लेखन स्पर्धा २ - माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन

Submitted by संयोजक on 18 August, 2020 - 15:15

नमस्कार मायबोलीकर,

नुकतेच २०२० वर्ष सुरू झाले होते. वर्षभरातील नियोजनाचे आडाखे बहुतेकांनी तयार करून ठेवले होते. अचानक फेब्रुवारी महिन्यात चीन देशात संसर्गजन्य रोगाची लागण सुरू झाली. म्हणता म्हणता अमेरिकेत हा रोग जाऊन थडकला. थोड्याच अवधीत जगभरात या रोगाने थैमान घातले. जगभरातील प्रत्येकजण आहे त्याच ठिकाणी अडकला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार जगभरातील सगळ्याच देशांनी लॉकडाऊन सुरू केले. प्रत्येकालाच हा प्रकार नवीन होता.

मंडळी तुम्हीसुद्धा हा महाकठिण काळ अनुभवलाय. या काळात काही जण नैराश्येत गेले तर काहीजणांनी मजेत हा काळ घालविला. नवीन कला आत्मसात केल्या तर काहीजण भरपूर आराम करून ताजेतवाने झाले. या काळातील तुमच्या सुखद, दुःखद आठवणी तुमच्याच शब्दात मांडा.

नियम:
१) ही स्पर्धा महिला आणि पुरुष सर्वांसाठी खुली आहे.
२) प्रवेशिकेतील लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
३) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
४) तुम्ही तुमच्या प्रवेशिका 22 ऑगस्ट पासून पाठवू शकता. (IST)
५) एक id फक्त १ प्रवेशिका पाठवू शकेल.
६) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"लेखनस्पर्धा -- { माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन) -- {तुमचा आयडी}"
७) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी आपणच मायबोलीवर लेख प्रकाशित केला असेल तर त्यातील काही भाग जसाच्या तसा वापरता येईल का?

आखाडा चीनने तयार केला Happy

येनीवेज,
छान आहे स्पर्धा. समयोचित वगैरे. मुख्य म्हणजे बहुतांश लोकं लिहीतील. कारण प्रत्येकाकडे लिहिण्यासारखे बरेच काही असेल.

बाई दवे.
यावेळी विनोदी लेखन स्पर्धा नाही का? त्यातही बरेच छान छान बाचायला मिळते.