Submitted by अजय चव्हाण on 20 May, 2020 - 09:09
समीप चांदण्यात माझ्या चंद्र होऊन जा..
तुझ्याविना अर्ध आयुष्य माझं, पुर्ण तु होउन जा ...
कधी गुंतलेले मन हे माझे, थोडे तुझे देऊन जा..
नाही जमलचं तुला तर हे बंध सोडवून जा..
कधी एकाकी तु आठवलीस तर स्वप्न ठेऊन जा..
नसलीस भोवती तरीही माझं हसणं पाठवुन जा..
कातरवेळी अशा संध्याकाळी, मला ओलांडून जा..
ओलंडताना दिसलेले तुला अश्रू माझे पुसुन जा..
डायरीतल्या पानांवर त्या कोमेजलेलं फुल फुलवून जा.
मोरपंख विस्कटलेला तो अजुनही, थोडं सावरून जा..
पाषाणह्रदी ह्या भावना जपतोय, दाह सोसून जा..
मनाच्या ह्या नदीकाठी स्थितप्रज्ञ मिनल होऊन जा..
- अजय चव्हाण.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.…. जा. सुंदर कल्पना
.…. जा. सुंदर कल्पना
अहाहा! मस्त!
अहाहा! मस्त!
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
मस्त लिहिली आहे कविता
मस्त लिहिली आहे कविता
समीपचा काय अर्थ अभिप्रेत आहे?
समीपचा काय अर्थ अभिप्रेत आहे?
धन्यवाद किशोर, तायडे, सामो,
धन्यवाद किशोर, तायडे, सामो, रूपाली, भरत.
@भरत समीप म्हणजे जवळ, निकट
जवळच्या चांदणयात माझ्या चंद्र होऊन जा.. ह्या अर्थाने लिहलं आहे..
अजुन बरेच प्रश्न पडण्याआधी उत्तरे देतो..
स्थितप्रज्ञ - Self Collected
मिनल - अलौकीक रत्न, खडा.
आवडली कविता !
आवडली कविता !
Nice
Nice
अप्रतिम कविता!!!!!!
अप्रतिम कविता!!!!!!
वा सुरेख !
वा सुरेख !
मीनल म्हणजे कोण हे विचारणार होतो
पण उत्तर मिळाले आहे
धन्यवाद आनंद, उर्मिला,
धन्यवाद आनंद, उर्मिला, अज्ञातवासी, बिपीन.
सुंदर आणि रम्य !
सुंदर आणि रम्य !