ऑनलाईन शाळा

Submitted by सखा on 21 June, 2020 - 10:53

सध्या शाळांचे शिक्षक ऑनलाइन मुलांना शिकवत आहेत. शिक्षक आणि लहान मुले या दोघांची पण नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना खूप पंचाईत होत आहे. बऱ्याचदा शिक्षक म्युट वर असतात आणि ते बिचारे तळमळीने बोलत राहतात पण मुलांना ऐकू येत नाही.
अनेकदा पालकांना आपला व्हिडिओ म्यूट कसा करायचा हे माहीत नसतो त्यामुळे घरातले नको ते संवाद आणि आवाज सर्वजनिक होतात.
अगदीच लहान मुलांचा अटेंशन span कमी असतो त्यामुळे पडद्यावर चित्र इंटरेस्टिंग दिसले नाही तर ती पाच मिनिटातच कंटाळतात.
शिक्षकांनी गोष्ट सांगताना वस्तू , पूरक चित्रफिती यांचा वापर करून सांगितले तरच त्यांचे शिकवणे इफेक्टिव्ह होईल. संवाद कौशल्य आणि अभिनय हे आता शिक्षकांना येणे गरजेचे आहे. कोण शिक्षक कसा शिकवतो हे आता पालकांना देखील दिसते त्यामुळे शिक्षक कॅमेराच्या निगराणीखाली आले आहेत.

#ऑनलाईन_शाळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्या धाग्यावर विचारावे हे समजत नसल्यामुळे ईथे विचारतेय,
भारताबाहेर राहणार्यांना प्रश्न-
मुलांच्या शाळा सुरू झाल्यात का? झाल्या असल्यास कशा स्वरूपात ? म्हणजे वेळ मर्यादा, विद्यार्थी संख्या मर्यादा वगैरे.

Mrunali,
हो झाल्या, परवा पासून, तितकेच वेळ , 8.40 to 4,
Google classroom ! We chose online instead of in-school so no idea how they are doing it at school.

मला बाकीच्या राज्य चे माहीत नाही पण तामिळनाडू government already said no online classes for below 5th std. पण ऑनलाईन क्लासेस सुरुच आहेत मुलाचे, तो तिसरीत आहे. अगदी प्रि केजी पण सुरू आहेत.

माझ्या मुलीच्या शाळेत अजिबातच ऑनलाइन किंवा ऑफलाईन अभ्यास घेत नाहीत. अगदी दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील नाही.
त्यामुळे आमच्याकडे करोना सुट्टी आनंदात चालू आहे.
बाकी पू्र्वप्राथमिक अभ्यास/शाळा ऑनलाइन असणाऱ्यांंचं वाईट वाटतं.

माऊमैय्या, भारतातच आहात का?
मी मुलाचे ऑनलाइन झूम क्लासेस नाही अटेन्ड करत. मधेच रेंज जाते, डिस्कनेक्ट होतो, रेंज परत येइपर्यंत क्लास संपतो.
वेळेचा अपव्यय.