मुलांच्या वर्तणूकीच्या समस्या आणि आपण-२

Submitted by मोहिनी१२३ on 7 July, 2020 - 10:36

भाग १- https://www.maayboli.com/node/75446

याच शाळेत १ली सुरू झाली. शाळेची वेळ ३.५ तासांची ७ तास झाली. विषय, लिखाण खूप वाढले.

आत्तापर्यंत आमच्या हे चांगलं लक्षात आलं होतं की त्याला एका जागेवर जास्त वेळ बसायला आणि लिखाण करायला आवडत नव्हतं का जमत नव्हतं(?)

Dictation tests, class tests जोरात सुरू झाल्या आणि आमची विकेट पडायला सुरूवात झाली.

अपूर्ण लिखाण, त्याबद्दल शाळेत शिक्षा, घरी आल्यावर ते पूर्ण करायचा आटोकाट प्रयत्न यात आमचं लेकरू हसणं विसरलं. आम्ही पहिल्याच महिन्यात लगेच शिक्षकांना भेटलो. त्यांनी आम्हाला school counsellor ला भेटायला सांगितलं. आम्ही त्यांना १ महिन्याची मुदत मागितली (चूक ४) आणि तो पर्यंत त्यांनी आणि आम्ही त्याला लिखाणाकरिता सतत बोलून उत्तेजन द्यायचे ठरवले.या मध्ये मुलाची आकलनशक्ती चांगली आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

एका महिन्यात लिखाण वेगात काहीच सुधारणा झाली नाही. Dictation tests, marathi/maths क्लास टेस्टस् यात चांगले गुण होते. पण English/science या विषयांचे पेपर्स निम्मे सुध्दा पूर्ण व्हायचे नाहीत.या काळात वर्गात हिंडणे पण वाढले होते.

आम्ही school counsellor madam ना भेटलो. त्यांनी आम्हाला आमचा मुलगा खूप खेळतो का असं विचारलं . अर्थातच याचं उत्तर हो होतं. पुढील ३-४ महिने आम्ही-शिक्षक-समुपदेशक यांमधे meetings होत राहिल्या,मुलाच्या शिक्षेचे प्रमाण, वांरवारिता वाढत राहिली, तो वर्गात बसल्यावर त्याला सगळे समजते ,तो लिखाण पूर्ण करित नाही, त्याचे पालक घरी करून घेतात या कारणाकरिता त्याला वर्गाबाहेर उभे करणे सुरू केले.

त्याची आनंदी, खेळकर वृत्ती या काळात लोप पावू लागली होतीं.
चिडचिड, संताप,बेपर्वा वृत्ती उद्यास आली होती.

या काळातील चांगल्या गोष्टी म्हणजे मुलाने trekking, small runs नियमीत सुरू केले होते. करून बघणे आणि शिकणे चालूच होते.
cycling, ground जमेल तसे चालू होते.

आम्हाला या काळात वर्गातील इतर पालकांची(ज्या नंतर चांगल्या मैत्रिणी बनल्या) अभ्यास पुरवणे, मनोबल वाढवणे व माझ्या मुलाबद्दल कोणतीही तक्रार न करणे ,त्याच्याबद्दल चांगले सांगणे अशा प्रकारची खूप मदत झाली.

३-४ महिन्यांनी psycologist नां भेटण्याचा आम्हाला counsellor madam नी सल्ला दिला. तो आम्ही ऐकला नाहीच वर शाळेने कसे वागले पाहिजे या बाबतीत सल्ला देऊन आलो.(चूक ५)

शाळेतील प्रत्येक meeting ला आम्ही दोघेही हजर असायचो.

या टप्यात त्याचे बालरोगतज्ञ आम्हाला/मुलाला नियमीत मार्गदर्शन करत होते. ह्या इयक्तेत परत बसवले तर समस्या सुटेल असं त्यांना वाटत होतं.

क्रमश:
भाग ३- https://www.maayboli.com/node/75462

Group content visibility: 
Use group defaults

चांगलं लिहित आहात. फक्त जरा मोठे भाग लिहिता आले तर पहा. अर्थात एका वेळी एवढाच वेळ मिळत असेल तर समजू शकते Happy लिहीत रहा पण.

दोन्ही भाग आवडले. मुद्देसूद आणि प्रांजळ आहेत. पालकांच्या चुका कसकशा होत गेल्या; हे वाचून अनेक समदु:खी पालकांना स्वत:च्या बाबतीत त्या कदाचित टाळता येऊ शकतील.

दोन्ही भाग आवडले. मुद्देसूद आणि प्रांजळ आहेत. पालकांच्या चुका कसकशा होत गेल्या; हे वाचून अनेक समस्थितीतील पालकांना स्वत:च्या बाबतीत त्या कदाचित टाळता येऊ शकतील.

छान प्रामाणिक लिहीत आहात
मोठे भाग लिहा किंबहुना अजून एक वा दोन भागातच संपत असेल तर त्याखालील चर्चा एकाच धाग्यावर राहील. माझ्यासारख्या पालकांना कामीही येईल.

छान.
ऋन्मेषला अनुमोदन. खुप प्रचंड लेख होणार नसेल तर एकाच भागात सर्व असावे.

CBSE / ICSE पॅटर्न आहे का? १ली साठी सात तास शाळा खुप झाली.

माझ्या मित्राचा मुलगा पोद्दार इंटरनॅशनलला ३री ला होता मागील वर्षी. शाळा सकाळी ८ ते ५.३०. सकाळी ७ला बस येणार, संध्याकाळी ६.३० ला घरी सोडणार. शाळा या वेळेतच होमवर्क करून घेणार, स्विमींग, गिटार क्लासही याच वेळात. पोरगा लिटरली घरी येऊन जेवून झोपायचा. मलूल झाला होता.

खूप धाडस लागते हे लिहायला. लिहीत रहा. खूप उपयोग होईल याचा काही पालकांना.
मूल लहान असतानाच पुढील वर्गात घालून त्रास आणि मनस्ताप होतो हे काही मैत्रिणींच्या बाबतीत जवळून पाहिले आहे.

धन्यवाद सुनिधी,पाथफाईंडर,धनवन्ती.
पुढच्या भाग १ ल्या व २र्या भागात सर्वांनी मांडलेल्या मुद्दयांच्या आधारे लिहीला आहे.

मोहिनी, छान लिहित आहात. आवडले. तुम्ही लिखाणाविषयी लिहिले आहे. नेमके किती ओळी लिखाण अपेक्षित असते ?
तसच वर्गाबाहेर उभ करण वगैरे हे सर्व शाळेत असते का ?

मोहीनी >>> तुमचा लेख उत्तम आहे. जर माझा खालील प्रतिसाद टँजेंट वाटत असेल तर सांगा. मी उडवून टाकेन.
========================
ह्या इयक्तेत परत बसवले तर समस्या सुटेल असं त्यांना वाटत होतं.

>>> तुमच्या केसमधे या गोष्टीचा उपयोग झाला की नाही माहीती नाही. तुम्ही त्याबद्दल सविस्तर लिहालच.

पण इतर पालकांसाठी स्वानुभव म्हणून सांगते की जर मुलं सगळं शिकत असतील तर मुलांना त्याच वर्गात बसणे अजिबात आवडत नाही. इतर समस्या निर्माण होतात.

माझं स्वत:चं वय पूर्ण झालं नसताना, बालकमंदीर घरापासून दूर होतं आणि माझी तब्येत बरी नसायची म्हणून घराजवळच्या शाळेत पहीलीत बसवलं. ही गोष्ट मला माहीती नव्हती आणि मी सगळं व्यवस्थित शिकत होते. पुढच्या वर्षी योग्य वय झाल्यामुळे मी फॉर्मली पहीलीत गेले, त्याच वर्गात. तू नापास झालीस असं बोलून माझा जीव काढला होता सो कॉल्ड वर्गभगिनींनी. त्या वर्षी मी हे दुखतंय, ते दुखतंय अशी कारणं काढून शाळेत जायला नकार देत होते, अक्षरश: उचलून न्यायचे मला. त्या वयातसुद्धा तू नापास झालीस हे मला खटकलं होतं कारण मी ढ नाहीये हे मला वर्गात जाणवत होतं.

( प्राथमिक शाळेत नापास केलेल्या मुलांबद्दल मला काही भाष्य करायचे नाहीय. कारण ते भारतातल्या शैक्षणिक व्यवस्थेचे अपयश वाटते मला. आता ग्रेडमुळे कदाचित सुधारत असेल पण तो या लेखाचा विषय नाही.)

माझ्या केसमधे मला जे प्रॉब्लेम जाणवले ते असे
1. त्या वयात मी आई-बाबा किंवा इतरांना नीटसं सांगू शकले नाही की मला वर्गात असं म्हणतात आणि त्यामुळे मला असं वाईट वाटतंय.
2. मला कुणी समजावले नव्हते की असं का? कारण सांगितलं असेल त्या वेळी. पण माझ्या बालबुद्धीला ते समजलंय का याला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही.
3. मला चिडवणार्या मुलांना मी प्रत्युत्तर देऊ शकले नव्हते.

त्यामुळे मुलांच्या बाबतीत मोठे निर्णय घेताना त्यांना जरूर विश्वासात घ्या. जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत न थकता वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सांगा.
असे निर्णय घेतल्यावर ती नव्या कंडीशनमधे सेटल होतात की नाही आणि त्यांची मनस्थिती काय आहे याकडे काटेकोर लक्ष पुरवा.

काही अनुभव अतिशय जवळचे आहेत. शाळा सर्रास अभ्यासात कच्च्या मुलांना पुन्हा त्याच वर्गात घाला असा आग्रह धरतात. कदाचित त्यांना पुढे जाऊन फक्त दहावीचा रिझल्ट चांगला लागण्याशी मतलब असतो. सुरूवातीला मूल 'सुधारण्यासाठी' हजार सूचना देतात अन काही दिवसांनी 'रिपिट करावाच लागेल याला' अशा धोशा लावतात. त्याआधी मुलांचा प्राॅब्लेम नेमका काय हे समजून घेण्याशी त्यांना कर्तव्य नसते. अर्थात नियमाला अपवाद यानुसार चांगल्या शाळाही असतील बर्याच. पण मुलाला काहीतरी प्राॅब्लेम आहे हे लक्षात आल्याबरोबर पालकांनीच धडपड करावी लागते हे सत्य आहे.
माझ्या मुलालाही रिपीट करायला सांगितले होते. पण आम्ही ते कटाक्षाने टाळले. स्वतः त्याचा अभ्यास त्याच्या कलाने घेतो. वर्गात किंवा इतर मुलांचा अभ्यास कुठवर याला याचा विचारच करत नाही. त्याच्यात सुधारणा करण्यासाठी अजूनही आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि बर्यापैकी वेगाने ती होतही आहे.निदान आतापर्यंतची सुधारणा बघून आम्ही समाधानी आहोत. तुम्ही तुमच्या मुलासाठी काय केले हे जाणून घ्यायला उत्सुक आहोत. याचा इतर पालकांनाही फायदा होईल.

सीमा-धन्यवाद.
MazeMan-धन्यवाद. हो असं होवू शकतं.
माझा लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न. तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहन व सल्ल्यांबद्दल खूप आभार.
या लिखाणाचा कोणाला तरी उपयोग व्हावा हीच ईच्छा.
अजून ३-४ भाग असतील.

हा पण लेख छान. मुले हिरमुसलेली मला बघवत नाहीत. तारे जमींपर मधला मुलगा आ ठवला.

चांगलं लिहित आहात. फक्त जरा मोठे भाग लिहिता आले तर पहा. ===> बरोबर....

या काळातल्या समस्या म्हणजे कमी एकाग्रता, लिखाण अर्धवट राहाणे, न ऐकणे, एका जागेवर न बसणे. == हे अगदी बरोबर आहे.... अन असे वागणे अनेक मुलांच्या बाबतीत होते .... % कमी पण असतात...
कोणीतरी लिहलय....खूप उपयोग होईल याचा काही पालकांना....खर आहे...

मी ३ र्या ,४थ्या भागात प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केलाय.कोणाला काही अजून विचारायचे असेल किंवा माझी उत्तरे स्पष्ट नसतील तर जरूर सांगा.धन्यवाद.