समाजकारण आणि इन्ट्रोव्हर्जन

Submitted by अननस on 16 June, 2020 - 01:01

काल सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हादरली. ज्यांचा सिनेसृष्टीशी निकटचा संबंध नाही असा समाजही इतक्या तरुण, गुणी, यशस्वी आणि उमद्या कलाकाराच्या आत्महत्येने हळहळला. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी याचे मागणी त्याच्या घरच्यांनी केली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. एका प्रशोंत्तरात श्री सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एकूण होणाऱ्या आत्महत्यांनी व्यापकता सांगितली,वर्षांला साधारण पणे  ८ लाख आत्महत्या होतात ही संख्या दहशतवाद, युद्ध (सीरियन युद्ध यासारखे अपवाद सोडता), खून यापेक्षा जास्त आहे. अनेक मानसशास्त्र तज्ञ, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, अध्यात्मिक कार्य करते या समस्येची उकल करतील. एक मत ज्याला धरून सामाजिक कार्य शक्य आहे ते लिहीत आहे. 

सुशांत सिंग राजपूत च्या एका भाषणात त्याने इन्ट्रोव्हर्ट असल्याचे सांगितले होते (त्या भाषणाच्या चित्रफितीची लिंक खाली दिली आहे), यावर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणावत हिने दिलेल्या प्रतीकियेत सुशांतचे कौतुकास्पद कामाची दखल घेतली गेली नाही कारण सिनेसृष्टीतील कोणत्याही बड्या असामीचा त्याला पाठिंबा नव्हता असा उल्लेख आहे (त्या भाषणाच्या चित्रफितीची लिंक खाली दिली आहे). हा सगळा सिनेसृष्टीतील नीतिमत्तेचा भाग थोडासा बाजूला ठेवून काही मूलभूत  प्रश्नांकडे पाहायला हवं. सर्व साधारणपणे सर्वच संस्कृतींमध्ये इन्ट्रोव्हर्ट व्यक्तीना दुय्यम वागणुकीला सामोरे जावे लागते यामध्ये एक्सट्रोव्हर्ट व्यक्ती इन्ट्रोव्हर्ट व्यक्तींच्या सत्कार्याचे श्रेय आपल्या अधिक चांगल्या समाजकुशलतेचा वापर करून हिसकावून घेणे, किंवा इन्ट्रोव्हर्ट व्यक्तींनी न केलेल्या चुकांचे खापर त्यांच्यामाथी फोडणे, त्यांचा मानसिक कोंडमारा करणे अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. याला काही प्रमाणात शास्त्रीय आधार आहे. त्यातून भारतासारख्या देशात जेथे संस्कृती व्यक्तीकिन्द्रित नसून समाज केंद्रित अधिक आहे तेथे इन्ट्रोव्हर्ट व्यक्ती या समाज विरोधी मानल्या जातात. 

समाजात सर्व साधारणपणे बड्या असामींच्या आधाराने अनेक व्यक्ती यशस्वी होऊ शकतात. पूर्वापार चालत आलेले पुरुषांना एकत्र आणणारे  'व' - वाईन, वुमन, वेल्थ (झटपट मिळवलेली श्रीमंती ), व्हॅनिटी (आपला दबदबा तयार करणे वगैरे) आणि व्यसन  (दारू, सिगारेट काही नाही तर किमान चहा) यांच्या आधारावर अनेक व्यक्ती झटकन मोठे समाजगट तयार करतात ज्याचा सर्वसाधारण एक्सट्रोव्हर्ट व्यक्तींनाही त्रास होतो अशामध्ये इन्ट्रोव्हर्ट व्यक्ती विशेषत्वाने भरडल्या जातात. अनेकदा असे एकत्र आलेले गट, काहीही विशेष सकारात्मक काम करत नाहीत, कोणीतरी षोडश वर्षीय मुलीच्या नैसर्गिक शृंगारिकस्वप्नांवर आपली वासनापूर्ती करून घेण्यासाठी एकत्र आलेला आंबट शौकीन समाज स्वच्छ भारत अभियान मध्ये स्वच्छता करायला किंवा ग्रीन इंडिया मध्ये वृक्षारोपण करायाला कधीही आल्याचे दिसत नाही.. परंतु त्यांच्या एकीमुळे हे मोठ्या समाजाला दाखवून देणे हे खूप अवघड काम होऊन बसते.. त्यातून 'दुनिया झुकतीही झुकाने वाला चाहिये|' किंवा 'आताच्या काळात यशस्वी होण्यासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात (वाईन, वुमन वगैरे) ' अशी समाजघातकी तत्वज्ञाने समाजापुढे मोठ्या शहाणपणाच्या आवेशात मांडली जायला लागतात. दुर्दैवाने अशा प्रकारचे गट कुटुंबे, धार्मिक संस्था, व्यावसायिक क्षेत्र, कला क्षेत्र, राजकारण, या सर्व क्षेत्रात आहेत. 

प्रश्न असा आहे, कि या सामाजिक वास्तवातून मार्ग कसा काढायचा? याबाबतीत मी एका मानसरोग तज्ज्ञांना विचारले होते कि अशा प्रकारच्या समाजात दुय्यम वागणूक मिळणाऱ्या व्यक्तींसाठी (प्रामुख्याने इन्ट्रोव्हर्ट) काही आधारगट आहेत का? त्यावर त्यांनी मला अशा प्रकारचे आधारगट त्यांच्या माहितीत नसल्याचे सांगितले. अशी परिस्थिती मोठ्या शहरात असेल तर खेडोपाडी किती दारुण परिस्थिती असेल? अशा प्रकारचे सामाजगट तयार केले तरीही इन्ट्रोव्हर्ट व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचणार कसे? इन्ट्रोव्हर्ट व्यक्तींची नैसर्गिक मोठ्या समाज गटा पासून दूर राहण्याची वृत्ती आणि त्यांना समाजाशी जोडण्याची त्यांची स्वत:ची तसेच समाजाची गरज यामध्ये चांगला दुवा कसा निर्माण करता येईल? यावर विचार मंथन व्हायला हवे. 

संदर्भ :
१) https://www.facebook.com/brutindia/videos/904918413307536
२) https://www.facebook.com/427585124069776/videos/732840910821926

Group content visibility: 
Use group defaults

विषय खूप चांगला आहे, पण मुळातच इन्ट्रोव्हर्ट व्यक्ती आधारगटाची मदत घेतील का

आणि खोचक पणे नाही पण कळले नाही म्हणून.. या वाक्यांचा या सगळ्यांनशी काय संबंध
"शृंगारिकस्वप्नांवर आपली वासनापूर्ती करून घेण्यासाठी एकत्र आलेला आंबट शौकीन समाज स्वच्छ भारत अभियान मध्ये स्वच्छता करायला किंवा ग्रीन इंडिया मध्ये वृक्षारोपण करायाला कधीही आल्याचे दिसत नाही.. परंतु त्यांच्या एकीमुळे हे मोठ्या समाजाला दाखवून देणे हे खूप अवघड काम होऊन बसते.. त्यातून 'दुनिया झुकतीही झुकाने वाला चाहिये|' किंवा 'आताच्या काळात यशस्वी होण्यासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात (वाईन, वुमन वगैरे) ' अशी समाजघातकी तत्वज्ञाने समाजापुढे मोठ्या शहाणपणाच्या आवेशात मांडली जायला लागतात. दुर्दैवाने अशा प्रकारचे गट कुटुंबे, धार्मिक संस्था, व्यावसायिक क्षेत्र, कला क्षेत्र, राजकारण, या सर्व क्षेत्रात आहेत"

सुशांत सिंग त्या व्हिडीओ मध्ये खूप छान बोललाय.मन मोकळं.आजच ऐकलं आणि सारखं घश्याशी दाटून येत होतं.ती जिगर, तो आत्मविश्वास शेवट पर्यन्त टिकवता आला नसावा.
इन्ट्रोव्हर्ट असणं फार वाईट नाही.अशी माणसं करियर मध्ये बडबड्या माणसांपेक्षा जास्त लक्षात राहतात.
बुद्धीची कामं, लेखन अश्या ठिकाणी पुढे जाऊ शकतात. बडबड्या माणसांपेक्षा जास्त प्रोटेक्ट होतात.कारण त्यांची मर्मस्थानं पटकन ओळखून त्यांच्यावर हमखास वार करता येत नाहीत.
एकदा स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलं की त्यांचा अंतर्मुखपणा त्यांची स्टाईल म्हणून स्वीकारला जातो.
मार्केटिंग, सिनेक्षेत्र जिथे बोलणे, कॉन्टॅक्ट, सतत कोणाला तरी, कोणत्या तरी पार्टीत दिसत राहणे, स्वतःचं आयुष्य, प्रत्येक क्षण सार्वजनिक बनवणे याला महत्व आहे अश्या क्षेत्रात अंतर्मुख लोकांचं जास्त कठीण होत असेल.

मी दोन अतिशय जवळच्या नात्यातल्या इन्ट्रोव्हर्टस सोबत राहते.
इन्ट्रोव्हर्ट लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांच्या मनात काय चाललंय ह्याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत.
त्यांच्या मनात काय चाललंय ह्याचा पुढच्या व्यक्तीला सतत विचार करावा लागतो आणि त्या प्रमाणे वागावे लागते.
सुशांत च्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याची डिप्रेशन वर ट्रेंटमेन्ट सुरु होती पण तो त्या डॉक्टर किंवा कॉऊन्सेलर कडे जाऊन कितीपत फ्रीली बोलत होता आणि असेल तर त्या डॉक्टरांचा त्याला कितपत भावनिक सपोर्ट मिळतं होतं?
मुळात समोर कितीही मोठा डॉक्टर बसलेला असला तरी ह्या लोकांच्या मनात काय चालय ह्याचा अंदाज येणं अवघड जातं.
IT Is extremelly challenging at a times...
त्याच्या g. F नी त्याच राहत घर सोडून ती निघून गेली ते वाचून वाईट वाटलं. त्याच्या बहिणीने तरी त्याच्या सोबत राहायला हवं होतं.
त्याला एका पॉईंट ला फार एकटं वाटलं असावं.
But it is challenging to interact with introverts specially in their difficult times as they dont get open up easily..

सुशांत प्रकरण माहीत नाही नक्की काय आहे? सो तिथे माझा पास.
पण मला काही इन्ट्रोव्हर्टस स्वतःचे इन्ट्रोव्हर्ट असणे फ्लाँट करतात ते फार खटकते. दुसरे असे की काही जण तर बोलक्या लोकांकडे किती बोलते ही/हा म्हणून तुच्छ कटाक्ष टाकतात.
लहान मुले सततच्या बदलत्या जागांमुळे,बदलत्या शालांमुळे इन्ट्रोव्हर्ट होताना मी पाहिलेली आहेत. काही जणांना शाळेत बुलींग झालेले असते. त्यामुळे लहान मुले इन्ट्रोव्हर्ट झाली तर त्यांना विश्वासात घेउन चर्चा केली पाहिजे.
काही मोठी माणसे मुळात इन्ट्रोव्हर्ट नसतात, त्यांना कंपनी ,शहर बदल्यावर पुरेसे अटेंशन नाही मिळाले की इन्ट्रोव्हर्ट होतात. शाळेत शिक्षाकांच्या लाडक्या ,बडबड्या असणर्‍या मैत्रिणी मोठया कॉलेजात शिकायला गेल्यावर भांबावुन गप्प झालेल्या मी बघितल्या आहेत.
ऑफशोअरला हिरो असलेले लोक ऑनसाइटला कसे गप्प होतात ते सगळ्यांनीच बघितले असेल.

>>>>पण मला काही इन्ट्रोव्हर्टस स्वतःचे इन्ट्रोव्हर्ट असणे फ्लाँट करतात ते फार खटकते. दुसरे असे की काही जण तर बोलक्या लोकांकडे किती बोलते ही/हा म्हणून तुच्छ कटाक्ष टाकतात.>>>> अचूक नीरीक्षण.
>>>>ऑफशोअरला हिरो असलेले लोक ऑनसाइटला कसे गप्प होतात ते सगळ्यांनीच बघितले असेल.>>>> Happy