अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे- अनिल अवचट

Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 April, 2020 - 02:16

'अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे'
अनिल अवचट

प्रास्ताविक-
(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र – डिसेंबर 1995 मध्ये ही अनिल अवचटांची मुलाखत प्रकाशित झाली होती. मुलाखत घेणारे दोघेही माझे अंनिस चळवळीतील हितचिंतक आहेत. 2019 मधे म्हणजे मागील वर्षी या मुलाखतीच्या अनुषंगाने अवचटांशी गप्पा मारायला गेलो होतो. त्यांना या मुलाखतीची प्रत दिली व 24 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला यात काही बदल करावासा वाटतो का? आपल्या विचारांच्या छटेत काही बदल करावा वाटतो का? हे अजमावणे हा हेतु बाळगून मी आलेलो आहे असे सुरवातीलाच सांगितले. एकूण गप्पांनतर असे जाणवले की अंधश्रद्धा निर्मूलन वा तत्सम विषयी त्यांना आज काही वेगळे म्हणायचे नाही.माणसांना समजून घेणे हा मूळ गाभा कायम आहे)
[अनिल अवचट आहेत सव्यसाची पत्रकार, कलाकार, लेखक, व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पण आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते आमच्या चळवळीचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय प्रभावीपणे लोकांसमोर आले ते अवचटांच्या लेखणीतून. त्या संदर्भात त्यांची संभ्रम, धार्मिक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रत्येक प्रश्नाकडे चिकित्सक आणि स्वत:च्या खास वेगळ्या दृष्टीने पहाचे हे अवचटांचे वैशिष्ट्य आहे. टी. बी. खिलारे आणि प्रभाकर नानावटी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत तुम्हाला त्याला प्रत्यय येईलच..]

व्यसनमुक्तीचं कार्य करीत असताना अंधश्रध्देच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला काय आढळले?

अमली पदार्थाने दारुने व्यसनग्रस्त असे जे लोक येतात ते अनेक अंधश्रद्धेचे प्रकार करूनच आलेले असतात. देवऋषाकडे मांत्रिकाकडे जाऊन आलेले असतात. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे या गावात एक बाबा आहे. त्याच्याकडे बरीच व्यसनग्रस्त माणसे जाऊन नंतर आमच्याकडे आलेली असतात, आम्ही जेंव्हा त्यांच्या पूर्वायुष्याची माहिती घेतो, तेव्हा त्यांना विचारतो, 'डोणजे रिटर्न का ?' तर ते 'हो' म्हणतात. 'काय झालं तेथे ? फायदा झाला का?' असे विचारल्यावर सांगतात की, 'बाबाकडे गेल्यावर सुटते असे ऐकले होते, त्यामुळे तिथ जायच्या अगोदर आम्ही भरपर पिऊन घेतली, त्यामुळे तिकडे काय झालं ते मला आठवत नाही. तिकडून आल्यानंतर काही जणाचे काही दिवस पिण बंद होतही. परंतु नंतर चालूच रहात. मला अस वाटत का सायकॉलोजिकल शॉकचा परिणाम म्हणून काही दिवस ते दारू घेत नाहीत. गळ्यात माळ घालणे, शपथ घेणे याचा मानसिक परिणाम होऊन सुटतही असेल, पण ते थोडे दिवस टिकत. पण व्यसनाच्या मागचं कारण शोधून काढणं किंवा प्रश्नाला स्वत: तोड द्यायला शिकवणं, नातेवाईक-मित्र याची मदत त्याला मिळवून देणं हे सगळं आम्ही करतो. ही प्रक्रिया काही तेथे झालेली नसते. बाबा, महाराज याच्याकडे गेल्यावर काहींना फायदा होतो काहींना होत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकडे जाऊ नका असे सांगत नाही.

चळवळीचा आदर्श कार्यकर्ता कसा असावा असे आपल्याला वाटते?

हजारों वर्षे रूजलेल्या कल्पनांशी लढा देताना फार आक्रमक पद्धतीने बोलून चालत नाही. लोक अंधश्रद्धेचा एखादा प्रकार करतात तो का ? हे कार्यकर्त्याने समजून घेतले पाहिजे आणि त्यास पर्याय सुचवला पाहिजे, जे मांत्रिक, गुरू, महाराज आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही कडक बोला परंतु जे त्यात सापडलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. सर्वसामान्य लोकांविषयी जर प्रेम असेल तरच तो चांगला कार्यकर्ता होऊ शकतो, माणसं अंधश्रद्धेमधे का गुरफटतात, एका टोकाला का जातात, हा आपल्याला वरकरणी जरी वेडेपणा वाटत असला तरी त्यांचं जीवन आपल्याला काहीही माहिती नाही. तो कुठल्या परिस्थितीत एखाद्या बुवाकडे, एखाद्या विधीकडे आकर्षित झाला हे आपल्याला काहीही माहिती नसताना त्याची निर्भत्सना करण हे फार क्रूर आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टी कशी उपयुक्त आहे हे लोकांना दाखवून देऊ शकले पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात अभय बंग व राणी बंग यांनी जे आरोग्यविषयक काम केले आहे त्यामळे तेथील लोकांच्या नाही.'आरोग्यविषयक दृष्टिकोनात फारच बदल झालेला आहे. अरूण देशपांडे यांनी कणकवली येथे शेतीच्या कामात उत्कृष्ठ अशी प्रगती केली आहे

अभय बंग व राणी बंग यांच्या कार्याविषयी सांगा,
अभय बंग याने लहान मुलांच्या आजारांची पाहणी करून असा निष्कर्ष काढला की चालमत्यूचं प्रमाण न्यूमोनियामुळे सर्वात जास्त आहे. सरकार व WHO/ (जागतिक आरोग्य संघटना) यांच्या अहवालानुसार डायरिया (हगवण) हे बालमृत्यूचं प्रमख कारण आहे असं मानलं जात होतं. या निष्कर्षास धक्का देणारा असा हा निष्कर्ष होता, त्याने ९७ टक्के बालमृत्यूचं प्रमाण कमी केलं व अनेक न्यूमोनियाग्रस्त मुले वाचवली. राणी बंगने स्त्रियांच्या आरोग्याविषयी पाहणी केली. स्त्रियांचे आरोग्य हे नेहमीच दुर्लक्षित केलं जातं. सरकार किंवा WHO यांचे कार्यक्रमही प्रसूतिपूर्व व प्रसुतिनंतरची काळजी किंवा कुटुंबनियोजन यावर आधारलेले असतात. म्हणजे मुलाच्या जन्माशी संबंधित तेवढ स्त्रीचं क्षेत्र आहे अस मानलं गेलं आहे परंतु स्त्रीच्या आरोग्य विषयक ज्या समस्या असतात त्या बघितल्या जात नाहीत. दोन गावातील पाचशे-सहाशे स्त्रियांची त्यांनी पाहणी केली . प्रयोगशाळेतील चाचण्या करून असा निष्कर्ष काढला की ९२ टक्के स्त्रिया ह्या कुठल्या ना कुठल्या आरोग्य विषयक समस्येने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी दवाखाना काढला.सुईणींना प्रशिक्षण देऊन त्याच्यामापत रोगनियंत्रण केले . लोकांच्या श्रद्धांचा आदरही ठेवला आणि त्याचबरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही सहजगत्या केल.

पांडरंगशास्त्री आठवलेंनी लाखों लोक व्यसनमुक्त केली असं सांगतात. मोठ्या प्रमाणात माणस अशा व्यसनमुक्त करता येतात का?

खरोखरी व्यसनात ग्रस्त असलेले लोक मुक्त करणे आणि लोकांनी म्हणणे आम्ही व्यसनमुक्त झालो यात फरक आहे. व्यसनात सापडलेल्या माणसाला बाहेर काढणं ही फार कठीण गोष्ट असते. घाऊकपणे लोक व्यसनमुक्त होत नसतात. पण व्यसनविरोधी वातावरण निर्माण होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे..

ध्यानधारणा (meditation) आपण करता का? त्याबद्दल आपलं मत काय?

ध्यानधारणा म्हणजे माणसाचे स्वत:शी काही काळ असणे. स्वत:च्या वर्तनाच, जीवनशैलीचं एकातामध्ये तो निरीक्षण करतो. मग त्याला काही नवीन गोष्टी सुचतात, आपण जे केलं ते बरोबर केल का याचा तो विचार करू लागतो. कोणाला काही आपण बोललो असेल तर त्याचा आपणाला विचार करता येतो. ध्यानधारणा म्हणजे धार्मिक किंवा आत्म्याच्या जवळ जाणारी गोष्ट असेच समजायला पाहिजे असे नाही. ध्यानधारणा बसूनच करता येते असं काही नाही. तस्लीनता - मग ती कुठेही येऊ शकते - माणसाच्या जीवनातला एक मोठा आनंद आहे. इगतपुरीच्या आश्रमात विपध्वनामध्ये दहा दिवस लोक. न बोलता राहतात. पहिले काही दिवस मनामध्ये खूप विचार येतात. पत्तु नंतर मात्र मनाची एक वेगळीच अवस्था येते. त्याचा एक अनुभव माणसाने घ्यावा कधीतरी. त्यात बाईट काही नाही. आपले ब्यबहारातले जे आनंद असलात, त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीने आनंद घेण्याची ताकद आपल्या मनामध्ये असते. ती आपण स्वत पुरती. शोधून काढू शकतो, त्यातून आत्मविश्वासही येऊ शकतो.

योगासने आपणा करता का? त्याबद्दल आपले मत काय आहे?

योगासने मी करतो, ती एक जगण्याची वृत्ती आहे. आपल्या ज्या अतिरिक्त गरजा असतात, (उदा. टीव्ही मंग रिमोट कंटोलटी व्ही डी सी आर कार त्याला अंतच नाही आपल मन जे सैरभैर असतं त्यामुळे आपण निसर्गापासून आणि स्वत:पासून दूर राहतो. योग हे स्वत:ला स्थिर करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शारीरही नीट राहतं आणि मनही. योग ही गोष्ट माणसाला व्यायामासारखी एकदम करता येत नाही. हळू हळू आत्मसात करावी लागते. यात स्पर्धा नसते. कुठल्याही खेळात जी स्पर्धा असते ती माणसाचं मन खाऊन टाकते. खेळ म्हणजे मनसोक्त आनंद, स्पर्धा असेल तर ती माफक असावी.

योगामुळे निरनिराळे रोग बरे होतात, सिध्दी प्राप्त होतात असा दावा केला जातो....

योगामुळे काही रोग बरे होतात, रोग न होण्याची शक्यता वाढते हे मला मान्य आहे. योगासनाच्या निरनिराळ्या आसनांमुळे आपले न वापरले गेलेले शारीराचे भाग आपण वापरतो. औषधाची गरजच भासू नये अशा त-हेची जी काय शारीरिक अवस्था ठेयायची असते ती योगासनामळे येऊ शकते. योगामळे सिडी प्राप्त होतात असे मी मानत नाही.

कुठल्या रोगासाठी कुठली पॅथी वापरावी हे कसं ठरवावं?

शास्त्राने सिद्ध झालेली असतात ती अॅलोपॅथिक औषधे असतात. परंतु अजून शास्त्राने सिद्ध झाल्या नाहीत अशा होमिओपॅथीपासून अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक पॅथीचे दावे खूप असतात. आणि त्या मानाने ते सिद्ध करू शकत नाहीत. त्यामध्ये काही नाही असेही म्हणता येत नाही, होमिओपथिचा काही तोटा तरी मला दिसत नाही. होमिओपॅथीने आजार बरे झालेले मी पाहिले आहेत.

जीवघेण्या आजारात, ज्या रोगाचे निदान झाले नाही अशा आजारात किंवा खात्रीचे ॲलोपॅथीचे उपाय उपलब्ध असताना केवळ रोग मुळातून बरा होतो या आधार नसलेल्या श्रध्देपायी होमिओपॅथी वापरावी का?

शेवटी प्रत्येकानं ठरवावं कोणती पॅथी थापराची, उलट अॅलोपंथीकडे जाणाऱ्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की विनाकारण ॲटीबायोटिक्स घेऊ नका वाट्टेल तशी ऑपरेशन्स् करू नका

रिकी (Reiki) उपचार पद्धतीचा आपण कोर्स केलेला आहे असे कळले. त्यातून आपल्याला काही फायदा झाला का?

रिकी उपचार पद्धतीचा कोर्स मी केला, परंतु मी ते सोडून दिलं. उपचार पद्धतीवाले असे म्हणत होते की वैश्विक उर्जा (cosmic energy) असते, ती आपण आपल्या शरीरात घेऊ शकतो. लहान मुलांना ती लवकर मिळू वायते, कारण त्यांची 'ओपनींगज् (शरीराची 'द्वारे') जास्त खुली असतात, मोठ्या माणसांची बुजलेली असतात. ही वैश्विक उर्जा आपल्या शरीरात न भिनल्यामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात,आपण जर ही बश्यिक उजो आपला चनल्स (मार्ग) खुली करून घेतली तर सर्व रोग दूर होतील असा त्यांचा सिद्धांत आहे. एकदा चैनेल्स खुली दोऊन वैश्विक उर्जा मिळाल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्याला देऊ शकता. संबंध शरीरावरील प्रत्येक भागावर तीन-तीन मिनिटे हात ठेवून त्याचं अवस्थांतर करायचं असतं. त्यामुळे रोग निवारण होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे.
वैश्विक उर्जा असते. आणि तिचा आपला संपर्क तुटलेला असतो, इथपर्यंत ठीक होतं. त्या उर्जेचा संपर्क पुन्हा सुरू झाल्यावर रोग जाऊ शकतील हे एकवेळ आपण मान्य करू. परंतु या माणसाने माझी चॅनेल्स खुली केली. हा भाग न कळण्याजोगा आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला आलेल्या परिणामावरून तम्ही ते ठरय शकता. आता या गोष्टी सिद्ध होणार नाहीत, परंस त्याचे जर परिणाम मिळत असतील तर तुम्ही का मान्य करीत नाही? असे ते म्हणतात. मला स्वत:ला आपण विशेष वेगळा अनुभव घेतला असे वाटले नाही. शरीराच्या निरनिराळ्या भागावर काही मिनिटं हात ठेवल्यामळे थोडं बरं वाटणं साहजिक आहे. ही रिकी उपचार पद्धती मला आता मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मला फायदा होणार अशी लोकांची श्रद्धा झालेली असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या बरं वाटत असाव.

पब, बार याबद्दल काय म्हणता येईल?

उपभोगवाद घातक आहे. पण तो आता आपण स्वीकारलेला आहे. खुल्या आर्थिक धोरणातुन तो आलेला आहे.. आपल्या बिघडलेल्या तब्येतीवर आपण 'मल्टिनॅशनल कंपन्या' (बहुराष्ट्रीय कंपन्या) हे जहरी औषध आपण मागवलं आहे. त्याचा उपयोग होणार की नुकसानच जास्त होणार हे अजून ठरायचं आहे. पब, नग्न जाहिराती ही सर्व उपभोगवादाची अंग आहेत. प्रत्येकजण या उपभोग संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे अडकलेलाच आहे. या संस्कृतीमधून तुम्हाला काही निवड करता आली पाहिजे, एखादी गोष्ट आवश्यक किती आहे? अमुक इतक्या मर्यादपर्यंत मी ते वापरेन असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे

तुम्ही आत्मसात केलेल्या निरनिराळ्या कलांविषयी सांगा ?

माणसांन स्वत:पुरत करायचं म्हंटले तर खूप करता येण्याजोग आहे. प्रत्येक माणस हा कमी-अधिक प्रमाणात कलावंत असतोच प्रत्येक माणसाच्या बाबतीत केलेल्या क्षेत्रात निर्मितीशील अशी वृत्ती असते. तिचं खच्चीकरण हे लहानपणी व पुढे शाळेत गेल्यावर होत असतं. ही वृत्ती जर जागी ठेवली तर स्वत:ला रमेल असं काही ना काही करता येतं. ओरिगामी, काष्ठतक्षण (Wood carving) बासरी यामध्ये मला आनंद मिळतो. विकणे प्रदर्शन करणे अशी वृत्ती मी कलेला आजपर्यंत लावलेली नाही, त्यामुळेच माझ्यातल्या कला स्वतंत्र आहेत असे मला वाटते. स्पर्धात्मक जगानं आपल्याला असं शिकवलंय की मुलं थोडी कुठं चित्र काढायला लागली की त्याला स्पर्धेत पाठवायची तयारी सुरू होते. स्पर्धेने तुम्ही त्याला झाकोळून टाकता. स्पर्धा मी माझ्या जीवनातून काढून टाकलेली आहे, त्यामुळे निर्भेळ आनंद मी घेऊ शकतो, तो कोणालाही घेता येईल. .

आतापर्यंत आपली किती पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यातील अंधश्रद्धा निर्मूलनावर कोणती आहेत. ?

जवळपास माझी पंधराच्या आसपास पुस्तके प्रसिद्ध झाली त्यातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक दोन आहेत. – संभ्रम व धार्मिक,

दिवाळी अंकातच का लिहिता ? इतरत्र का लिहित नाही ?

दिवाळी अंकात मला भरपूर जागा मिळते आणि तो खूप काळ वाचला जातो, मासिके आता बंद पडली आहेत किंवा नीट चालत नाहीत.
या वर्षीच्या दिवाळी अंकात कोणकोणते लेख लिहिलेत ?
1) पाणी व माती - साप्ताहिक सकाळ
२) काका चव्हाणांचं व्यक्तिचित्र - महाराष्ट्र टाईम्स
३) Wood Carving - दीपावली
४) तेंदू- पत्ता- मौज, ५) डावं जग - लोकसत्ता

आपल्या मुलींना आपण शहरी प्रचलित कल्पनेच्या विरोधी अशा नगरपालिकेच्या शाळेतून शिकवलं, त्याची काय कारणे ?

आम्ही असं ठरवलं होतं की आमची मुलं मराठीत शिकावीत. पायी जाता येईल अशी जवळ शाळा असावी . तिसरं म्हणजे गरीब लोक जिथं शिकतात तिथं मुलं शिकावीत, त्यामुळे गरीबांबद्दल त्यांना प्रत्यक्ष माहिती कळेल. त्यांच्यातल्या काहींबरोबर मैत्री असेल, राम मनोहर लोहिया हे सरकारी रूग्णालयात मरण पावले होते. त्या घटनेचा माझ्या मनावर परिणाम झाला, राजकीय नेते जसे विमानाने परदेशात जातात व उपचार करून घेतात तसे त्यांनी केलं नाही. आम्ही दोघांनीही विचार करून दोन्ही मुलांना नगरपालिकेच्या शाळेत घातले त्यापैकीएक आर्टिस्ट झाली व सध्या संगणक शिकत आहे दुसरी मुक्ता, M.A. Clinical psychologist झाली. युनिव्हर्सिटीत पहिली आली. दहावीपासून वरच्या क्रमांकात येतच होती, त्या कुठल्याही. क्लासला गेल्या नाहीत. त्यांनी कुठलही गाईड वापरलं नाही, त्यांना जन्मात आम्ही अभ्यास कर असं म्हंटलं नाही. मुलांना स्वत:हून शिकावसं वाटलं तर ते खरे शिक्षण, आपल्या पोरांच भवितव्य हे आपण फार हातात घेऊ नये त्यांचा त्यांना मार्ग काढू द्यावा. एकदा मुल बाढल्यावर पुढे नातं हे मित्रासारखंच असतं.
______________________________________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे अनिल अवचट सरांची. योगसुत्रे ग्रंथ हा योगाभ्यासाचा पाया आहे. योगाभ्यासामुळे रोग्मुक्ती होते हे मान्य करायचे पण सिध्दी प्राप्त होतात हे मान्य करायचे नाही ? हे सर्व आपल्या सोयीने ठरवतात. अर्थात अनिल अवचट सरांविषयी तसेच व्यसनमुक्ती विषयी आदर आहे. तो कमी होणार नाही.

छान

सिद्धि घेउन करणार क़ाय ? सिद्धिंचे प्रदर्शन करायचे नसते किंवा घाउक बाजारहि करायचा नसतो
एखाद्याने पाठीवर भाकरी भाजल्या किंवा गालीचावरुन उडान करून दाखवले तरी त्याचा समाजाला उपयोग शून्य असतो

प्रघा तुमच्यामते सिद्धी म्हणजे काय?>> हेच जे धर्मग्रंथ पुराण यात वर्णन केलेले अतिमानवीय वा अतिंद्रिय शक्ती. एखादी कला अवगत होणे या अर्थी नव्हे

हेच जे धर्मग्रंथ पुराण यात वर्णन केलेले अतिमानवीय वा अतिंद्रिय शक्ती. उदाहरण?

समुद्र दुभंगून रस्ता तयार झाला, मारुतीने द्रोणागिरी उचलून आणला वगैरे प्रकारच्या गोष्टी का ?

तुम्हाला स्वतःला योगाभ्यासाचा अनुभव आहे का? योगासनांचा नव्हे योगाभ्यासाचा
असेल तर किती कालावधीचा

समुद्र दुभंगून रस्ता तयार झाला, मारुतीने द्रोणागिरी उचलून आणला वगैरे प्रकारच्या गोष्टी का ?>>> पाण्यावरुन चालणे, हवेत तरंगणे,अदृष्य होणे.... वगैरे वगैरे
तुम्हाला स्वतःला योगाभ्यासाचा अनुभव आहे का? योगासनांचा नव्हे योगाभ्यासाचा
असेल तर किती कालावधीचा>>>> नाही.माझा मूळ प्रश्न आहे की म्हणजे योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त होउ शकतात का?

तुम्ही सिद्धी आणि चमत्कार प्रदर्शन यामधे गल्लत करत आहात का?

माझा मूळ प्रश्न आहे की म्हणजे योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त होउ शकतात का? >>>>> हो नक्कीच,

ह्यावर तुमचे मत काय आहे?

एका पेशंटला नर्सिंग होममध्ये भेटायला गेलो. छातीत दुखत होते म्हणून ठेवले होते.
" आता बरे वाटते आहे, रोज **** जप करतो यामुळेच उपयोग झाला."
"हो "म्हणून बाहेर पडलो. म्हणजे नारळपाणी फुकटच गेले.

तुम्ही सिद्धी आणि चमत्कार प्रदर्शन यामधे गल्लत करत आहात का?>>> योग, तत्वज्ञान, अध्यात्म, धर्म, पुराण, संहिता, वेद अशा क्षेत्रात शब्दच्छल होउ शकतात. जसे की नास्तिक चा अर्थ.पुर्वी वेदप्रामाण्य नाकारणार्‍या लोकांना नास्तिक म्हणायचे. आता ईश्वर शब्दाचे वावडे असणार्‍यांना किंवा ईश्वर या संकल्पनेला शत्रू मानणार्‍यांना आणि अश्रद्ध असणार्‍यांना नास्तिक म्हणतात. ओके आपण ग्रेट आहात.

तुम्ही सिद्धी आणि चमत्कार प्रदर्शन यामधे गल्लत करत आहात का?>>> योग, तत्वज्ञान, अध्यात्म, धर्म, पुराण, संहिता, वेद अशा क्षेत्रात शब्दच्छल होउ शकतात. जसे की नास्तिक चा अर्थ.पुर्वी वेदप्रामाण्य नाकारणार्‍या लोकांना नास्तिक म्हणायचे. आता ईश्वर शब्दाचे वावडे असणार्‍यांना किंवा ईश्वर या संकल्पनेला शत्रू मानणार्‍यांना आणि अश्रद्ध असणार्‍यांना नास्तिक म्हणतात. ओके आपण ग्रेट आहात. >>>

हा तुअमचा मोठेपणा झाला. तुम्ही खूपच नम्र आणि विनयशील आहात प्रघा, मला तुमच्याबद्दल अतीव आदर वाटतो आहे. Happy

माझा मूळ प्रश्न आहे की म्हणजे योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त होउ शकतात का? >>>>> हो नक्कीच,
या वर मी म्हणालो ग्रेट आहात. मला जो सिद्धीचा जनसामान्यात असलेला अर्थ अभिप्रेत आहे त्यावर तुमचे म्हणणे अशी सिद्धी प्राप्त होउ शकते असे म्हणणारा मला इथे तुम्हीच भेटलात म्हणून ग्रेट. मला असा अनुभव नाही. तुमचे मत विस्ताराने मांडू शकता अथवा लिंक देउ शकता

सिद्धी म्हणजे नक्की काय?>>एक प्रकारची अतिंद्रिय, गूढ शक्ती किंवा विशेष असाधारण क्षमता असाही अर्थ घेतला जाउ शकतो.पहिला अर्थ रुढ आहे.

योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त होउ शकतात का? ह्यावर तुमचे मत काय आहे? ते तुम्ही कसे बनवले ह्याबद्दल वाचायला आवडेल.

तुमचे मत विस्ताराने मांडू शकता अथवा लिंक देउ शकता >>>
मी अजीबात असे काहीही करणार नाही. अजून माझी तितकी प्रगती झाली नाहीये. शिवाय मग परत तुम्ही माझी स्तुती कराल. मी तुमच्या स्तुतीस पात्र नाही असे समजतो. स्तुती करायचीच असेल तर देवाची करा. प्रेज द लॉर्ड.
दंगलमधे काम करणार्‍या आता चित्रपट संन्यास घेतलेल्या मुलीनेही सांगीतले आहे माझे कौतुक करू नका, तारीफ अल्लाची करा.
https://in.style.yahoo.com/zaira-wasim-urges-fans-not-121907767.html