माझी मुलगी सध्या सहा वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिला ॲक्टीव्हिटी कम बालनाट्य अश्या एका क्लासला टाकले होते. (क्लासचे नाव विचारू नका) मुलगी पुरेशी क्रिएटीव्ह आहे आणि ड्रामा ॲक्टींगचीही आवड आहे हे पाळण्यातले पाय साधारण दिसले होते. फार नाही पण बरेपैकी रमायची तिथे. चारसहा महिन्यांनी त्यांच्या नाटकाचा सीजन आला तेव्हा प्रत्येकाला छोटीमोठी भुमिका मिळणारच या हिशोबाने एका कळपातल्या बकरीची भुमिका तिला देण्यात आली. सोबत चक्क एक डायलॉग !
नाही म्हटले तरी आमचा हिरमोडच झाला. पण म्हटले जाऊ दे कदाचित आपल्या मुलीतील कलागुण त्यांना फारसे दिसले नसतील वा तिनेच दाखवले नसतील.
पण त्याचवेळी अजून एक विचार मनात आला. मुलीची क्लासला ने आण करायची जबाबदारी माझीच होती. त्यावेळी एक सहज निरीक्षण केलेले. त्या क्लासच्या मॅडमचा आणि ठराविक पालकांचा आपलाच एक ग्रूप होता. अगदी फॅमिली रिलेशन असल्यासारखा. त्यांच्यात मी किंवा माझी मुलगी आऊट साय्डरच होती. त्यामुळे तर नाही ना तिला तिच्या मानाने दुय्यम भुमिका दिली गेली?
हा विचार बायकोला बोलून दाखवताच ती चिडली. जाब विचारते म्हणाली. आपल्या मुलांसाठी आपण उभे राहिले पाहिजे म्हणाली. पण मीच म्हटले हा अंदाज आहे. आणि तसे झालेही असेल तरी ठिक आहे. कदाचित ते पालकही आपल्या मुलांना संधी मिळावी या हेतूने प्रयत्न करत असतील आणि आपल्या जागी बरोबरही असतील. तसेही हाच जगातला शेवटचा प्लॅटफॉर्म नाही जिथे आपली मुलगी चमकू शकते. आता पदरी पडलीय ती भुमिका करूया म्हटले. कारण मुळात तिलाच आपली भुमिका छोटी मोठी याचे काही पडलेच नव्हते. तर आपण तरी का ते तिच्या मनात भरवा..
असो, पुढे ते नाटक झालेच नाही. पण शाळेचे ॲन्युअल फंक्शन मात्र मुलीने गाजवून सोडले. आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवत शाळेच्या रेडिओ चॅनेलची पहिली ब्रांड ॲम्बासेडरही झाली. आज या निमित्ताने आठवले म्हणून पण ते नाटकाचे प्रकरण जुने होत तो सलही मनातून निघून गेला होता.
पण आज मनात विचार आला की समजा तो प्लॅटफॉर्म खरेच फार महत्वाचा असता? आणि खरेच तिथे आपली मुलगी एखादी संधी डिजर्व्ह करत असूनही तिला नाकारली गेली असती? एक पालक म्हणून आपण या अन्यायाविरुद्ध काहीही करू शकलो नसतो?
तर......
----------
२०१९ - महेंद्रसिंग धोनी स्ट्राईक घेण्याच्या नादात रनआऊट झाला आणि समस्त क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लाऊन गेला.
२०२० - धोनीची भुमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत स्वत:च आपल्या आयुष्याची खेळी संपवून गेला. त्याहीपेक्षा मोठा चटका लाऊन गेला.
कदाचित त्याला स्ट्राईक नाकारला गेला म्हणून..
----------
कोणावर आरोप करायची ईच्छा नाही..
कदाचित जो तो आपल्या जागी बरोबरही असेन..
पण मनात विचार येतोय की आपण मुलांना जसे अपयश पचवायला शिकवतो..
तसे आता ईतरांनी लादलेले अपयश स्विकारायला सुद्धा शिकवायला हवे
जेम्स बॉण्ड, धन्यवाद!
जेम्स बॉण्ड, धन्यवाद!
हो तीन तासातच!

तुमच्याशीच नव्हे तर आख्ख्या मायबोलीशी माझी मैत्री आहे
ऋन्मेष धागा आवडला. अपयश
ऋन्मेष धागा आवडला. अपयश स्वीकारायला शिकवणे फार गरजेचे आहे.
परीला खूप शुभेच्छा व आशीर्वाद.
.
अजुन एक - आपले काही हळवे कोपरे असतात. आपली अपत्ये हा एक. ते असे उघड करु नका. मनाच्या कुपीत अत्तरासारखे जपा.
पहिल्या पासून ह्या मुलीला
पहिल्या पासून ह्या मुलीला अगदी बारक्या सारक्या गोष्टींचे कौतूक करून अगदी डोक्यावर चढवून ठेवले आहे परी परी करून. >>
या वाक्याचा करावा तितका निषेध कमीच आहे.
आपण काय लिहतो याचं थोडं तरी तारतम्य बाळगायला हवं.
अमा , सिरियसली ??? खरच तुमचा
अमा , सिरियसली ??? खरच तुमचा आयडी हॅक झालाय का ? लोकांचा ऋन्मेश वर असणार राग समजू शकतो , पण म्हणून अशी कमेंट ?????
.
पहिल्या पासून ह्या मुलीला अगदी बारक्या सारक्या गोष्टींचे कौतूक करून अगदी डोक्यावर चढवून ठेवले आहे परी परी करून >>> आता तीचे नावच परी आहे म्हटल्यावर परी परी करणारचं सगळे .
आणि सगळ्या पापांच्या पर्या काय डोईजड होत नाही ओ !
रुन्मेश, या प्रकारच्या प्रतिसदावरुन तरी तू धडा घेशील आणी तुझ्या मुलांचे तपशील इथे देणार नाहीस अशी आशा व्यक्त करते! >>> सहमत . अर्थात , सोशल मिडियाचे धोके माहित असूनही आपल्या कुटुम्बाचे , मुलांचे तपशील आणि फोटो टाकणारे कमी नाहीयेत . ज्याना जे पटतय ते ते करणार .
>तसे आता ईतरांनी लादलेले अपयश
>तसे आता ईतरांनी लादलेले अपयश स्विकारायला सुद्धा शिकवायला हवे
हे इतर म्हणजे नेहेमी लोकच असतात असे नव्हे, परिस्थिती, योगायोग, ई आपल्या शक्तीबाहेरचे घटकही असू शकतात.
टॅलेंट, मेहेनत असूनही केवळ right place at right time ने हुलकावणी दिल्याने अपयश ( किंवा स्वप्नभंग) होऊ शकतो.
नाव लिहित नाही कारण ते महत्वाचे नाही पण साधारण सचिन तेंडुलकरच्याच वयाचा त्याच शाळेत शिकलेला अत्यंत गुणी खेळाडू भारतीय संघाकडून खेळू शकला नाही. कारण तो ज्यावेळी संघाचे दार ठोठवत होता तेव्हा आधीच चार पाच बॅट्समन आत होते व एका वेळी किती बॅट्समन घ्यायचे यालाही मर्यादा होत्या. आधीच्या पिढीतील पद्माकर शिवलकरंचही असंच झालं. हे लोक चार पाच वर्षे मागे पुढे जन्मले असते तर ..
आजकाल ग्रामीण भगातून बरेच विद्यार्थी पुण्यात एम पी एस सी च्या तयारीसाठी येतात. या वर्षी राज्य सरकार कडे पैसेच नसल्याने जागा फारच कमी निघतील. कदाचित निघणारही नाहीत. यातल्या अनेकांची वयोमर्यादे मुळे ही शेवटचीच संधी होती. टेलेंट, मेहेनत असूनही अनेकांचे सरकारी अधिकारी बनायचे स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही.
वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे फक्त कर्म आपल्या हातात असते. कधी कधी असे काही घडू शकते पण That does not make us less of a human being हे थोडे मोठे झाल्यावर हळूवारपणे समजावले पाहिजे.
हे इतर म्हणजे नेहेमी लोकच
हे इतर म्हणजे नेहेमी लोकच असतात असे नव्हे, परिस्थिती, योगायोग, ई आपल्या शक्तीबाहेरचे घटकही असू शकतात.
>>>>>
ईतर घटकांबाबत नशीबच पांडू म्हणून मनाची समजूत काढू शकतो.
पण एखादी व्यक्ती वा कंपू आपल्या यशाच्या आड येत असेल तर ते जास्त त्रासदायक वाटत असावे. म्हणून या मानवी अडथळ्यांशी कसे डिल करावे हे जास्त महत्वाचे वाटते.
दोन धाग्यावर एकच चर्चा चालु
दोन धाग्यावर एकच चर्चा चालु झाली आता, मिसळायला हवी.
लेट्स बी काईन्ड टू वन अनादर..
लेट्स बी काईन्ड टू वन अनादर... टू अमा ऍज वेल...
>>म्हणून या मानवी अडथळ्यांशी
>>म्हणून या मानवी अडथळ्यांशी कसे डिल करावे हे जास्त महत्वाचे वाटते.<<
पिकप ए फाइट दॅट यु कॅन विन अँड गो ऑल इन, अदर्वाइज स्टे अवे फ्रॉम द मेस. हे तुझ्या मुलांना शिकव. मागे तुझ्याकरता लिहिलं होतं कि मुलांच्या आय्क्यु पेक्षा इक्यु डेवलप करण्यावर फोकस कर. योर किड्स विल शाइन, गॅरंटिड...
मागे तुझ्याकरता लिहिलं होतं
मागे तुझ्याकरता लिहिलं होतं कि मुलांच्या आय्क्यु पेक्षा इक्यु डेवलप करण्यावर फोकस कर
>>>>
हो याच्याशी सहमत आहे. हे का गरजेचे आणि कसे करावे हा खरे तर व्यापक विषय आहे आणि यावर चर्चा व्हायला हवी. माबोवर झाली आहे का कुठे स्वतंत्र धाग्यात. किंवा यासंबंधित नॉलेज वाढवायला काही मार्गदर्शनपर लिंक्स आहेत का?
पापाकी परी मुली इतरांना अगदी
पापाकी परी मुली इतरांना अगदी डोइज्ड होतात व वात आणतात. >>> हे वाक्य मला अगदी अगदी पटलं आहे तसा अनुभव आला आहे
रच्याकने ऋ च्या मुलांबद्दल माझे काहीही म्हणणे नाही कारण त्यांच्या काही अनुभव आला नाही so त्याबद्दल मत व्यक्त नाही करता येणार
पापा की परी मै या गाण्यामुळे,
पापा की परी मै या गाण्यामुळे, करिनाच्या अभिनयामुळे आणि त्या चित्रपटमुळे निश्चितच वात आला ☺️
सर्वांनी दाखवलेल्या
सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल धन्यवाद. यात मूळ विषय अध्येमध्ये भरकटला याचा थोडा खेद आहे. पोरांचे किती लाड करावे हा आमच्याकडे फार आवडता वादाचा विषय आहे. जरा कामातून फुरसत मिळाली तर स्वतंत्र धागा काढतो. घरोघरीच्या कहाण्या वाचायला आवडतील
Pages