चालता चालता पडलो डबक्यात

Submitted by बोकलत on 12 May, 2020 - 22:53

चालता चालता पडलो मी डबक्यात
बेडूक म्हणाला चल निघ इथून एका फटक्यात

चालता चालता पडलो मी तळ्यात
खेकडा म्हणाला जाऊन मर मेल्या मळ्यात

चालता चालता पडलो मी विहिरीत
मासा म्हणाला पाय घसरून कसा पडलास मोरीत

चालता चालता पडलो मी नदीत
कोलंबी म्हणाली फेरी मार एकदा मुंजाच्या हद्दीत

चालता चालता पडलो मी सागरात
Hr म्हणाली कोविड 19 मुळे कपात होणार पगारात

Group content visibility: 
Use group defaults

शेवटच्या शेरात(? Uhoh ) कामगारांच्या आवाजाला वाचा फोडलीत बोकलत! Happy

वाह!!! वैयक्तिक पातळीवरुन हळूहळू वैश्विक होत जाणारी ही कविता, शेवटच्या कडव्यात एक वेगळाच आयाम गाठते. विद्रोह, निसर्ग, गेयता काय नाही या कवितेत ते विचारा.

सागराची सखोलता, नदीची चंचलता, विहीरीचे परोपकारित्व, डबक्या/तळ्याचे साचलेपण यांचा एक अननुभूत मेळ घालून कविने आपल्या प्रतिभेचे जे अलवार दर्शन घडविले आहे, त्याने हे कवि रसिकमनांवर अधिराज्य करणारच याची तीळभरही शंका उरलेली नाही.

तेव्हा पुलेशु. अशीच मेजवानी माबोकरांना मिळत राहून एके दिवशी कवितासंग्रहरुपी सागरामध्ये या कवितांचे निर्माल्य सॉरी अर्घ्य पडावे ही इच्छा.