तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

Submitted by ताजे प्रेत on 22 September, 2020 - 13:31

गाभा:
तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली.
रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं-
"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"
रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं-
"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?"
रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-
"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"
समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली.

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती.

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले.
रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -
१) ३७ जणांचा मृत्यू झालेला होता. आणि कारणे खाली येतीलच
२) २८ मुली विधवा झालेल्या होत्या. ४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.
३) १३ जण घटस्फोटीत होते.
४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती. आणि काही मरण पावली होती
५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .
६) १९ मुले मुली वेगवेगळ्या ड्रगज च्या व्यसनात होते आणि त्यातले काही मरण पावले होते
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .
८ ) ४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता,
९) ५ जण गँगस्टर झाले होते आणि २ जण विरोधी गॅंग चे असल्याने त्यांनी एकमेकांना ठोकले होते . अजून एकाला वर्गातल्याच कमिशनर झालेल्या मुलाने एन्काउंटर मध्ये उडवले होते. वर्गातील काहींची मुले हि वेगवेगळ्या गॅंग मध्ये होती
१० ) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
११) ४ जण समलैंगिक झाले होते आणि त्याचे हि ब्रेक अप झाले होते.
१२ ) २ जण करोना काळात मास्क चा काळाबाजार करताना पकडले गेल्याने त्यांना खूप हप्ते द्यावे लागत होते
१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती
१४) ३ जण ब्रेन ट्रान्सप्लांट मध्ये मेंदू चा काळाबाजार करतांना पकडले गेले होते
१५) ७ जण करोना ने मरण पावले होते . ३ जणांची फुफुसे बदलावी लागली होती .
१६) २ जण नोटबंदी च्या रांगेत मरण पावले होते
१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते .
१८) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.
१९) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.
२०) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.
२१) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.
२२) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.
२३) १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.
२४) ११ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
२५) ४ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.
२६) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.
२७) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.
२८) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-
"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

Group content visibility: 
Use group defaults

कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण सध्याच्या घडीला मायबोलीवरचा सगळ्यात डिप्रेस माणूस मी आहे. डिप्रेशनचं दुसरं समानार्थी नाव बोकलत बोललात तरी वावगं ठरणार नाही.
>>>>>>

मायबोलीवर सर्वात जास्त साईकीअ‍ॅट्रीस्टची गरज कोणाला असेल तर ती मला आहे. आपण यावर पोल घेऊ शकतो. फक्त वोटींग करताना तुम्ही भूतं वापरायची नाही, मी डुआयडी वापरणार नाही हे आधीच ठरवूया.

आणि तसेही आर्किमिडीजने युरेका युरेका करण्याव्यतिरीक्त फारसे काही केल्याचे ऐकिवात नाही, मग कसे नाव लक्षात राहणार?>>>>>

एक से एक
तुझे आदर्श सचिन पिळगावकर का याचे उत्तर मिळाले Happy

बापरे किती ते प्रतिसाद.... क्यूं गढे मुडदे उखाड रहे हो लोगों.... ओह्ह्ह.... हे गढे नाही ताजे आहे....

आणि तसेही आर्किमिडीजने युरेका युरेका करण्याव्यतिरीक्त फारसे काही केल्याचे ऐकिवात नाही, मग कसे नाव लक्षात राहणार? >> अरे लक्स च्या जाहिरातीत शारूख पण टबातून उठला नाही... आर्किमिडीज पार रस्त्यावर गेला तरी काही ऐकीवात नाही... शेळी जाते.... Wink Happy

अमितव, धन्यवाद
नक्की वाचतो तो लेख Happy
उघडताच पहिले वाक्य वाचले ते ईतरांसाठी कॉपीपेस्ट करतो.

आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल!

याचा अर्थ आर्किमिडीज आणि युरेका युरेका यापलीकडे फारसे माहीत नसणे हे कॉमन आहे भारतीयांमध्ये. जे शिकलो तेच माहीत असणार तेच आठवणार...

तुझे आदर्श सचिन पिळगावकर का याचे उत्तर मिळाले Happy
>>>>>

ते माझे आदर्श नाहीयेत, त्यांचे जे महागुरू म्हणून नृत्यातले ज्ञान दिसले ते मी मानतो. त्यांच्यातील चतुरस्त्र कलेचा चाहता आहे.
या यशस्वी लोकांच्या अंगात जे चांगले असते ते उचलावे. जे नाही त्यावर टिका करण्यात का आयुष्य व्यर्थ घालवावे ईतका सरळ फंडा आहे.

लेख म्हणून ते वाक्य रंजक असले तरी खरे नाही. तहानलेला कावळा ही गोष्ट बहुतेकांना माहिती असते. साधारणपणे तेच आर्किमिडीज प्रिंसीपल असे सरांनी शिकवलेले आजही आठवते. कसे आणि कुणाकडून काय शिकलो ह्यावर काय आठवते हे खरे आहे.

बाकी शारूख वर बोलायचा चान्स असताना रून्मेष आर्किमिडीजवर चिकटून राहिला हे पाहून मला डिप्रेशन आले.... Wink
अमितव लेखाबद्दल धन्यवाद !

याचा अर्थ आर्किमिडीज आणि युरेका युरेका यापलीकडे फारसे माहीत नसणे हे कॉमन आहे भारतीयांमध्ये. जे शिकलो तेच माहीत असणार तेच आठवणार...>>>>>
तू शिकला नाहीस याचा अर्थ सगळे भारतीय तुझ्यासारखे होत नाहीत
शाळेतच आर्किमिडीज ची तत्वे होती
आता म्हणशीलच की आमच्या शाळेत परदेशी शास्त्रज्ञांबद्दल शिकवत नव्हते
हे कॉमन आहे Happy

मुळात मिसेस आर्किमिडीज ने बाथ टब काठोकाठ भरला नसता तर हा शोधच नसता लागला Happy
(माझ्या मते पटकन एक टॉवेल गुंडाळून बाहेर पडायला हरकत नव्हती.)

Biggrin मी_अनु... ममा आर्किमिडीजने आर्किमिडीजला बटाटे चार बोटे बुडतील इतक्या पाण्यात उकड असे कधीच न सांगितल्याने हा शोध लागला.

त्यांच्यात चालत नसतील बटाटे उकडलेले.
बहुतेक सुके रोस्ट स्टाईल मध्ये भांड्यात पाणी न घालता कुकरमध्ये घालून उकडत असतील Happy
आर्किमिडीज ला कमी पाणी घातल्याने दाटलेला भात आणि टणटणीत कडक डाळ खावी लागली नाही.खाल्ली असती तर योग्य पाण्याचं महत्व कळलं असतं.

रोस्टेड बटाट्यात सावर क्रिम आणि चिरलेली कांद्याची पात घालून खाऊन किती दिवस झाले.
लॉकडाऊन मध्ये हापिसातलं फुकटचं जेवण बंद झालं आणि बटाटे मिळेना!

मग चिकनवर घालून खा.
( इफ यु डोन्ट गेट ब्रेड स्टाईलमध्ये वाचावं)

meanwhile Wink

photo-2020-09-24-21-17-57

Lol जिद्दु
बेगानी प्रेतयात्रा में माबोकर दिवाने Proud

असेच एक ताजे प्रेत आणि वरील शाळेतील "गुणवंत" विद्यार्थी
असेही बनवा हो कुणी , कुणी कँसर , खून , अपघात, गांजा , वेड, आजार, अशी गर्दी असलेली शाळा....

वरील कुणालाही एवढा स्ट्रेस असूनही ब्लड प्रेशर नसल्याने मला सकारात्मक वाटतयं.

ते माझे आदर्श नाहीयेत, त्यांचे जे महागुरू म्हणून नृत्यातले ज्ञान दिसले ते मी मानतो. त्यांच्यातील चतुरस्त्र कलेचा चाहता आहे. >> डिप्रेशनच्या धाग्यावर महागुरु काय करताहेत?

आमची मुंबई गाणे पाहिल्यावर जगात किती अत्याचार आहेत हे पाहून आपले जग किती सुखी आहे याची जाणीव होते Happy

मायबोलीकरांनी ताज्या प्रेतात अभूतपूर्व रूची दाखवल्याने रातचं जेवायला निघालेल्या झाँम्बी आदी गरीब मंडळींना असुरक्षितता व अन्यायाची भावना दाटून आली असेल का!!!
माझा हाच पहिला अमानवीय अनुभव आहे . Wink

व्यक्ती म्हणून ताजे प्रेत यांचा व विषय म्हणून नैराश्याचा पूर्ण आदर आहे.

शाळेतच आर्किमिडीज ची तत्वे होती
>>>>>
अहो आशुचॅम्प मी मराठी शाळेत होतो. दहावीपर्यंत आर्किमिडीजची स्पेलिंग कोणी मला विचारली असती तरी मी आर वरून बोल्लो असतो. फुल्ल स्पेलिंग आजही येत नाही ती गोष्ट वेगळी. पण तेव्हा शाळेत आर्किमिडीजची तत्वे शिकवायला आमची शाळा काही वैज्ञानिकांची नव्हती. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह किंवा प्रतिष्ठा, परंपरा आणि अनुशासन असली तत्वेच शाळेत शिकवली जायची आणि पुढे आयुष्यातही तीच कामाला आली.

Pages