तुम्ही घरकामाला बाई पुन्हा ठेवली आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2020 - 18:58

लॉकडाऊन लागायच्या आधीच आमची बाई सर्वांची नोकरी सोडून कायमची गावाला गेली. आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार असल्याने महिनाभरासाठी तात्पुरती बाई पाहिली. पण तिलाही या महिन्याभराच्या कामात रस नसल्याने दोमचार दिवस काम करत ती सुद्धा गायबली. मग कोरोना आला. लॉकडाऊन लागला. या काळात सोसायटीनेच घरकामाल बाई ठेवण्यास मनाई केली होती. आणि नंतर जेव्हा निर्बंध हटवला तेव्हा आम्हीच रिस्क नको म्हटले. तसेही बायको आणि आई मिळून घर व्यवस्थित चालवत होत्या. माझीही वर्क फ्रॉम होम मुळे त्यांना मदत होत होतीच. आणि तसेही पुन्हा थोड्या काळासाठी नवीन बाई शोधण्यात अर्थ नव्हता.

नुकतेच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालोय. तर मोठे घर, त्या घरातला पसारा, नवीन घराची छोटीमोठी कामे, आजूबाजूचे काम चालू असल्याने येणारी धूळ, मुलीची ऑनलाईन शाळा, माझे नुकतेच आठवड्यातून दोन दिवस सुरू झालेले ऑफिस यामुळे एकंदरीतच घरकामाला कोणी मदतीला आले तर बरे असे पुन्हा घरच्या बायकांना वाटू लागलेय.
घरकाम म्हणजे कचरा, भांडी, लादी पुसणे वगैरे.. स्वयंपाक जोपर्यंत आईबायको आवडीने करताहेत तोपर्यंत त्यांच्याच हातचेच खायला आवडते.

तर चौकशी करता समजले की नव्या बिल्डींमध्ये जे आतापर्यंत राहायला आले आहेत त्या सर्वांच्या घरी घरकामाला बाई येते. आम्हीच आहोत जे अजून कोरोनाच्या भितीने हे टाळत आहोत. त्यामुळे आता घरच्या दोन्ही बायकांमध्ये कुजबूज सुरू झालीय की आपणही आता बाई बघायला हरकत नाही. फारतर काळजी घेऊया. पण ती काय हे त्यांनाही ठाऊक नाही.न्म्हणून हा धागाप्रपंच.

तुमच्याकडे घरकामाला बाई येते का? किती वेळासाठी येते? काय काय काम करते? आणि याबाबत तुम्ही एकूणच काय काळजी घेता? उदाहरणार्थ तिला आल्या आल्या हात धुवायला लावणे? तिचे सामान असल्यास वेगळे ठेवणे? तिला मास्क लावायला सांगणे? झाल्यास आपणही मास्क लावणे? तिला मोजकीच कामे सांगणे जेणेकरून कमीत कमी तिचा घरात वावर होईल? ईतर आणखी काही काळजी? कि अजूनही हि रिस्क घेऊ नये? अजून काही काळ आपली कामे आपणच करावीत?

सर्वांची याबाबत मते आणि अनुभव फायदेशीर ठरतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदाहरणार्थ तिला आल्या आल्या हात धुवायला लावणे? तिचे सामान असल्यास वेगळे ठेवणे? तिला मास्क लावायला सांगणे? झाल्यास आपणही मास्क लावणे? तिला मोजकीच कामे सांगणे जेणेकरून कमीत कमी तिचा घरात वावर होईल? >हे सगळे करावे. तसेच...
दारात आल्या कि बाईंच्या हातावर(तीर्थ देतो तसे) सॅनीटायझर द्यावे.
Infrared Forehead Thermometer (नसेल तर घ्या) ने त्यांचे Temperature तपासावे.
Fingertip Pulse Oximeter Finger Blood Oxygen Saturation Monitor ने Oxygen level तपासावी.
त्यांच्या पूर्णवेळ मास्क वापरावर लक्ष द्यावे. (नाहीतर मावशी/बाई बोलक्या असतील तर मास्क राहतो बाजूला)
आमच्याकडे कामाला कोणी येत नाही. पण मी डॅाक्टरकडे गेले होते तेथे अशी खबरदारी घेतलेली आढळली.

हे सगळे करावे. तसेच...
दारात आल्या कि बाईंच्या हातावर(तीर्थ देतो तसे) सॅनीटायझर द्यावे.
Infrared Forehead Thermometer (नसेल तर घ्या) ने त्यांचे Temperature तपासावे.
Fingertip Pulse Oximeter Finger Blood Oxygen Saturation Monitor ने Oxygen level तपासावी.
त्यांच्या पूर्णवेळ मास्क वापरावर लक्ष द्यावे. (नाहीतर मावशी/बाई बोलक्या असतील तर मास्क राहतो बाजूला) >>आणि हे सगळे रोज करावे लागणार असेल तर त्यासाठी पुन्हा एक वेगळी बाई ठेवावी Happy

आमच्या बिल्डिंगमधे पण बाकिच्यांनी कामवाल्या मावशीला बोलवलय..पण मी नाही बोलवले आणि बोलवण्याचा विचार पण नाहीये... त्यात आता बिल्डिंग मध्ये रोज एक कोरोना पेशंट सापडु लागलेत..
माझी कामवाली खूपदा येऊन विचारून गेली, सगळ्यांनी बोलवलय,येऊ का तुमच्या घरी पण? नेहमी तीला थोडे पैसे देऊन,कोरोना गेल्यावर बोलवेन सांगते.

आता बिल्डिंग मध्ये रोज एक कोरोना पेशंट सापडु लागलेत.>>> अगदी..
ईतके दिवस काढलेत आता अजून काही महिने थांबा. आपले आरोग्य महत्वाचे.

बंगळूरला तरी आमच्या सोसायटीत मे महीन्यापासूनच कामवाल्या बायका परत यायला लागल्या. अर्थात काही काही घरांनी स्वेच्छेने अजूनही बोलवलेल्या नाहीत.
त्या बायका गेटमधून आत शिरल्या की सिक्युरिटी गार्ड त्यांचं तापमान चेक करतो. त्यांनी मास्क घातलेला असतोच. लिफ्टजवळ आणि सिक्युरिटीजवळ एकेक सॅनीटायझर स्टँड आहे. त्यातून त्या सॅनीटायझर घेतात. तरी शिवाय घरी आल्यावर त्या काम सुरू करण्यापूर्वी साबणाने हात धुतात. मास्क पूर्णवेळ असतोच.
तरी नाकावरून थोडा खाली घसरतोच. आणि लादी पुसण्यासारखी कामं करताना एरवीही आपल्याला दम लागतो तिथे त्यांना आणखी नाकावर घट्ट मास्क ठेवा असं सांगवत नाही. तेवढं मी सोडून देते. मात्र आता पहिल्यासारख्या गप्पा मारत नाही मी त्यांच्या जवळ उभी राहून. Happy

त्या बायका गेटमधून आत शिरल्या की सिक्युरिटी गार्ड त्यांचं तापमान चेक करतो. त्यांनी मास्क घातलेला असतोच. लिफ्टजवळ आणि सिक्युरिटीजवळ एकेक सॅनीटायझर स्टँड आहे. त्यातून त्या सॅनीटायझर घेतात. .....

आमच्या इथे पण हे सगळं फोलो करताएत..

आम्ही बोलावलं कामवाल्या बाईला परत.
ती किती वेळ असते, काय काम करते वगैरे प्रश्नांची उत्तरं नाही देणार मी पण काय काळजी घेतो ते सांगते.
१) आल्या आल्या सॅनिटायजर देणे
2) टेम्परेचर चेक करणे
३) ऑक्सिजन लेव्हल चेक करणे
4) मास्क काढू न देणे

ही ताई आमच्याच सोसायटी मध्ये राहते आणि फक्त आमच्याच घरी काम करते तरीही आम्ही हे सगळं करतो कारण आमच्या घरी एक कॅन्सर सरवायवर, एक लहान बाळ, एक हार्ट पेशंट आहे.
कान्ट रिस्क!!!

आमची सोसायटी लहान आहे, बिल्डिंगला लिफ्ट नाही , ताई घरी एकटीच राहाते यामुळे हे इतके precautions पुरे असावेत असं वाटतं.

आमच्या घरात फक्त मी आणि बाबाच घरा बाहेर पडतो आणि आल्या आल्या लगेच अंघोळ करतो

बाई विश्वासू(खूप घरात कामं न करणाऱ्या) आहेत का हे बघणे.
सॅनिटायझर आणि मास्क.
सोडियम हायपॉकसी ची टॅबलेट मिळते ती पाण्यात विरघळून बाई काम करून गेल्यावर साध्या मॉप ने जमीन पुसून काढणे(उद्योग होतो पण ईलाज नाही.आम्ही हे करत नाही.पण करणारे बरेच आजूबाजूला पाहिलेत.).दुसरे म्हणजे बाई काम करून गेल्यावर आपण स्वतः हात धुणे/आंघोळ.(इतकं पुरेसं नाही माहिती आहे.पण रिस्क ची रेंज कमी करत जायची.)

एक्सपोजर कुठून न कुठून येणार आहे.ते कमी करणे इतकं करू शकतो.

घरात 5 पेक्षा लहान वयाची मुले असल्यास बाई परत बोलावणे जरा रिस्की वाटत असेल.वेळेत झोपून लवकर उठून 45 मिनिटात सगळी कामे होतात.ताटं वाट्या ज्याच्या त्याला कमी पाण्यात नीट धुवायला लावणे.(आणि या कामाला घरातल्या सर्वाना कामाला लावावे.अगदी नोकरी न करणारी घरातली स्त्री असेल तरी)एकटी बाई/एकटा माणूस करत बसल्यास वेळ जास्त जातो.'ही कामं बायकांची,ती पुरुषांची' असं मेंटल कंडिशनिंग मुलांचं लहानपणी फक्त आईला कामं करताना बघून झालं तर मोठेपणी त्यांना त्रास होतो.

आमच्या मावशी 1 ऑगस्ट पासून यायला लागल्या.मग मध्ये किडनी स्टोन आणि थायरॉईड चा त्रास झाला आणि काम करायला त्रास व्हायला लागला.ऑपरेशन लागेल.आता येणार नाहीत 1 महिना.बदली बाई वेगळ्या सोसायटीत कामं करणारी देत होत्या पण आम्ही नको म्हटले.आता व्हॅक्युम क्लिनर आणि मॉप.

आमच्याकडे गावी सुरवातीला 4 महिने एकही covid पेशंट नव्हता त्यामुळे मावशी कायम येतात पण आता पेशंट दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे आता मावशींना बोलावयाच की नाही हा विचार करतेय

घाबरवायचे नाही, पण पैशाशिवाय घर चालत नाही.

तापाची गोळी घेऊन काम करणार्या केसेस मी काम करणार्या फॅक्टरीत सापडल्या. अशावेळी थर्मल गन चा उपयोग होत नाही. सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आले.

आमच्या मावशी जून पासूनच यायला लागल्या.. आल्या की आधी बाथरूम मध्ये हात-पाय धुवून, भांडी घासून घेतात,नंतर केर व फरशी करून 15-20 min मध्ये निघून जातात,मास्क सतत असतोच.. आम्ही 1/2 जेवढे घरात असू ते सर्व छोटी study room आहे,तिथे बसतो,अर्धा तास
Study room आम्हीच स्वच्छ करतो,जमेल तशी .. बाकी केर झाला की फॅन सुरु ठेवतो 15-20 min सर्व खोलीत आणि खिडक्या/दारं(लोखंडी दाराला लॅच आहे) उघडी असतात.. त्या गेल्या की मेन आणि बाथरूम चा दरवाज्याच्या कड्या,हँडल पुसून घेतो
मावशींना बजावून ठेवलंय जर त्यांच्या घरात कुणाला ताप/खोकला असेल( ते दोघेच आहेत नवरा-बायको घरात) तर ph करून सांगा,15 दिवस येऊ नका,आम्ही पूर्ण पगार देऊ

मावशी येतात. वर्शभर कुठे घरकाम करणार म्हणून बोलावले आहे. त्या आल्या की हातपाय धुतात. मास्क वापरतात. केर फरशी, भांडी घासतात, जातात. घरकाम, ऑफिस्काम व स्वच्छता सगळे वर्षभर करणे कठीण होईल म्हणून रिस्क आहे तरी घेणार आहे.

आमच्याकडे ४-५ दिवसापासून भांडी घासणार्या/पोळ्या करणार्या मावशी यायला सुरूवात झाली. बिल्डींगमधे प्रवेश करतानाच त्या हातावर सॅनिटायझर मारतात. तरीही घरी आल्यावर काहीही न करता आधी साबणाने हात धुवायला सांगते. त्यांनी चुकीने हात न धुता कशाला स्पर्श केला तर कोलीन मारून तो पृष्ठभाग पुसून घेते. घरात काम करताना त्या मास्क घालत नाहीत, आम्हीही सांगत नाही कारण घाम येऊन त्रास होतो हे स्वानुभवाने माहीती आहे. त्या असताना माझे काम स्वयंपाकघरात चालू असते. मात्र आईला वावरायला पूर्ण बंदी घातलीय. त्या गेल्यावर लादी पुसत नाही. पण २-३ दिवसापूर्वी ऍक्वागार्ड दुरूस्त करायला माणसं आली होती, त्यांच्या सॅक्स होत्या बरोबर. त्यावेळी ते जिथे वावरले तो सगळा एरीआ पुसून घेतला.

मी मार्च पासून आजतागायत भांडी, केर, फरशी, पोळ्या हे सगळं करतीय आणि डिसेंबर एन्ड पर्यंत तसंच कंटिन्यू ठेवणारे.
माझ्या आजूबाजूंच्या सगळ्याकडे बायका येतात. पण पुण्यामधला वाढता वाढे आकडा बघून आम्ही न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंही आमच्या मावशी सुतारदारतून येतात की जो डे वन पासून आजतागायत containtment झोन आहे.
खरंतर रोज उठून हे सगळं करायचा कंटाळा येतो
पण उगाच बोलावून घेऊन रिस्क घेऊ नये असे वाटले.

खूप वर्ष तुमच्या कडे कामवाली बाई काम करत असेल तर तिला किती लोक नी काम वाल्या बाई ला पगार दिला आहे.
असा धागा पाहिजे होता.

मी lockdown declare झाल्यापासून झाडणे, पुसणे ,भांडी हे सगळं घरीच करत आहे.
जेवण झाल्यावर प्रत्येकजण आपापली ताट वाटी घासून ठेवतो. कपड्याना मशीन आहे.
सध्याची परिस्थिती बघता अजून ६ महिने तरी सगळं घरीच करायचं असं ठरवलं आहे. अर्धा तास लवकर उठते नेहमीपेक्षा. आता सवय झालीये.
बाईला lockdown मध्ये पूर्ण पैसे दिले. मार्च मध्ये तसंही तीन निम्मा महिना काम केलं होतंच.

हुच्चंभृ सोसायटीपेक्षा स्लम मधल्या लोकांच्यात अँटिबॉडीज जास्त आढळल्या आहेत , म्हणजे टॉवर मधले फक्त 10-15 % इम्युन आहेत व झोपडपट्टीतले आलमोस्ट 50 % इम्युन आहेत

मोदींनी राम मंदिर कार्यक्रम केला तेंव्हाही कोविड होऊन गेलेले पोलीस मुद्दाम पोलीस पथात घेतले होते

The study revealed that 57% of slum population and 16 per cent of non-slum residents in these civic wards had developed antibodies, the BMC said on Tuesday.

https://www.thehindu.com/news/national/coronavirus-57-of-mumbai-slum-pop...

त्यामुळे कामवाली ठेवण्यापेक्षा तुम्हीच दोन चार महिने तिच्या घरी सकाळ संध्याकाळ चहा प्यायला जा म्हणजे तुम्हीही इम्युन व्हाल.

Proud

गर्व से कहो हम अँटीबॉडीवाले है

आमच्या शेजारच्या सोसाटीत कामवाली मुळे कोरोना झाला २ फॅमिलीस ला म्हणून आम्ही कोरोना लस आल्याशिवाय कामवाली लावायची नाही हा निर्णय घेतला आहे. आधी घरातली कामे जड वाटली आता सवय झाली आहे. आम्ही दोघे IT वाले बसून काम करणारे घर कामामुळे थोडाफार naturally व्यायाम होतो आणी घरातील कामे ही चांगली होतात. कामे वाटून घेतली की जास्त जड नाही जात. मी जेवण, डिशवॉशर ला भांडी लावणे, पोचा करते, सकाळी लवकर उठून जेवण बनवून फ्रिज मध्ये ठेऊन देते, मुलगा vaccum ने रोज वापरातील रूम्स क्लीन करून घेतो. नवरा वॉशिंग machine लावणे, कपडे सुकत टाकणे, घडी घालणे, भाजी सामान आणून ठवणे इ करतो, वीकएंड ला मी भाज्या कापून ठेवते, लसूण निवडून ठेवते, आलं लसूण मिरची पेस्ट करून ठेवते , चटण्या, इडली batter, चिवडा, चकली, लाडु असं करून ठेवते मध्ये खायला, सकाळी ९ पर्यंत सगळी काम आवरून आम्ही तिघेही आपल्या कामाला सुरुवात करतो, आमची ऑफिस आणी मुलाचे ऑनलाईन स्कूल. सगळी काम ९ च्या आत संपून जातात. संध्याकाळी खिचडी, चटणी पोळी, इडली चटणी, डोसा चटणी किंवा सकाळचे उरलेले जेवणही update करून चालून जाते Happy

जर घरात लहान मुलं असतील तर बाई टाळणे, त्या ऐवजी थोडी इन्व्हेस्टमेंट करून ऑटोमॅटिक मशीन्स घेणे उत्तम, मशीन बाई पेक्षा जास्त hyginic, कमी कटकटीचे असते, सुट्ट्या मारत नाही आणी दिवसातून चार वेळा हि विना झिकझिक काम करते असा माझा अनुभव आहे

कपड्यांसाठी ऑटोमॅटिक frontload वॉशिंग machine ज्यात फक्त कपडे टाकून दिले की छान धुतले जातात
डिशवॉशर भांडी धुण्याचे टेंशन कमी करते आणी बाई पेक्षा खूप छान भांडी क्लीन करते
Vaccum क्लिनर सगळी धूळ साफ करते

आणी जेवणा साठी थोडया चटण्या, थोडा सुका खाऊ वीकएंड ला बनवून ठेवला, भाज्या चिरून, आलं लसूण, मिरची पेस्ट करून ठेवली, इडली बॅटर करून ठेवले की जेवणाचे बरेच टेंशन working डे ला कमी होते.

वीकएंड ला मी भाज्या कापून ठेवते, लसूण निवडून ठेवते, आलं लसूण मिरची पेस्ट करून ठेवते , चटण्या, इडली batter, चिवडा, चकली, लाडु असं करून ठेवते मध्ये खायला >>>> हे सगळे मी मूवी किंवा webseries बघत करते मग कंटाळा नाही येत Happy

कामवालीकडून करोना झाला हे कसे समजले ?

परदेशातून करोडपती एन आर आय घेऊन आले रोग भारतात आणि कवारांटाईन न होता उधळत फिरले

आता अमित शहा पासून झोपडपत्तीपर्यंत सगळे ग्रस्त आहेत , कामवालीकडून झाला हे कसे समजले ?

उलट झोपडपट्टीवाले अँटिबॉडी कमवून बसले

दिव्याताई.. तुम्ही घरातल्याना चांगल्या सवयी लावल्या आहेत.. मिळून मिसळून काम करायची.. आमच्याकडे तर आसावरीचा डबड्या आहे..

थँक्स मानव पृथ्वीकर , श्रवु
कामवालीकडून करोना झाला हे कसे समजले ? >> कामवालीला लक्षण नव्हती पण तिचा नवरा पॉसिटीव्ह होता आणी टेस्ट केल्यावर तिची टेस्ट हि पॉसिटीव्ह आली, ती ज्या घरात काम करत होती तिथले काही मेंबर्स ही पॉसिटीव्ह आले, लवकर कळले म्हणून लवकर उपचार झाले सगळ्यांवर.

पण तरीही एव्हढ्यावरून सांगणे मुश्किल है >> कारण काही का असेना, कामवाली मुळे झाला असो वा नसो पण better safe than sorry, विषाची परीक्षा का घ्यावी.

Pages