स्मृतींची चेपली घागर कुठे ठेवू

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 July, 2020 - 02:10

स्मृतींची चेपली घागर कुठे ठेवू
व्यथेची फाटकी चादर कुठे ठेवू

असा उठलास जर ताटावरुन भरल्या
चुलीवरची गरम भाकर कुठे ठेवू

नवा अभ्यासक्रम आहे, नवी यत्ता
विचारांचे जुने दप्तर कुठे ठेवू

विसरल्यावर कदाचित आठवूसुध्दा
घडा हा पालथा तोवर कुठे ठेवू

नभाला स्पर्शले होते तुझ्यासोबत
तुझ्याविण गवसले अंबर कुठे ठेवू

तुझे ना जाहले, ना राहिले माझे
मनाला सांग ह्या बेघर कुठे ठेवू

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त. मला नेहमी आपण ह्या भावना अनुभवल्या आहेत हे तुमची दु: खाचे अनेक कंगोरे तपासून उल गडून दाखविणारी कविता वाचली की समजते. जनरल पुढे बघायच्या रेट्या मुळे मी ह्याबाबतीतली संवेद न शीलता ऑप्शनलाच टाकली. सवड मि ळाली की तुमच्या कविता
वाचून तपासून बघते.

जिवाची काळजी घ्या हे आहेच.

अमा

मनःपूर्वक धन्यवाद आपल्या नियमित प्रतिक्रियांबद्दल.

माझ्या लिखाणातून आपल्याला सहवेदना जाणवते हे ऐकून बरे वाटले की चला कुणीतरी वाचूनही मोकळे होते आहे परंतू प्रत्येक लिखाण प्रत्येकवेळी स्वानुभवच असतो असेही नाही. बर्याचजणांचं आयुष्य जवळून बघितले जाते तेही लिखाणात ओघाने येत राहते.

कुठलीही कला भावनांना वाट मोकळी करून देण्याचं फक्त एक माध्यम आहे नाही का?

जोकर हसवतो म्हणून तो नेहमीच आनंदी असायलाच हवा असे नाही.
पुलंना दुःख नसेल का? वपु हलकं फुलकं जगत नसतीलच का?

तात्पर्य : लेखक हा त्या त्या भावना लिहित्या क्षणी जगतो अन मोकळा होतो, रिकामा होतो नवीन अनुभवाचे स्वागत करायला.

असो

काळजी करू नकात स्वतःची काळजी मात्र घ्या.

धन्यवाद !!

सुप्रिया मिलिंद जाधव

परंतू प्रत्येक लिखाण प्रत्येकवेळी स्वानुभवच असतो असेही नाही. बर्याचजणांचं आयुष्य जवळून बघितले जाते तेही लिखाणात ओघाने येत राहते.>> हो मला माहीत आहे. ते एक चांगल्या क्रिएटीव्ह मनाचे लक्षण आहे. कारण इतरांचे अनुभव आपण जगून बघतो. हाय एंपथी असल्या शिवाय ते शक्य नस्ते. काही लोकांना दुं:खाची नस चांगली पकडता येते. मला जास्त करून विनोद व उपहास नैसर्गिक रीत्या जमतो. पण लोक्स ऑफेंड होतील म्हणून मी बरेच विनोद कधीच शेअर करत नाही. तो फक्त एक कोपिन्ग मेकॅनिझम असतो त्यात कोणाला हर्ट करायचा उद्देश नस्तो. पण आता
इतरांमधली इन्वेस्ट्मेंटच कमी झाली आहे.

अरे वा वा नीलिमाजी वाचताय की सगळंच !

गझलेत वृत्त असतात, अक्षरगणवृत्तात लगावली त्यामध्ये आपली सुचवणी बसत नाही मॅडम

दोन्ही जमिनी एकदमच तयार झाल्या मग काय पेरत गेले Happy

धन्यवाद

अरे वा वा नीलिमाजी वाचताय की सगळंच !
>>

खचत नाही तुझ्याही ट्रोल करण्याने
मनाला ह्याहुनी कणखर किती ठेवू ?

गझलेत वृत्त असतात, अक्षरगणवृत्तात लगावली त्यामध्ये आपली सुचवणी बसत नाही मॅडम!
>>

मला वाटलेच की काहितरी कारण असणार. पण एक्स्पर्ट कडुन ऐकलेले चांगले.
Happy Happy

खचत नाही तुझ्याही ट्रोल करण्याने
मनाला ह्याहुनी कणखर किती ठेवू ?

अरेच्च्या ! हे इथे का आणलत Happy