बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 September, 2020 - 19:23

स्पर्धेसाठी म्हणून या आधी खालील धाग्यावर प्रवेशिका दिली होती

https://www.maayboli.com/node/76386

ती आता मागे घेत आहे Happy

कारण स्पर्धेची वेळ वाढवण्यात आली असल्याने आमच्यातील किडा शांत बसणे आता शक्य नव्हते.

खरे तर आधीची वारली बूकमार्क किंवा टू ईन वन (बूकमार्क + हेअरक्लिप) कल्पना मला आवडलीच होती,

पण यावेळी आम्ही बूकमार्क नुसता बनवलाच नाही तर तो बनवायचा कसा याचे धडे देत तो वापरायचा कसा याच्या प्रात्यक्षिकासह विडिओ देखील रेकॉर्ड केला आहे.
त्यामुळे नवीन एंट्री देणे भागच होते Happy

थोडी मेहनत आम्ही केलीय तर थोडी तुम्हीही करा,

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ जरूर पहा -

https://jumpshare.com/v/vOBIaZ8q6UtpKJCTIKDO

विडिओमुळे वर्णनात पाल्हाळ लावायची माझी संधी हुकली Wink

तरी नियमानुसार फोटोही हवे असल्यास ते तेवढे देतो.

pari bookmark final 1.jpg

आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्ट.. परंपरा वगैरे.. Happy

pari bookmark final 2.jpg

पालकांची मदत -
बिनकामाचा पप्पा - मागचा पडदा जो नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लावेन लावेन म्हणून पडून होता तो लावला Happy आणि हो, मग छानसा विडीओही काढला.
टीचर मम्मा - पोरीला ईंग्लिश टॉल्किंग टिप्स दिल्या. पण ज्या तिने मनावर न घेता तिला हवे तेच आणि हवे तसेच बोलली Happy

धन्यवाद
- परी & ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ संयोजक - कृपया ही प्रवेशिका स्पर्धेसाठी अंतिम समजा.

छान Happy

मस्त!
व्हिडिओ तर एकदम भारी, की आत्मविश्वासाने, कुठेही न अडखळता बोलली!

धन्यवाद ऑल Happy

खरे तर काल स्कूलने एखादी ॲक्टीव्हिटी करून विडिओ मागितला होता तिच्याकडे
मग विचार केला की बूकमार्कच करायला लाऊया. दोन्हीकडे चालेल.
त्यामुळे ईंग्लिशमध्ये विडिओ झालाय. अन्यथा मराठीत आणखी मजा आली असती करायला.

हस्तकला भारीच आहे. उत्तम प्रात्यक्षिक. वस्तू चिटकवताना थोडी तारांबळ उडाली होती परंतु पहाताना मज्जा येत होती. बुकमार्क चा उपयोग कसा करायचा ते देखील छान दाखविले. लहानपणी वाचलेल्या पानाचे टोक दुमडून ठेवायचे किंवा पुस्तकच उलटे करून ठेवायचे किंवा सभोवती मिळेल ती वस्तू पुस्तकात वाचलेल्या पानांची खूण म्हणून ठेवायचे दिवस आठवले.

विडिओ खासचं .. टी -शर्ट पण Daddy's Girl वगैरे का Happy Happy
>>>>>>>

कपडे तसे तिचे तीच ठरवते. पण कधीतरी मम्माला हस्ताक्षेप करावासा वाटतो. जसे काल तिच्या मम्माने तिला काहीतरी सुचवले. जे तिला बिलकुल घालायचे नव्हते. जे तिचे नेहमीचे आहे, सुचवलेले तिला रुचत नाही. मग त्यांचे वाद सुरू झाले. मी त्यात तटस्थ होतो. त्यानंतर आत जाऊन हा डॅडीज गर्ल वाला घालून आली. आणि मला तिच्या पार्टीत घेतले.... पप्पा तू बघितले नाहीस मी डॅडीज गर्ल घातलेय... विषय संपला Proud

माझ्या लेकीनेही विडीओ बघून एक बूकमार्क बनवला.. १५ मिनीटांचंच आयुष्य लाभलं बिचाऱयाला .. त्यानंतर धाकटीने फाडला 79B1CB02-B17C-4EED-81CC-20EE091B15B9.jpeg

वॉव म्हाळसा... पण या बूकमार्कने माझ्या लेकीला जणू बक्षीसच मिळाले.. तिला दाखवल्यावर ती फार खुश होईल..पुढेही असे काही करण्यास यापेक्षा दुसरे भारी प्रोत्साहन नाही.. ईथे हा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद Happy

बाई दवे, आम्ही रात्री एकला त्या बूकमार्कचा विडिओ बनवला. छोटा रुनू तेव्हा झोपलेला. दोनला तो उठला आणि त्याच्या हाती
तो लागताच तासाभराच्या आयुष्य लाभून आमचाही बूकमार्क फाटला Happy

निळ्यात काही विशेष आहे का?
तिचे आम्हा तिघांशी (मी, मम्मा, आज्जी) भांडण झाले. चिडून आत गेली. थोड्यावेळाने दरवाजा उघडला तेव्हा हे बूकमार्क बनवून घेऊन आली. आम्हाला मस्का मारायला.

हा आमचा विडिओ शाळेच्या आज लाँच झालेल्या ऑनलाईन टीव्ही चॅनेलवर टेलिकास्ट झाला Happy
विडिओला चौकट आली. बॅकग्राऊण्डला म्युजिक आली. जिथे मुकाटपणे बूकमार्क करत होती तिथे विडिओचा स्पीड वाढवला आणि नुसतीच म्युजिक ठेवली. एकंदरीत प्रेझेंटेबल केला.
मायबोलीवर बूकमार्क स्पर्धा नसती तर काय करावे हा प्रश्नच होता आमच्यापुढे ..कारण अगदी एका दिवसाच्या किंबहुना काही तासांच्या शॉर्ट नोटीसवर मागवला होता...

Pages