बालदिनाच्या निमित्ताने....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकप्रभात आलेला हा लेख.
वाचल्यानंतर कुठल्याही संवेदनशील माणसाच्या चित्तवृत्ती सुन्न झाल्या नाहीत तरच आश्चर्य. Sad
http://www.loksatta.com/lokprabha/20091120/baldin01.htm

आपल्याला काय करता येईल?

प्रकार: 

Sad

लहान मुलांना भिकेला लावणे अथवा इतर प्रकारे शोषण पूर्णपणे थांबवणे आपल्या हातात नाही. पण अशा प्रकारचे काम करणार्‍या एखाद्या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करु शकतो. मोलकरणीला अथवा माहितीतल्या गरीब कुटुंबाला मदत करण्याचा मुद्दा पण पटला. ते म्हणजे एक प्रकारे त्या गरीब आई-बापाला पैशासाठी मुलांना अशा मार्गाला लावण्यापासून परावृत्त करणेच झाले. अगदीच काही नाही तर सिग्नलपाशी भीक मागणार्‍या मुलांना खाऊ द्यावा. त्यांना मिळणार्‍या पैशांचा हिस्सा (बहुतेक दिवसाची सगळीच कमाई) बॉसकडे जातो, खाऊ नाही.

सिंडे, अगदी मान्य.
मला एक छोटीशी गोष्ट आठवली यावरून. असेच एकदा सिग्नलला एक छोटा, अर्धवट कपड्यातला मुलगा आला. माझा भाऊ म्हंटला पैसे नाही देणार, पण समोसा हवाय का? तो नाही म्हणाला. घेतच नव्हता अजिबात. पैशाचा हट्ट धरून बसला होता. मला भावाने देऊ दिले नाहीत. शेवटी गाडी सुटताना तो म्हणाला, 'द्या समोसा'. इतकं वाईट वाटलं ना, तो सगळा दिवसच उदास वाटत होतं. त्यांना पण मार पडत असेल ना, अमूक इतके पैसे नाही मिळवले तर. म्हणून खाण्याचा मोह टाळून बिचारा पैसे मागत होता. Sad इतका छोटा जीव होता ना. खूप खूप खूप अपराधी वाटलं.