चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल ई. जुन्या गोष्टी पुन्हा का प्रसिद्ध होत आहेत ?

Submitted by केशव तुलसी on 24 June, 2020 - 07:55

चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल वगैरे गोष्टी पुन्हा एकदा लोकांना आवडू लागल्या आहेत.जुन्या गोष्टींना प्रसिद्ध होताना पाहून काहींना ,खासकरुन जुन्या लोकांना आनंद होत आहे. परंतु यापाठीमागे काय मानसशास्त्र आहे? जुनं ते सोनं हा विचार आहे की लोकांना खरंच आपली जुनी खाद्य संस्कृती ,जीवनपद्धती जपायची आहे ,पुन्हा वर आणायची आहे.मला तरी यात फारसे नाविन्य दिसत नाही.आपले मत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव, मला माहीती नाही की या डॉक्युमेंटरी कडून तुझ्या काय अपेक्षा होत्या. पण ही सर्वसामान्य प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव व्हावी म्हणून बनवलेली डॉक्युमेंटरी आहे जी पर्यावरण दिनी रिलीज केली. तपशीलातल्या चुकांची शहानिशा करायला मलाही अधिक वाचायला लागेल.
माझ्या मते ग्रीन एनर्जी ही कशी ग्रीन नाही आणि कदाचित काही वेळा पारंपरिक उर्जा स्रोतापेक्षा पर्यावरणासाठी अधिक घातक ठरू शकते याची जाणीव करून देणे हा या डॉक्युमेंटरी चा मुख्य उद्देश असावा आणि तो बऱ्यापैकी साध्य झालेला आहे.
जलउर्जा ही खरी ग्रीन उर्जा आहे. अर्थात त्यासाठी तुम्ही शक्य तितक्या नैसर्गिक पद्धतीने तिचा वापर केला पाहिजे. मोठ्या धरणांचे दीर्घकालीन तोटे भरपूर आहेत आणि तशाप्रकारे जर जलविद्युत प्रकल्प चालवले जाणार असतील तर ते घातकच ठरतील.
लोकसंख्या कमी करणे हा एक उपाय आहेच पण जे बाकीचे उपाय आहेत तेही अवघडच असणार आहेत. To come to terms with the reality is the main thing. हाच खरा "अवेअरनेस" आहे. मला या साऱ्याची माहिती आहे या नोटवर अवेअरनेस संपत नाही तर तो सुरू होतो. आपण एका अशाश्वत विकासाच्या मॉडेलमध्ये जगतो आहोत. त्यातून बाहेर पडून एका शाश्वत विकासाचे मॉडेल आपल्याला तयार करायचे आहे. अशावेळी काही uncomfortable lifestyle changes आपल्याला सर्वांना अंगिकारावे लागतील.
कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे (5 why's approach) आणि मग आपले trade offs निश्चित करणे यापासून सुरूवात करता येईल.
It is never easy to give up comforts but if you are convinced that you will benefit from it then you can probably follow it through. हा मानसिकतेतला बदल बहुसंख्य लोकांना पटवून देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. एकदा आपण त्या जाणीवेने जगायला लागलो की बाकीचे बदल घडवणं तुलनेने सोपे जाईल.

लहानपणी भाजे - कार्ले सहल घरून गेलेलो. तेव्हा वाटेत गुळाचा ( कोरा) चहा प्यावा लागला होता. इकडे असेच पितात असे तो टपरीवाला म्हणाला.
पण आम्हाला थंडीत सकाळी गरम गोड पाणी म्हणून आवडला. चहा नाही.

मानवाने निसर्गात ढवळाढवळ करून निसर्गाचे आणि स्वतः:चे अपरिमित नुकसान करून ठेवले आहे हे म्हणणे एका मर्यादेपर्यंतच खरे आहे. एक तर मानव हा निसर्गापासून वेगळा नाही. दुसरे म्हणजे मानवाव्यतिरिक्त उर्वरित निसर्गाकडूनही निसर्गाची हानी होत असते. साधी पानांची सळसळ झाली तरी ऊर्जा वापरली जाते किंवा transfer होते. कडे कोसळतात, नद्या आपले स्वतः:चे तट ओरबाडतात, त्यांच्या गाळामुळे खाड्या ओहरतात, बंदरे निकामी होतात, एक पूर्ण संस्कृती लयास जाते किंवा उदयास येते. Entropy of the world is increasing, irreversably. पण मानव जात ही अतिशय चिवट आहे tenacious आहे. बिकट आणि प्रतिकूल काळातही तगून राहते. इतकेच नव्हे तर सभोवतालानुसार स्वतः:मध्ये म्हणजे होमो सेपिअन्स ह्याच प्रजातीमध्ये किरकोळ बदल करीत राहून स्वतः:ची अमाप वंशवृद्धीदेखील करते. मैलोन मैल वाळवंट, प्रखर हिवाळा, एक मैल उंचीवर वास्तव्य अशा खडतर सभोवतालाशी मिळतेजुळते घेत स्वतः:ची आणि संस्कृतीची वाटचाल सुरू ठेवते. मानवाने स्वतः:ची वाढ एक्सपोनेन्शिअल ठेवूनही मालथूझिअन थिअरीला खोटे पाडीत अन्नाचीही ग्रोथ लिनीअर न होऊ देऊन एक्सपोनेनशिअल केली आहे. वितरण व्यवस्था आणि सुस्थित शासनव्यवस्था ह्या सध्याच्या तातडीच्या गरजा आहेत त्याकडे अधिक लक्ष दिल्यास डूम्स डे दूर दूर जात राहील.
हे वरचे लिखाण फार बाळबोध वाटेल कदाचित पण डूम्स डे ची फार चिंता करण्यात अर्थ नाही

मानवाने स्वतः:ची वाढ एक्सपोनेन्शिअल ठेवूनही मालथूझिअन थिअरीला खोटे पाडीत अन्नाचीही ग्रोथ लिनीअर न होऊ देऊन एक्सपोनेनशिअल केली आहे. >> ही फार आत्ता आत्ता घडलेली गोष्ट आहे. गेल्या शेदोनशे वर्षांतली. त्याआधी मानवाची प्रगती बरीचशी तुम्ही म्हणता तशी निसर्गाशी जुळवून घेत झाली. मात्र आता जो जीवविविधतेचा विनाश चालू आहे त्याला sixth mass extinction असे नाव दिले आहे. गेल्या पाच mass extinctions मध्ये नेहमी apex species लयाला गेल्या उदाहरणार्थ डायनॉसोर. सध्या आपण म्हणजे मानव apex species आहोत. या mass extinction ला चालना देणे म्हणजे स्वजातीचा विनाश ओढवून घेणे असणार आहे. सुदैवाने मानवाला चांगल्या बुद्धिमत्तेचे वरदान आहे त्यामुळे आपल्यावरील संकटाची जाणीव आपल्याला झाली आहे. त्यातून वाचून अधिक काळ पृथ्वीवर जगायचे की स्वतःचा सर्वनाश करून घ्यायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.
ऋणं कृत्वा घृतं पिबेत या चार्वाकाच्या तत्वज्ञानाने जगणार असू तर प्रश्नच मिटला!

ऊर्जा उत्पन्न करायची आणि तिचा वापर करायचा तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यावरण हानी तर होणारच.
ऊर्जेचे विविध मार्ग विविध प्रकारे पर्यावरणाची हानी करतात.
गंधक किंवा धातूचे कण हवेत सोडले जातात.
Co2 हवेत सोडला जातो.
आणि बाकी पण हवेच्या प्रदूषणाचे प्रकार असतील पण मला त्या बद्द्ल माहीत नाही.
प्रत्येकाचे पर्यावरण ला हानी pochavnyachi पद्धत वेगळी आहे.
कार्बन डाय ऑक्साईड ग्रीन गॅस इफेक्ट निर्माण करून वातावरणाचे तापमान वाढवण्याचे काम करतो आणि त्याचाच परिणाम म्हणून समुद्राची पाण्याची पातळी वाढू शकते,ऋतू चक्र बदलू शकतो.
धातूचे कण,विषारी वायू ह्या मुळे माणसाच्या शरीरावर (सर्वच सजीव आणि वनस्पती) वाईट परिणाम होतो.
कीटक नाशक,रासायनिक खते,विविध रासायनिक कारखाने,गाड्या हे सर्व ह्याला जबाबदार आहेत.
थोडक्यात वातावरणाची हानी विविध प्रकारे होते.
मग हे थांबवायचे कसे.
तर ऊर्जा निर्माण करण्याचे पर्याय शोधून कमीत कमी हानी होईल तो पर्याय निवडणे.
कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायू चे विघटन करून हानिकारक घटक वेगळे करून त्याची विल्हेवाट लावणे( पण अस करणे शक्य आहे का)
ऊर्जेचा वापर कमी करणे .
असे विविध मार्ग अवलंबावा लागेल.
परत भौतिक प्रगती ची गती पण राखावी लागेल
रोजगार हा पण प्रश्न आहेच.
एक प्रश्न सोडवायला गेलो की दुसरा प्रश्नांनी गंभीर रूप घेवू नये.
एकंदरीत खूप आव्हांत्मक काम आहे.

पण होमो सेपियन्सनी इतक्या कोत्या आणि स्वार्थबुद्धीचे का व्हावे? आम्हांला प्रदीर्घकाळ आमचा वंश जसाच्या तसा टिकवायचा आहे आणि आम्ही म्हणू त्याच अवकाशात, आम्हांला आवडेल त्याच परिसंस्थेत, फक्त मामुली बदल होऊ देऊन, जवळपास status quo मध्ये राहायचे आहे. आम्हांला बदल नको आहे कारण बदलांशी सामना करणे कठीण असते. आमच्यामध्ये इनर्शिया आहे, आणि आम्हांला पुढे जाताना friction ची भीती वाटते. पण निसर्ग (म्हणजे पुन्हा थोडेसे आम्हीच) आम्हांला पुढे ढकलणारच आहे. आणि 'जैसे थे' हेसुद्धा सापेक्ष असते. आपल्याला हिरवेगार रान, त्यात वसलेली 'छान छान', स्वयंपूर्ण, रॅट रेस विहीन गावे आवडतात. पण तीच गावे सोडून मन:शांती किंवा तपश्चर्येसाठी लोक हिमालयात जात असत, जातात.(आजकाल अर्थात एव्हरेस्टवरील कचरा त्यांना हिमालयात येण्यापासून परावृत्त करून गावातच मन:शांती मिळवण्यास उद्युक्त करीत असेल!)
निसर्ग हा चर आणि अचर अशा वस्तुमात्राचा मिळून बनलेला आहे. त्यातल्या अचर वस्तुमात्रात प्रचंड ऊर्जा, पोटेनशिअल एनर्जी असते आणि ती चरसृष्टीला आपल्या तालावर नाचवते. चरसृष्टीला तिच्याशी जुळवून घ्यावे लागते. तिच्या कलानेच चालावे लागते. होमो सेपियन्स कोण मोठे ग्रेट लागून गेलेत बदल नाकारणारे!
अर्थात हा खूपच। दूरचा विचार आहे. आजच्या घडीला 'जीवनात ही घडी अशीच राहू दे', त्यातच कल्याण आहे असा प्रामाणिकपणे विचार करणारे मानवहितचिंतक आहेत आणि असणारच. कारण दीर्घकालीन योजना आणि तात्कालिक योजना असे प्लॅनिंग हवेच. प्रदीर्घकाळाचा विचार आपण करीतच नाही, करू शकत नाही. मानवाला बुद्धी ही अतिरिक्त देणगी मिळाल्यामुळे तो उपद्व्यापरूपी कल्याण करीत राहणारच. मॉस्को नदीवर प्रचंड धरण बांधून कॅस्पियन मधले तिचे जलप्रदान कमी करून कॅस्पियन आटवत आणि खारट करत राहणार, सिंहस्थकाळात शेतीचा हंगाम नसतानाही गोदावरीत पाणी सोडीत राहणार, कच्छ आणि थर वाळवंटात 'सुखाचे चार दिवस त्यांनाही दिसू देत' म्हणून नर्मदा आणि सतलजचे पाणी सोडून वाळवंटात नंदनवन फुलवणार, पारंपरिक परिसंस्था हद्दपार करणार, सिंध आणि अंकलेश्वरला सिंधू आणि नर्मदा कोरडी पाडणार. हे लघु टप्प्याचे नियोजन आपण दीर्घकालीन मानून भविष्यकाळाचा वेध घेतल्याच्या नशेत राहणार! पण ते त्या त्या क्षणाला आवश्यक होते असणार कदाचित.
हे सगळे उलटसुलट विचारप्रवाह आणि घटनाप्रवाह पाहिल्यास, आजचा,आत्ताचा आणि नजीकच्या भविष्याचा विचार करून तेव्हढेच नियोजन करणे कदाचित योग्य ठरेल.
नाहीतरी "गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिंतयेत, वर्तमानेन कालेन बुधो लोके प्रवर्तते" असे जुने लोक सांगून गेले आहेतच.

भरत आणि हर्पेन या दोघांनी प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे माझे, अमितचे आणि सीमाचे उर्जा वापर या अनुषंगाने आलेले या धाग्यावरचे प्रतिसाद दुसऱ्या धाग्यावर (https://www.maayboli.com/node/75251) कॉपीपेस्ट केले आहेत. जर काही हरकत असेल तर नक्की सांगा.

आपण आपल्या चार चाकी / दुचाकी या प्रदुषणमुक्त राहाव्यात म्हणून त्यांचे दर ५००० / १०००० / /१५००० किमी ला सर्विसिंग करतो. वॉरंटीत असतील तर इतके किमी झाले नाही तरीही दर तीन / सहा महिन्यांनी कुपनवर मुदत असेल त्यानुसार हे सर्विसिंग केले जाते. ऑईल चेंज कंपल्सरी - ८०० ते ९०० रुपये लिटरचे आपल्याला बिलात लावले जाते. हे केले नाही तर वॉरंटी कॅन्सल अशी एक लेखी धमकीच ओनर्स मॅन्यूअल नामक वाहन धर्मग्रंथात असते.

इंजिन, ट्रान्स्मीशन, स्टीअरिंग, ब्रेक या सगळ्यांतून बदललेल्या जुन्या ऑईलचे काय होते हे माहिती आहे का? हे जुने ऑईल वेगवेगळ्या गॅरेजेसमधून २० ते २५ रुपये लीटर्सने विकत घेणारे अनेक लोक या उद्योगात आहेत. हे ऑईल अनेक बेकर्‍या व भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते तसेच इंडस्ट्रीयल फरनेस मध्येही त्याचे ज्वलन होते. हे वायूप्रदुषण किती गंभीर असू शकेल?

अरे काय रे....
बदलत्या खाद्य सवयी/ खाद्य नॉस्टॅल्जिआ / वगैरे विषयाचा धागा ऊर्जा वापर, ग्रीन एनर्जी, करत कुठल्या कुठे गेलाय....

Pages