हिमालयन मोनाल (उत्तराखंडचा राज्यपक्षी) - संगणकावर काढलेलं चित्र

Submitted by अश्विनी के on 22 April, 2020 - 14:03

मध्यंतरी फेसबूकवर एका छायाचित्रकाराने प्रकाशित केलेला फोटो पाहिला होता. त्या छायाचित्रकाराची परवानगी घेवून त्याच्या रेफरन्सने हे डिजिटल पेंटिंग काढले आहे. सध्या work from home असल्याने दिवसभर समोर laptop असतोच. तेव्हा कंटाळा आल्यावर अधुनमधुन रेघोट्या काढत एकिकडे छंद पुरा करतेय.

हे चित्र Paint 3D मध्ये काढले आहे. कोर्‍या डिजिटल कॅनव्हासवर माऊसच्या मदतीने उपलब्ध ब्रश वापरून पक्ष्याची आऊटलाईन काढून रंग भरले आहेत.

monal 8 with WM_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अमित Happy . आज बरेच दिवसांनी मायबोलीवर आले आणि समोर कंसराजची चित्रे दिसली. मग म्हटलं आपणही एखादं पोस्ट करू. कसं पोस्ट करायचं तेही विसरायला झालं होतं Uhoh

सुरेख आहे... रंग फारच आकर्षक Happy . तुम्हाला मिस् केले . आताशा येत नाही का तुम्ही. तुमचे अध्यात्मिक लेखन आणि प्रतिसाद आवडायचे. काळजी घ्या.

मस्तच!! मी खूप पूर्वी (१५-२० वर्षांपूर्वी) डिजिटल चित्र काढली होती. तेव्हा उजवा खांदा जो दुखायला लागला, तेव्हापासून मला माऊसची फार चीड येऊ लागली, जी अजूनपर्यंत गेली नाही. त्यामुळे मला विंडोजपेक्षा लिनक्स आवडू लागलं आणि कामासंबंधीची चित्रं काढायला LaTeX पेक्षा भारी काहीच नाही असं माझं ठाम मत झालय. Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy

आताशा येत नाही का तुम्ही. >>> हो. नाही जमत आहे यायला हल्ली.
तुमचे अध्यात्मिक लेखन आणि प्रतिसाद आवडायचे. >>>> श्रीराम. इदम् न मम.

Bagz, मी फक्त विन्डोज वापरलंय आतापर्यंत Happy

तुम्ही सर्व मायबोलीकरांनीच काळजी घ्या. घरी राहा. सुरक्षित राहा.

अप्रतिम !
मीं ' पेंट' मधे खूप चित्रं, व्यगचित्रं काढलीं आहेत व काढतोही आहे ( फार चांगली आहेत , असा अजिबात दावा नाहीं). चित्रासाठी सर्व बारकावे माऊस वापरून इतक्या सफाईने दाखवणं किती कठीण आहे हें म्हणूनच मीं समजूं शकतो. खरंच मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!

वावे, Sanjeev.B , TI, धनुडी आणि भाऊकाका... धन्यवाद. भाऊकाका, मी तुमच्या व्यंगचित्रांची फॅन आहे Happy

Pages