Submitted by द्वैत on 7 May, 2020 - 14:40
बुडालो जरी मी किनारा मिळाला
मला वादळांचा सहारा मिळाला
जिथे थांबली वाट अंधारलेली
तिथे चांदण्यांचा पहारा मिळाला
जरासा कुठे मी विझू लागल्यावर
नवा पेटलेला निखारा मिळाला
कधी ना मिळाले नखाएवढे ही
कधी मग सुखाचा ढिगारा मिळाला
किती भाग्यशाली म्हणू मी स्वतःला
तुझ्या काळजाचा निवारा मिळाला
पुरे द्वैत आता इथे थांबणे हे
पुढे चालण्याचा इशारा मिळाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुरे द्वैत आता इथे थांबणे हे
पुरे द्वैत आता इथे थांबणे हे
पुढे चालण्याचा इशारा मिळाला....
अप्रतिम....
मस्त!
मस्त!
धन्यवाद मनोज, धन्यवाद मन्या
धन्यवाद मनोज, धन्यवाद मन्या
सुंदर!
सुंदर!
>>>>>>जिथे थांबली वाट अंधारलेली
तिथे चांदण्यांचा पहारा मिळाला>>>> वाह!
जरासा कुठे मी विझू लागल्यावर
जरासा कुठे मी विझू लागल्यावर
नवा पेटलेला निखारा मिळाला<<<
वा वा
गझल व जमीन आवडली
धन्यवाद सामो, धन्यवाद बेफिजी
धन्यवाद सामो, धन्यवाद बेफिजी
सुरेख गझल
सुरेख गझल
मस्त!!
मस्त!!
धन्यवाद सुप्रिया जी, धन्यवाद
धन्यवाद सुप्रिया जी, धन्यवाद जव्हेरगंज