चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल ई. जुन्या गोष्टी पुन्हा का प्रसिद्ध होत आहेत ?

Submitted by केशव तुलसी on 24 June, 2020 - 07:55

चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल वगैरे गोष्टी पुन्हा एकदा लोकांना आवडू लागल्या आहेत.जुन्या गोष्टींना प्रसिद्ध होताना पाहून काहींना ,खासकरुन जुन्या लोकांना आनंद होत आहे. परंतु यापाठीमागे काय मानसशास्त्र आहे? जुनं ते सोनं हा विचार आहे की लोकांना खरंच आपली जुनी खाद्य संस्कृती ,जीवनपद्धती जपायची आहे ,पुन्हा वर आणायची आहे.मला तरी यात फारसे नाविन्य दिसत नाही.आपले मत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे सगळे प्रकार नव्या बदलांचा स्विकार करुन जुन्या गोष्टी जपण्याची केविलवाणी निष्फळ धडपड वाटते.. आता चुलीवर जेवण केले /जुन्या पद्धतीत नव्या पद्धतींची सांगड घातली तरी एंड रिझल्ट 'जुन्या खाद्यसंस्कृतीच्या जवळ' जाणारा असतो. तिच जूनी चव आजच्याकाळात मिळण अशक्यप्राय.
कारण, आपण लोकांनी उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी केलेला रासायनिक खतांचा भडीमार.

Lifestyle diseses काही प्रमाणात हे सगळं केल्यामुळे कमी व्हायला मदत होते.
Alkaline water purifier असाच आहे. इथे आम्हाला पाण्याचा source माहीत नसतो त्यामुळे वाईटबरोबर चांगल्या गोष्टी पण पाण्यातून जातात. जिथे नदीचं पाणी हा confirmed water source असतो तिथे गरज नसते.

जे कमी पिकते त्याला बाजारात जास्त मागणी ! उद्या गलोगल्ली तेलाचे घाणे आणि चुलीवरचे जेवण मिळू लागेल तेव्हा क्या आपके टूथपेस्ट में नमक है करत नवीन मार्केटिंग फंडे येतील.
बुद्धिला पटेल अन् खिशाला रुचेल ते प्रत्यकेजण स्विकारेल की.

जे सोयीचे असेल तेच लोक स्वीकारतील. गुळाचा चहा करायला सोपा. तो लोकप्रिय होऊ शकेल पण घाण्याचे तेल आणि चुलीवरचे जेवण हे सोयीचे उरलेले नाही. कुठल्यातरी रिसॉर्ट/ कृषिपर्यटनामध्ये मिळते म्हणजे ते किफायतशीर पध्दतीने सर्वत्र मिळू शकेल किंवा वापरता येईल असे नाही. जे सोपे, सोयीचे,स्वस्त, सुलभ असेल तेच टिकेल.

नॉस्टॅल्जियाही असेल. मी लहानपणी बंबामधे तापवलेल्या पाण्याने आंघोळ केली आहे. अजूनही असे वाटते की ते पाणी कोणत्याही इलेक्ट्रिक साधनाने गरम केलेल्या पाण्यापेक्षा भारी असायचे. अनेकदा अगदी थंड अवस्थेत घरातून मागच्या अंगणात तो बंब नेउन, त्यात बंबफोड टाकून हळुहळू तो वॉर्म होत जाणे व नंतर कडकडीत पाणी तापणे वगैरे सगळे पाहिलेले आहे कारण ते काम माझ्याकडे असायचे. गरम पाण्याबरोबर त्या सगळ्या आठवणींचा नॉस्टॅल्जियाही आहे.

नॉस्टॅल्जिया आणि वेगळं करण्याची हौस, सोमिवर फोटो टाकायची, टुकार व्हिड्यु टाकायची सोय. परत संस्कृती जतन केल्याचा वर्ख वेगळा!
कधीतरी गंमत म्हणुन अशा ठिकाणी जायला छान वाटेल. घरात चुल आणि गुळाचा चहा मात्र जन्मात करणार नाही. कोल्ड प्रेस्ड ऑऑ कॉस्ट्कोने ठेवलं की परवडेल तसं वापरतो.
वेगळं काही केलं की बातमी होऊन लोकं येतील आणि धंदा वाढेल हे साधं कारण! बाकी काही नाही.

मागचा वर्षी पण पंढरपूर ला गेलो होतोत ता वेळेस रागे मध्ये असताना एक हॉटेल दिसल होत तेकडे एक आजी चुलीवर खूप मस्त भाकरी करत होती आणि पिठाल ही पोस्ट वाचून तेच डोळा समोर आले.

चूल पेटवण्याच्या एकंदर त्रासामुळे पूर्वीच्या काळी आपोआपच इंटरमिटन्ट फास्टिंग,फायरलेस कुकिंग आणि पोर्शन कंट्रोल होत असावा.

रिफाईंड तेलापेक्षा घाण्यावरचे तेल चांगले आहे असा माझा अनुभव आहे आणि गुळाचं म्हणाल तर मला तो साखरे साठी उत्तम पर्याय वाटतो.

करत असावा पण असा ही आहे की पूर्ण चा बायका बाहेरची कामे नव्हता करत म्हणून वेळ मिळत होत आणि एकत्र कुटूंब पद्धतीही होती म्हणून मानस जास्त हाती घरात. एकच सगळे करावे लागते नव्हते

चेंडू जर तुम्ही वर फेकलात तर एक अंतर कापून तो पुन्हा खाली येतो. माणसाची प्रगती आता त्या विशिष्ठ अंतरापर्यंत झाली असून इथून आपण पुढे जाणार नसून मागे जाणार आहोत. पुन्हा अशमयुगीन कालखंडात आपण जाणार आहोत. यापूर्वीही असं घडलं होतं. आताही घडणार.

आधी चा कळत ना चूल 2वेळा पिडवली जायची आणि झोपना साठी अंथरून एक वेळीस रात्रीच टाकले जायचे. ता मुळे वजन जास्त वाटत नव्हत

थोडे मागे येता येता आपण एव्हडे मागे आलोय की परत पुढे जाणे कठीण आहे. अशमयुगीन कालखंड जवळ आलाय, आता थोड्याच दिवसात लोकांना गिरणीच्या पिठापेक्षा जात्यावर दळलेलं पीठ आवडायला लागेल. सगळ्या बायका एकत्र जमून ओव्या गात गात पीठ दळतील. तेव्हा समजून जा अशमयुगीन कालखंड सुरू झाला.

बोकलत @ सगळ्या बायका एकत्र जमून ओव्या गात गात पीठ दळतील. तेव्हा समजून जा अशमयुगीन कालखंड सुरू झाला.>>>अशमयुगीन कालखंड सुरू झालावर ही बायकाच काम करतीन का???

माझ्या गावी श्राद्धासाठी लागणारे पीठ आणि लग्नात लावली जाणारी हळद जात्यावरच दळली जाते. त्यामागे बायकांनी एकत्र यावे आनंदाच्या क्षणी सोबत करावी व दुःखाच्या वेळी सांत्वन करावे हा उद्देश असतो. आणि अश्मयुगाचे म्हणाल तर कोरोना नेईल बहुतेक अश्मयुगात असे वाटायला लागले आहे.

इथून आपण पुढे जाणार नसून मागे जाणार आहोत. पुन्हा अशमयुगीन कालखंडात आपण जाणार आहोत >>>>> असा करता करता पुन्हा माकड झालो नाही म्हणजे मिळवलं

>>>नथीचा नखरा सुरू झाले होते मध्ये>>>

त्या नथीच्या नखऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मी पुरुषांसाठी "मिशीचा आकडा" मोहीम सुरु करण्यासाठी आवाहन केले होते परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

मिशीचा आकडा
>>>
दाढीचा दरारा आलेला की...
पण सहसा पुरुषवर्ग यात फार रमत नाही.
बायका आपले फोटो टाकून आणखी दहाजणींना टॅग करतात असले प्रकार पुरुषांमध्ये आढळत नाहीत.
यात कोणी चूक वा बरोबर नाही तर हा साधारण स्वभाव असतो.

पूर्वापार चालत आलेली रित आहे.
>>>>
तेच! पूर्वापार चालत अलेल्या रितीला फॅशनच्या वेष्टनात गुंडाळून सादर करणे यालाच फॅड बोलतात Happy

चुलीवरचा स्वयंपाक हा प्रकार मला नॉस्टाल्जिया म्हणूनही नकोच वाटेल. आरोग्याला अतिशय घातक प्रकरण! पूर्ण ज्वलन होत नसल्याने भरपूर प्रदुषण होते. घरातील हवेची गुणवत्ता फार खालावते त्याशिवाय चुलीसमोर बसून स्वयंपाक करताना डोळ्याला सतात धग जाणवत रहाते. चूल पेटवणे हे तसे सोपे काम मात्र खेड्यांतून चुलीसाठी लाकूड फाटा गोळा करणे हे पाणी भरण्यासारखेच मुलींवर पडणारे एक काम असते. पहाटे लवकर उठून रानात फाटी आणायला जाणे, पाणी भरणे वगैरे करुन जमल्यास शाळा-अभ्यास अशी परीस्थिती असलेल्या माझ्या शाळेतील मुलींचे चेहरे आजही आठवतात.
माझे बाबा फिरतीवर असत तेव्हा बरेचदा खेड्यांतून चहाचा आग्रह होई. तो चहा गुळाचा असे. इथे ब्राउन शुगर घातलेला दुधाचा चहा बघितला तेव्हा तो गुळाचा चहा आठवला होता.

Pages