रीथ मेकिंग आणि रॉक पेंटिंग

Submitted by अस्मिता. on 15 August, 2020 - 18:52

रीथ मेकिंग

मी सोप मेकिंग
ह्या लेखात छंदीष्ट लोकांचे नंदनवन असलेल्या ज्या दुकानाचा उल्लेख केला आहे त्या 'मायकेल्स' मध्ये जवळजवळ दर आठवड्याला क्राफ्ट क्लासेस होतात. ज्याची फीस अगदी दोन ते पाच डॉलर इतकी कमी असते , हेतू हा की तुम्ही लागणारे सामान तिथून घ्यावे व त्यांचा फायदा व्हावा. याकरता लेकरं तिथे सोडून उगाच या आयल मधून त्या आयल मध्ये काहीबाही घेत हिंडणाऱ्या आया व मिळेल ती खूर्ची पकडून मुलाशेजारी फोनवर टिपी करणारे बाबा हे तिथले सामान्य दृश्य असते. त्यामुळे विशिष्ट सणावाराला हे दुकान अगदी फुलून आलेले असते.

दर तीन महिन्याला ऋतूप्रमाणे येणारे साधे- छोटे इस्टर सारखे उत्सव किंवा मातृदिन/पितृदिन ते फार बिग डिल असलेले Thanksgiving /Christmas या सगळ्याचे रीथ /wreath बनवता येते. अगदी डोहाळं जेवण, बारसं, लग्न किंवा भिंतीवर लावायला असंख्य प्रकारचे रीथ मिळतात. किंमत साधारण वीस डॉलर ते अगदी दोनशे डॉलर पर्यंत असते.

आधी भारतात असताना रीथ म्हणजे थडग्यावर ठेवायचे फुलाचे रिंग असे वाटून काही तरी अभद्र प्रकार वाटायचा . इथे आल्यावर बऱ्याच दरवाज्यांवर रीथ टांगलेले दिसले. ते एक आनंदाचे, नव्या ऋतूच्या स्वागताचे, कसल्यातरी शुभेच्छेचे प्रतिक आहे हे हळूहळू कळले. मगं रीथबद्दल प्रसन्न व सकारात्मक प्रतिमा तयार झाली. फुले मला आवडतातच ...कपडे सुद्धा फ्लोरल प्रींटचे घेते. मिनिमलिझम मुळे कमीत कमी व आवश्यक सामान घेणारी मी प्रत्येक खोलीत प्रसन्न पुष्पगुच्छ ठेवायचा प्रयत्न करते. फुलं जरी खोटी असली तरी मन मात्र खरेखुरे प्रसन्न होते !! शेवटी मनं करा रे प्रसन्न.......

मग मलाही वाटले रीथ घ्यावे का पण सतरा डॉलरचे तितके आवडले नाही आणि सत्तरवाले घ्यायला मध्यमवर्गीय मन धजावले नाही. एके दिवशी मायकेल्स मध्ये गेलो असताना कळाले की आज रीथ बनवायचे प्रोजेक्ट आहे. आनंदाने दोन दोन डॉलर दिले माझे व मुलीचे ...त्यासाठी त्यांनी फूलं पान क्लासमध्ये दिलेलीच होती फक्त ग्रेपवाइन बेस रीथ घ्यायची होती. पहिली रीथ आम्ही शिशिरऋतूची केली . शिशिराची पानगळ होण्यापूर्वीचे पानांचे झालेले वेगवेगळे रंग अतिशय सुंदर दिसतात.

मुलीने दुसरी उदाहरणार्थ दिलेली रीथची चित्रे बघून मला सारखं पळवलं, आई शोभेचे पक्षी/घरटं/अंड आण, लेडीबर्डस् आर सो क्यूट, आय नीड पम्पकिन, आणं न , असं केल्यावर दोन डॉलरचा क्लास काही अंगी लागत नाही लक्षात आलं... शिवाय एखाद्या आयलमध्ये काही वेगळे दिसले तर मी तिथेच रमते त्यामुळे दोन तासाच्यात कधीही अर्धातासात करायच्या क्लासला आम्हाला दोन तासच लागले. आणि ४०% कुपन वापरून साधारण दहाबारा डॉलरमध्ये भरपूर सामान आले.

अर्थातच मगं आम्हाला याचा नाद लागला आणि आम्ही दर दोन तीन महिन्याला प्रत्येक ऋतूचे एक रीथ केले. फोटो आहेत. पहिले रीथ केले तेव्हा आम्ही सहकुटूंब गेलो होतो उगाच टिपी करायला, मुलाला खूप सांगूनही तो शेजारच्या 'बेस्ट बाय' या इलेक्ट्रॉनिक दुकानात जाण्यासाठी अडून बसला मगं त्याच्या बाबालाही त्याच्यासोबत जावे लागले नवऱ्याला बहुतेक मुलं माझ्याकडे सोडून कुठेतरी खुर्ची पकडून फोनमध्ये तोंड घालून बसायचे होते पण मुलाने आमचे 'बागबान' केले !!

आम्हाला पीकप करायला आल्यावर त्याला एकदम पस्तावा झाला कारण रीथ प्रकार असणार हे माहिती नव्हते. मला म्हणाला मलाही करायचं होतं . मी म्हणाले ' दैव देतं कर्म नेतं , मी तर चल म्हणाले होते तुला ' !! मी नेहमीच खूप म्हणी/ उदाहरणं वापरते म्हणजे मला राग/ सार्कँजम व्यक्त करता येतो आणि मुलांचा शब्दसंग्रह सुद्धा वाढतो.

गाडीत बसल्यावर त्याने थोड्या मत्सराने /उत्सुकतेने ताईच्या रीथला कचकच केली आणि ती ओरडली त्याच्यावर, मगं मी दोघांवर ओरडले, मगं नवरा सगळ्यांवर ओरडला. या सगळ्या आरडाओरड्यात कधी घर आले कळलेच नाही.

काही वेळेला मुलीनं गरम ग्लुगन वापरली काही वेळेला प्लास्टिक पुष्पगुच्छाची फुलं प्लायरने तोडून नुसतीच खूपसली. याचा फायदा म्हणजे तुम्ही पुन्हा कितीदाही रिअरेंज करू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी पाच वर्षाच्या मुलांना घेऊन सुद्धा हे करू शकता . प्लायरने तोडून आपण फुलं पानं द्यायची व 'जा सिमरन जा' करायचे. मगं जे काही तयार होईल ते नक्कीच तुम्हाला आवडेल व त्यांनाही आवडेल. आपण फार ढवळाढवळ न करता मुलांना निर्मितीचा आनंद घेऊ द्यायचा. फाइन मोटर स्किल्ससाठी असे प्रोजेक्ट अगदी योग्य असतात. This project is not rigid at all but superfun for all ages. They will enjoy the sense of accomplishment.

एक उदाहरण
Wreath supplies...

For my garden themed wreath I needed:

2 grapevine wreaths. One 20 in. and one 24 in.

1 natural looking garland from a craft store.

A bow (this is optional)

wire cutters.

florists wire.

glue gun.

glue.

The fun stuff. Things you have collected to embellish the wreath.

*
20200728_171426_compress56.jpg
*
20200728_171509_compress65.jpg
*

20200728_171440_compress0.jpg
*

20200728_171519_compress22.jpg
*
20200728_173624_compress66.jpg
*

20200728_173908-min-1-compressed.jpg
*
20200728_173742_compress81.jpg

*

********************************

रॉक पेंटिंग

काही मुलांची ही एक स्टेज असते त्याला 'उंदीर' स्टेज म्हणता येते. ही मुलाने एस्केप केली पण मुलगी रमली यात. त्याकाळी कशाचाही संग्रह करायचा नाद लागला होता. तुटक्या स्ट्रॉ, अर्धवट रंगकांड्या, स्टिकर, स्वतःचे फोटो प्रिंटस्, स्वतःच्या लहानपणीचे (?) सामान, वाटी, चमचे, बाहुलीचे बूट एकेकटे, केकवर मिळालेली प्रिन्सेस, दुधाच्या बाटलीची टोपणं, पर्सेस, लिप बाम, प्रिस्कुलचे क्राफ्ट , सुई दोरा (कशाला लागणारे बरं सुईदोरा ), रीळ, चिरिओजच्या माळा, बाहुलीचे मुंडके, त्या मुंडक्याचे नसलेले धड, एक मोजा, बबलची बाटली, प्लास्टिक अंगठी, पेंन्ग्विनचे रबर, रँडम झिरमिळ्या, तुणतुणे, गोंडे, कुठलीही बाळ वस्तू जसे बेबी कात्री , बेबी पेन्सिल, आँ.... आँ ....करून माया करत बसायचे , बेबी वस्तूंना !!
मी आपलं इतकी आसक्ती बरी नव्हे ताई , कुत्र्या-मांजराच्या जन्माला जाते असे म्हटले की .... मला ह्युमन आवडतच नाहीत , I don't know why we call them humankind, it should be humanmean ,they are not kind at all, I love dogs and cats, they are so cuuuuuute, अजून एक आँ...... बरोबरच आहे म्हणा. ही स्टेज गेली पण कुत्र्यांवर अजूनही प्रचंड प्रेम आहे. कालच call of duty(video game) मधल्या vicious कुत्र्यांनी दादाला फाडून काढलं पण हीने काही शत्रुच्या animation कुत्र्यांना मारू दिले नाही त्याला !!

हं तर कुठे होते मी , आठवलं...कुठल्या तरी सायन्स प्रोजेक्ट साठी मुलीने पहिलीत असताना बरेच दगड गोळा केले होते . त्यासाठी आम्ही कॅलगरी (कॅनडा) इथल्या घराजवळच्या फिश क्रिक पार्क मधल्या नदीच्या काठावर गेलो होतो मगं नियमितपणे काही वेगवेगळे चपटे, रंगीत, खवल्याचे, टोकदार, अगदी पातळ, गुळगुळीत, तपकिरी, पांढरे, काळे असे असंख्य दगडं गोळा केले. काही वापरले काही तसेच प्लॅस्टिक bag मध्ये बांधून ठेवून दिले. घरं/देश बदलल्यावर तेही आले आमच्याचसोबत आपोआप आठवण म्हणून !

कपाटातून दुसरी कुठलीतरी वस्तू काढताना दरवेळेस ही दगडाची पिशवी इमानेइतबारे पडायची मी विचारले तिला देऊ का फेकून, हे... माझे कलेक्शन आहे ते... म्हणून मलाच दटावायला लागली, मी चिडून 'दगडाचं कलेक्शन' असे म्हणाले, दगडाचच्च आहे न मगं म्हणून मलाच हसली Happy !

या दगडांचे काहीतरी करावे मनात होते तेव्हा 'दगड रंगवणे' ही कला प्रचलित होतं आहे हे कळलं. खरंतर आपण याचं पेटेन्ट घेतलं पाहिजे आपल्याही आधी कुणी केले असल्यास कल्पना नाही !! असो. तरं मगं मुलांना नादी लावण्यासाठी आणि भाचीला नोकरीच्या शोधातून चिल/ब्रेक मिळण्यासाठी युट्युबवर विडिओ पाहिले. असंख्य आणि प्रत्येक लेव्हल चे Rock painting videos आहेत. ते बघून बाहेर जाणे टाळायचे असल्याने आहेत त्या अँक्रिलिक रंगात रंगवले. हे रंग वॉटरप्रुफ नाहीत तर पाऊस येणार नाही अशा ठिकाणी यांची रांगोळी मांडली. या सगळ्या सामानाचे डायनिंग टेबलवर रुखवत मांडले व सर्वांनी काही बाही रंगवले. मुलीला भलताच आत्मविश्वास असल्याने तिने मंडला डिझाइन निवडले. तुम्ही याआधी कधी 'पाषाणचित्रे' (पहिल्या वाफेचा शब्द) काढली नसतील तर तुम्हाला मॉन्स्टर बरा आहे काढायला. अमिबा सारखाच क्षमाशील आहे बिचारा, कसाही असममितीय रंगवला तरी खपून जाईल. शिवाय गुगली नेत्र चिकटवून त्याला मजेदार लुक देता येईल. रंग रूप निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य !! ज्यांना आव्हानांची खुमखुमी आहे किंवा कलेची पार्श्वभूमी आहे त्यांच्यासाठी मंडलाचा विडिओ पण दिलाय.

हे दगड मुलीचे असल्याने आम्हाला तिने तिला नको असलेले दिले, त्यामुळे सगळ्यात गुळगुळीत आकाराचे मोठे तिने ठेवून घेतले, याने तिला अधिक रचनास्वातंत्र्य मिळाले. मुलाचा स्वभाव अत्यंत तडजोडी व साधा असल्याने असलं राजकारण त्याच्या लक्षात येत नाही व फारच क्वचित भांडणं होतात. मुलीने कलिंगडाची फोड, एक मंडला, मी लकी लेडीबर्ड व त्याला उपासमार नको म्हणून एक पान (दोन्ही एकाच मापाचे ) व एक पेंन्ग्विन , भाचीने काय करायचं ठरवायला इतकाssss वेळ घेतला की तिला एकच दगड राहिला त्यात तिने 'Hope' रंगवली , मुलाने क्यूट 'मिनियन' रंगवले , एका दगडाला करायचे होते संत्र्याचा काप पण बिघडल्याने राग येऊन त्याचा मॉन्स्टर झाला. सुरवातीला तुम्ही काही वेगळे सुंदर सुरु करूनही शेवटी त्याचे रूप राक्षसात परिवर्तित होऊ शकते.
It is all about the journey not the destination ह्या उक्तीप्रमाणे हे दगडं रहातील न रहातील पण त्यांच्या ताई सोबत घालवलेला हा काळ नेहमी लक्षात राहील त्यांना ही आणि तिलाही. मला वस्तू गोळा करण्यापेक्षा आठवणी गोळा करायला अधिक आवडतात कारण त्या सुखदुःखात आपल्या नेहमीच बरोबर असतात. त्या आठवणी बनवलेल्या वस्तूपेक्षा कितीतरी मोलाच्या होऊन जातात. अशा सुरेख आठवणी आणि निर्मितीचा आनंद हाच माझा ड्राइव्ह आहे या कलाकृतींमध्ये.I just want to be a part of a creative process, doesn't matter how insignificant!! तुम्हीपण हे करून बघा . आपल्या हातात कला असो नसो निर्मितीच्या आनंदावर तर आपला अधिकार नेहमीच असतो आणि मी त्याचा पुरेपूर उपयोग घेते Happy !

*हे आमचे फोटो...
*
Image-4639.jpg
*

*20200628_171015-1.jpg

*

20200628_171028-1.jpgImage-5783.jpg

*
Image-8056.jpg

Happy धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद , मी संपादन करेपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आल्या Happy
हो सायो, आमचेच घर ! त्या दाराला एक छोटे दार आहे जे उघडता येते.
धन्यवाद सोनाली.

कसलं गोड आहे हे सगळच Happy
आणि लिहिलयसही फार मस्त
क्रिएटिव्ह माईंड आहे तुझं किप इट अप
आता तिकडे येणं आलं, मायकल्सला जाणं आलं Wink

मला वस्तू गोळा करण्यापेक्षा आठवणी गोळा करायला अधिक आवडतात कारण त्या सुखदुःखात आपल्या नेहमीच बरोबर असतात. त्या आठवणी बनवलेल्या वस्तूपेक्षा कितीतरी मोलाच्या होऊन जातात.

खूप आवडली ही वाक्यं.
दोन्ही कलाकृती खुप सुंदर, मुलाला दाखवते, स्पेशली रॉक पेन्टींग, ते जमन्यासारखं आहे त्याला.
लेख पण खूप छान.

छान जमलेत दोन्ही ( वरची छायाचित्र प्रताधिकार मुक्त आहेत ना हे एकदा बघुन घ्या)

खूप सुंदर
तुम्ही आणि तुमची मुलगी हौशी कलाकार तर आहात.
परदेशात असे वेगवेगळ्या छंदाचे क्लासेस असतात , त्यामुळे अश्या छंदाना प्रोत्साहन मिळते हे खूप आवडते .

धन्यवाद प्रणवंत आणि अवलताई !! लेखाविषयी पण प्रतिक्रिया बघून छान वाटले Happy ! मन लाऊन लिहीते मी आणि बहुतेक प्रतिसाद मात्र फायनल प्रोडक्ट विषयीच असतात म्हणून खास आभार !!
धन्यवाद अनु , mrunali, प्राजक्ता, जाई, मंजुताई, चिन्नु, वत्सला आणि वावे. Happy

@प्राजक्ता (पाहिले होते हो , it is fine as long as images are acknowledged , and most of them are mine) Happy

@mrunali जरूर कर आणि इथे सांग आणि फोटो टाक !!
मुलांना प्रेरणा देता यावी यासाठी लिहीते मी आणि स्टेप बाय स्टेप माहिती व विडिओ सुद्धा देते त्यामुळे मला खरंच बरे वाटेल कुणाला हे बघून करावे वाटल्यास !!

मायबोलीवर तुमचे स्वतःचे लेखन किंवा कलाकृती (किंवा प्रताधिकाराबद्दल तुम्ही लेखी परवानगी घेतली आहे) प्रकाशीत करणे अपेक्षित आहे. केवळ आंतरजालावर मिळाले म्हणून , प्रताधिकार नसलेले फोटो इथे देऊ नका. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

माझेच लेखन आहे वेमा आणि कलाकृती सुद्धा !!
सगळेच काढले माझे सोडून. दोन तीन लिंक होत्या त्याही काढल्या. ऐवढे चालेल नं

तुमच्या लेखनाबद्दल शंका नव्हती. तुम्ही काही फोटो आंतरजालावरून थेट घेतले होते म्हणून लिहिले. धन्यवाद.

खूप छान लेखन!
ते रॉक्स तर खूपच गोड दिसत आहेत. तुमचं खरंच कौतुक आहे मुलांना घेऊन हे सगळं करायचं.

०. सगळ्यात मुख्य धोरण म्हणजे, तुमचे लेखन कुठल्याही मायबोली बाहेरच्या वेबसाईटवर जायच्या अगोदर, इथल्या वाचकाला समाधान देणारे असावे. वाचकाला लेख वाचताना समाधान वाटले पाहिजे आणि लिंक वरच्या वेबसाईटवर / चॅनेल वर जाऊन ते वाढले पाहिजे.

१. मायबोली बाहेरील वेबसाईट्च्या फक्त लिंक्स , फक्त जाहिरात करायची या उद्देशाने दिल्या असतील तर ते मायबोलीच्या धोरणात बसत नाही.

२. इथे मुद्दाम अर्धवट केलेले लेखन आणि उरलेले मायबोली बाहेरच्या वेबसाईटवर वाचा असे असेल तर ते योग्य नाही.

३. जर एक संपूर्ण लेख असेल आणि त्या लेखात किंवा लेखाखाली, लेखाच्या विषयाशी संबंधित लिंक असतील तर काहीच हरकत नाही. उदा. हा तुमचा वरचा लेख पूर्ण लेख आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर देलेल्या लिंक्स साठी काही हरकत नाही.

४. जर एक संपूर्ण लेख असेल आणि त्या लेखात किंवा लेखाखाली, लेखाच्या विषयाशी संबंधित लिंक असतील, त्या जरी जाहिरातीसारख्या असतील (उदा. "या विषयावरचे माझे इतर लेखन इथे जाऊन वाचा" किंवा "हे अधिक खोलात शिकण्यासाठी माझा कोर्स जॉइन करा ") तर काहीच हरकत नाही. कारण वर नियम ० पहा.

५. जर एक संपूर्ण लेख असेल आणि त्या लेखात किंवा लेखाखाली, भलत्याच विषयाशी संबंधित लिंक असतील तर ते मायबोलीच्या धोरणात बसत नाही. उदा. लेख "रीथ मेकिंग आणि रॉक पेंटिंग" बद्दल आहे पण लिंक "पैसे कसे मिळवायचे" यावर जास्त असेल तर योग्य नाही. कारण वर नियम ० पहा.

खूप चांगल्या गाईडलाईन्स आहेत
याचा स्वतंत्र लेख हवा(पॉलिसीज मध्ये असतीलच पण लेखाच्या निमित्ताने जास्त वाचले जाईल.)

धन्यवाद वेमा , म्हणजे स्वतःचे फोटो व संपूर्ण लेख आणि लेखाशी सुसंगत व संबधित लिंक ओके आहे. हे व्यवस्थित कळले. नियम १ , माहिती नव्हता अगदीच. बाकी बद्दल सुद्धा अर्धवट खात्री होती.
आभार , आता आत्मविश्वासाने वावरता लिहिता येईल.
गडबडीत लिंक काढल्या मी वेड्यासारख्या .....
अनुशी सहमत.
स्वतंत्र लेख खरंच हवा म्हणजे विचारता सुद्धा येतील काही शंका असल्यातर, आणि सर्वांना स्पष्ट कळेल.

Pages