मोहनबाधा

Submitted by mi manasi on 11 August, 2020 - 06:55

।।मोहनबाधा।।

तो पाऊस होऊनी पिसा !
बिलगला असा !
जरा ना लाज !
कळले ना करु मी काय !
होय निरुपाय !
फसले आज !!

घन शामल आतूर असा !
. मोहन जसा !
शोधतो राधा !
मी भिजून हरखले अशी !
जाहली कशी !
मोहनबाधा !!

...मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे..
राजसा... जवळी जरा बसा..
या चालीवर वाचली/बोलली जातेय.