जीरा कुकीज

Submitted by इवाना on 13 September, 2020 - 11:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटर (2 मोठे चमचे)
फोटो १
बटर व दळलेली साखर

दळलेली साखर (3 छोटे चमचे)
शेकलेले जिरेपूड(1/4 चमचा)
फोटो २
शेकलेलं जीरं

मैदा ( 1/2 वाटी)
कस्टर्ड पाउडर(3 छोटे चमचे)
बेकिंग पावडर(1/4 चमचा)
बेकिंग सोडा(1/4 चमचा)
फोटो ३
मैदा, कस्टर्ड पावडर, बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर

थंडगार दूध

फोटो ४
पायपिंग बॅग मधून ८ चा आकार देणे

शेकलेले जिरे
फोटो ५
तयार

क्रमवार पाककृती: 

सध्याच्या लॉकडाऊन काळात सर्वांनी घरी स्वयंपाक करण्याचे धडे गिरवले आहेत तसेच काहीसे मीही ट्राय केले.
मला स्वयंपाकाची पहिल्यापासून आवड आहे पण रेस्टॉरंट स्टाईल पाककृती ट्राय करायला जास्त आवडतात. दैनंदिन स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त काहीतरी करावं असे डोक्यात असताना एक रेसिपी माझ्या नजरेस पडली ती मी इथे शेअर करु इच्छिते.
(१) 2 मोठे चमचे बटर , 3 छोटे चमचे दळलेली साखर फेसून घेणे ( पांढरा रंग येतो ) व 1/4 चमचा शेकून घेतलेली जिरेपूड घालून पुन्हा फेसून घेणे.

(२) 1/2 वाटी मैदा , 3 छोटे चमचे कस्टर्ड पावडर, 1/4 चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा चाळून घेणे.

(३) क्र.1 व क्र.2 एकत्र करून कणिक बांधणे. त्यात हळूहळू करून थंडगार दूध ( साधारण चार चमचे) घालून कणिक सैलसर करणे. ( मिश्रण पायपिंग बॅग मध्ये भरता येईल इतपतच सैल करणे)
टीप : दुधाचे प्रमाण मैद्यावर अवलंबून आहे.

(४) मोठे स्टार नोझल लावून पायपिंग बॅग मध्ये भरून आठ चा आकार , ॲल्युमिनियम ट्रेमधील बटर पेपर वर काढावा . त्यावर शेकलेलं जीरा भुरभुरावे.

(५) बेकिंग -
जून्या कुकरमध्ये कुकर ची शिट्टी काढून , खाली वाळू किंवा मीठ पसरवून एक रिंग ठेवली , 10 मिनिटं कुकर प्रिहिट केला. मग कुकीज् ट्रे ठेवून १५-२० मि. मिडीयम फ्लेम वर बेक केले. वरून हलका ब्राऊन कलर आल्यावर काढून घेणे.
मूळ पाककृतीत कुकीज् प्रिहिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर १५ ते २० मिनिटं बेक केल्या.

रूम टेम्परेचर वर कडक होतात त्यामुळे जास्त वेळ बेक न करणे.
कुकीज चहासोबत सर्व्ह करणे.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना , १० नग
अधिक टिपा: 

टीप : दुधाचे प्रमाण मैद्यावर अवलंबून आहे.

माहितीचा स्रोत: 
कलर्स गुजराती: रसोई शो
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast.

वा !कुकर मध्ये करता येताहेत म्हटल्यावर नक्की करून पाहीन. मी पूर्वी 2वेळा ओव्हन मध्ये राऊंड शेप मध्ये बनवली होती जिरा बिस्किट्स, पण जळणारी लाईट आणि बनणारी बिस्किट्स यांचे प्रमाण व्यस्त असल्याने पुन्हा कधीच बनवली नाहीत.

@नादिशा : अल्युमिनियम चे मोठे पातेले असल्यास त्यात वाळू घालून करावे. शक्यतो अल्युमिनियमच्या भांड्यात वाळू घालूनच बेकिंग करावे. मिठाने ॲल्युमिनियम खराब होते भोकं पडतात.

थँक्स इवाना. मी वेगवेगळ्या प्रकारचे केक्स नेहमीच कुकर मध्ये बनवते. कुकीज नाही try केल्या कधी. आता नक्की करून पाहीन.