पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - Red Rose Momos - ShitalKrishna

Submitted by ShitalKrishna on 28 August, 2020 - 12:44

या आठवड्या मध्ये अनुक्रमे पहिल्या दिवशी -भावाने लेट रक्षाबंधन निमित्त आणलेले कलाकंद, हल्दीराम डब्बा बंद रसोगुल्ला, दुसऱ्या दिवशी घरी सत्यनारायण पूजेसाठीचा प्रसाद, पुरणपोळी, तिसऱ्या दिवशी बाप्पा आगमनानिमित्त रव्याच्या उकडीचे मोदक, गौरी पूजना दिवशी शेजारी काकूंनी दिलेले बेसन लाडू, काल चॉकलेट ब्राउनी मोदक असं सगळा अगदी म्हणजे अगदीचं फारच गोग्गोड झाले, आमच्या गावाकडच्या भाषेत तोंड लईच गोड मचूळ झालाय, कायतर चमचमीत पाहिजे


Red Rose Beetroot Momos Version 1.0

घरात बीट होते.. chinese noodles, rice करण्यासाठी आणलेले सौस, व्हिनेगर होते, मग काय.. घेतेले कि मोमोस करायला..

कृती नेहमीच्या मोमोस सारखीच आहे, फक्त मी गव्हाचं पीठ वापरते, आणि आता त्यामध्ये बीट मिक्सर ला बारीक करून, त्याचा काढलेला रस कणकेत घातला, तेल मीठ घालून मळले.

राहिलेले पल्प/ चोथा, खिसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले मिरची, आलं, लसूण, तेलात परतून अर्धवट शिजवून घ्यायचे. मीठ, सोया सौस, व्हिनेगर टाकून stuffing सारण बनवला.

आणि मोमोस वळले.. Wink बनवले.

(खरं म्हणजे, गाजर बीटरूट हलवा करून, मोदक च्या उकडी मध्ये बीटरस घालून, बीट हलवा मोदक कारायचे आहेत.. Beetroot Halwa Red Modak Version 1.1 coming soon.. Wink महिनाभर तरी खाणार नाहीये गोड.. नंतर बघुयात, असं ठरवलं आहे)

क्रमवार फोटो :

1. तयारी अनुक्रमे बीटच्या रसात मळलेली कणिक, खिसलेले गाजर, तयार केलेले सारण

IMG-20200828-WA0056.jpg

2. पारी लाटून, मोमोस बनवले

IMG_20200828_212923 (1)_0.jpg

3. पूर्ण झालेला

IMG-20200828-WA0033.jpg

4. वाफवण्यापूर्वी

IMG-20200828-WA0039.jpg

5. वाफवल्यावर

IMG-20200828-WA0044.jpg

6. Plating करण्याचा प्रयत्न

IMG-20200828-WA0037.jpg

जमलंय का presentation?

IMG-20200828-WA0043.jpg

हिरवी मिरची कच्ची तुम्हाला झेपत असेल तर खा, मिरी द्या माघारी.
खाली पाण्यात कालवलेले हळद कुंकू नाहीये. Red chilly and Green Chilly Sauce आहे.

वाढणी प्रमाण : इथे तीन पाऱ्या मिळून एक मोमोस आहे, म्हणजे तीन मोमोस मिळून एक. बघा मग.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अत्यंत सुरेख मोमोज्, अगदी गुलाबासारखेच. सारण वाफवून घेण्याची गरज नाही का , मगं वेळही कमी लागेल.
Presentation is outstanding !

हिरवी मिरची कच्ची तुम्हाला झेपत असेल तर खा, मिरी द्या माघारी.>>> झेपते दोन्ही, नाही देणार माघारी Lol .
खूप छान.

सुंदर दिसतंय फार
खायलाही मस्त लागेल
क्रिएटिव्हिटी चांगली आहे.

खुपच छान!
(प्रेझेटेशन्ला स्टिलच्या एवजी दुसरी प्लेट वापरायला हवी होती, बाकि सग्ळ छान जमलय)

कलात्मक मोदक! शीतल तुझा उत्साह, उरक, कलात्मकता चे खूप कौतुक! ग्रीन चिली सॉस यल्लो दिसतोय.

@अनु @सुर्यगंगा @maitreyee धन्यवाद Happy

@धनुडी धन्यवाद Happy
<<(खाताना तीनाचा ऐवज असणार ते लक्षात ठेवलं पाहिजे.) >> बरोबर.. mention केलंय वाढणी प्रमाण मध्ये

@प्राजक्ता, धन्यवाद Happy
<<(प्रेझेटेशन्ला स्टिलच्या एवजी दुसरी प्लेट वापरायला हवी होती, बाकि सग्ळ छान जमलय)>> सध्या only healthy kitchen wares n serve wares. 1 वर्ष झाले kitchen update karu. Glass ceramic plate मुलगी मोठी झाल्याशिवाय काढणार नाही.

@ऋन्मेष @अमृताक्षर धन्यवाद Happy

@मंजूताई धन्यवाद Happy
<<कलात्मक मोदक! शीतल तुझा उत्साह, उरक, कलात्मकता चे खूप कौतुक! ग्रीन चिली सॉस यल्लो दिसतोय.>> light camera effect. तसाही ग्रीन चिली सौस एवढा ग्रीन कलर नाहीये जरा फिका ग्रीन आहे. म्हणून mention केलंय. हळदी कुंकू वाटायचं नाहीतर Proud Proud Proud

@सई @मानव @देवकी @रुपाली @विनिता @जाई @कविन @आराध्या धन्यवाद Happy

Pages