ही माझी पहिलीच कविता आहे.

प्रेमगंध

Submitted by प्रितु_१४ on 25 June, 2020 - 15:41

ही माझी पहिलीच कविता आहे. काही दुरुस्ती असल्यास नक्की सांगावे

प्रेमगंध
प्रितु_१४

तारुण्यातील पहिला पाऊस
मन माझे झुलवत होता
जेव्हा स्वप्नातील राजकुमार
जवळ मला बोलवत होता

धडधड माझ्या हृदयाची
स्पष्ट जाणवत होती
नजर त्याची मला
प्रेमाने खुणावत होती

अवचित माझे पाऊल
त्याच्या वाटेवर पडले
अचंबित होते मी की
नकळत सारे घडले

समरस झालो दोघे
तोडून सारे बंध
श्वासात भरूनी राहिला
पहिल्या पावसातील प्रेमगंध

Subscribe to RSS - ही माझी पहिलीच कविता आहे.