श्रीपथी पंडिताराध्युल ऊर्फ 'तो' आवाज

Submitted by हायझेनबर्ग on 25 September, 2020 - 16:17
 S P Balsubrhamanyam

अनेकांसाठी त्या अवाजाच्या आठवणी वेगवेगळ्या असतील पण माझी त्या आवाजाशी पहिली ओळख म्हणजे...
आsssजा शाम होने आयी...
आपल्याकडे एक जीप असावी, एक लेदर जॅकेट असावे, आपली एक 'सुमन' असावी, ती आपल्याच कॉलनीत रहात असावी, ईंग्लिश बोलून आपल्याला तिला ईंप्रेस करता यावे, आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जाण्यासाठी आपण तिच्या घराखाली आपल्या जीपचा हॉर्न वाजवत साद घालावी तिच्या विनवण्या कराव्यात ...अहाहा काय ते सुखस्वप्न...
त्याकाळी फ्लॅमबॉयन्सची व्याख्या वेगळी होती पण जीपचा हॉर्न वाजवून प्रेयसीला साद घालणार्‍या नायकाचा 'मर्दानी' आवाज, त्याचं मध्येच 'धत्त तेरे की' म्हणणे वगैरे प्रचंड आवडलेलं...
मग तोच आवाज 'मेरे रंग मे रंगने वाली' म्हणतांना एवढा काय रोमँटिक झाला की विचारता सोय नाही.
पुढे ह्याच आवाजाने 'बनके लहू नस नस मे मोहोब्ब्त दौडे और पुकारे' म्हणत तारूण्याचा धगधगता जोश अक्षरशः आमच्या रक्तात ओतला
प्रेमात निराशा आल्यावर पुढे 'सच मेरे यार है, बस यही प्यार है' म्हणत त्या निराशेला तत्वज्ञानाची ऊभारीही दिली.

जेव्हा आपल्या 'मारियाला' किंवा 'सपनाला'... मनातल्या मनात 'आय लव्ह यू' म्हणण्यापुढे एक ईंच सुद्धा आमच्या ईंग्रजीची मजल जात नसे तेव्हा ह्याच आवाजाने त्यापुढे जाऊन मनातल्या मनातच का असेना आम्हाला पहिल्यांदा ईंग्लिश मध्ये गुणगुणायला शिकवले..

I don't know what you say
I don't know don't know what you say
But i want to dance and play
I want to play the game of love
I want you in the name of love

त्या आवाजाबद्दल काय लिहू आणि किती लिहू...चेहरे बदलून बदलून हा आवाज भेट्त राहिला... मला अनेक वर्षे त्या आवाजाच्या खर्‍या मालकाचे नाव माहितही नव्हते की त्या मालकाचा चेहरा कुठे दिसला... पण त्याची काही गरज वाटली नाही की त्यामुळे काही त्या आवाजाबद्दल असलेल्या 'बस यही प्यार है' ह्या समजुतीत फरक पडला नाही ईतका तो आवाज दशकानुदशके आतात झिरपत राहून जणू माझ्याच मालकीचा झाला होता...
माझ्यासाठी हाच आवाज म्हणजे आपल्या 'प्रेमाचा आवाज' असा बनून गेला... आयुष्यात देवाने 'प्रपोज' करण्यासाठी हा आवाज आपल्याला एक दिवस ऊधार द्यावा (अगदी त्यातल्या योडलिंग सहित) असे वेडगळ विचारही त्या वयात मनात येत. Happy
आज त्या आवजाचा खरा मालक हरपला पण आवाज मात्र अजून दशके नव्हे शतके मला आणि माझ्या सारख्या अनेकांना चिकटून राहील.

मला खात्री आहे आताही तो आवाज आभाळातून हेच म्हणत असेल....
Hey come here
Not here there up in the sky
Come with me i want to fly
Don't stop let the whole world know
Don't stop let the whole world know
Come fast come fast don't be slow
Life is fire, life is snow

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यस्पी चे एक दिजे के लिये मधले सत्यम शिवम सुंदरम् कधीही ऐकताना शेवटी तो ला ला ला ला करायला लावतोतेंव्हा आपण नकळत मनात तेच करत असतो. Happy एक दुजे के लिये म्हणजे त्याची स्वतःचीच हिंदी चित्रपटातली जर्नी वाटावी. तो सर्दन अ‍ॅक्सेंट जो सुरूवातीला हिंदी मधे जाणवत असे तो कमी होत गेला नि शेवटी बॅक ग्राऊंडमधे राहण्या ऐवजी त्याला हवे तेंव्हा तो वापरून घ्यायची त्याची एक स्टाईल बनली. हॅट्स ऑफ !!!

माझ्यासाठी SP म्हणजे मैने प्यार किया, हम आपके है कौन ,लव्ह आणि साजन हे चार अल्बम प्लस रोजा. किती वेळा ऐकलं आहे गणतीच नाही. लव्ह मधलं मेरी प्रियतमा हे गाणं फारसं न गाजलेलं पण मला खूप आवडतं.
एक वेगळीच जादू होती तो आवाज म्हणजे.

करोना काळ म्हणजे आभाळच फाटलंय अशी अवस्था आहे.इतका मोठा माणूस म्हणजे मेडिकल हेल्प तर कुठे कमी पडली नसणार तरीही ..ओम शांती.
परवाच आशालताबाई गेल्यावर गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी लुपवर लावलं होतं. आता आज शाम होने आई, आते जाते हसते गाते , दिल दिवाना लावावी लागतील. अवघड आहे सगळं.

Sp दवाखान्यात झुंजताहेत हे वाचून धक्का बसला होता, पुढे काय होणार याचा अंदाज येऊन मन व्याकुळ झाले होते.

मी एसपीला त्याच्या हिंदी गाण्यांच्या आधीपासून ऐकतेय. शंकराभरणमची गाणी ऐकली आणि वेड लागल्यासारखे झाले. ती गाणी ऐकून मला तर तो शास्त्रीय गाणारा गायक वाटलेला. दूरदर्शनच्या कृपेने कित्येक दक्षिणी चित्रपट पाहिले आणि दर चित्रपटात फक्त एसपीलाच ऐकले.

आपल्या किशोरकुमारच्या पडोसनच्या मूळ आवृत्तीत एसपीने काम केलंय. एक चतुर नार मूळ गाणे खूप वेळा पाहिले गेले.
दोन्ही गायकांनी आपापला ठसा उमटवलाय.

त्याच्या हिंदी गाण्यात सुरवातीला दक्षिणी झाक असायची.. नंतर ती खूप कमी झाली पण मला आवडायची तशी गाणी..

हल्लीच्या हल्ली इतके दिग्गज गेलेत की श्रद्धांजली हा शब्द थिटा झालाय..

लेख आवडला. आठवणींना छान उजाळा दिला आहेस.
श्रीपथी पंडिताराध्युल म्हणजे एस्पी हे माहित नव्हते. श्रद्धांजली


Sp दवाखान्यात झुंजताहेत हे वाचून धक्का बसला होता, पुढे काय होणार याचा अंदाज येऊन मन व्याकुळ झाले होते.
+१

एसपींची,मला बरीचशी ८०-९० ची गाणी आवडायची, रोमँटीक गाणी.
अगदी सहज गायचे, मध्ये थोडा मद्रासी उच्चार असत पण चलता है...

येसुदास नंतर हेच आवडले मद्रासी गायक.. नंतर हरीहरन.. प्रत्येकाची वेगळी छाप पण मद्रासी गायकांची हि लिस्ट अगदी , कॅसेट्स तयार करायची..

>> यस्पी चे एक दिजे के लिये मधले सत्यम शिवम सुंदरम् कधीही ऐकताना

"एक दुजे के लिये" मधले "सत्यम शिवम सुंदरम"? कधी ऐकल्याचे आठवत नाही. याची लिंक मिळेल का?

आsssजा शाम होने आयी... आणि त्या सिनेमातली अजून एकदोन गाणी अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे मला आजही ऐकवत नाहीत. त्या काळात हि गाणी इतकी इतकी लोकप्रिय झाली होती कि या गाण्यांनी अक्षरशः वेड्या झालेल्या एका शेजाऱ्याने अहोरात्र ती कॅसेट लावून ठेवलेली असायची. सकाळी भजन आsssजा शाम होने आयी, दुपारी वामकुक्षी आsssजा शाम होने आयी, संध्याकाळी तर काय आsssजा शाम होने आयी रे आयीच. त्यामुळे या गाण्यांची शिसारी आली ती आजतागायत.

एसपी कमल हसन साठी गायीलेत ती गाणी मात्र खूप खूप ह्रदयाच्या जवळ आहेत. मग सागर मधली असोत किंवा एक दुजे के लिये. एदुकेली मधली गाणी केवळ आणि केवळ अ वी ट गोडीची आहेत. ऐकायला आणि पाहायला सुद्धा. त्या काळात नंतर त्यांची खूप गाणी हिट झाली. साजन, हम आपके है कौन इत्यादी. कमाल गाणी गायिली एस्पीनी. पुढे रोजा मध्ये तर चार चांद लागले गायकीला.

श्रीपथी पंडिताराध्युल म्हणजे एस्पी हे माहित नव्हते. श्रद्धांजली>>>>>>> हो मला ही. त्यामुळे लेख आधी वाचलाच नव्हता. तुमच्या नावामुळे वाचला. छान लिहीलायत. मन व्याकूळ झालं . आता नुसत्या आठवणी आणि त्यांची गाणी राहिली.

Sp दवाखान्यात झुंजताहेत हे वाचून धक्का बसला होता, पुढे काय होणार याचा अंदाज येऊन मन व्याकुळ झाले होते. >> +१
लेख आवडला. श्रद्धांजली.

एसपी बालू सर च्या आवाजाचे कायल आधीपासूनच होतो पण इलियाराजा आणि रहामानासोबत जी जमलेली केमिस्ट्री होती त्याला तोड नाही. मग भले ते अपुूराजा मधले मतवाले यार तेरी जय असो की हमसे है मुकाबला मधले प्रेमी का ने प्यारसे असो.
राजश्री सोबतची गाणी फारसी आवडायची नाहीत पण लव्ह गर्दिश हे जबरदस्त फेवरेट.
एसपी ची अक्टिंग ही चीज पण खतरा. चोर चोर मधील सीबीआय इन्स्पेक्टर लक्ष्मी नारायण असो की दुनिया दिलं वाले मधील तब्बूचं फादर. हम्से है मुकाबला मधील प्रभुदेवाचा पोलीस लाईनीत राहणारा कॉन्स्टेबल भाऊ ही भूमिका काय बोलायचे. तोंड झाकलेला आरोपी आपला भाऊच आहे हे माहीत नसल्याने त्याला मारल्यावर जो पश्चात्ताप अन दाटून आलेली माया एसपी दाखवतो ती अफाट होती.
थॅन्क्स a लॉट एसपी बालू सर.

क्या कोई बेचे, क्या कोई बाँटे
क्या कोई बेचे, क्या कोई बाँटे
अपने दामन में सिर्फ़ हैं काँटे
और दुकानें हैं सिर्फ़ फूलों की

हम न समझे थे बात इतनी सी
ख्वाब शीशे के दुनिया पत्थर की

त्यांच्या जाण्याचे दु:ख आहेच पण खरे तर श्रद्धांजली म्हणून लिहिले नव्हते किंवा रूढार्थाने लेख वा ललित म्हणूनही लिहिले नाही ज्यावर प्रतिसाद वाढल्याने आनंद व्हावा. त्यामुळे धन्यवाद वगैरे म्हणण्याच्या भानगडीत पडत नाही.
केवळ ह्या महान गायकाने ज्या गोड आठवणी आयुष्यात पेरल्या त्या आठवणींचा ऊहापोह आणि ज्याला त्याला अशाच विस्मृतीत गेलेल्या क्षणांची ऊजळणी करण्याची संधी मिळावी म्हणून लिहिले. ह्या निमित्ताने एसपींचे आयुष्य आणि कार्य सेलिब्रेट व्हावे एवढीच ईच्छा.

वेमांनी धाग्यात फोटो अ‍ॅड केला हे बरे झाले.

किशोर सारखेच गाण्याच्या फ्लो मध्ये मानवी हावभावांचे फिलर्स टाकून तंत्रशुद्ध गाण्याला अजून एक्स्प्रेसिव बनवण्याचे एसपींचे कसब अफलातून होते.
सच मेरे यार है..... गाण्यात 'अपनी तो हार है' ओळीच्या आधी सर्वस्व हारलेला माणूस ऊपहासाने जसा हसतो ते मायक्रो सेकंदाचे हसणे काय अप्रतिम ऊतरवले आहे.

एस पी च्या गाण्यात 'तेरे मेरे नाम नये है' ह्या 'ईस रात कि सुबह नही' मधल्या गाण्याचा उल्लेख कोणीच केला नाही चक्क ? गर्दिश मधल्या 'हम न समझे थे' किंवा रोजा मधल्या गाण्याच्या आसपास जाणारे गाणे. अप्पू राजा मधल्या 'तुने साथी' किंवा सागर वाल्या गाण्यानंतर ह्या टाईप च्या गाण्यामधून रेंज नि श्रोत्यां पर्यंत पोहोचण्याची करामत जाणवते.

https://youtu.be/nn2zKzHdpAQ
ह्या गाण्याशी संबंधित सगळ्या लोकांत फक्त एस्पिनीच मन लावून त्यांचे काम केले आहे हे जाणवते.

Pages