घरातील उपकरणांच्या मेंटेनन्स साठीचे प्लॅन्स

Submitted by sneha1 on 24 June, 2020 - 11:15

नमस्कार,
मला थोडी माहिती हवी आहे. फ्रीज आणि ड्रायर ला पाच वर्षे झाली आहेत आणि आता वॉरंटी रिन्यू करायची आहे. Assurant ने पाच वर्षाचे ८०० डॉ. सांगितले आहेत. आता असे वाटते आहे की ते द्यावे, की दुसरा एखादा प्लॅन घ्यावा? अमेरिकन होम शील्ड चा अनुभव आजू बाजू च्या लोकांचा चांगला नाही. बरं, ऑलरेडी एसीचा आणि डिशवॉशरचा वेगळा प्लॅन आहेच.
घराला पाच वर्षे होतील काही महिन्यात.
इथली बाकीची मंडळी काय करतान जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थर्ड पार्टि एक्स्टेंडेड वॉरंटि घेत नाहि, बर्‍याचदा रिप ऑफ असते. एव्हढ्या वर्षांत लोकल रिपेअर/सर्विस कंपनींच नेटवर्क डेवलप केलेलं आहे. नीड बेसिस वर त्यांनाच एंगेज करतो. काय खर्च होईल तो आउट-ऑफ-पॉकेट...

कुठल्याही उपकरणाचा मेंटेनन्स प्लॅन घेत नाही. घेताना रिव्ह्यू वाचुन (जमेल तितकं) तावुन सुलाखुन घेतो. नंतर काही बिघडलं तर युट्युब व्हिडीओ -> हँडिमॅन -> कंपनी अशा क्रमाने (अर्थात घेतल्यानंतर कधी बिघडतं आहे त्यावर) जाईन. पण अजुन असं काही मेजर बिघडण्याची वेळच आली नाहिये. उपकरणे खूप चालतात.
लॉन मोअर/ स्नो थ्रोअर पिरिऑडिकली ट्युन करुन घेतो.

धन्यवाद.
खरं सांगायचं तर गोंधळ होतो आहे, to be or not to be मधे.
सुरुवातीला नवीन घर असल्याने सगळ्याचीच वॉरंटी होती. फ्रीज आणि वॉशिंग मशीन चा कधीही प्रॉब्लेम झाला नाही, पण नवीन असून ही ड्रायर आणि डिशवॉशर च्या अडचणी आल्या. एकदा तर ड्रायर मधली लिंट काढायला गेली आणि मग तो लिंट ट्रे लावायला विसरली आणि लोड लावून मोकळी झाली. तो बंद पडलाच ! technician आला, त्याने नवर्‍याचा नेकटाय गुंडाळून बिघडलेली मोटर काढून नवी टाकून दिली. हे सगळे वॉरंटीमधेच आले :-). हे सोडूनही बाकी अडचणी आल्या ड्रायर चा, मी काही न करता पण Happy