लॉक डाऊनच्या कृपेने जरा वेळ मिळतो नेहमीच्या रूटिनमधून तर ब्रेड बनवण्याचे प्रयोग सुरू असतात.
आणी मोदकांचे म्हणाल तर लग्नानंतरच उकडीचे मोदक खाल्लेत. आत्ता आत्ता कुठे थोडे जमतायं करायला.
तर जेव्हा ही स्पर्धा जाहीर झाली तेव्हा ब्रेड आणी मोदक असं काहीतरी फ्युजन करूया असा विचार केला आणी अर्थातच अमलात आणला. तर मायबोलीकर मंडळींसाठी सादर आहे स्टफ्ड ब्रेड मोदक.
यासाठी सारण आणी ब्रेड दोन्ही बनवायचे आहे.
आधी सारण बघूया.
सगळे साहित्य बारीक चिरून घ्यायचे.
सहा सात लसुण पाकळ्या
अर्धा इंच आलं
एक मध्यम कांदा
शिमला मिरची - 1 मध्यम
पत्ताकोबी - अर्धा कप
बीन्स - पाव कप
गाजर- अर्धा कप
कांदापात-
कोथिंबीर
पनीर
मटार
खरं तर भाज्या आपल्या आवडीप्रमाणे आणी कमी जास्त प्रमाणात घेता येतील.
कढईत थोड्या तेलावर आलं, लसुण, कांदा परतायचा.
सगळ्या भाज्या टाकून परतायचे. एक चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस, मिरी पावडर आणी मीठ घालायचे.
मी झाकण न ठेवता 10/12 मिनीट परतले. फार शिजवायचे नाहीये.
आता ब्रेड.
अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा साखर घालून ढवळले. त्यात एक चमचा इंस्टंट यीस्ट घालून दहा मिनीट ठेवले. यीस्ट चांगले फसफसायला पाहीजे.
दोन कप मैदा आणी एक कप कणिक घेतली. चवीनुसार मीठ, पाव कप तेल, थोडे ओरीगैनो आणी यीस्ट घातले. गरजेनुसार थोडे दुध आणी पाणी घालून अगदी सैल कणिक भिजवली आणी जवळपास वीस मिनीटे मळली.
नंतर एका भांड्यात हि कणिक ठेवून क्लिंज फॉईलने झाकून दोन तासांकरता ठेवून दिली.
दोन तासांनी कणिक जवळपास दुप्पट होते. पुन्हा थोडीशी मळून घेतली.
आता कणकेचा छोटा गोळा घेऊन, उकडीच्या मोदकांसारख्या कळ्या पाडून सारण भरले आणी मोदकांचा आकार दिला.
ओव्हनच्या ट्रे ला तेल लावून मोदक ठेवलेत. दोन मोदकांच्या मध्ये थोडी जागा असु द्या.
मोदकांना वरनं ब्रशने दुध लावले.
ओव्हनमध्ये 180 डिग्रीला जवळपास पंचवीस ते तीस मिनीटं लागली.
मोदक ओव्हनच्या बाहेर काढल्यावर अमुल बटर आणी कोथिंबीर मिक्स करून मोदकांना लावले. नंतर दहा ते पंधरा मिनीटे मोदक ओल्या कापडाने झाकून ठेवलेत.
तर करून बघा आणी आवडलेत का ते सांगा.
फोटो अप्रतिम सुंदर। सगळं
फोटो अप्रतिम सुंदर। सगळं प्रेझेंटेशन एक नंबर
कल्पना आणि प्रेझंटेशनमधे पहिला नंबर Happy मस्तच ग>> +१
नवीन कल्पना आणी सादरीकरण
नवीन कल्पना आणी सादरीकरण आवडल्याचे आवर्जुन सांंगीतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
सही आयडिया
सही आयडिया
नीलाक्षी, खूप छान कल्पना आहे.
नीलाक्षी, खूप छान कल्पना आहे.
फोटोग्राफी सुंदर!!
मस्त कल्पना...मोदक छानच
मस्त कल्पना...मोदक छानच
मस्त कल्पना! करून पाहणार
मस्त कल्पना! करून पाहणार नक्की.
शेंडी अजून वर करा पुढच्या
शेंडी अजून वर करा पुढच्या वेळी. बेक झाल्यानंतर मोदक वाटत नाहीय.
फ्युजनची कल्पना भारी आहे
फ्युजनची कल्पना भारी आहे
भारीये
भारीये
रेसिपी भारीये, त्याचे मोदक
रेसिपी भारीये, त्याचे मोदक करण्याची कल्पना भारीये आणि फोटो तर फारच भारीयेत.
वाह! इनोव्हेटिव्ह!
वाह! इनोव्हेटिव्ह! प्रेझेंटेशनही खूप आवडलं..
भारी कल्पना आणि सादरीकरण!
भारी कल्पना आणि सादरीकरण!
फारच भारी , अवनमध्ये मोदकांचे
फारच भारी , अवनमध्ये मोदकांचे तोंड ओपन अप होईल ही भिती आहे... पण करावे वाटतंय. पुष्कळ वेगवेगळ्या स्टफिंग्सना वाव आहे. खूपच छान. >>>>>हो अस्मिता. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे स्टफींग बनवता येईन. मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्याही ढकलता येतील. ब्रेडही फक्त गव्हाच्या पीठाचाही छान लागेल.
शिवाय वेगवेगळ्या आकारात करता
शिवाय वेगवेगळ्या आकारात करता येतात.

वाह हे पण तू केलेस?तू बरीच
वाह हे पण तू केलेस?तू बरीच ब्रेड एक्स्पर्ट आहेस
तुझ्याकडून टीप घ्यायला हव्यात.
एक्सपर्ट नाही गं. शिकतेय अजून
एक्सपर्ट नाही गं. शिकतेय अजून.
वा !मोदक bake करण्याची आयडिया
वा !मोदक bake करण्याची आयडिया भारी.
मी करते, पण मी ब्रेड रोल साठी करतो, तसे ब्रेड च्या कडा कापून टाकते. थोडा ओला करून त्यात सारण भरते, मग हाताने मोदकाचा आकार देते आणि तळून घेते.
पण ही bake करण्याची आयडिया तब्येतीला चांगली. आता पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने करून पाहीन.
मस्त आयडिया
मस्त आयडिया
मस्त दिसतायत ब्रेड मोदक.
मस्त दिसतायत ब्रेड मोदक. फोटो कातिल
वा !मोदक bake करण्याची आयडिया
वा !मोदक bake करण्याची आयडिया भारी.
मी करते, पण मी ब्रेड रोल साठी करतो, तसे ब्रेड च्या कडा कापून टाकते. थोडा ओला करून त्यात सारण भरते, मग हाताने मोदकाचा आकार देते आणि तळून घेते.
पण ही bake करण्याची आयडिया तब्येतीला चांगली. आता पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने करून पाहीन.>>>नक्की करून बघा.
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
Pages