श्रीपथी पंडिताराध्युल ऊर्फ 'तो' आवाज

Submitted by हायझेनबर्ग on 25 September, 2020 - 16:17
 S P Balsubrhamanyam

अनेकांसाठी त्या अवाजाच्या आठवणी वेगवेगळ्या असतील पण माझी त्या आवाजाशी पहिली ओळख म्हणजे...
आsssजा शाम होने आयी...
आपल्याकडे एक जीप असावी, एक लेदर जॅकेट असावे, आपली एक 'सुमन' असावी, ती आपल्याच कॉलनीत रहात असावी, ईंग्लिश बोलून आपल्याला तिला ईंप्रेस करता यावे, आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जाण्यासाठी आपण तिच्या घराखाली आपल्या जीपचा हॉर्न वाजवत साद घालावी तिच्या विनवण्या कराव्यात ...अहाहा काय ते सुखस्वप्न...
त्याकाळी फ्लॅमबॉयन्सची व्याख्या वेगळी होती पण जीपचा हॉर्न वाजवून प्रेयसीला साद घालणार्‍या नायकाचा 'मर्दानी' आवाज, त्याचं मध्येच 'धत्त तेरे की' म्हणणे वगैरे प्रचंड आवडलेलं...
मग तोच आवाज 'मेरे रंग मे रंगने वाली' म्हणतांना एवढा काय रोमँटिक झाला की विचारता सोय नाही.
पुढे ह्याच आवाजाने 'बनके लहू नस नस मे मोहोब्ब्त दौडे और पुकारे' म्हणत तारूण्याचा धगधगता जोश अक्षरशः आमच्या रक्तात ओतला
प्रेमात निराशा आल्यावर पुढे 'सच मेरे यार है, बस यही प्यार है' म्हणत त्या निराशेला तत्वज्ञानाची ऊभारीही दिली.

जेव्हा आपल्या 'मारियाला' किंवा 'सपनाला'... मनातल्या मनात 'आय लव्ह यू' म्हणण्यापुढे एक ईंच सुद्धा आमच्या ईंग्रजीची मजल जात नसे तेव्हा ह्याच आवाजाने त्यापुढे जाऊन मनातल्या मनातच का असेना आम्हाला पहिल्यांदा ईंग्लिश मध्ये गुणगुणायला शिकवले..

I don't know what you say
I don't know don't know what you say
But i want to dance and play
I want to play the game of love
I want you in the name of love

त्या आवाजाबद्दल काय लिहू आणि किती लिहू...चेहरे बदलून बदलून हा आवाज भेट्त राहिला... मला अनेक वर्षे त्या आवाजाच्या खर्‍या मालकाचे नाव माहितही नव्हते की त्या मालकाचा चेहरा कुठे दिसला... पण त्याची काही गरज वाटली नाही की त्यामुळे काही त्या आवाजाबद्दल असलेल्या 'बस यही प्यार है' ह्या समजुतीत फरक पडला नाही ईतका तो आवाज दशकानुदशके आतात झिरपत राहून जणू माझ्याच मालकीचा झाला होता...
माझ्यासाठी हाच आवाज म्हणजे आपल्या 'प्रेमाचा आवाज' असा बनून गेला... आयुष्यात देवाने 'प्रपोज' करण्यासाठी हा आवाज आपल्याला एक दिवस ऊधार द्यावा (अगदी त्यातल्या योडलिंग सहित) असे वेडगळ विचारही त्या वयात मनात येत. Happy
आज त्या आवजाचा खरा मालक हरपला पण आवाज मात्र अजून दशके नव्हे शतके मला आणि माझ्या सारख्या अनेकांना चिकटून राहील.

मला खात्री आहे आताही तो आवाज आभाळातून हेच म्हणत असेल....
Hey come here
Not here there up in the sky
Come with me i want to fly
Don't stop let the whole world know
Don't stop let the whole world know
Come fast come fast don't be slow
Life is fire, life is snow

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस. बर्‍याच ठिकाणी अगदी अगदी झालं.
गाण्याच्या फ्लो मध्ये मानवी हावभावांचे फिलर्स टाकून तंत्रशुद्ध गाण्याला अजून एक्स्प्रेसिव बनवण्याचे एसपींचे कसब अफलातून होते.>> हो.

जुलै मध्ये झालेल्या याच कार्यक्रमात त्यांनी तीन चुका केल्या ज्या त्यांच्या जीवावर बेतल्या असे सांगितले जाते: १. मास्क काढला २. मास्क नसलेल्या व्यक्तीशी योग्य अंतर ठेवले नाही ३. सगळ्यात धोकादायक कृती: नाकाला स्पर्श केला

एस पी यांनी गायलेली हिंदी गाणी सगळी आवडतात. पूर्वी बंगलोरला रहात होते तेव्हा रेडीयो वर जुन्या काळातील कन्नड गाणे ऐकले. 'जोतेयली जोते जोटेयली' अर्थ काही कळत नव्हता पण एस पी यांचा आवाज इतका छान आहे ना.
https://m.youtube.com/watch?v=J5OXQsTLLHw
त्या चालीवर चीनी कम सिनेमात गाणे आहे.
हम आपके है कौन मध्ये 'मुझसे जुदा होकर' माझे आवडीचे गाणे. आपण वयाने कितिही मोठे झालो तरी एस पी ची गाणी ऐकताना परत मन त्या अल्लड वयात फिरुन येते.

मला एसपीची एक दुजे पासून ते राजश्रीपर्यन्तची, तशीच गर्दीश, लव सगळी गाणी आवडतात.

बादवे हे गाण तुम्ही कुणी ऐकलय का?

https://www.youtube.com/watch?v=1LfOj-i4Obc

बादवे हे गाण तुम्ही कुणी ऐकलय का?
हो खुप वेळा. का कोण जाणे पण हे गाणं प्रत्यक्ष व्हिडिओ बघेपर्यंत कमला हासनच आहे असच वाटत होतं त्याकाळी.

मी पण ऐकलं आहे हे गाणं लहाणपणी..वडिलांनी कैसेट भरून आणली होती त्यांच्या आवडीच्या गाण्यांची त्यात होतं...

@ झंपी
येसुदास नंतर हेच आवडले मद्रासी गायक.. नंतर हरीहरन..
>>>>
अगदी.. मी सुद्धा या तिघांना असेच एकाच गटात पण वेगवेगळे बसवेन. आपली अशी आवजाची वेगळीच अदभुत छाप सोडतात हे तिन्ही गळे

लेखात आजा शाम होने आयी गाण्याचा उल्लेख जसा आहे.. तसे माझ्यासाठी त्याच चित्रपटातले "मेरे रंग मे रंगने वाली, परी हो या हो परीयोंकी राणी आहे..."
शाहरूख मला फार नंतर आवडू लागला. आधी या गाण्यामुळे सलमान आत शिरला.. पण खरे तर तो आत जो शिरला होता तो हा मर्दानी आवाज होता हे कळायची तेव्हा अक्कल नव्हती.

यानंतर जेव्हा सलमानसाठीच गायलेले पहला पहला प्यार है ऐकले आणि ते सुद्धा उतरले तेव्हा मात्र हे जाणवले.

छान लिहिले आहेत हायझेनबर्ग.

ऑटाफे?>>>>>>>>>>> ऑल टाईम फेवरिट.

आत्ताच ' सच मेरे यार है बस वही प्यार है' ऐकलं. अपनी तो हार है ला फारच तुटतं. Sad
खूप छान लेख लिहिला आहे. थोडा रॉमँटिक, थोडा मर्दानी, थोडा मधाळ असं मस्त कॉबिनेशन आहे एसपींच्या आवाजाचं.
मैने प्यार किया ची गाणी ऐकल्यावर आपल्याही जीवनात अशा आवाजाचं कोणीतरी यावं असं फार वाटायचं. Happy

ऑटाफे?>>>>>>>>>>> ऑल टाईम फेवरिट. >>>>>> धन्स

आणखी एक ऑटोफे गाण:

https://www.youtube.com/watch?v=0-c6GwI5mgA

तो मुलगा झालेला मुलगी आहे. प्रियान्का नाव आहे तिच. वन्श सिनेमात हिरोईन होती सुदेश बेरीची.

हो सुलू हे गाणं विस्मरणात गेलं होतं. मला पण आवडतं . गाणंही, शब्द, त्याचं पिक्चरायझेशन, सगळंच आवडतं

सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम

सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला.

https://youtu.be/iZACVIMSbOM

मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहे.

हा त्याचा हिंदी अवतार हे शिवशंकर
https://youtu.be/eEBc8LFI-GE

हो सुलू हे गाणं विस्मरणात गेलं होतं. मला पण आवडतं . गाणंही, शब्द, त्याचं पिक्चरायझेशन, सगळंच आवडतं >>>>>>> ++++++++११११११११

https://www.youtube.com/watch?v=AWs7LqmdM8U

हे गाण जर डोळे बन्द करुन ऐकल तर सलमान खानच वाटेल.

त्यांचे नाव श्रीपथी नसून श्रीपती आहे. दक्षिण भारतात ती चे स्पेलिंग थी असे करतात (इंग्रजीत).

Pages