सहजभाव

Submitted by गंधकुटी on 23 August, 2020 - 12:42

*सहजभाव*

झाडावरून हलकेच पडते
पान तरूतळी
मारता सूर मासोळी
उठती तरंग जळी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव वनमाळी

वसंतात झाडे बहरती
लेऊन पर्ण संभार कोवळा
शरद ऋतूत लगडते
चांदणे आभाळा
मजसी द्यावा ऐसा सहजभाव घननिळा

उगवता दिन मणी
बरसते प्रकाशाची झारी
निशी दिनी वसते
चैतन्याची दुनिया न्यारी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव श्रीहरी

नुरो चिंता नुरों खंत
सावरशिल तू ही आस उरी
विश्वास अभंग मनी
देवाने धरिला कर हा करी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव मुरारी

तूच कर्ता तूच करविता
चैतन्य लहरते चराचरी
मज बोलावते लडिवाळे
घुमते तुझीच रे बासरी
एैसा सहजभव मजसी दे रे हरी.

Gandhkuti

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभारी आहे.
आता आणखी काही लिहिलेले पोस्ट करायचे धाडस होईल.