Submitted by टोच्या on 10 May, 2020 - 04:39
काथवटीत थपथपा थापून
भानोशातील कडक आहारावर
खरपूस, कुरकुरीत भाजलेली
जाडजूड बाजरीची भाकर
नादावर किणकिणणाऱ्या
बांगड्या कळकट लालसर
कुंकवातून ओघळणारा
घाम पुसणारा फिक्कट पदर
आवलावरचं दूध सायीसह
ताटात ओतणारा हात सैलसर
बांधावरच्या गिलक्या दोडक्याचं
कालवण तर्रीबाज लालसर
हिरव्यागार लवंग्या, लसूण
त्यावर जरासं मीठ जाडसर...
पाट्यावर वाटलेल्या खर्ड्याची
सांगा येईल कशाला सर
आता रोजच बनताहेत
रेसिप्या घरोघरी
सांगा कुठला पदार्थ करील
आईच्या हाताची बरोबरी
मातृदिनाच्या शुभेच्छा!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त...
जबरदस्त...
सुंदर...
सुंदर...
एक अस्सल ग्रामीण दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं..
आवडली.
आवडली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद बोकलत,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद बोकलत, नीरू, मंजूताई
एकदम झणझणीत
एकदम झणझणीत
खूप सुंदर
खूप सुंदर
राजेंद्र देवी, मंगेश विर्धे,
राजेंद्र देवी, मंगेश विर्धे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डोळ्या समोर चित्र उभे राहिले.
डोळ्या समोर चित्र उभे राहिले...मस्त
वाह!! अतिशय चित्रमय कविता आहे
वाह!! अतिशय चित्रमय कविता आहे.
मनोजकुमार देशमुख, सामो
मनोजकुमार देशमुख, सामो प्रतिसादाबद्दल धन्यवाद