Submitted by मोहिनी१२३ on 6 August, 2020 - 12:55
माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. मैदानी खेळ, trekking, small runs, सोसायटीत मनसोक्त खेळणे असे त्याचे नेहमीचे उद्योग चालू असतात.
मार्चअखेर पासून बाहेरचे खेळणे एकदम बंद झाले आहे. मध्ये २-३ आठवडे खाली खेळण्याची परवानगी होती. आता परत बंद आहे.
त्याच्या दोरीच्या उड्या मारणे, दोरीला लोंबकाळणे, घरच्या घरी जमेल तितकी मस्ती, उड्या चालू असते.एप्रिल-मे महिन्यात ground चे online camps होते.जून महिन्यात एक दिवसाआड online ground सुरू झाले आहे.
पण नेहमीच्या व्यायामाच्या मानाने हे बरेच कमी आहे.अजुन असे किती दिवस चालेल कल्पना नाही.
तुम्ही मुले या परिस्थितीत चांगली तंदुरूस्त राहावी म्हणून त्यांचा आहार/विहार कसा आखता?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला धागा, माझा मुलगा 7
चांगला धागा, माझा मुलगा 7 वर्षं , आपण वर लिहिल्याप्रमाणेच रूटीन सुरु आहे. काय करावे खरच फिटनेस वाढविण्यासाठी?
धन्यवाद मृणाली. मला तू
धन्यवाद मृणाली. मला तू/तुम्हीच म्हणा please.
Wii सारखे sports video game
Wii सारखे sports video game काही मदत करू शकतात का ? Fun and interactive दोन्ही असतात ते.
अच्छा. आमच्याकडे console
अच्छा. आमच्याकडे console नाहीय ...असे iOS/Android गेम्स असू शकतील का?
ते नाही माहिती गं पण आम्ही
ते नाही माहिती गं पण आम्ही Canada मध्ये होतो तेव्हा -20 तापमानात शाळेत हे खेळवायचे . It is really fun.
Wii-Sports offers Tennis, Bowling, Boxing, Baseball and Golf and can be played with up to four Wii Remote controllers. ... Wii-Sports Resort offers Swordplay, Wakeboarding, Frisbee, Archery, Basketball, Table Tennis, Golf, Bowling, Power Cruising, Canoeing, Cycling and Air Sports...
हे सापडले !! यात खेळायला बरेच हात पाय हलवावे लागतात.
तुला शुभेच्छा
अरे वा मस्तच की.
अरे वा मस्तच की.
खाली खेळायला बंदी का आहे?
खाली खेळायला बंदी का आहे? Lockdown संपलाय ना आता?
टेरेस वर घेऊन जा बंद असेल तर..
बिल्डिंग मध्येच कोरोना पेशंटस
बिल्डिंग मध्येच कोरोना पेशंटस आहेत.म्हणून लहान मुलांना बंदी केलीय. मुलाचा एक मित्र रोज घरी येतो खेळायला २ तास. त्यांना जास्तीत जास्त जागा आणि संपूर्ण मोकळीक देतो खेळायला.टेरेसवर जागा नाहीय मोकळी.सोलर पॅनेल्स वगैरे आहेत.
छान धागा.
छान धागा.
झोपतच होतो पण प्रतिसाद टाकल्याशिवाय राहवले नाही.
कारण आमच्याकडेही सेम प्रॉब्लेम. मुलगी या लॉकडाऊनमध्येच सहा वर्षांची झाली. आधी मार्शल आर्टला जायची. पण ते ऑनलाईन सुरू झाल्यावर तिने सोडूनच दिले. सरच फोन करत राहतात की तिला सोडायला लाऊ नका. छान करते. पण आधीच ऑनलाईन स्कूल चालू आहे. त्या नंतर पुन्हा हे ऑनलाईन करायला तिची ईच्छा होत नाही. त्यामुळे सरांना काय उत्तर द्यावे हे आम्हालाच समजत नाही.
बरं ते न केल्यास ईतर काहीच व्यायामप्रकार होत नाहीत. बाहेर खेळणे आमच्याकडेही बंद आहे. तरी शुद्ध हवेसाठी टेरेसवर नेतो. तसे ते पळण्यासाठी मोठे आहे पण तरीही तिथे मुद्दाम पळणे होत नाही. खेंळायलाही फारसे मित्र मिळत नाहीत. त्यामुळे टाकीवर बसून हवा खाणे किंवा बैठे खेळ वा होमवर्क करणे असलेच प्रकार चालतात.
ओवरऑल फिजिकल ॲक्टीविटीजमध्ये मुलगी चुणचुणीत आहे आणि याचे आम्हाला कौतुकही होते. पण बदललेल्या जीवनशैलीने घात केलाय. स्वत:च्या वाढत्या पोटापेक्षा मुलांचे वाढीचे वय असे खराब होतेय याचे जास्त वाईट वाटतेय.
मध्यंतरी समोरच्या घरात कोरोना पेशंट निघाल्याने टेरेसही बंद केलेले दहा बारा दिवस. पण कायमचे नाही. नंतर पुन्हा काळजी घेऊन टेरेसवर जाणे सुरू केलेय.
आता या महिन्यात घर शिफ्ट करू तिथे आधी टेरेस बघून आलो. पण सोलार पॅनेलने खाल्लेली जागा बघून जीवाला त्रास झाला
आमच्याकडेही हा प्रश्न आहे.
आमच्याकडेही हा प्रश्न आहे. ग्राऊंड बंद झाल्यावर आम्ही तीनचार आयांनी व्हॉट्सअॅपवरून सगळ्यांचा एकत्र व्यायाम सुरू ठेवायचा प्रयत्न केला, पण महिनाभराच्या पलिकडे ते नीट चाललं नाही.
सुर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर
सुर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी दोन्हीचा उत्तम समतोल साधला जातो .
मी लहानपणी महाराष्ट्रीय मंडळात जात असे तेव्हा पाऊस पडल्यावर मैदानात चिखल झाला की अशावेळी सगळ्या मुला-मुलींना एका मोठ्या हॉल मधे नेऊन सगळ्यांना तास भर सुर्यनमस्कार घालायला लावत असत.
सुर्यनमस्कार १२ पासून सुरु करून मग वाढवत न्यायचे. जमले तर १०८ पर्यंत न्यायचे. १०८ / तासभर घालायचे म्हण्जे कंटाळा येतो पण मग काही सेट भरभर घालायचे तर मधेच काही सेट नमस्काराच्या प्रत्येक स्थितीत स्थिर राहून मग पुढे जायचे अशा प्रकारे त्यात बदल करायचा म्हणजे कंटाळा येत नाही.
आठवड्यातून निदान दोन तीन वेळा घातले तरी खूप उपयोगी होतात बाकी वेळी इतर काहीबाही करायचे.
सुर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर
सुर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी दोन्हीचा उत्तम समतोल साधला जातो
+७८६
मध्यंतरी आमच्यात हे बोलणेही झाले. मी कामात असल्याने मुलीला म्हणालो की नंतर तुला स्टेप बाय स्टेप सुर्यनमस्कार दाख्वतो. आणि राहून गेले. बरी आठवण केलीत. घेतो हे मनावर आता. पंधरा दिवसांनी आपल्या लक्षात राहिल्यास मला पुन्हा व्हॉटसपला रिमाईण्डर टाका
आणि हो
चांगली लिंक असल्यास शेअर करा एखाद्या विडिओची जिथे
पुर्ण सुर्यनमस्कार असेल.
अरे माझ्यावर कधी
अरे माझ्यावर कधी सुर्यनमस्काराचा व्हिडियो बघायची वेळच आली नाहीये.
तू कसे घालतोयस ते आधी बघतो
नाहीतर व्हिडियोकॉल वर मीच दाखवतो
असेल लिंक तर द्या, मलाही
असेल लिंक तर द्या, मलाही फायदा होइल.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=AbPufvvYiSw
सूर्यनमस्कार ला जोरदार
सूर्यनमस्कार ला जोरदार अनुमोदन
माझ्या मुलालाही मी लावतो घालायला
अर्थात सोबत तुम्हीही घातले तर उत्तम म्हणजे मग ते न कंटाळा करता घालतात
आम्ही दोघांनी योगा दिवस ला 108 सूर्यनमस्कार घातलेले सोबत
@ मोहिनी१२३ --- खेळण्या /
@ मोहिनी१२३ --- खेळण्या / हुंदडण्यातली मजा नाही पण व्यायाम म्हणून ---- सूर्य नमस्कार, योगासने, जोरबैठका वगैरे जुने व्यायाम, कराटेच्या आधी करायचे वॉर्मपचे व्यायाम करता येतील.
शेजारी झोपलेले नसतील तेव्हा वॉल टेनिस. आट्यापाट्या. नाच करणे. आंधळी कोशिंबीर.
मोकळी जागा असेल घरात तर (लहान बाळांचा असतो तो) हलक्या रबरी बॉलने बास्केटबॉल.
संगीत खुर्चीसारखे गाण्याच्या तालावर लादीच्या चौकोनात उड्या मारणे, गाणे थांबल्यावरही उड्या मारेल तो आऊट.
असे करत जाऊ तसे सुचत जातील नवीन खेळ.
लॉकडाऊन मधील फिटनेसवर मोठ्यांचा एक धागा निघाला होता. त्यात काही लिंक्स होत्या माबोकरांनी सुचवलेल्या संगीताच्या तालावर करायचे व्यायाम वगैरे, ते लहान मुलांना पण करता येतील.
@ आशुचॅम्प, गटग zoom तर झाले
@ आशुचॅम्प, गटग zoom तर झाले नाही, आता सूर्यनमस्कार zoom प्लॅन करायचे का?

चांगली कल्पना आहे
चांगली कल्पना आहे
खरंच हरकत नाही
त्या निमित्ताने लोकं मोटिव्हेट होतील
फिटनेस वाढवण्यासाठी
फिटनेस वाढवण्यासाठी मंगळागौरीच्या खेळांचासुद्धा चांगला उपयोग होऊ शकतो. युट्युबवर त्या खेळांचे व्हिडिओज आहेत. ते बघून प्रयत्न करू शकता. तसे सोपे असतात.
धन्यवाद सर्वांना. खूप छान
धन्यवाद सर्वांना. खूप छान प्रतिसाद. नंतर थोडे सविस्तर लिहीते.आहाराबद्द्ल काही विशेष सुचना असतील तर त्या पण येवू द्या please.
ऋन्मेऽऽष-लेकीचं online मार्शल आर्टस् सुरू करा. खूप उपयोग होईल.रच्याकने online ground चे वेगळेच किस्से बनतात. तुम्ही सुरू केलेत तर तुम्हीच लेख टाकाल त्यावर. टेरेसवर बागडण्याची संधी मिळतेय तितकी घ्या आत्ताच.
स्वत:च्या वाढत्या पोटापेक्षा मुलांचे वाढीचे वय असे खराब होतेय याचे जास्त वाईट वाटतेय.-अगदी खरं.
हर्पेन/आशुचॅम्प
हर्पेन/आशुचॅम्प-सूर्यनमस्काराच्या सुचनेबद्गल धन्यवाद.
Online ground मध्ये सर सूर्यनमस्कार मुलांकडून घालून घेतात.त्यांचा count वर जास्त भर असतों. Alternate Days ला आम्ही करून घेतले पाहिजे.काल online ground मध्ये त्याने ६० घातले. परवा घरी १० मि. मध्ये ३७ घातले. यात भराभरा आणि खूप /सावकाश एका पोझ मध्ये आणि कमी याचे कोणते वेगवेगळे फायदे होतात ?
आशुचॅम्प-आम्ही दोघांनी योगा दिवस ला 108 सूर्यनमस्कार घातलेले सोबत—मस्तच.
अर्थात सोबत तुम्हीही घातले तर उत्तम म्हणजे मग ते न कंटाळा करता घालतात-हो बरोबर आहे.
कारवी/सोहा-चांगल्या सुचना. धन्यवाद.
गौरी/देवकी/मृणाली/पाथफाईंडर-धन्यवाद.
सूर्यनमस्कार खरच सर्वांगसुंदर
सूर्यनमस्कार खरच सर्वांगसुंदर व्यायाम . अर्थात सोबत तुम्हीही घातले तर उत्तम म्हणजे मग ते न कंटाळा करता घालतात- हे अगदी बरोबर. अडनीड्या वयातल्या - धड लहान नाही धड मोठी नाही अशा मुलांकडून घालून घ्यायचे म्हणजे फार पेशन्स लागतो.
यात भराभरा आणि खूप /सावकाश
यात भराभरा आणि खूप /सावकाश एका पोझ मध्ये आणि कमी याचे कोणते वेगवेगळे फायदे होतात ?>>> कुठलाही व्यायाम प्रकार डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करत केला तर जास्त परिणामकारक होतो आणि अर्थात ह्यासाठी भराभर करणे अपेक्षित नसून अतिशय संयत हालचाली आणि स्नायुवर आपले पूर्ण नियंत्रण ठेवत केले तर शरीर लवकर सुडौल सुदृढ़ बनते हां स्वानुभव आहे.
डंबेल्स असो की पुशअप्स... ते ह्या पद्धतीने केल्यावर स्वतालाच लगेच फरक समजून येईल. कराटे मध्ये काही काता प्रकार मुद्दाम बॉडी कन्डीशनिंगसाठीच असतात आणि त्यात प्रत्येक स्टेप स्लो ब्रीथिंग वर आधारित असते. नेटके १२ नमस्कार दिवसात ३दा केले तरी पुरेसे ठरेल हेमावैम. फक्त कधीही कुठलाही व्यायाम सुरु करताना सुरुवातीस हल्का वार्म अप आवश्यक.
दोरीच्या उड्या, जिने चढणे
दोरीच्या उड्या, जिने चढणे उतरणे.
मी माझ्या सहा वर्षांच्या
मी माझ्या सहा वर्षांच्या मुलीकडून १० सूर्यनमस्कार आणि ६०० दोरीउड्या असं रोज करून घेते. ६०० उड्यांमधे ती ब्रेक घेते. ७० उड्या एका वेळी होतात. थोडं कमी-जास्त असतं.
मी योगासनं करते. तिला वाटलं तर तीपण चार-पाच आडवी-उभी आसनं करते. पण हे ऑप्शनल.
मी माझ्या सहा वर्षांच्या
मी माझ्या सहा वर्षांच्या मुलीकडून १० सूर्यनमस्कार आणि ६०० दोरीउड्या असं रोज करून घेते. ६०० उड्यांमधे ती ब्रेक घेते. ७० उड्या एका वेळी होतात. थोडं कमी-जास्त असतं. >> अम्मा सेहत के लिए तू तो हानिकारक है....

22 महिन्यांच्या हायपर
22 महिन्यांच्या हायपर ऍक्टिव्ह मुलीसाठी काय करता येईल?? क्रिकेट, भिंतीवर बॉलचा टप्पा खेळणे, स्टॅक ,लिंक असे खेळ प्रकार ही झालेत. छोटी स्कूटर घेतलीय ती फिरवत असते घरात पण मग त्याचाही कंटाळा येतो. मागच्या आठवड्या पर्यंत सोसायटी ग्राउंडवर नेत होते पण या आठवड्यात सोसायटीत एक पेशंट निघालाय, पेशंट दुसऱया कारणामुळे दवाखान्यात होते आणि तिथेच कोविड पोसिटीव्ही झाले घरी नवरा quarantine आहे पण safer side म्हणून आठ दिवस मुलांना खाली बंदी आहे. स्वतः अजून एकटी खेळू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या मुलांकडे खेळायलाही सोडू शकत नाही, त्यांना बोलावते आठवड्यातून एकदा घरी. गोष्टीची पुस्तक वाचून दाखवते पण एक मिनिटाच्या वर ऐकत नाही. मुळात पाच मिनिटं ही एका जागेवर न बसणे हा मुद्दा आहे.
चित्र असणारी पुस्तके घ्या...
चित्र असणारी पुस्तके घ्या... लेवल 1. म्हणजे अक्खा पान भरून चित्र आणि खाली एकच वाक्य असणारे.. आवडेल तिला...
खूप सारे रंगीबेरंगी खेळणी दया
खूप सारे रंगीबेरंगी खेळणी दया, जसे की बिल्डिंग ब्लॉकस, रिंग्ज, पण मोठ्या आकाराचे असावे नाहीतर तोंडात घालायची भीती, माझी लहान मुलगी अडीच वर्षाची आहे,ती रमते खेळण्यांमधे आणि बाहुल्यासोबत.
पुस्तक आहेत खूप, काही आम्ही
पुस्तक आहेत खूप, काही आम्ही घेतलेली काही सोसायटी मैत्रिणींनी दिलेली, त्यांच्या मुलांच्या तावडीतून वाचलेली.दोन पुस्तक टराटरा, फराफरा फाडून झाली, मी ही फाडू दिली, एक पेपरच पान ही देते काय करायचं ते कर म्हणून.
ब्लॉक्स वैगरे सोबत कुणी असेल तरच खेळते. बाहुली आणि toys फक्त त्यांना जेवण खाऊ घालण्यापूर्ती खेळते म्हणजे आधी ते घास घेणार मग ही. रोज दिड तास चालतो जेवायचा कार्यक्रम.
मुळात शांतताच नाही जीवाला.बघू या अजून तरी लहान आहे आम्हीही शिकतोय हळूहळू.
तिला खाली गादी टाकून देता
तिला खाली गादी टाकून देता येईल का? कोलांट्या उड्या, नाचायला वगैरे?
सीमंतिनी (इथे स्मायली आहे)
सीमंतिनी (इथे स्मायली आहे)
आमच्या घरी गोडाचं प्रस्थ फार झालंय. याच आठवड्यात म्हटलं तरी सोमवारी नारळीभात, मंगळवारी ( मी स्वत:हून इतक्या वर्षात एकच मंगळागौर पुजल्यामुळे यंदा घरी आहे तर
हौसेखातर निदान फक्त गोड पदार्थ करावा असं वाटून) साधी शेवयांची खीर, बुधवारी रामाला नैवेद्य म्हणून बासुंदी आणि पुरण, आज शुक्रवार आणि संकष्टी म्हणून उकडीचे मोदक.
हे सगळं एकेकच सर्विंगपुरतं करतो आम्ही, पण तरी ते पोटात जातंय त्याचं काय (स्मायली).
जिज्ञासा-दोरीच्या उड्या चालू
जिज्ञासा-दोरीच्या उड्या चालू आहेत. जिना चढणं-उतरणं बाहेर पेशंटस् असल्याने जरा रिस्की वाटतयं. पण बघते विचार करून.
मस्त प्रज्ञा९.
धन्यवाद.
पिन्की, खरच माझंही असच होतं,
पिन्की, खरच माझंही असच होतं, जेवण भरवने तासभर तरी चालते. दोन अडीच वर्ष म्हणजे atleast play group मधे मुलांना पाठवलं तर खेळणे, खाणे तरी शिकतात पण कोरोणामूळे ती पॉसिबीलीटी पण नाही आता.
मी माझ्या सहा वर्षांच्या
मी माझ्या सहा वर्षांच्या मुलीकडून १० सूर्यनमस्कार आणि ६०० दोरीउड्या असं रोज करून घेते. ६०० उड्यांमधे ती ब्रेक घेते. ७० उड्या एका वेळी होतात. थोडं कमी-जास्त असतं.
>>>>>>
१०-१२ वर्षांनी येणारया ऑलिंपिकला भारताला एक गोल्ड मेडल येतेय असे म्हणू शकतो
Exercise ball घ्या. माझ्या
Exercise ball घ्या. माझ्या मोठ्या मुलाला त्यावर व्यायाम करायला/खेळायला आवडते तर बारका जेव्हा वाटेल तेव्हा त्याच्या मागे पळत असतो. फुगा दिला कि त्याला उडवत घरभर फिरतो. काहीच करायचे नसेल तर ‘आई रन’ म्हटले कि त्याच्या मागे किंवा पुढे पळते.
पिंकी वेगवेगळ्या आकाराचे
पिंकी वेगवेगळ्या आकाराचे भांडे वाट्या देऊन एका टबात भरलेलं पाणी वा वाळू आणि दुसरा तब रिकामा असे खेळायला द्या.
त्यातही लक्ष द्यावे लागेल .
त्याच बरोबर वर्तमानपत्र फाडायला देणे
खडू 2 रंगरंगोटी करू देणे
गाणी बडबड गीते ॲक्शन वर घेणे
एकत्र पळापळी रंगारंग करणे
धुळ्याचे कपडे टाकण्या साठी गोल कापडी बास्केट मिळते, ती थोडी मॉडीफाय करून रांगणयासाठी टनेल करणे
हार्ड कव्हर बुक्स अशा अनेक गोष्टी करता येतील
पाणी वा वाळू>> याचा फार राडा
पाणी वा वाळू>> याचा फार राडा करतात मुलं. मी डाळ किंवा वाटाणे देते. ताटातून वाटीत, वाटीतून ग्लासात, त्यातून परत ताटात असे बराच वेळ खेळतो.
Play doh किंवा कणिक चा छोटा गोळा दिला तरी छान खेळतो.
घरात राहून मुलांचा फिटनेस कसा
घरात राहून मुलांचा फिटनेस कसा वाढवावा?बदलून आता>> घरात राहून मुलांचा वेळ कसा घालवावा? <<< असे वाटतेयवाळू, खडू, वाटणे, डाळ, पेपर
.
हो, वयोगट बदलला तरी चालेल पण
हो, वयोगट बदलला तरी चालेल पण फिटनेस वर फोकस राहू दे please.
कौतुकासाठी सगळ्यांचे आभार.
कौतुकासाठी सगळ्यांचे आभार.
पण हे इतकं कठीण नाही. तिला मे महिन्यात जेमतेम २० उड्या एका वेळी येत होत्या. हळूहळू शिकवून सवय लागली आणि जमायला लागलं तेव्हा तिलाच त्याची गोडी लागली. ६०० उड्या ही गेल्या ४ दिवसातली प्रगती आहे. मूड असेल तर झटकन होतो व्यायाम. नाही तर मला तिच्या मागे लागावं लागतं आणि मी व्यायाम न करताच दमून जाते. पण ' व्यायामाला पर्याय नाही' हे तिला पटलं आहे. सध्या ग्राऊंडवर जाता येत नाही म्हणून आपण स्वत: फिट राहायचे हे समजलंय आता.
धन्यवाद वर्णिता,अनंतनी
धन्यवाद वर्णिता,अनंतनी,sonalisl. धन्यवाद सर्वांना.
प्रज्ञा-मस्क. माझा मुलगा पण लहर असेल तर १००० उड्या मारतो दिवसभरात मिळून.
१ मिनिटात न थांबता किती उड्या होतात हे पण बघू शकता. हा एक वेगळा प्रकारचा टास्क.
सर्वांच्या सल्ल्यांचा
सर्वांच्या सल्ल्यांचा/मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल. धन्यवाद.
Khup chhan salle. Tumachi
Khup chhan salle. Tumachi mule tumach aikun he sagal kartat hyach far kautuk vatat. Maza 4 varshancha mulga 2 sooryanamaskar ghatale ki palun jato. Khup hyperactive ahe. Satat dokyat kurapati vichar chalu astat kay karave kalat nahi.
असं काही नाही अस्मि_ता. सगळी
असं काही नाही अस्मि_ता. सगळी मुलं इकडून तिकडून सारखीच. त्यांच्या बरोबर करणं हा बेस्ट मार्ग(जो आम्हालाही हेल्थ इश्यूस मुळे फारसा जमत नाही.) पण फिटनेस ही खूप भारी गोष्ट आहे हे मुलावर २ र्या वर्षापासून सतत बिंबवण्याचा प्रयत्न चालू आहे.
साखर जास्त देता का... साखरेने
साखर जास्त देता का... साखरेने जास्त एनर्जी येऊन मुले हायपर ऍक्टिव्ह होतात असे बहुतेक वाचलेले आठवतेय...
हो बरोबर आहे च्रप्स. गोड खाणे
हो बरोबर आहे च्रप्स. गोड खाणे(साखर,गुळ सर्वकाही) खूप आटोक्यात ठेवले पाहिजे.
५०
५०