प्रेमगंध

Submitted by प्रितु_१४ on 25 June, 2020 - 15:41

ही माझी पहिलीच कविता आहे. काही दुरुस्ती असल्यास नक्की सांगावे

प्रेमगंध
प्रितु_१४

तारुण्यातील पहिला पाऊस
मन माझे झुलवत होता
जेव्हा स्वप्नातील राजकुमार
जवळ मला बोलवत होता

धडधड माझ्या हृदयाची
स्पष्ट जाणवत होती
नजर त्याची मला
प्रेमाने खुणावत होती

अवचित माझे पाऊल
त्याच्या वाटेवर पडले
अचंबित होते मी की
नकळत सारे घडले

समरस झालो दोघे
तोडून सारे बंध
श्वासात भरूनी राहिला
पहिल्या पावसातील प्रेमगंध

Group content visibility: 
Use group defaults

खुप छान. अजून लहान आहेस पोरी. तरी एवढी छान केली आहेस. चौदा वर्षांच्या वयात मी शाळेतल्या निबंधात चारोळ्या लिहीत होतो. मला मोजक्या शब्दात भाव मांडणारे कवी लोकं आवडतात... नव्हे कधी कधी हेवा पण वाटतो. म्हणून मी ही अशाच प्रकारच्या कविता, गझल लिहीण्याचा प्रयत्न करतोय !! मायबोली परिवारात स्वागत आणि शुभेच्छा !!

धन्यवाद प्रगल्भ
धन्यवाद सामो
१४ ही माझी जन्म तारीख आहे

सामो ताई,
नसलंं तर नसु दे की
असलं तर असु दे की
-पाडगावकर टाईप जरा :)) :))
(जोक होता, लॅपटॉप वरून ईमोजी घालता येत नाहीत का?)
सिरीयसली नका घेऊ प्लीज हा हा हा