असतं, सगळेच किमान एकदा तरी प्रयत्नही करतात, पण नाही सापडत मार्ग. व्यसनात अडकलेल्या माणसाला "अरे तुला एवढं कसं कळत नाही, सोड ते व्यसन!" असं म्हणणं म्हणजे
अंधाऱ्या कोठडीत तुरुंगात खितपत पडलेल्या एडमंड डांटे (Count of Monte Christo) ला त्याच्या डॉक्टरने "अरे तू इथे काय करतो आहेस? काय तब्येत झालीय तुझी! जा घरी जा छान मोकळ्या हवेत रहा, व्यवस्थीत खा पी!" असं म्हटल्यासारख आहे. दोघही म्हणतील "अहो, महाशय ते तर आम्हालाही कळतं. पण या तुरुंगवासातून सुटका कशी होईल ते सांगा ना आधी."

जो नशा करणाऱ्या पदार्थाचे सेवन करतात नशा येण्यासाठी त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होवून ते रोग ग्रस्त होते .
इथ पर्यंत ठीक आहे कारण परिणाम फक्त त्याच व्यक्ती पुरता मर्यादित आहे आणि त्याला व्यक्ती स्वतंत्र चे फायदे देण्या पुरताच मर्यादित आहे.
पण नशेत तो व्यक्ती जो कृत्य करतो त्याचा त्रास समाजाला होतो.
नशे मुळे जास्त उत्तेजीत होवून विरूद्ध लिंगी व्यक्ती चा लैंगिक छळ करतो.
नशेत वाहन चालवून अपघात करतो.
नशेत हिंसक होवून समाजात हिंसा निर्माण करतो.
ही कृत्य त्या व्यक्ती पुरती राहत नाहीत तर त्याचे परिणाम समाजाला ,दुसऱ्या व्यक्तीला भोगावे लागतात हे चुकीचे आहे .
अन्यायकारक आहे म्हणून त्या पदार्थ वर बंदी आहे ,निर्बंध आहेत.

सुशांत सिंह राजपूत की मौत मामले की जांच में ड्रग्स एंगल की कड़ी धीरे-धीरे बॉलीवुड की कई अभिनेत्रियों तक पहुंच गई है। जांच एजेंसी एनसीबी इससे जुड़े लोगों से लगातार पूछताछ कर रही हैं। वहीं टीवी डिबेट में भी यह मुद्दा जोरशोर से उठाया जा रहा है। शनिवार अर्नब गोस्वामी के डिबेट शो पूछता है भारत में इसी मुद्दे पर अपनी बात रखते हुए एक्टर मुकेश खन्ना ने कहा कि ये वो लोग हैं जो अपने आपको अंग्रेज समझते हैं और कूल के नाम पर ड्रग्स लेते हैं। उन्होंने कहा कि फिल्मों का स्तर गिर गया है। इन लोगों का बहिष्कार किया जाना चाहिए। अगर कुछ गलत हो रहा है तो हमें उसका विरोध करना चाहिए।

Proud

ड्रग 2000 वर्षांपासून भारतात आहेत , भीष्मजीना माहीत नाही

आता जे दानशूर पारशी उद्योजक दिसताहेत त्यांचे पणजोबा ड्रग विकुनच श्रीमंत झालेत

हिंदी मीडिया वर सर्व नॉन हिंदी राज्यांनी पूर्ण बहिष्कार टाकणे गरजेचे आहे.
खूप माज आलंय ह्या हिंदी मीडिया ला.

हिंदी मीडिया ला फक्त यूपी ,बिहार सोडला तर कोणी गंभीर पने घेत नाही.
आपण का घेतोय .
काही उकाडू शकणार नाहीत ते बॉलिवूड चे.
मोदी सारखा तो योगी पण थापडा आहे.
म्हणे फिल्मसिटी निर्माण करणार.
त्यांना ते कधीच जमणार नाही.
मॉडर्न स्त्रिया तिथे रात्री 8 च्या पुढे घरा बाहेर पडू शकत नाहीत.
एवढे मागास आहेत भय्ये.

SRA
एस सलमान
आर रणवीर कपूर
ए अर्जुन रामपाल

गांजावर बंदी घालायच्या प्रयत्नात अमेरिकेने आज हार मानली आहे. लाखो जीवने उध्वस्त केल्यावर! जे अमेरिकेला जमले नाही ते आपल्याला जमणार आहे का ?>>>>

ड्रग म्हणजे फक्त गांजा का?? कुठलीही गोष्ट तेव्हाच जमते जेव्हा प्रयत्न मनापासून होतात. ड्रगच्या व्यवहारात राजकारणीही असतील तर कसा बसायचा आळा?

दारू व ड्रगची तुलना खरेतर अस्थानी आहे. दारू कायद्याने विकता येते, विकत घेऊन हवी तितकी पिता येते. कोणी काहीही करू शकणार नाही.

ड्रग कायद्याने विकत घेता येत नाहीत. विकणारे मात्र प्रत्येक गल्लीत असतात. कायद्याने विकण्यावर बंदी असल्यामुळे बेकायदा विक्रीतून आलेल्या पैशावर कसलेही नियंत्रण नाही. यातून मिळणारा पैसा दहशतवाद्यांपर्यंत पोचतो असेही काही जणांचे म्हणणे आहे. कायद्याने बंदी असल्याचा आधार घेऊन पोलिस ड्रग घेणाऱ्यांना आत करतात, त्यांच्यामार्फत पुढे खऱ्या गुन्हेगारांपर्यंत जाता येईल असा कयास बांधून.

आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलामाणसांपासून ड्रग दूर आहेत असे जे समजतात त्यांना काहीच माहिती नाही. शाळा, कॉलेज, हॉस्टेलस सर्वत्र याचा प्रसार आहे, ज्यांना हवेत त्यांना सहज उपलब्ध होतात.

शिवाय अश्या गल्लोगल्ली विकल्या जाणाऱ्या ड्रग मध्ये जी इतर विषारी कचऱ्याची भेसळ असेल प्रॉफिट मार्जिन साठी ती वेगळीच.

आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलामाणसांपासून ड्रग दूर आहेत असे जे समजतात त्यांना काहीच माहिती नाही. शाळा, कॉलेज, हॉस्टेलस सर्वत्र याचा प्रसार आहे, ज्यांना हवेत त्यांना सहज उपलब्ध होतात.
>>> साधना +1
प्रत्येक पालकाला वाटते माझा पाल्य खूप शामळू..
99% लोकांना माहीत नसते...
माझे उदाहरण देतो.. माझ्या घरच्यांना वाटते मी नॉन व्हेज घेत नाही.. दारू तर लांबची गोष्ट आहे..
सब कुछ करके हो गया...

उडता पंजाब
ड्रग्सच्या नशेच्या व्यसनाने युवा पिढी उध्व्हस्त करायचे कारस्थान
बॉलीवूड तारका, बडे सेल्ब्रेटी, हायफण्डू सर्कलमधील लोकं घेतात. याचे सेवन करणे ही एक शान आहे असा प्रचार..
पोरांनी बहकून ड्रग्स घेऊ नये म्हणून आधी या ड्रग्सला बदनाम करणे गरजेचे आहे..

डोंगर पोखरून उंदीर निघाला

सुशांत ड्रग केस तपासणीत ही बाई सापडली , भाजप प्रचारक

IMG-20190902-WA0080.jpg

आधी ती , मग तिचा नवराही
कुटुंब रंगलय गांजात

https://indianexpress.com/article/cities/mumbai/ncb-searches-comedian-bh...

सगळेजण स्ट्रेस साठी(हे कारण सांगून) ड्रग घेतात का?मराठी चित्रपट सृष्टी याबाबत साधी आहे का?पैसे नसल्याने ड्रग साठी?

आता तर भारती सिंग आणि तिचा नवरा गांजा केस मध्ये अडकलाय !
गल्ली गल्ली मध्ये सर्रास मिळणारा गांजा आणि भारती सापडलेला गांजा यात काही फरक आहे का ?
गल्ली मधील गुंडाच्या मागे इतका सासेमिरा लागत नसेल जितका बॉलीवुड च्या मागे लागला आहे !
पण दुर्दैव अजुन करण जोहर आणि महेश भट गांजा केस मध्ये अडकले नाहीत !!!
Happy

गल्ली गल्ली मध्ये सर्रास मिळणारा गांजा आणि भारती सापडलेला गांजा यात काही फरक आहे का ?
--

गल्ली गल्ली मध्ये सर्रास मिळणारा गांजा हा "सर्वसामन्य" असतो, म्हणून त्याकडे तपास यंत्रणा सर्रास दुर्लक्ष करतात. जर असे नसते तर एक संपूर्ण 'कुंभ मेळा' एनसिबीच्या कोठडीत भरला असता.

सिलेब्रेटींकडे सापडणारा गांजा, तो चिमुटभर का असेना तो असतो 'सिलेब्रेटी' म्हणूनच तो मारणार्‍या लोकांना मिडीयामधे व इतर माध्यमांमधे इतका मान मिळतो. व एनसिबीला त्याची दखल घ्यावी लागते.

Pages