मानहंस

Submitted by प्रगल्भ on 24 July, 2020 - 11:11

मी काल आणखी एक प्रयत्न केला गझल लिहीण्याचा, माझा माबो वरचा गझलमित्र निलेश ती वाचल्यावर म्हणाला

"वृत्त्त जमलय तुला फक्त मेंटेन करावं लागेल"

ती आता सादर करतो Happy

आर्तता (नाव द्यायच म्हणून .. पण बहुतेक अस वाटतय गझलेला नाव हे त्याच गझलेतील एखाद्या पंक्तिचं देतात )

जमवून घेतल, सोबती तुज लाभला
ठरवायचा बघ आपला जन्म आपला

पटवून ठेवल भावली मज आर्तता
भरवायचे मन भेटता सय भेटता

गुतवून साठल लागली तिज वाळवी
मिळवायची मग लाडकी तव सावली

गिरवून टाकल नाव ते तुझ मैत्रिणी
मिटवायचा तर सोवळा दुर वैरिणी

ठसवून घे सकलासि ठेवण जाणुनी
कसल्यातरी पण आभाळी भर राहुनी

- प्रगल्भ कुलकर्णी
- मानहंस ( स्वरकाफिया )
( ललगालगा ललगालगा ललगालगा )

- धन्यवाद भरत
- धन्यवाद बेफिकीर सर
- आणि धन्यवाद निलेश अगदी मनापासून

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रयत्न सुरू आहेत Happy वाचून झालय
डोळे काळे पडलेत
पण सोडणार नाही
काहीही होवो
पण एक तरी गझल जमली पाहीजे अस खूप आतून वाटतं द्वैत!

@बेफिकीर सर तुमच्याच माबो वरच्या लेखाच्या लिंक्स वाचत असतो मी तुम्ही गझल बद्दल खूप लिहून ठेवले आहे.
मी सुद्धा एखादी गझल लिहिण्याचा खूप प्रयत्न करतोय...
पण पहिल्यांदा लिहिताना जे लिहून जातो त्या सगळ्या कविता होत आहेत ओ Proud

वृत्तात पहिल्यांदा लिहिता आलं ( निलेश शेलोटे यांना क्रॉस चेक साठी पाठवलं होत. ते म्हणाले वृत्तात लिहिण जमलय पण अजूनही ही गझल नाही झाली आहे) आणि खरंच गझल नाही झाली ही पण

हे इथेच लिहितो.
मायबोलीवरच्या अधिकतर गझला या वृत्तबद्ध गद्य असतात.