चेक संबंधी व्यवहार

Submitted by Nitin9 on 8 July, 2020 - 07:30

मी माझ्या एका सहकाऱ्याकडून पैसे उधार घेतले , एकदा 20 हजार एकदा 30 वगैरे असे एकूण 1 लाख रुपये अडचणीच्या वेळेस घेतले सर्व रक्कम मला त्यांनी कॅश स्वरूपात दिली कोणत्याही म्हणजे ट्रान्सफर नाही , कोणताही बॉण्ड वगैरे केला नाही आणि चेकने नाही , प्रत्येक वेळेस त्यांना मी सही करून ब्लॅंक चेक दिला त्यांच्याकडे माझे एकूण 4 चेक आहेत आणि आता ते मला जास्तीचे पैसे मागताय आणि चेक बोउन्स करण्याची धमकी देताय कोर्टची नोटीस पाठवायचं म्हणताय , मग आता मी काय करावे ? मला काय अडचण येऊ शकते या मध्ये कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याने तुम्हाला मागितलेली क्याश दिली. ती तुम्ही घेतलीत. आता त्यास अधिक परत हवी असेल. किती काळ गेला परतफेडीत हे लक्षात घेऊन थोडी जास्ती घे बोलून प्रकरण मिटवून टाका. चेक तीन महिने वैध असतात.

चेक कधी दिले होते?
बेअरर होते की क्रॉस?
सही केलीये का तुम्ही?
तारीख टाकली होती का?

एकदा बँकेत फोन करून ते चेक नंबर देऊन चेक डिलीट (नेमका शब्द आता आठवत नाहीये) करता येईल का विचारा.

मुळात जर पैसे रोख घेतले तर चेक देणे कितपत योग्य कळत नाहीये

कुठलाही आर्थिक व्यवहार करताना फक्त गरजेच्या किंवा भावने पोटी करू नये हेच खरे

असो

चेक तुम्हीच दिल्याचा पुरावा नसेल तर चेक हरवले अशी पोलीस तक्रार करुन ती कॉपी बँकेत जमा करुन बॅकेला ते चेक ब्लॉक करायला सांगा.

अश्या व्यवहारात फक्त एक सिक्युरिटी म्हणून पोस्ट डेटेड चेक घेतलेले असतात आणि उसने घेतलेली / कर्जावू रक्कम परतफेड करताना ते चेक फाडून टाकतात. त्यामुळे घडले ते विसंगत नव्हते असे वाटते पण आता त्या सहकऱ्याची एकतर नियत फिरली म्हणून जे बोलणे ठरले त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा / हाव करतोय किंवा त्याला तातडीने परतफेड हवी असेल म्हणून धमकी देतोय. घी जब सीधी उंगली से ना निकले तो.... त्यामुळे जर तो सहकारीच आहे तर त्याची अड़चण समजून घेऊन सामोचाराने मार्ग काढता येईल असे बघा. पैसे बुड़वायचे असतील तर त्यासाठी हजार मार्ग आहेत आणि अर्थात वसूल करायचे तर त्यासाठी सुद्धा ! पण ह्यात व्यक्तिगत संबध कायमचे दुरावतील आणि शत्रुत्व येईल ते वेगळेच. सध्याच्या नाजुक परिस्थितीत होता होईल तितके माणूस जोड़णे गरजेचे आहे. काल तुमच्या संकट काळात त्याने मदत केली होती ... उद्या त्यालाही तुमची गरज लागू शकते.

अज्ञानी!!

धन्यवाद! कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनन्तर असे दुर्मिळ प्रतिसाद वाचावयास मिळतात....त्यामुळे कुठेतरी एक आन्तरिक समाधान लाभते...!
"....सध्याच्या नाजुक परिस्थितीत होता होईल तितके माणूस जोड़णे गरजेचे आहे. काल तुमच्या संकट काळात त्याने मदत केली होती ... उद्या त्यालाही तुमची गरज लागू शकते..."
हे महत्वाचे.....सध्या सगळेच दुरावत चाललेत...

आत्ताच कुमार गन्धर्वजींचे ' सुनता है गुरु ग्यानी....' हे निर्गुणी भजन ऐकता ऐकता तुमचा प्रतिसाद वाचला....त्यात तुमच्या 'गुरु ग्यानी' असण्याचा लगेच प्रत्यय आला...

आपल्या ग्रुप मध्ये कोणी वकील असेल तर कृपा करून सल्ला द्यावा,
चेकवर दिनांक नाही ,
ते जी रक्कम मागताय ती खूपच जास्त आहे म्हणजे 1 लाखाचे 4 लाख , रक्कम उधार घेऊन 4 महिने झाले आहेत , त्यांच्याशी बोलणं झालय पण काही मार्ग निघत नाही ते पैशे 4 लाख पाहिजे म्हणतात
आता पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

एक लाखाचे चार महिन्यात चार लाख मागणं पटत नाही खरं.

समजा तुम्ही सांगता तशीच परिस्थिती असली तर आधी असे धमकीचे फोन रेकॉर्ड करा. दोघांच्या चांगल्या परिचयातली चार चांगली माणसं घ्या आणि बसून बोलून प्रकरण मिटवा. नाहीतर पोलीस तक्रार करणं उत्तम. फोन रेकॉर्डिंग इथं उपयोगी पडेल. सावकारी प्रतिबंधक अधिनियम लागू शकतो यात.

काही लोकांचा हा धंदा असतो. कोरे चेक घेऊन खटल्याची धमकी देणं. मग खरंच दावा न्यायालयात गेला की पैसे घेऊन दावा मागं घ्यायचा.