मुलांच्या वर्तणूकीच्या समस्या आणि आपण-१

Submitted by मोहिनी१२३ on 7 July, 2020 - 09:14

आमचा मुलगा आत्ता ८ वर्षाचा आहे.

नर्सरी पासून त्याच्याबद्दल शाळेत तक्रारी येऊ लागल्या. लक्ष देत नाही, एका ठिकाणी बसत नाही वगैरे.त्या वेळी आम्ही त्याला समजावून सांगणे, शिक्षक, त्याचे बालरोगतज्ञ यांची मदत घेणे, ओरडणे , कधी दुर्लक्ष करणे असे उपाय केले.

सिनिअर केजी मध्ये शाळेची वेळ वाढली, लिखाण वाढले आणि समस्याही. लिखाण पूर्ण न होणे, एका जागी न बसणे या गोष्टींबद्दल त्याला शिक्षा व्हायला लागली आणि आम्ही काळजीत पडलो.
रोज घरी अभ्यास (शाळेतील आणि घरचा) पूर्ण करून घेणे याचा आमच्यावर खूप ताण येऊ लागला.

आम्ही या वेळी त्याची शाळा बदलण्याचा विचार सुरू केला.खूप लोकांशी बोललो, त्याच्या मुख्याध्यापिका बाईंशी बोललो.त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले.

त्यांनी दिलेल्या धीरामुळे आणि नेट वरच्या माहितीवरून “आम्हाला तारीख उलटून गेल्यामुळे दुसरीकडे प्रवेश मिळणार नाही” हे गृहितक मनात ठेवून (चूक १) आम्ही तीच शाळा पुढे ठेवण्याचा निर्णय घेतला.

या पर्यंतच्या प्रवासातील जमेच्या बाबी म्हणजे २ र्या वर्षापासून नियमीत चालू असलेले त्याचे पोहणे/बास्केट बॅाल किंवा ग्राउंड, खूप मित्र, मोकळ्या हवेत खेळणे, त्याच्या आजी-आजोबांचा त्याच्या जडणघडणीमधील सक्रिय सहभाग.त्याच्या बाबांनी तर त्याच्यासाठी जवळ जवळ वाहूनच घेतले होते.आमच्या मुलाची चांगली आकलनशक्ती, भाषा आणि समज. आनंदी ,खेळकर व हरहुन्नरी स्वभाव.

या काळातल्या समस्या म्हणजे कमी एकाग्रता, लिखाण अर्धवट राहाणे, न ऐकणे, एका जागेवर न बसणे.

या वेळी आमचा मुलगा हा वर्गातील सर्वात लहान मुलांमधील एक होता.
या शाळेत लिखाण त्याच्या कुवतीपेक्षा जास्त होते.

या टप्प्यात आम्ही त्याचे शिक्षक, बालरोगतज्ञ हे सोडून कोणाचाही सल्ला घेतला नाही. (चूक २) व या मंडळींनी दिलेला सल्ला नीट पाळला नाही.(चूक ३)

क्रमश:
भाग २-https://www.maayboli.com/node/75447

Group content visibility: 
Use group defaults

सामो +१
पण मधला काही भाग चुकून डिलीट झालाय का?

हो आता दिसतंय व्यवस्थित. पण दुसरा सेम धागा चुकून प्रकाशित झालाय. तो प्रशासकांना डिलीट करायला सांगा.

किंवा जर पुढचं लिहून झालं असेल तर तो दुसरा धागा संपादन करून, भाग २ म्हणून, आधीचा मजकूर डिलीट करून पुढचा मजकूर टाका.

चांगले लिहिताय. सावकाशीने सविस्तर लिहा. इथे आता काही प्रतिक्रिया आल्यात, तो दुसरा धागा काढून टाकता येईल प्रशासकांना. कन्टेन्ट तुम्हाला एडिट करता येईल , तिथले इथे कॉपी पेस्ट करू शकता.

छान.
चुका का वाटल्या यावर दोन्ही बाजुनी (तेव्हाचा विचार आणि हाडंडसाईट विचार) सविस्तर वाचायला आवडेल.

धन्यवाद mi_anu,अमितव.
चुका का वाटल्या यावर दोन्ही बाजुनी (तेव्हाचा विचार आणि हाडंडसाईट विचार) सविस्तर वाचायला आवडेल-पुढच्या भागांमध्ये mostly cover होईल हे.

प्रांजळपणा खूप आवडला. अनेक घरात एकापेक्षा अधिक प्रश्न असतात जसे पालकांनाच काही आजार असणे, पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणे (पिडीयाट्रीशियन जेमतेम परवडतो), आजी-आजोबांचा असहकार. आपल्या पाल्याला समस्येबरोबर तिचे समाधान शोधायला संसाधने नशीबाने मिळाली/ झगडून मिळवली ह्याबद्दल अभिनंदन.

सीमंतिनी छान पोस्ट. मोहिनी लिहा. आम्ही फॉलो करतो लेख मालिका. व तुम्हाला भावनिक आधार पण आमच्या तर्फे.