आता मुलांना हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे...

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2020 - 13:19

माझी मुलगी सध्या सहा वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिला ॲक्टीव्हिटी कम बालनाट्य अश्या एका क्लासला टाकले होते. (क्लासचे नाव विचारू नका) मुलगी पुरेशी क्रिएटीव्ह आहे आणि ड्रामा ॲक्टींगचीही आवड आहे हे पाळण्यातले पाय साधारण दिसले होते. फार नाही पण बरेपैकी रमायची तिथे. चारसहा महिन्यांनी त्यांच्या नाटकाचा सीजन आला तेव्हा प्रत्येकाला छोटीमोठी भुमिका मिळणारच या हिशोबाने एका कळपातल्या बकरीची भुमिका तिला देण्यात आली. सोबत चक्क एक डायलॉग !
नाही म्हटले तरी आमचा हिरमोडच झाला. पण म्हटले जाऊ दे कदाचित आपल्या मुलीतील कलागुण त्यांना फारसे दिसले नसतील वा तिनेच दाखवले नसतील.

पण त्याचवेळी अजून एक विचार मनात आला. मुलीची क्लासला ने आण करायची जबाबदारी माझीच होती. त्यावेळी एक सहज निरीक्षण केलेले. त्या क्लासच्या मॅडमचा आणि ठराविक पालकांचा आपलाच एक ग्रूप होता. अगदी फॅमिली रिलेशन असल्यासारखा. त्यांच्यात मी किंवा माझी मुलगी आऊट साय्डरच होती. त्यामुळे तर नाही ना तिला तिच्या मानाने दुय्यम भुमिका दिली गेली?

हा विचार बायकोला बोलून दाखवताच ती चिडली. जाब विचारते म्हणाली. आपल्या मुलांसाठी आपण उभे राहिले पाहिजे म्हणाली. पण मीच म्हटले हा अंदाज आहे. आणि तसे झालेही असेल तरी ठिक आहे. कदाचित ते पालकही आपल्या मुलांना संधी मिळावी या हेतूने प्रयत्न करत असतील आणि आपल्या जागी बरोबरही असतील. तसेही हाच जगातला शेवटचा प्लॅटफॉर्म नाही जिथे आपली मुलगी चमकू शकते. आता पदरी पडलीय ती भुमिका करूया म्हटले. कारण मुळात तिलाच आपली भुमिका छोटी मोठी याचे काही पडलेच नव्हते. तर आपण तरी का ते तिच्या मनात भरवा..

असो, पुढे ते नाटक झालेच नाही. पण शाळेचे ॲन्युअल फंक्शन मात्र मुलीने गाजवून सोडले. आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवत शाळेच्या रेडिओ चॅनेलची पहिली ब्रांड ॲम्बासेडरही झाली. आज या निमित्ताने आठवले म्हणून पण ते नाटकाचे प्रकरण जुने होत तो सलही मनातून निघून गेला होता.

पण आज मनात विचार आला की समजा तो प्लॅटफॉर्म खरेच फार महत्वाचा असता? आणि खरेच तिथे आपली मुलगी एखादी संधी डिजर्व्ह करत असूनही तिला नाकारली गेली असती? एक पालक म्हणून आपण या अन्यायाविरुद्ध काहीही करू शकलो नसतो?
तर......

----------

२०१९ - महेंद्रसिंग धोनी स्ट्राईक घेण्याच्या नादात रनआऊट झाला आणि समस्त क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लाऊन गेला.

२०२० - धोनीची भुमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत स्वत:च आपल्या आयुष्याची खेळी संपवून गेला. त्याहीपेक्षा मोठा चटका लाऊन गेला.
कदाचित त्याला स्ट्राईक नाकारला गेला म्हणून.. Sad

----------

कोणावर आरोप करायची ईच्छा नाही..
कदाचित जो तो आपल्या जागी बरोबरही असेन..
पण मनात विचार येतोय की आपण मुलांना जसे अपयश पचवायला शिकवतो..
तसे आता ईतरांनी लादलेले अपयश स्विकारायला सुद्धा शिकवायला हवे Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्याही परिस्थितीत अन्याय सहन करायचा नाही हेच बिंबवले पाहिजे. लहानपणी एखाद्या रोल पुरता असलेले कॉम्प्रोमाइज उद्या नोकरी मिळवताना भलत्या वळणाला पोचलेले असेल आणि पालक म्हणून आपण अनभिज्ञ असू तर एकाचवेळी अनेक आयुष्य पणाला लागलेली असतील. ह्याचा बिमोड करायचा सोप्पा मार्ग म्हणजे जे चूक ते चुकच म्हणायला आणि ओळखायला शिकवणे. कधीकधी वर्गात शिकवणारे टीचर अनवधनाने चुकीची माहिती देत असतील तर त्यावर स्वतःचे मत परखड़पणे मांडता आलेच पाहिजे. भिडस्तपणाने किंवा घाबरून जाऊन काहीच न बोलणे म्हणजे समोरच्या पदाला दबकुन वागत अन्याय सहन करण्याचीच शिकवण ठरेल.

कुठल्याही परिस्थितीत अन्याय सहन करायचा नाही हेच बिंबवले पाहिजे.
>>>
हो ते देखील खरे आहे.
शेवटचे वाक्य उपरोधाने लिहिले आहे. उद्वेगाने लिहिले आहे. हताशपणे लिहिले आहे.. माझे मलाच आता सांगता येणार नाही.
नेमके मृत्युचे कारण महीत नसताना उगाच कोणावर आरोप करण्यात अर्थ नही. पण यानिमित्ताने जे कानावर येतेय त्यात नक्कीच तथ्य आहे. कारण बॉलीवूडबाबत बोलायचे झाल्यास आऊटसायडर्सना स्विकारले जात नाही हे आधीही ऐकून् माहिती आहे. आणि हे उद्या कुठल्याही क्षेत्रात कोणाशीही होऊ शकतेच

तुम्ही जमिनीवर असाल... यशाने हुरळून घमंडी होत नसाल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही...
चांगले उदाहरण - आयुष्मान खुराणा !

माझा प्रतिसाद कदाचित cliche वाटू शकेल, पण तुमचा, फक्त तुमच्या कर्मावरच अधिकार असतो, कर्मफळ तुमच्या अधिकारात येत नाही हे मुलांना ज्या भाषेत, जसं समजेल तसं जितकं लवकर समजावून सांगता येईल, तितक्या लवकर, त्या पद्धतीनं ते सांगावं / शिकवावं. किंबहूना मुलांना नैसर्गिकरित्या ते बर्यापैकी समजत असतं. वर दिलेल्या दोन उदाहरणांमधे, त्या लहान मुलीला, लहान रोल चं ही वैषम्य वाटलं नव्हतं आणी जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तिला जे (अभिनय / नृत्य) चांगलं करता येतं ते तिनं करून घवघवीत यश मिळवलं. माझा असा अंदाज आहे की ती मुलगी तिच्या परफॉर्मन्समधे आनंदी होती. जर तिला लहान रोल मिळाल्याचं वैषम्य वाटलं नसेल, तर तिला तिच्या अ‍ॅन्युअल डे च्या परफॉर्मन्समुळे मिळालेल्या ब्रँड अँबेसेडर पदाचा अहंकार सुद्धा स्पर्ष करू शकला नसेल. हीच समतानता टिकवता आली तर वैषम्य, डिप्रेशन, अहंकार, superiority / inferiority complex पासून स्वतःला बर्याच प्रमाणात - नैसर्गिक भाव-भावना असणारच, पण त्याचा अतिरेक न होता - आनंदी आयुष्य जगता येतं.

सगळ्यांनाच मोठ्या ब्यानर चित्रपटात हिरो हिरॉइन व्हायचं असतं. निर्मात्यांना कमी बजेटात पिच्चर करायचं असतं. किंवा पिच्चर आपटणार नाही एवढा जुगार खेळायचा असतो.
मग मध्येच कलाकारांनी डिप्रेशन गोळ्यांचा धंधा का वाढवायचा?

सगळ्यात आधी व्यक्त व्हायला शिकवले पाहिजे. Just stay social and talk,talk,talk.
आधुनिक जिवनशैली व material success ह्या दोन्ही गोष्टी आपल्यात गर्व व अहंकार निर्माण करत आपल्याला meditation आणि मंत्र साधनेतल्या शक्तीपासून लांब ठेवत असतात. साधं रामरक्षा स्तोत्र ऐकणंही फार empowering आहे. म्हणून meditation ही remedy समजून रोजच्या जीवनात समावेश करायला काहीच हरकत नाही.

सगळेच प्रतिसाद चांगले आहेत.
मला वाटते, आपण एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करु नये. कधी कधी आयुष्यात पुढे गेल्यावर ती गोष्ट फार क्षुल्लक होती हे जाणवते.
आणि अशा स्टेटस वगैरेंच्या मागे धावून जीव गमावणे तर फारच वाईट!
अपयश किंवा दुसरा आपल्याला मागे खेचायचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यावर निराश न होता मार्ग काढणे फार गरजेचे आहे. आपल्या सुह्रदयांशी संवाद असू द्यावा. आईवडीलांनी मुलांना मनाने खंबीर बनवावे व नेहमी पाठीशी राहवे हे खूप गरजेचे आहे.
त्या वयोवृध्द आईवडिलांनी काय करारयचे? आपल्यापेक्षा लहानांना खांदा द्याय्ची वेळ कोणावरच येवू नये ही प्रार्थना Sad

आजकालची आधुनिक , गतिमान जीवनशैली, स्पर्धा पाहता स्ट्रेस येणारच! अगदी शाळेत जायला लागल्यापासून मुलांना स्ट्रेसचा सामना करावा लागतो. त्या बिचार्यांना हे नीट सांगताही येत नाही कुणाला. पण तो हॅन्डल करता येणे फार महत्वाचे. हे आपण मुलांना शिकवलेच पाहिजे आता.

मुलांच्या अपयशाचा फार बाऊ करू नये, यशाचे अति कौतुक करू नये माफक करावे. त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. "रात गयी बात गयी" हे मी शिकवले आहे. उगाच फार गुंतू नये, स्वतःचे चुकले असेल तरी सारखे तळमळत राहू नये. आपल्या अचिवमेंट मध्ये सुद्धा फार न रमता पुढे पुढे जात रहावे. आपल्या हातात फक्त त्यांचे लहानपण आहे, पूर्ण आयुष्य मात्र त्यांना स्वबळावर घडवायचे आहे.
सुशांत सिंग ची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काय वाटत असेल त्याच्या घरच्यांना कल्पना सुद्धा करवत नाही. चाहत्यांना काही महिन्यांनी दुसरे कुणी आवडायला लागेल पण आई वडील भावंड कधीच हे दुःख विसरू शकणार नाहीत. डिप्रेशन हा आजार कर्करोगापेक्षाही वाईट आहे असे वाटते काही फारसे (कधी कधी)सिम्पट्म सुद्धा लक्षात येत नाहीत आणि तीव्रता वाढत जाऊन जीव जातो. Sad

पहिल्या पासून ह्या मुलीला अगदी बारक्या सारक्या गोष्टींचे कौतूक करून अगदी डोक्यावर चढवून ठेवले आहे परी परी करून. मग अश्या पापाकी परी मुली इतरांना अगदी डोइज्ड होतात व वात आणतात. घरच्यासारखेच कौतूक बाहेर होणे शक्य नाही. आपण एक अ‍ॅव्हरेज व्यक्ति आहोत व सर्वांसारखे च यश अपयश सुख दु:ख आपल्याही वाट्याला येणार हे आताच्या मुलांनाच काय त्यांच्या आईबापांनाही लक्षात येत नाही. .
अगदी ज्ञानेश्वरांनाही उपेक्षा अवहेलना चुकलेली नाही. पण नंतर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीली.

अमा आजकाल तुमचे प्रतिसाद खरेच तुम्ही लिहिलेत का असे वाटायला लागले आहे... प्रत्येक आई बापाला आपल्या मुलांचे कौतुक असतेच... त्यांची मुलगी अजून दहा वर्षांची पण नाहीय... इतक्या लहान मुलीला का आपण एक ऍव्हरेज व्यक्ती आहोत असे सांगायचे... त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव कसा मिळणार?

मुलाला यशाने हुरळून जावू नका, अपयशाने खचून जावू नका शिकवणे गरजेचे आहेच. अन्याय होत असेल तर त्यातून मार्ग कसा काढायचा हे शिकवायला लागते तसेच प्रसंगी अन्यायाने लादलेल्या अपयशातून खचून न जाता पुन्हा उभे रहायला देखील शिकवावे लागते. यश-अपयश यापलीकडे केवळ कुटुंबातील व्यक्ती म्हणून आम्ही तुझ्यावर प्रेम करतो हा विश्वास द्यावा लागतो.
काही क्षेत्र अशी असतात की जिथे तुमचे यश-अपयश हे फार सार्वजनिक असते आणि बरेचदा टोकाचेही असते. काही वेळा खूप मेहनत घेवून काम करुनही अपयश वाट्याला येते , आज यश मिळाले तरी त्यातून पुन्हा चांगले काम मिळेल याची शाश्वती नसते. अशावेळी मनाने खंबीर राहून प्रयत्न करत रहाणे ही सोपी गोष्ट नाही.
नैराश्य आणि इतर मानसिक समस्या असतात तेव्हा मुळातच मनोव्यापार सामान्य नसतो. अशावेळी जर अन्याय, अपयश वाट्याला आले तर त्यावर उमटणारी प्रतिक्रिया सामान्य नसते. नैराश्य हा आजार वेळीच लक्षात येत नाही पण अगदी प्राथमिक शाळेतील मुलांनाही नैराश्याची लक्षणे उद्भवतात. मुलाची वाढ, लहानसहान शारीरिक तक्रारी, शालेय प्रगती याबद्द्ल पालक सतर्क असतात मात्र मानसिक स्वास्थ्य ठीक आहे ना याकडे बरेचदा दुर्लक्ष होते. लक्षात येवून उपचार सुरु केले तरी त्याबद्द्ल मौन पाळले जाते/ झटपट बरे व्हावे अशी अपेक्षा असते. नैराश्यासारख्या आजारात त्याचा स्विकार करुन , त्यासोबत जगायला शिकणे ही त्या व्यक्तीसाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी एक कसोटीच असते. सर्व काही ठीक असे वरवर वाटत असताना कुठल्या गोष्टीचे निमित्त होवून आजार पुन्हा कधी डोके वर काढेल याचा भरवसा नसतो. त्यामुळे मला ही व्याधी आहे हे खुलेपणाने सांगता येणे आणि त्या व्याधीचा बाऊ न करता समजून घेवून आधार देणार्‍यांचे जाळे असणे या गोष्टी फार महत्वाच्या!

आजचे जग म्हणजे बोलाल तर टिकाल. या तत्त्वावर चालू आहे. गप्प राहण्यार्यांचे नक्किच हाल होतात. मग मानसिक ताण येणे अगदी सहज घडू शकते. जेव्हा असा विचार मनात येउ लागतो त्या वेळी आपल्या पेक्षा ही हालाखित जीवन जगणारे आहेत ह्याचा विचार करावा. त्यांच्या पेक्षा आपण नक्कीच चांगले आहोत. हा विचार कुठेतरी ताण कमी करु शकतो. पण हे झाल सामन्य लोकांच्या बाबतीत.
प्रसिध्धित असलेल्या लोकांचे मानसिक ताणातुन बाहेर येणे अवघड होते. कारण त्यांनी बाहेर यायचे ठरवले तरी आजची सोशल मीडिया काही त्यांचा पिच्छा सोडत नाही. गोष्टी विसरणे अवघड करुन ठेवते. त्यातुन मार्ग काढण्यापेक्क्षा जीवनाचा अंत करणे सोपे वाटते. भलेही आपली जवळची लोकं कितिही साथ देणारी असली तरी......
कारण यात केवळ आपल्यामुळे त्यांनाही त्रास नको अशी भावना दडलेली असावी. परंतू त्यांच्या अश्या करण्याने घरचे अजुन त्रासात जातिल हा विचार त्या वेळी केला जात नाही.

अमा , आयमाय नॉट गेटींग युअर पॉईंट
सुशाण्त सिंगच्या आत्महत्येला त्याच्या आईवडीलांनी केलेले अति लाड जबाबदार होते??

जर विषय सोडून मला काही पर्सनल कॉमेंट असेल तर येस्स. मला पोरांचे फक्त लाड आणि प्रेम करता येते. मग ती माझी असो वा दुसरयाची. Happy . एकूणच रागद्वेष कराय्ला हे आयुष्य खूप छोटे आहे. लोकं वेळ कसा काढतात त्यासाठी हे मला आजवर समजले नाही Happy

असो, आपण स्वतंत्र धागा काढून याची चर्चा करूया.

इथे एकच सांगेन की हा तुमचा संशय मुलांसमोर जास्त बोलु नका. त्यांचा गैरसमज होउ शकतो की प्रयत्न करुन उपयोग नाही.
अशा टायगर मॉम्स च्या ग्रुप चा बरेचदा आला आहे, पण "सच और सा
हस है जिसके मनमे अंत मे विजय उसीकी होए."
तुमची मुलगी जरुर यशस्वी होइल.

सुशांतसिंग हिट विकेट झाला >> ही वाक्यरचना बदललीत तर बरं होईल. आज तक ने ही हेडलाईन दिवसभर लावलेली चमकोगिरीसाठी . आता त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत . तुमचा हेतू तसा नाही याची कल्पना आहे

https://www.google.com/amp/s/www.thenewsminute.com/article/legal-notice-...

आज तक ने ही हेडलाईन दिवसभर लावलेली
>>>>.
ओके हे माहीत नव्हते
मी ते धोनीचा संदर्भ लिहीताना जे सुचले ते लिहिले.
त्यात काही वावगे असेल तर बदलतो. शब्द नाही भावना महत्वाच्या
..
बदल केला. धन्यवाद

>>> पहिल्या पासून ह्या मुलीला अगदी बारक्या सारक्या गोष्टींचे कौतूक करून अगदी डोक्यावर चढवून ठेवले आहे परी परी करून. मग अश्या पापाकी परी मुली इतरांना अगदी डोइज्ड होतात व वात आणतात.<<<

अतिशय वैय्क्तिक व विनाकारण असलेला प्रतिसाद. खरे तर नीच प्रतिसाद, तो ही लेखकाने मुलीविषयी लिहिलेल्या लेखांवर आधारीत. तुमच्या पोटात इतकी मळमळ?
इतकी जेलसी? वाण लागला का ‘त्यां’चा?
दुसर्‍यांचा वीनाकारण द्वेष करणारी वृतीच कारणीभूत असते एखाद्याला खच्ची करायला.
कोणी स्वतःच्या मुलीला कसे वाढवतो त्यावर टिप्प्ण्णी करणारे तुम्ही कोण? तुमच्या मुलीला तुम्ही कसे वाढवता त्यावर अशी पब्लिक फोरमवर टिप्प्ण्णी केली तर चालेल काय?
मुद्दा काय आणि कमेंट काय?

अ‍ॅडमिन, अश्या प्रवृतीचे प्रतिसाद ह्यावर तुमचे काय धोरण आहे?

निलिमा धन्यवाद, ती तुलनेत फार छोटी गोष्ट होती. आणि आता जुनी झालीय. या प्रकरणामुळे आठवली. की कमी जास्त प्रनाणात हे कोणशीही कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. आताच पुन्हा एका चॅनेलवर यासंबंधित कार्यक्रम पाहिला. बरेच जण पुढे येऊन याबद्दल बोलत आहेत. उघडपणे नावे घेतली जात आहेत. आणि ती नावे माझ्या डोक्यात जात आहेत. त्याला कसे बुली केले जायचे. अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्याच्या हातातले काम कसे हिराऊन घेतले गेले. एकूणच ऐकून फार वाईट वाटत होते. अश्या परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग स्विकारणारयाला कमजोर मनाचे म्हणनेही मला अन्यायकारक वाटते.

अमा, असा प्रतिसाद वाचून खेद वाटला. धागाकर्त्याच्या मुलीला आपण पर्सनली ओळखत नाही, ती लहान मुलगी इथे माबोवर येवून स्वतःला डिफेंड करु शकत नाही असे असताना तिच्याबद्दल असे लिहायला नको होते.

अमा, Sad

सुशांतने 'यशराज' चा सिनेमा नाकारला तिथुन यशराजचा 'इगो' दुखावल्यामुळे त्याची पद्धतशीर अडवणुक सुरु झाली असे एका व्हिडिओत कळले. १० व्या मिनिटापासुन विश्लेषण नीट केले आहे.

https://youtu.be/gVFrcAR3Jvk

ऋन्मेष पटलं, सगळ्यांचे प्रतिसाद आवडले, अमा सोडून.
ऋन्म्याचा हाच स्वभाव आवडतो, त्याने हे किती शांतपणे अमां ना सांगितले.

पहिल्या पासून ह्या मुलीला अगदी बारक्या सारक्या गोष्टींचे कौतूक करून अगदी डोक्यावर चढवून ठेवले आहे परी परी करून. मग अश्या पापाकी परी मुली इतरांना अगदी डोइज्ड होतात व वात आणतात. घरच्यासारखेच कौतूक बाहेर होणे शक्य नाही. आपण एक अ‍ॅव्हरेज व्यक्ति आहोत व सर्वांसारखे च यश अपयश सुख दु:ख आपल्याही वाट्याला येणार हे आताच्या मुलांनाच काय त्यांच्या आईबापांनाही लक्षात येत नाही. .>>>>>>>>>>>
अमा, तुमचा निषेध! तुम्हाला एक प्रगल्भ विचारांची व्यक्ति समजत होते!!!!

ऋन्मेश कितीही बेकार धागे काढत असला, कितीही वैयक्तिक माहीती देत असला त री ही ती वापरुन तुम्ही केलेले त्याच्या मुलीबद्दलचे वक्तव्य ऐकुन धक्का बसला! रुन्मेश, या प्रकारच्या प्रतिसदावरुन तरी तू धडा घेशील आणी तुझ्या मुलांचे तपशील इथे देणार नाहीस अशी आशा व्यक्त करते!
अमा, आम्ही तर तुमच्या कुत्र्यांच पण तुम्ही केलेल कौतुक पण ऐकुन घेतल आहे…. तुमची वैयक्तिक आवड म्हणुन त्याकडे दुर्ल्क्श केल आहे…...
तुम्ही मात्र एका सहा सात वर्षांच्या मुलीला आणि तिच्या बाबांना असं बोलता? वा!!!

मनुडी वर लिहीलेल्या दोन वाक्यातला फाउल तुम्हाला उघडं पाडतोय सांभाळा जरा. (हे पण तीन तासातच कां ??????)

माज्याशी मय्तरी कर्नार कं ?????? रोफ्ल्ल्ल्ल !!!!!

Pages