Submitted by सुप्रिया जाधव. on 17 September, 2020 - 22:53
खडे जे संभ्रमांचे क्रूर नियती टाकते आहे
तुझ्या डोळ्यातले प्रतिबिंब माझे हालते आहे
तुझ्या शहरात असणे हा सुगंधी सोहळा असतो
तुझ्या श्वासांमुळे जिथली हवा गंधाळते आहे
हवेने ऐन रणरणत्या दुपारी रोख बदलावा
तसे भाग्यात आले सौख्य लहरी वागते आहे
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे
परत धाडायचे होतेच तर का मारल्या हाका ?
किनाऱ्याला धडकली लाट उत्तर मागते आहे
जरी अंधारले आहे, पुन्हा उगवेल नेमाने
भरवश्यावर जिवाची म्लान पणती तेवते आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. आवडली.
छान. आवडली.
छान.
छान.
सुंदर!
सुंदर!
आभार मंडळी
आभार मंडळी
वाह!!
वाह!!
>>>>>>>>>हवेने ऐन रणरणत्या दुपारी रोख बदलावा
तसे भाग्यात आले सौख्य लहरी वागते आहे
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे
परत धाडायचे होतेच तर का मारल्या हाका ?
किनाऱ्याला धडकली लाट उत्तर मागते आहे>>>>>>>>>>>>>
ही तीन कडवी फार आवडली.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
जरी अंधारले आहे, पुन्हा उगवेल
जरी अंधारले आहे, पुन्हा उगवेल नेमाने
भरवश्यावर जिवाची म्लान पणती तेवते आहे >>
सकारात्मक शेवट आवडला.
खूप आवडली.. सुंदर..
खूप आवडली..
सुंदर..शिर्षक पण आवडले..
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे>>> क्या बात!
आभारी आहे प्रत्येकाची
आभारी आहे प्रत्येकाची
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे---खूप छान