आहे

Submitted by रोहितकुलकर्णी on 25 July, 2020 - 13:25

कुठल्या मातीमध्ये घडला आहे?
माठ मनाचा नुसता गळका आहे

निळ्या ढगांची गर्दी वाढत गेली
पाऊस बहुदा मरून पडला आहे

थांब जरासे विचार करून बोलू
हा संवाद नव्हे हा गलका आहे

कोंदण करून घेऊया किरणांना
महिन्यांनंतर प्रकाश पडला आहे

नकोच आगीशी इतकी आपुलकी
नको निखारा फारच जळका आहे

लाट उसळते आहे विझते आहे
कुठे किनारा जाऊन दडला आहे

पायजमा इर्षेचा सफेद आणि
सात्विकतेचा सदरा मळका आहे

अवघड कविता करते आहे जगणे
काळ विचारामध्ये गढला आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"निळ्या ढगांची गर्दी वाढत गेली
पाऊस बहुदा मरून पडला आहे" ----> कविकल्पना एकच नंबर

"थांब जरासे विचार करून बोलू
हा संवाद नव्हे हा गलका आहे" ---> हृद्य!!

"पायजमा इर्षेचा सफेद आणि
सात्विकतेचा सदरा मळका आहे" ---> खूप भिनलंं आहे काव्य तुम्हाला

दररोज काय देऊ तुम्हा ... मीच 'शब्दभंगार'

पायजमा शेरात आणि चे आणी करावे लागेल

कविता जगणे अवघड करते आहे - अशी एक शब्दरचना सुचली

गझल, खयाल, जमीन सगळे आवडले