सुरु सुद्धा न होणारा (Bricked) सॅमसंग एंड्रॉईड फोन मी असा दुरुस्त केला

Submitted by अतुल. on 8 July, 2020 - 05:39

ऐन लॉकडाऊनच्या काळात सर्व भिस्त फोन आणि इंटरनेटवर असल्याने फोन बंद पडणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. माझ्या भावाचा फोन असाच बंद पडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या काही वर्षात वेळोवेळी साठवला गेलेला अतिशय महत्वाचा डेटा त्यात होता. थोडाथोडका नव्हे तर जवळजवळ ६४ गिगाबाईट!

त्याने फोन दुरुस्त करणाऱ्या त्याच्या ओळखीच्या/प्रसिद्ध वगैरे वगैरे तंत्रज्ञाना संपर्क साधून त्याबाबत विचारले. मॉडेल कोणते आहे आणि नक्की समस्या काय आहे हे विचारून अखेर सर्वांनी एकच सांगितले कि फोन रिसेट करून सुरु होऊ शकेल. पण डेटा मिळवणे शक्य नाही. खुद्द सॅमसंगच्या सर्विस सेंटर मधून सुद्धा हीच माहिती मिळाली. लॉकडाऊन संपल्यानंतर फोन आणून द्या. फॅक्टरी रिसेट करून सुरु करून देऊ. पण डेटा विसरून जा. इतक्या महत्वाच्या डेटा वर पाणी सोडणे भावाच्या जीवावर आले होते. खरे तर वेळोवेळी बॅकअप घ्यायला हवा होता. पण तो घेतला गेला नव्हता. पण यात मी त्याला दोष देत नाही. कारण आपल्यापैकी अनेकजण वरचेवर बॅकअप घेत नाहीत. मी तरी कुठे घेतो? असो.

अखेर त्याने फोन माझ्याकडे सुपूर्द केला. मी खरे तर सॉफ्टवेअर व्यवसायातला मनुष्य. मला हार्डवेअर/फर्मवेअर यातली फार माहिती नाही. पण पाच-सहा वर्षापूर्वी माझा स्वत:चा एक सॅमसंगचा फोन मी नेटवर माहिती गोळा करून दुरुस्त केला होता. त्यामुळे मी शेवटचा प्रयत्न म्हणून प्रयत्न करायचे ठरवले. मिळाला डेटा तर उत्तमच. नाहीतर तसेही फोन रिसेट करायला द्यायचा होताच. भाऊ म्हणाला कि येनकेन प्रकारे फक्त डेटा मिळवता येतो का बघ. एकदा डेटा कॉपी केला कि फोन रिसेट करायला देऊ.

पण नेट वर शोध घेता घेता एक वेगळाच धोका लक्षात आला. मी ज्या प्रकारे पूर्वीचा माझा फोन दुरुस्त केला ती पद्धत आता कालबाह्य झाली होती! फोन केवळ अडीच तीन वर्षापूर्वी घेतला होता. म्हणजे सॅमसंगचे हे नवीन मॉडेल होते. मागच्या तीन चार वर्षात त्यांनी बरेच बदल केले होते. फोन चोरीला गेल्यास त्यातून डेटा चोरता येऊ नये म्हणून त्यांनी हे बदल केले होते. मग लक्षात आले कि सगळे तज्ञ फोन रिसेट करण्याशिवाय गत्यंतर नाही असे का म्हणत होते. नवीन बदलांमुळे मी पूर्वी वापरलेली पद्धती आता अवलंबली तर फोन कायमचा खराब होण्याची शक्यता होती. म्हणजे डेटा तर गेलाच शिवाय इतका महागडा फोन सुद्धा गमावण्याची शक्यता होती. हे नवीनच आव्हान समोर आले होते. पण इंटरनेटवर पुन्हा कित्येक तास धुंडाळ धुंडाळ धुंडाळले. मिळालेल्या प्रचंड माहितीचा किस पाडून आणि बराच काथ्याकुट करून एक पद्धती अवलंबायची ठरवली. ती त्यातल्या त्यात सुरक्षित वाटत होती. पण भरोसा देऊ शकत नव्हतो. म्हणून भावाची सल्लामसलत केली. म्हणालो, "मला बरीच खात्री आहे. पण पूर्ण भरोसा देऊ शकत नाही. यश मिळालेच तर डेटा हाताला लागू शकतो. पण प्रयोग अयशस्वी झाला तर फोन खराब होऊ शकतो. काय करायचे?". त्याने विचार करून सांगितले, "ठीक आहे. प्रयोग करून बघ. डेटा महत्वाचा आहे".

हा फोन सुरु होत असताना SAMSUNG च्या लोगो वर अडकून बसत होता. याला तांत्रिक भाषेत Soft Bricked म्हणतात.
(पण जर फोन पूर्णपणे बंद असेल व बॅटरी चार्ज करूनही सुरूच होत नसेल तर त्याला Hard Bricked म्हणतात)

सॅमसंग एंड्रॉईड फोन आपण बरेच जण वापरतो आणि अशा प्रकारची समस्या अनेकांना आली असेल किंवा येऊ शकते व हि माहिती कोणालातरी उपयोगी पडू शकेल म्हणून हा लेख. पुढे सुरु ठेवण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे...

१. या गोष्टी खूप तांत्रिक असल्याने तुम्ही स्वत: यातले माहितगार असाल तर तुम्हाला स्वत:ला हे लिखाण उपयोगी होईल. किंवा ओळखीतल्या/नात्यातल्या तंत्रज्ञाशी चर्चा करताना माहिती म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो.

२. यामध्ये फोनचे फर्मवेअर बदलण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. यात फोन कायमचा खराब होण्याचा धोका असतो हे ध्यानात असू द्या. विशेषत: Odin या संगणकप्रणालीचा वापर अत्यंत जपून करावा लागतो.

३. फोन दुरुस्त झाल्यांनतर हि प्रक्रिया मी तपशीलवार लिहून काढून ती मी यासंबंधातली विविध चर्चासत्रे (Forums) तसेच युट्यूबवर पोस्ट केली आहे. अर्थातच हि मूळ पोस्ट इंग्लिशमध्ये आहे. पण मायबोली या मराठी संकेतस्थळावर पोस्ट करण्यासाठी ती मी मराठीत भाषांतरीत केली तर अगम्य होऊन बसेल. म्हणून मी ती इंग्लिशमध्येच जशीच्या तशी इथे चिकटवत आहे, हे कृपया ध्यानात घ्या. या सगळ्या पायऱ्या मराठीपेक्षा इंग्लिशमध्येच समजणे सोपे जाईल.

या त्या पायऱ्या आहेत ज्यांच्याद्वारे मी तो खराब झालेला फोन दुरुस्त केला व त्यातला डेटा सुद्धा परत मिळाला:

How did I successfully recovered my soft bricked Samsung phone along with data:

1. My phone was soft bricked while upgrading from Android 9 to Android 10. It was stuck at SAMSUNG logo after booting.

2. Phone was having FRP LOCK & OEM LOCK both turned on (We can this info from restarting phone in recovery mode by pressing Power & Volume Up buttons)
- From info available on internet, I realised that if phone is FRP LOCK or OEM LOCK, then flashing it with TWRP is NOT recommended.
- So I decided to flash it with stock firmware only (A Stock ROM/Firmware is an official software that is designed by the manufacturer for a particular device)

3. To flash firmware using Odin, we first need to turn on phone in download mode. Generally we can do this by startig phone by pressing Volume down + Power buttons
However, for some reasons my phone was not going in download mode (even after pressing those eys). But it was going in recovery mode.

4. I used USB Jig to put the phone forcefully in download mode. (USB Jig is avilable on Amazon)
- Turned off phone using option provided in recovery mode,
- Attach USB Jig
- Then pres power button. Phone starts in download mode. Remove Jig quickly and attach USB cable and connect it to computer to flash it with Odin

5. Then I used Odin to flash stock firmware. In download mode, Odin detects the phone.
- In my case phone was soft bricked because of Android 10 upgrade. Hence I flashed it with Android9 firmware.
- Android9 stock firmware available here: https://www.sammobile.com/samsung/galaxy-a6-plus/firmware/SM-A605G/INS/d...
- Important: Read all instructions carefully on the site above how to use Odin to flash. Especially remember: Use HOME_CSC_* if you want to keep your apps and data. This is VERY important.
- After flashing with Android 9 firmware, I disconnected phone from PC and restarted. But it was still hanging at Samsung logo. It was frustrating.
- But then I again rebooted phone and this time just connected to PC, then it took some time at Samsung logo but then whoaaaa... it started successfully Happy I was able to see all the data

6. IMP links those finally helped:
https://www.youtube.com/watch?v=4fURMa60lq4&lc=Ugyayt-jmz1FoxiDnVZ4AaABA...
https://www.thecustomdroid.com/install-samsung-stock-firmware-galaxy-dev...
https://www.sammobile.com/samsung/galaxy-a6-plus/firmware/SM-A605G/INS/d...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपयुक्त माहिती
-----------+-
फोन कितीही महागडा घेतला ( जास्त रॅम +अतिजास्त इनबिल्ट मेमरी) तरी एक्सटर्नल मेमरी कार्ड डिफ़ॉल्ट मेमरी म्हणून आवर्जून वापरले तर ही समस्या आलीच नसती ना ?

मला एक येथे शंका विचारायची आहे. फोन पाण्यात पडला असेल तर त्याचा LCD डीस्पले खराब होउ शकतो का? सुरवीतीला फक्त बॉटरी ईश्यु दाखवत होता

बेस्ट!
सो, एक धडा -
सगळ्या गोष्टी क्लाउड बॅकप ला ठेवणे.

महत्त्वाचे पण नेहेमी न लागणारे फोन नंबर्स (उदा. प्लंबर/ इलेक्ट्रिशिअन) आणि महत्त्वाचे टेक्स्ट + वॉअ‍ॅ मेसेजेस (चोप्य-पस्ते करून)- नोट्स मध्ये. नोट्स चं बॅक अप आयक्लाऊड/ गूगल ड्राईव ला शक्यतो आपोआप होतंच. (गूगल ड्राईव वाल्यांनी कुठल्या गूगल अकाऊंट ला तुमचा फोन सिंक केला आहे ते चेकणे)

फोटोज, कॉन्टॅक्ट्स आणि एंटायर फोन चं एक बॅक-अप क्लाऊडवर.
हे अधून मधून चेक करत राहाणे व्यवस्थित होतं आहे की नाही.

फोन अगदी या क्षणी जरी फॅक्टरी रीसेट करायला लागला तरी रेडी असतो हे फॉलो झालं की.

अपवाद - कंपनी आयटी जर तुमचा फोन मॅनेज करत असेल तर रिसेट झाल्यावर त्यांच्याकडून पुन्हा एमडीएम प्रोफाईल्स डालो करून अ‍ॅक्टिव्हेट करायला लागतात, पण त्यालाही साधारणपणे फार क्लिष्ट प्रोसेस नसावी.

>> फोन कितीही महागडा घेतला ( जास्त रॅम +अतिजास्त इनबिल्ट मेमरी) तरी एक्सटर्नल मेमरी कार्ड डिफ़ॉल्ट मेमरी म्हणून आवर्जून वापरले तर ही समस्या आलीच नसती ना ?
>> Submitted by अज्ञानी on 8 July, 2020 - 15:26

हो पण आजकाल फोन मध्ये इनबिल्ट मेमरी पुष्कळ असते आणि Apps चे डीफॉल्ट सेटिंग नुसार तिथेच सर्वकाही साठवले जाते. बहुतेक युजर्स ते सेटिंग बदलत नाहीत.

>> छान माहीती. खुप मेहनत घेतलीत
>> Submitted by मेघ on 8 July, 2020 - 16:51

धन्यवाद Happy

>> फोन पाण्यात पडला असेल तर त्याचा LCD डीस्पले खराब होउ शकतो का? सुरवीतीला फक्त बॉटरी ईश्यु दाखवत होता
>> Submitted by मेघ on 8 July, 2020 - 16:56

हो. डिस्प्ले खराब होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती:

https://whoosh.com/blogs/blog/how-to-fix-a-water-damaged-phone-even-when...

https://www.techwalla.com/articles/how-to-remove-water-from-a-cellphones...

https://www.ifixit.com/Answers/View/128077/Why+is+my+phone+screen+black+...

>> सो, एक धडा -
>> सगळ्या गोष्टी क्लाउड बॅकप ला ठेवणे.
>> Submitted by योकु on 8 July, 2020 - 21:10

खरे आहे. एक सेकंद लागतो फोन किंवा कोणतेही डिजिटल उपकरण (अगदी डेस्कटॉप सुद्धा) खराब व्हायला. त्यामुळे याबाबत नेहमीच जागरूकता बाळगायला हवी. निदान महत्वाचा डेटा तरी बॅकप ला ठेवणे.

माझ्या मते फोन { android } आहे त्या ओएस वर्शनवरच वापरावा. तो अजिबात अपग्रेड करू नये. Technically android six ( marshmallow) आणि android nine यामध्ये थोडेफार वरवर बदल केले असावेत. ( तीन बोटे वापरून स्क्रीनशॉट काढणे, किंवा एकाच वेळी दोन ट्याब्ज सक्रीनवर अर्ध्या उघडणे किंवा आणखी काही. पण android system modular नसावी. म्हणजे संपूर्ण ओएस अपग्रेड करूनच ते बारीक बदल मिळतात. ( Windows ten modular आहे का? ते छोटेछोटे अपग्रेड देतात.)
( नेटवरच्या माहिती आधारे हे तर्क आहेत.)

डेटा - अधूनमधून काही माल ओटीजी वापरून एक्स्टर्नल कार्डावर ढकलला पाहिजे. फोटो विडिओ तरी ढकलले पाहिजेत.

तुम्ही सॉफ्टवेरचे जाणकार असल्याने हे करू शकलात. कारण त्यात काय धोके असतात ते तुम्हास माहिती आहेत.

"फोनला रिसेट मारा" हा सल्ला प्रत्येक मोबाईल दुकानातले 'गडी' सर्वांनाच फुकट देत असतात.

>> ... आहे त्या ओएस वर्शनवरच वापरावा. तो अजिबात अपग्रेड करू नये.

सहमत आहे. ओएस अपग्रेड हा खूप मोठा बदल असतो. डेटा महत्वाचा असेल तर हे न करणे उत्तम.
Android 10 ला अपग्रेड करताना अनेक फोन बंद पडल्याचे वाचनात आले आहे.

>> "फोनला रिसेट मारा" हा सल्ला प्रत्येक मोबाईल दुकानातले 'गडी' सर्वांनाच फुकट देत असतात.

त्यांचे ठोकताळे असतात. सर्विससेंटर वाल्यांची तर कंपनीने ठरवून दिलेली चाकोरी असते. त्यात राहून त्यांना काम करावे लागते. एखाद्या फोनवर इतके संशोधन करत बसणे त्यांना परवडणारे सुद्धा नसते. तरीही यानिमित्ताने काही पेड सर्विसेस विषयी माहिती कळली. डेटा रिकवरी करण्यासाठी या सर्विसेस खूप सारे चार्जेस घेतात.

1. My phone was soft bricked while upgrading from Android 9 to Android 10.
<<
Who was upgrading and why? Was it an OTA update?

२. "महागड्या सॅमसंग फोन" चं नांव गांव पत्ता? आय मीन टेक्निकल नांव? उदा. गॅलॅक्शी दगड ५५ वगैरे काही?

३. फोन रूटेड होता/नव्हता?

४. यूएस्बी एडीबी ऑन केला होता/नव्हता? डेव्ह मोड ऑन होता की ऑफ?

तुमचे मूळ भाषण (तूनळीवरील) वा इतर लिंका न अवलोकिता, डोक्यात आले ते प्रश्न विचारले आहेत.

***

>> ... आहे त्या ओएस वर्शनवरच वापरावा. तो अजिबात अपग्रेड करू नये.
<<

जुने फोन पुन्हा वापरात ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. उदा. माझा प्राचीन Galaxy Tab 2. हार्ड्वेअर उत्तम आहे. बॅटरी पण पुरेशी आहे. मग फक्त ऑस व्हर्जन जुनी झाली म्हणून हे फेका अन नवीन घ्या??

का?

कम्पनीचा धंदा वाढून त्यांना पैसे मिळावेत म्हणून?

जुनी ऑस झाली म्हणून हे कुत्रे ऑस चा सपोर्ट बंद करतात. त्यावर काहीच चालणार नाही अशी व्यवस्था करतात.

असाही फोन / टॅब फेकायचाच आहे. मग ऑस बदलून चालू लागला तर अडचण काये?

***

फोन कितीही महागडा घेतला ( जास्त रॅम +अतिजास्त इनबिल्ट मेमरी) तरी एक्सटर्नल मेमरी कार्ड डिफ़ॉल्ट मेमरी म्हणून आवर्जून वापरले तर ही समस्या आलीच नसती ना ?

<<

नाही. हे असे करता येत नाही. ऑपरेटींग सिस्टिम तुमच्या एक्स्टर्नल मेमरी कार्डवर जात नाही. जाऊ शकत नाही. नुस्ते फोटो अन व्हॉट्सॅप फाईल्स म्हणजे डेटा नसतो. फॉर एक्झाम्पल तुमची बँकींग / फायनान्शिअल अ‍ॅप्स कार्ड वर जाऊ शकत नाहीत.

अन दुसरा मुद्दा मी जो नेहेमी सांगत असतो, तो हा,

महागडा "फ्लॅगशिप" फोन घेऊच नका. १०-१२ हजाराचा मध्यम मेमरीवाला चक्क चायना फोन घ्या. २ वर्षांत आऊटडेट झाला, की फेकून द्या / कुणा गरीबाला द्या.

कंपनीवाले पण गरीब असतात, फोन बाय-बॅक पण करतात.

आपला फोन ज्या व्हर्जनवर मस्त चालतोय, त्याचं स्टॉक फर्मवेअर डाऊनलोड करून ठेवा.

फोनला पुढे मागे प्रॉब्लेम आला तर फ्लॅश करायला बरं.

>> 1. My phone was soft bricked while upgrading from Android 9 to Android 10.
>> <<
>> Who was upgrading and why? Was it an OTA update?

=> User was upgrading it. Phone given OS upgrade notification so he just tapped on it to upgrade (He said he did that because he had done same in the past few times without any trouble)

>> २. "महागड्या सॅमसंग फोन" चं नांव गांव पत्ता? आय मीन टेक्निकल नांव? उदा. गॅलॅक्शी दगड ५५ वगैरे काही?

=> SM-A605G

>> ३. फोन रूटेड होता/नव्हता?

=> नव्हता

>> ४. यूएस्बी एडीबी ऑन केला होता/नव्हता? डेव्ह मोड ऑन होता की ऑफ?

=> नव्हता. डेव्ह मोड ऑफ.

@आ.रा.रा. Happy Happy

फोनच्या मॉडेलचा लेखात थेट उल्लेख केलेला नाही कारण ही मूलभूत पद्धती असल्याने सॅमसंग एंड्रॉईड फोन च्या सर्वच मॉडेल्सना ती लागू पडेल.