पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - शाही मोदक- Sonalisl

Submitted by sonalisl on 1 September, 2020 - 15:12

(बालू)शाही मोदक
बऱ्याच दिवसांपासू बालूशाही करायचे मनात होते. तशी तयारी केली आणि मोदक करायची कल्पना सुचली.

लागणारे जिन्नस:
१ कप दूध
१/४ कप दही
१/४ कप तूप
१/२ कप पिठीसाखर
१/२ चमचा बेकिंग पावडर
१ १/२ कप मैदा
१ १/२ कप दूध पावडर
तळण्यासाठी तेल
सजावटीसाठी चाॅकलेट सिरप

पाककृती :

बालूशाहीसाठी भांड्यात १ १/२ कप मैदा, १/२ चमचा बेकिंग पावडर आणि १/४ कप तूप घेऊन चांगले मिसळून घ्यावे. मग त्यात १/४ कप दही, १/४ कप दूध आणि जरासे पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्यावे. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
24FE4F95-E602-407C-B44F-2302E5379E93.jpeg

या पीठाचे छोटे मोदक करून तळून घ्यावे. (या प्रमाणात २२-२३ मोदक आणि ७-८ बालूशाही होतात.)
हे मोदक मी बालूशाही प्रमाणे पाकात नाही घातले. पण जास्त गोड हवे असल्यास ते पाकात मुरवून घ्यावे.

82B43A41-1F72-48C7-8183-B651F6F2CF0A.jpeg

मावा करण्यासाठी १/२ कप दूधात १चमचा तूप घालून ते गरम करायला ठेवावे. मग त्यात १ १/२कप दूधाची पावडर घालून ते घट्ट आटेपर्यंत हलवावे. आटून गोळा झाल्यावर जरा गार करून त्यात १/२ कप पीठी साखर आणि वेलची पावडर घालून चांगले मळावे.
मोदकाला वरून या माव्याचे कव्हर केले. त्यावर चाॅकलेट सिरपने सजावट केली.
AD7776E7-2F13-4EAD-B2F1-D3F644FDFB32.jpeg

अधिक टीप :
हे मोदक केक आईसिंग, कूकी डेकोरेटींग जेल, चाॅकलेट फ्राॅस्टींग यापैकी काही वापरून सजवता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड.

मस्त.
दोन वेगवेगळ्या रेसिपीज आहेत ना?

भारी आयडिया .
चॉकलेटच्या कळ्यांची आयडिया मस्त