चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल ई. जुन्या गोष्टी पुन्हा का प्रसिद्ध होत आहेत ?

Submitted by केशव तुलसी on 24 June, 2020 - 07:55

चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल वगैरे गोष्टी पुन्हा एकदा लोकांना आवडू लागल्या आहेत.जुन्या गोष्टींना प्रसिद्ध होताना पाहून काहींना ,खासकरुन जुन्या लोकांना आनंद होत आहे. परंतु यापाठीमागे काय मानसशास्त्र आहे? जुनं ते सोनं हा विचार आहे की लोकांना खरंच आपली जुनी खाद्य संस्कृती ,जीवनपद्धती जपायची आहे ,पुन्हा वर आणायची आहे.मला तरी यात फारसे नाविन्य दिसत नाही.आपले मत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
चूल पेटवण्याच्या एकंदर त्रासामुळे पूर्वीच्या काळी आपोआपच इंटरमिटन्ट फास्टिंग,फायरलेस कुकिंग आणि पोर्शन कंट्रोल होत असावा.

लोल्ज Lol

१) घाणीवरचं शेंगदाणा तेल.
शेंगाच्या पोत्यातून हवे तेवढेच शेंगदाणे फोडून घेऊन मग लाकडी घाणीवर तेल काढले की त्यास एक वेगळाच ताजेपणा आणि चव असते. किंवा रोज तीन चार तास घाणी चालते तिथेही नवे शेंगदाणे वापरत असतील तर. हे तेल कच्चेच चटणीवर, भाजीवर खायला छान. पण दुकानातले शेंगदाणे जून असतात. अर्थात हे तेल फार टिकत नाही, लवकर खवट होते.
२) दगडी जात्यावर आणि घरघंटी ( मिल) वर दळलेल्या पिठात फरक म्हणजे जात्यातले पीठ फार तापत नाही. त्यामुळे पोषक तत्वे टिकत असावीत.

स्वाती२+१

जे लोक चुलीवर स्वतः अन्न शिजवणार आहेत त्यांनी त्याचं कवतिक करावं.
आपण स्वतः व्यवस्थित प्रगत व्हायचं पण आपला नोस्टा ल्जिया कुरवाळता यावा म्हणून इतर कोणी मात्र मागेच राहावं यातला प्रकार वाटतो.

शहरांत सगळ्या प्रकारच्या अ त्या धुनिक सुखसोयी भोगणार्‍यांनी आणि त्याशिवाय पाउलही न टाकू शकणार्‍यांनी गावं त्यांचं गावपण हरवताहेत म्हणून हळहळणं हे ढोंग वाटतं.

कमीत कमी प्रक्रिया केले अन्न हे उत्तम सत्व राखून असते त्या मुळे ते आरोग्यास चांगलेच असते ह्या मध्ये काही चूक नाही.
घाण्या च्या तेलावर जास्त प्रक्रिया होत नाही रस्यानिक प्रक्रिया तर बिलकुल होत नाही
सर्व बाबतीत हाच basik विचार आहे.

भरत व स्वाती +1
मला स्वतःला आवडणार नाही करून पहायला, दुसर्याला त्रास झाला तर पटणार नाही. ज्यांनी त्यांनी आपली सोय पहावी.
खूप दूर खास खाण्यासाठी जाणे ऐवढे काही चवीला महत्त्व देत नाही मी तरी. उलट खेड्यातल्या स्त्रियांना स्वयंपाकाला कमीत कमी वेळ व कमीत कमी कष्ट लागले पाहिजे असे वाटते. मला स्वतःला तासनतास कुटून/वाटून केलेली चटणी कशी मिक्सरपेक्षा चविष्ट लागते असे कुणी सतत म्हणताना पाहिले की डोक्यात तिडीक जाते. एवढं काय चवीचे असं म्हणावे वाटते पण गप्प बसते. Happy !

बी ,बियाण्या मध्ये संपूर्ण परिवर्तन झालेलं आहे.
तेल बिया असणाऱ्या शेंगदाणा पासून मोहरी पर्यंत सर्व जाती आता हायब्रीड स्वरूपात आहेत .
पारंपरिक बियाणे आणि जाती हरित क्रांतीच्या नावाखाली नष्ट केल्या गेल्या.
त्या मुळे अन्न मध्ये पोष्टिक घटक नाहीतच .
फक्त quantity वाढली पण quality purn नष्ट झालंI.. ह्याचे drush परिणाम दिसू लागले आहेत.
कमी वयात मधुमेह,वाढलेला रक्तदाब,केस पिकने,असे असंख्य रोग चालू होतात.
ह्या ला जीवनशैली आणि अन्न ची गुणवत्ता ही दोन्ही करणे जबाबदार आहेत.
ह्याची जाणीव झाल्या मुळे च आहार बदलला जात आहे .
पारंपरिक बियाणे परत मिळू शकत नाही म्हणून शिजवणे, भाजणे,ह्या मध्ये बदल केला जात आहे.
हे काही फॅड नाही.

चुलीवरचा स्वयंपाक कोणी घरात चूल लावून करत असेल असं वाटत नाही. महाराष्ट्रात highway लगतच्या हॉटेल मध्ये फक्त हा प्रकार दिसतो. विकणारे विकत आहेत आणि ज्यांना आवडतं ते जाऊन खातात.त्यात इतकं काय! काहीतरी वेगळेपणा -चुलीवर - हा त्यांचा selling point ह्या पलिकडे काही फार महत्त्व असेल असं वाटत नाही.

बाकी खलबत्ता, पाटा-वरवंटा नव्या संसारात असतील असं वाटत नाही. कोणी व्यक्तिगत चॉईस म्हणून घरात पिठाची चक्की वापरत असेल तर कोणी रेडिमेड पीठ. दक्षिण भारतात आल्यापासून मला wet grinder विकत घेण्याची खूप इच्छा आहे. आठवड्या-पंधरवड्यात एकदा इडली/डोसा होतो त्यासाठी गरजेचे वाटत नाही. stone-grind डोसा पीठ आणि मिक्सर वर केलेलं चवीत खरंच खूप फरक पडतो. मी stone grind विकणाऱ्या कडून विकत घेते.

https://www.youtube.com/watch?v=cS5MIlRIPF4
चुलीवरच्या जेव णाच्या चवीची आठव ण काढून हळहळणे , आपली संस्कृती नामशेष होत चालली म्हणून अश्रू ढाळणे हे प्रकार हल्ली जास्त बघायला मिळतात.

शहरांत सगळ्या प्रकारच्या अ त्या धुनिक सुखसोयी भोगणार्‍यांनी आणि त्याशिवाय पाउलही न टाकू शकणार्‍यांनी गावं त्यांचं गावपण हरवताहेत म्हणून हळहळणं हे ढोंग वाटतं.>> हे ढोंग नसत. एकटेपणा घालवण्यासाठी स्मरणरंजन हा मेंदुने शोधलेला उपाय आहे. यावर स्मरणरंजन असे एक प्रकरण मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकात आहे. त्यात शास्त्रीय माहिती आहे.

चुलीवरचं जेवण हा प्रकार barbeque nation मुळे जास्त फेमस झाला असावा. 15-20 वर्षे तरी झाली असतील सयाजी ग्रुप नी ही चेन सुरू केली. आता फक्त हायवे साईड चुलींमुळे साध्या गरीब शेतकऱ्याला पण रोजगार मिळत असावा. त्याने कुंभाराकडून चुली install करून घेतल्या तर त्याला रोजगार. त्याने जंगलात राहणाऱ्या आणि लाकूडफाटा गोळा करणाऱ्या लोकांकडून लाकूड विकत घेतली तर त्यांना रोजगार. सयाजी हॉटेल मध्ये जायचे तर पाकीट जड हवे, शेतकरी जे रोडसाईड ला विकतो, ते कोणताही सामान्य माणूस विकत घेऊन आनंद घेऊ शकतो.

मध्यम वर्गाचे माहीत नाही पण उच्च वर्गातील लोक ज्वारी ,नाचणी भाकरी,
चक्की चा aata.
विविध डाळी,भाज्या ,हे ऑरगॅनिक च वापरतात ज्या मध्ये देशी वान आणि कोणतेच रासायनिक खत न वापरलेली ह्या गोष्टी ल प्राधान्य असते.
दूध हे देशी गाई चे .
आणि तेल सुधा घानी चेच.
मध्यम वर्ग जरा वेगळ्या विचाराचा असल्या मुळे .
गरीब आणि श्रीमंत ह्या दोघां पेक्षा वेगळाच वागतो.
आधुनिक तेच्या व्याखे मध्येच त्यांच्या गडबड आहे.

गरीब लोकांना हे ऑरगॅनिक फॅड परवडतच नाही. असलं काही वाचणं हेसुद्धा त्यांच्या जीवनक्रमात येत नाही. रोजच्या जीवनसंघर्षाच्या भरीला आणखी कशासाठी संघर्ष किंवा आटापिटा करणे त्यांना शक्यच नसते. यंत्रउत्पादित कृत्रिम धाग्याची स्वस्त वस्त्रे त्यांना परवडतात. ते हातमागाच्या सुती वस्त्रांकडे वळत नाहीत. मास प्रॉडक्शनचा माल स्वस्त पडतो आणि कस्टमाईझचा महाग.
हाय वेच्या बाजूला चुली पेटू शकतात पण आज मुंबईत फायर हॅझार्डच्या धोक्यामुळे उघड्या जागेत विस्तव पेटवण्यावर निर्बंध आहेत. ते मोडले जातात ही गोष्ट वेगळी. आज दाटीवाटीच्या वस्त्यांत कोणी चुल्हाण लावून पाणी तापवू शकत नाही. लाकूडफाटा साठवायला जागा नाही. रानावनात सरपण गोळा करणारे आदिवासी वा तत्सम लोक मोठया बाजारपेठेपर्यंत स्वतः पोचू शकत नाहीत. मग नेहमीसारखी सप्लाय चेन उभी राहील. सर्वात तळाच्या दुव्याचे शोषण होत राहील. इललीगल फेलिंग सुरू होईल. इत्यादि.

कोरोनाच्या भीतीने लोकं न्हाव्याकडे जायला घाबरत आहेत. आता त्यांचे केस आदिमानवासारखे वाढून आपण पुन्हा अशमयुगीन माणसासारखे दिसू लागणार आहोत.

बाकी सर्व मुद्धे बाजूला ठेवून फक्त चूल च का सर्वांनी कवटाळून ठेवली आहे.
खेडेगाव आता खूप बदलली आहेत साधी घर जावून पक्की घर आली आहेत.
पक्के रस्ते आहेत.
गॅस,टीव्ही, मिक्सर,फ्रीज हे कॉमन झालेले आहे.
काही प्रमाणात एसी आहेत .
दोन चाकी गाडी कॉमन आहे.
शहरी लोकांपेक्षा गावातील लोकांचा दर्जा नक्कीच उच्च आहे.
भरपूर मोकळी जागा,सर्व सुविधांनी युक्त घर.
स्वच्छ वातावरण.

कपडे, हेअर स्टाईल, इत्यादी बाबतीत रोज नवनवीन प्रयोग, फॅशन, फॅड येतच असतात मग जीभेच्या चवीसारखया आत्मनिषठ गोष्टीबाबत आलीच कधी अशी नवीन फॅशन तर काय विशेष आहे ! जोपर्यंत त्यात स्वत:ला घातक किंवा इतराना त्रासदायक कांहीं नाही , तोपर्यंत स्वागतच होणं उचित अशा प्रयोगाचं. कुणाला सोय महत्वाची वाटते तर कुणा खवय्याला चव . जे जो वांछिल ... !
आंणि हो, केसांचा गोटा ते केस बेसुमार वाढवणे अशी फॅडस अधूनमधून येतच असतात पण म्हणून कुणी परंपरा जपण्याचा अट्टाहास किंवा अशमयुगाकडे वाटचाल असे मुद्दे त्या संदर्भात थोडेच उपस्थित करतं !!

थोडंस फॅड आणि वाढता (हेल्थ) अवेअरनेस ही दोनही कारणं असतील घाण्याचं तेल आणि गुळाचा चहा परत या पिढीत चालू होण्याची. चूल म्हणजे फक्त वेगळेपणाची मजा आणि काही जणांसाठी नॉस्टॅल्जिया.

>>चुलीवरचा स्वयंपाक कोणी घरात चूल लावून करत असेल असं वाटत नाही. महाराष्ट्रात highway लगतच्या हॉटेल मध्ये फक्त हा प्रकार दिसतो. विकणारे विकत आहेत आणि ज्यांना आवडतं ते जाऊन खातात.त्यात इतकं काय! काहीतरी वेगळेपणा -चुलीवर - हा त्यांचा selling point ह्या पलिकडे काही फार महत्त्व असेल असं वाटत नाही.>>

आजही भारतात मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण खेड्यापड्यात, तसेच शहरातील गरीब वस्त्यांतून बरेच आहे. भारतात हेल्थ हजार्ड अंतर्गत घरातली प्रदुषित हवा हे तिसर्‍या क्रमांकावर आहे. बरेचदा गॅस असला तरी किंमत परवडत नाही म्हणून बराचसा स्वयंपाक चुलीवर आणि चहा वगैरेसाठी गॅस असेही चालते. चूल पेटवायला चांगला लाकूड फाटा, गोवर्‍या ही देखील चैन असते . जे मिळेल ते सरपण म्हणून वापरले जाते तेव्हा प्रदुषकांचे प्रमाण अधिकच वाढते. साधारण २५% प्रदुषणामुळे होणारे मृत्यू हे चुलीवरच्या स्वयंपाकाशी निगडीत आहेत. बरेचदा तान्ह्या बाळाला सांभाळत हा स्वयंपाक चालतो त्यामुळे आईसोबत घरातली लहान मुलेही या प्रदुषकांना रोज सामोरी जात असतात.
महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी गच्चीत्/डेकवर बार्बेक्यू ही हौस झाली. घरात चुलीवर रोज करावा लागणारा स्वयंपाक हा नाईलाज असतो. रोज घुसमटत जगणे असते.
बाकी हायवे लगतचे धाबे, शहरातील रेस्टॉरंट्सना खरेच काय परवाने असतात आणि किती गोष्टी ते नियम मोडून करतात कुणास ठाऊक. बरेचदा मोठी दुर्घटना झाल्यावर बरेच काही नियमबाह्य सुरु होते असे बाहेर येते, थोडावेळ चर्चा रंगतात, कारवाई होते आणि पुन्हा विसर पडला की जैसे थे सुरु होते.

गरजेनुसार स्टीलचा आणि दगडी खलबत्ता मी वापरते, कारण काहीवेळा मसाल्याचा , वाटणाचा स्वाद आणि पोत हा मिक्सरमधे हवा तसा जमून येत नाही.
घाण्यावरचे तेल कोल्ड प्रेस्ड असल्याने चांगले. इथे क्लोल्ड प्रेस्ड तेल उपलब्ध असते आणि किंमत परवडते तेव्हा मी घेते.
बंबात पाणी तापवणे हे प्रकरण ५ वीला शाळा सकाळच्या सत्रात असल्याने थांबले. मात्र त्याकाळी देखील तांब्याचा मोठा बंब, त्यात घालायला सालपा, कोळश्याची पोती हे सगळे मध्यम आणि त्या वरच्या आर्थिक स्तरात असे. गरीब घरांतून थंडीतही अंघोळीसाठी जेमतेम कोमट पाणी असे.

... अशी मंडळी दिसली कोणाला तर त्यांना नक्की उज्जवला ह्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती द्या. माझ्या बघण्यात तरी कोणी अशी मंडळी नाहीत.

Pages