मुख्य पानावर धागा येण्यासाठी काय करावे लागेल

Submitted by कटप्पा on 9 September, 2020 - 23:18

मुख्य पानावर (maayboli.com)जे धागे असतात त्यांचा निकष काय आहे. सध्या तिथे चार पाच लेख दिसत आहेत.
लेख पहिल्या पानावर येण्यासाठी काय करावे लागते?
हा विरंगुळा धागा नाहीय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते ऍडमिन, वेमा करू शकतात, चांगले लेखन असलेले व महत्वाचे धागे ते मुखपृष्ठावर ठेऊ शकतात.
अपल्यामते चांगले लेखन असले तरी तिथे येत नसेल तर आपल्याला त्यांना आपला धागा महत्वाचा कसा हे पटवून द्यावे लागेल,

ऍडमिन आणि वेमा: इथे माबो साठी उत्पन्नाचा एक स्रोत दिसतेय बघा. दिवसाला काही १००₹ वगैरे शुल्क लावून धागा मुखपृष्ठावर ठेवता येईल. जे पूर्ण आठवड्याचे आगाऊ पैसे देतील त्यांना १०% सूट, महिनाभरासाठी २०% आणि वर्षभरासाठी ५०% असे करता येईल.

कटप्पा, जर माबोने वरील प्रमाणे सुविधा उपलब्ध केली तर पैसे भरून आपल्या बजेटनुसार आपली इच्छा आहे तेवढ्या कालावधी करता धागा मुखपृष्ठावर ठेवता येईल.

मुखपृष्ठ म्हणजे होमपेज का?
माझे ते पेज कधी उघडलेही जात नाही
ॲपवरून उघडताना डायरेक्ट नवीन लेखनाची यादी
असे ईतररही करत असतील तर
मग तिथे धागा ठेवायला पैसे मोजण्यात काय फायदा?

ॲपवरून उघडताना डायरेक्ट नवीन लेखनाची यादी
असे ईतररही करत असतील तर
>>
मी ॲप वापरत नाही तेव्हा हे माहीत नव्हते. पैसे भरून मुखपृष्ठावर लेख ही सुविधा उपलब्ध केल्यास ॲपवरूनही आधी मुखपृष्ठ उघडेल अशी सोय करावी लागेल मोबाला.

अतरंगी Happy

चांगले लेखन.
>>>
मी ॲप आल्यापासून पाहिले नाहीये मुखपृष्ट पण आधीही कधी तिथे माबोवरील उत्तम कथा, ललित लेख, गझल वगैरे पाहिले नाहीत. मला वाटते चांगले लेखनासोबत लेखाचा विषय काय आहे, त्यातील माहिती किती अभ्यासू आहे वगैरे जास्त मॅटर करते.

मागे माझाही एक धागा मुखपृष्ठावर आलेला.
त्यातले लेखन चांगले तर सोडा त्यात काही लिहिलेही नव्हते.
उलट मीच माहिती विचारलेली.
पण त्याखाली प्रतिसादात छान अभ्यासू माहिती आल्याने तो मुखपृष्ठावर झळकलेला.

आज बऱ्याच दिवसांनी माबोचे मुख्यपान पाहिले. राजु कसांबे सरांचे लेखन मिस करतोय. त्यांच्या धाग्यांवर प्रतिक्रिया नाही दिल्या जास्त कधी पण छान लिहितात. त्यांना भेटायलाही आवडेल योग आला तर.
अतरंगी + १